बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह खा फारच गुंड होती. तिला हाकलले असते पब्लिक ने, स्वतःच गेली. सोमी वर तिला पण दाजी आणि चिपनिस पेक्षा जास्त शिव्या पडल्या होत्या.

ऋतुजा अफलातून व्यक्ति आहे. प्रामाणिक आहे, धाडसी आणि विचारीही. ती रहायला हवी होती. मेघाला टक्कर देऊ शकली असती ती. असो, इथूनपुढे तिला चांगली कामे मिळोत. एखादी जबरदस्त ॲक्शन फिल्म मिळायला हवी. बॉक्सिंग खेळाडूचा रोल मिळाला तर भारीच. Happy

हो ऋतुजा असती तर टक्कर की फाईट झाली असती मग मेघा जिंकली असती का नाही कोणास ठाऊक

म्हणजे एकुणात मेघासाठी लक आणि ऋतुजा साठी बॅड लक ठरली ह खा

ओहह badluck खरंच. पन्नास दिवसाच्या आत बरी झाली असती तर reentry दिली असती का तिला. पुढच्या सिझनला घ्या तिला. पण तोपर्यंत काहीतरी सुरु असेल तिचे.

ही मला आवडायला लागली जेव्हा तिने सईची गुलामगिरी नाकारली. सई असं कर तसं कर imposed करत होती तेव्हा तिने मस्त उत्तर दिलं. Taskपण छान खेळायची.

रिया जिंकली मेघाचं असती. मेघाला आधीपासून सपोर्ट खूप होता प्रेक्षकांचा पण ऋतुजा दुसरी किंवा तिसरी आली असती.

मेघा ऋतुजा जोडी पाठवा नाहीतर हिंदी bb ला. मेघाला श रा हवी आहे बरोबर, सईला मेघा. सईला मुळीच पाठवू नये. स्मिता बिझी होतेय बहुतेक नव्या मराठी मुवीत, एक लंडनमध्ये शूट झालाय, त्याचं dubbing सुरु आहे, त्यामुळे ऋतुजा मेघा बेस्ट हिंदी bb साठी.

सगळ्यांना मेघा हवी आहे जोडी म्हणून , तिच्या हेटर्सना सुध्दा :).
हा प्रश्नं सुशान्त, रेशम एलिमिनेट झाल्यावर या दोघांनाही विचारला होता , तेंव्हा मेघा काही अजुन जिंकली नव्हती तरी त्यांनीही मेघाच हवी सांगितलं.
सई सांगेल यात काही नवल नाही, आली वाटतं पुष्कर विमानातून जमिनीवर Proud
बाकी हा प्रश्नं गंमत म्हणून विचारत असतील, हिंदीत यांना पाठवतील असं वाटत नाही, त्यातून बिबॉ मराठीने पाठवलंच खरच तर कदाचित मेघा-पुष्कर जातील पहिले दुसरे म्हणून !

पुष्कर विमानातून जमिनीवर Lol डीजे. चांगलंच जमिनीवर आणलंय आईबाबांनी तासमपट्टी करून असं दिसतंय.

मेघा म्हणाली मी बॅग्ज unpacked केल्या नाहीत अजून, त्याच घेऊन जाईन. नको ग आता नवीन shopping कर, तेच परत बघायला लागतील कपडे.

फायनल विजेती घोषित करण्या आधी मेधा व पुष्कर चे हात म मां नी जरा अधिकच वेळ घट्ट पकडून ठेवले होते असे मला वाटले.....काही गरज नव्हती!

आस्तादने पत्रकार परिषदेत म्हंटलेलं गाणं कुणाकडे आहे का? "तरीही हवी इम्युनिटी" लिरीक्स हवी होती.

मी हिंदी बिग बॉसबद्दल फक्त ऐकून होते. काल युट्युबवर डॉली बिंद्रा, श्वेता तिवारी असलेल्या दोन-तीन क्लिप्स पाहिल्या. बापरे, काय भयंकर आहे ती डॉली बिंद्रा. तिचं ते कचकचून भांडणं, अंगात येण्याचा एपिसोड Uhoh ... दोन तीन मिनिटं सुद्धा बघणं अशक्य झालं. आपल्या मराठीतले सगळेच खरंच खूप नॉर्मल होते. अगदी आस्ताद, सुशांत, राजेशचा राग सुद्धा सात्विक संताप कॅटेगरी वाटला तिच्या थयथयाटापुढे आणि ती म्हणे फायनलिस्ट होती Uhoh
हिंदी बिग बॉस कधी बघू शकेन असं वाटत नाही...

अगो म्हणून तर मी तिसऱ्या bb पासून सोडलं बघणे. ती बिंद्रा आणि अजून एक कोण होती त्या कसल्या कचाकचा भांडायच्या तो शॉट एकदा बघितलेला सर्फिंग करताना. नवीन सिझन सुरु झाला की बघायचा प्रयत्न करायचे पण नेमकी कचकच वचवच असायची कोणाची तरी, मग डेरिंग व्हायचंच नाही.

मेघा वगैरे गेली तर आता एखादा बघायला घेतला तर.

मेघा ऋतुजा जोडी पाठवा नाहीतर हिंदी bb ला. मेघाला श रा हवी आहे बरोबर, सईला मेघा >>>> नशीब सईने पुष्करच नाव नाही घेतल ते. Lol

म्हणून तर मी तिसऱ्या bb पासून सोडलं बघणे. >>> मी सुद्दा तिसऱ्या सिझनपासून सोडून दिल. अश्मित पटेल- विणा मलिकचे चाळे सुरु झाल्यापासून. पहिला सिझन थोडाफार बघितला होता.

डॉली बिन्द्राच्या फक्त भांडणाच्या क्लिप्स पाहिल्या होत्या , मला अ‍ॅक्चुअली हसुच आलं ते बघून, जो सूर ती लावायची !
पब्लिकला ती हवी होती , आवडती स्पर्धक म्हणून नाही, खूप एंटरटेन्मेन्ट द्यायची म्हणून !
गरीब बिचार्या मराठी बिबॉ ला आउ बहुदा डॉली बिन्द्रा सारखी टीआरपी देईल असं वाटल होतं Biggrin

अश्मित पटेल- विणा मलिक >>> हे तिसरा वाले का. मला अश्मित आवडला होता मर्डरमधे पण वीणा नाही आवडत म्हणून हा सिझन बघायला घेतलाच नव्हता.

अजून तो एक सीझन कुठला त्यात तनिशा, बालिका बहुची मोठी आनंदी, ती राजपुत आणि तो अरमान कोहली होता, त्याला बघितल्यावर डोकं दुखायचं माझं म्हणून तो ही सिझन बघितला नाही.

तिस-यापासून मी फार बघितलंच नाही हिंदी bb पण मराठी news channels वर जे tv सिरियल्स संबंधित prgm असतात त्यात दाखवायचे shots, ते बघायचे.

इथे मागे धागा आलेला हिंदी bb वर , तेव्हा बघायचा प्रयत्न केला पण bored.

अजून तो एक सीझन कुठला त्यात तनिशा, बालिका बहुची मोठी आनंदी, ती राजपुत आणि तो अरमान कोहली होता, त्याला बघितल्यावर डोकं दुखायचं माझं म्हणून तो ही सिझन बघितला नाही.
>>
तो मी संपुर्ण फॉलो केलेला. मला तनिषा आवडायची (काजोलची बहिण म्हणुन Proud ) मला फक्त अरमान - तनिषा आणि गोहर - कुशल च आठवतात त्या सिजन मधले, बाकी काहीहीहीहीहीही आठवत नाही

तनिषा मला पण आवडायची, पण तिचं अरमानबरोबर अफेअर आवडत नव्हतं, ती किती छोटीसी नाजूक वाटायची त्याच्यापुढे, त्यांची लवस्टोरी बघायचं डेरिंग नव्हतं. हिंदी bb मध्ये काय चाललंय ते मात्र रोज मराठी news channel वर बघायचे Lol

गोहर कुशल त्याच सीझनमध्ये होते का, ok. सॉलिड confused.

एखादवेळेस मी लिहिलेले सर्व एका सीझनमध्येपण नसतील Lol मीन्स डोक्यात माझ्या केमिकल लोचा झाला असेल , दोन तीन सिझन मिक्स.

मलाही अपुर्व आत्ता आठवला Happy

गोहर आणि तनिषा ने लाईट बंद करुन जाण्याचा सिन मला व्यवस्थीत आठवतोय.

गोहरचे नातेवाईक आलेले पण तनिषाची फक्त आईच आलेली हे बघुन मला वाईट वाटलेलं पण आठवतंय.

गोहर बिग बॉस आधी मला फारशी माहीत नव्हती, मग ओळखु यायला लागली

गौहर आणि तिची बहिण निसार बहुतेक, दोघी हिंदी सिरियल्समध्ये काम करायच्या.

हेजल आवडायची मला, फार गोड होती. ती आता क्रिकेटपटू युवराजसिंगची बायको आहे.

गोहर मला बिग बॉस च्या ही 8 ते 10 वर्ष आधीपासून माहीत आहे. V की m वर कुठल्यातरी गाण्यांचा प्रोग्रॅम ची होस्ट होती. तेव्हा खूप मस्त दिसायची ती

https://www.youtube.com/watch?v=aGR4DSwS-Cg

स्मिता मेघा आणि मेधा मांजरेकर यात confused झाली का. अगदी शेवटी तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण मेघाचं नाव नाही घेतलं.

पार्टीत पण helping hand होती मेधा मांजरेकर यांचा.

स्मिता आधी किचन मध्ये खूप असायची शेवटी शरा आल्यावर मेघा शरा दिसायच्या आणि स्मिता कधी कधी भाजी कटींग वगैरे. तिला फार कोणी भाव द्यायचं नाही बहुतेक कारण एकदा श रा म्हणाली की स्मिताला सांग ये किचनमध्ये, मी काही बोलणार नाही तिला, तिला करुदे हवं ते.

Pages