बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल तो फ्रेंडशिप डे व्हिडीओ पाहून प्रश्नं पडले, आस्तादचं नाइलाजानी मेघाला भेटणं लगेचच कसं सुरु झालं ?
त्याच्या गर्लफ्रेंडची मेघा इतकी क्लोज फ्रेंड, अगदीच बीएफेफ आहे तर डे १ पासून अस्तादनी तोफा डागायला कशी काय सुरवात केली मेघावर ? थोडाही प्रयत्न केला नाही मेघाला त्याच्या गृपमधे घेण्याचा ?
शेवटी मेघा त्याला गल्लीगुंड बेवडा म्हंटली इ. बरेच जाळपोळ झाली अस्ताद-मेघा मधे.
स्वप्नालीला मेघाचा किंवा अस्तादचा कोणाचाच राग नाही आला ?

https://www.youtube.com/watch?v=Qq-4Qmy_vM8

अरे बापरे ऋतुजाने असं statement केलं, तो व्हिडीओ मी नाही बघितला. मेघाला सामान्य लोकांचा खूप सपोर्ट होता. फक्त पी आर इतकं यश खेचून आणू शकत नाहीत.

फक्त पीआरच्या जोरावर जिंकता आल असतं तर स्मिता जिंकली असती Happy
मेघा बिबॉला ‘मेघा धाडे शो’ बनवण्यात यशस्वी झाली होती ही फॅक्ट आहे !

डीजे मे पी आर पण मजबूत. एकता कपूर related.

मेघा पण सर्व ताकदीने उतरलेली, मला एकाने कमेंट टाकलेली bb fb वर एक पी आर एकता कपूरचे आहेत.

पण ती जिंकली स्वतः च्या हिमतीवर, सामान्य लोकांमुळे. पी आर शो जिंकून देऊ शकत नाही, जर पब्लिक साथ नसेल तर.

स्मिता ला पण सामान्य लोकांनी इथपर्यंत आणले.

त्यामुळे मेघा जिंकली ते स्वबळावर आणि केवळ सामान्य प्रेक्षकांमुळे पण हे ऋतुजा ला कळत नसेल तर काय म्हणणार.

आस्ताद आणि मेघात उत्तम मैत्री झाली , अगदी आदित्य पण खुश दिसतायेत.

सोशल मीडियावर एकमेकांचे फॅन्स एकमेकांवर मात्र खालच्या पातळीवर उतरले होते.

ह्या दोघांचे असं नाही पण grp भांडायचे एकमेकांशी तेंव्हा मी लिहिलेलं की इथे प्रेक्षक भांडतायेत. उद्या हेच सर्वजण बाहेर एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील, ते अपरिहार्य आहे कारण एका क्षेत्रात आहेत आणि इथे लोकं त्यांच्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन भांडतायेत Happy .

नाही ग, मेघाचा पीआर एकता कपुरचा पीआर असण्याइतका बिग शॉट असेल असे मला वाटत नाही.
इन्स्टाग्रॅमवर आहे बघ त्याची माहिती, मोस्ट्ली मराठी कलाकार, @ brandbaajaasocial

हो काय, एकाने मला लिहिलेलं. मी मेघाचे कौतुक केलेलं तेव्हा. मी काही खोलात नाही गेले, असेल ब्वा, असुदे की हा विचार केला. खूप दिवस झाले, दोन महिने होऊन गेले असतील.

https://www.youtube.com/watch?v=V1HSmr08BE0

स्मिता बिझी झालीय खूप. ती कामं असतानाचं आतमध्ये गेलेली. तिला स्वतःलाच इतकी पुढे जाईल वाटलं नव्हतं, लवकर बाहेर पडेल ती असं वाटलेलं. बाहेर पडल्यापासून तिला आराम नाही मिळाला अजिबात.

मस्त दिसतेय मेघा, फार गोड. साक्षीपण कित्ती गोड आहे आणि आदित्य handsome.

हल्ली मी youtube जास्त बघायला जात नाही. स पु आणि स्मिताचेच जास्त असतात. स्मिताचे दोन बघितल्यानंतर सोडून दिले कारण घरात तिला cofused म्हणायचे बाहेर तिला तोच प्रश्न विचारतात, ती तेच उत्तर देते. ती घरात सांगायची मी नाहीये, येडा बनकर पेढा खातेय, कोणी लक्ष दिले नाही असं उत्तर दिलं म्हणून सईने अजून वेड्यात काढलं तिला. मग stand घ्यायला नको, वाईट कोणाबद्दल बोलायला नको म्हणून ती cofused आहे दाखवायची असं बाहेर येऊन सांगते. तर ok, त्यामुळे मला ती फार फेक वगैरे वाटली नाही पण interviews फार बोअर होतात तिचे. तेच प्रश्न, तीच उत्तरे. काही वेगळं नाही. बाहेर पण जास्त वेळ confused असणे आणि नसणे यावर घालवतात किंवा तिचे तेच तेच wardrobe दाखवतात, so bored. म्हणून मी आता स्मिताचं पण बघत नाही. स पु मध्ये इंटरेस्टचं नाही.

मेघाचे कमी असतात त्याचं कारण ती जिंकली त्यामुळे channel ची संमती लागणार तिला बहुतेक, contract असणार वर्षाचे, असं मला वाटतं.

नवरा असावा तर असावा प्रोग्रॅम कधी पाहिला नाही पण हखा होस्ट करते माहित आहे.
मेघा आणि आदित्य एपिसोड दाखवणारेत आहे म्हणून उत्सुकता वाटली पण त्याच बरोबर तो फट्टु पुष्करही असणार आहे म्हणे त्या एपिसोड मधे, त्यामुळे आता बघावासा वाटत नाहीये.
त्याची ती चाचपडत अडखळत बोलण्याची धडपड, किरकिरीत हसण , भिरभिरती नजर कंटाळा आणि चिडचिड होते या फेक माणसाचं थोबाड दिसलं कि !

पुष्कर त्याच दिवशी नसेल, जसमीनने नवरा नसावा तर कसा ते सांगावं Lol

तो prgm बघितला नाही कधी पण एकादिवशी एक असं असेल तर वेगळे एपिसोडस असतील.

मला मेघा आदित्य बघण्यात interest. Voot वर बघेन म्हणजे पुष्करला टाळता येईल.

मेघाचा सगळ्यात फन इंटरव्ह्यु असणार कारण इंटरव्ह्यु घेत आहेत ऑनेस्ट्ली इन्सेन चे राजेश आणि विकास Happy
राजेश विकासला मेघा भेटली, मीच भरून पावले, सर्वात सुपर फॅन्स होते ते ! मेन म्हणजे आता मेघाला अगदी खरेखुरे अनसेन्सॉर्ड भाषेत फिडबॅक्स मिळणार सई पुष्कि बद्दल Biggrin
https://youtu.be/JmjIXl35mAk
मेघा म्हणे बिबॉ हाउस मधे राजेश विकास मेघा हे क्रेझी ट्रायो हवे होते Proud

या क्लिप मधे मेघाचे स्टेटमेन्ट एअरिंग्स आणि ड्रेस मस्त आहे.
https://youtu.be/y_wdwy42Uws

रोज इथे हा धागा वर येतोच. बिग बॉस हे प्रकरण कधीच पाहीलेले नाही. मेधा धाडे कोण हेही ठाउक नाही. पण एव्हढ्या मोठ्या संख्येने हा कार्यक्रम पाहतं हा माझ्यासाठी धक्काच आहे. हा धागा उघडल्यावर फोटो पाहिला. पण कधीच पाहिल्यासारखे ही वाटले नाही ...

सुलु, सैड्या पुष्की चा मस्त होता, धमाल Lol . फक्त एंड ओबामा मेघाचा सेक्रेटरी हे अति होतं.

बाकी फार नाही पूर्ण बघितले. विंदू दारासिंगला बघून मेघा छान दिसत असली तरी मी नाही बघितलं पूर्ण ते डीजे. माझ्या तो डोक्यात जातो, विंदू दारासिंग.

मेघाचा ड्रेस छान आहे वरच्या व्हिडीओत !
आदित्यला सारखी कॅमेराकडे बघून बोल म्हणून इशारे करतेय, तो बिचारा सवय नसल्यामुळे कॅमेरा ऐवजी प्रश्नं विचारणार्याकडे बघतोय सारखा Proud

हो ग डीजे मला खूप आवडला आणि ह्याच ड्रेसमध्ये आदित्य आणि साक्षीबरोबर काही फोटो बघितलेले मध्ये, मोस्टली ह्याच prgm संदर्भात असतील, ती साक्षीपण कसली गोड आणि सही दिसतेय. तिचे केस छान आहेत.

आदित्यला सारखी कॅमेराकडे बघून बोल म्हणून इशारे करतेय, तो बिचारा सवय नसल्यामुळे कॅमेरा ऐवजी प्रश्नं विचारणार्याकडे बघतोय सारखा >>> Lol अगदी अगदी हेच मनात आलं.

Pages