बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणती kbc - तीच का ज्यात आलीया भट ला कोणत्या ऍक्टर ने किस केला विचारले होते.>>>>>> च्र्प्स, तुम्हाला केबीसी माहित नाही? धन्य आहे! तुम्ही कॉफी विथ करण बघितलेल असाव कदाचित. तुम्ही उल्लेख केलेला प्रकार त्यात असतो.

श्रीशांत फक्त नावाने शांत असावा. >>>>> +++++११११ शांत नव्हताच कधी तो आपल्या करियरमध्ये. खुप कॉन्ट्रोवर्शियल आहे तो.

हे वाचा:

https://en.wikipedia.org/wiki/S._Sreesanth

च्रप्स, केबिसी बरेचदा बघते, अमिताभ फार ग्रेसफुली करतो ह्याचं संयोजन त्यामुळे तुम्ही म्हणता ते दुसरं काही असावं.

शनिवारी साम प्रिमीयर मध्ये , मेघाचा गणपती दाखवला 'गणपती विशेष' मध्ये. त्यात ती तिच्या आगामी प्रोजेक्टसविषयी बोलत होती. तिला महेश मान्जरेकरचा एक चित्रपट मिळालाय. तसच कलर्स मराठीवर एका शोच अ‍ॅन्करिन्ग करणार आहे. त्या शोबद्दल नक्की अजून काय ठरल नाही म्हणे.

सुशान्त शेलार आणि आस्ताद काळे हयान्च नाटक आलय, ' मि. अ‍ॅन्ड मिसेस लान्डगे' नावाच. 'वय विसरायला लावणारी कॉमेडी' अशी टॅगलाईन आहे नाटकाची. तुपारे च्या 'वय विसरायला लावणारी प्रेमकथा' ची कॉपी केलीय. Proud

स्मिता गोन्दकरचा डिप्रेशनवरचा तिने शेअर केलेला अनुभवः

download_0.png

https://www.voot.com/shows/assal-pavhane-irsal-namune/1/631418/revisitin...

मेघाने वोटिन्ग मॅनेज केल होत का? हया प्रश्नावर मस्त उत्तर दिल.

रेशमने 'तुम्ही कितीवेळा प्रेमात पडता? ' हया प्रश्नावर 'गिरे तो भी टान्ग उपर' छाप उत्तर दिल. प्रेम अनेक प्रकारच असत अस ती म्हणाली. जसलिन सुद्दा हेच म्हणाली होती. Lol

भुषण कडू सुरुवातीच्या स्किट मध्ये दिसला.

गाण्यावरुन चित्रपट ओळखा गेममध्ये सईला 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे' गाण दिल होत. Proud प्रेमाचे चर्चे घरात नाही पण घराबाहेर खुप झाले अस काहीतरी म्हणाली ती.

शेवटी इन्टरविव्ह्यु सिरियस नोटवर (महिलान्वर होणारे अत्याचार) गेला. सगळया जणी 'लोकान्ची नजर, मानसिकता बदलली आहे. गुन्हेगारान्ना कठोर शिक्षा व्ह्यायला हव्यात.' अस म्हणत होत्या. पण बिबॉ मध्ये मेघा, रेशम, आउ एकमेकीन्च्या कपडयान्विषयी कित्ती निगेटिव्ह बोलत होत्या. Uhoh

असो. आज दुसरा भाग आहे.

Amitabh ने KBC मध्ये हा प्रश्न विचारला होता
आलिया भट ला कोणत्या actor ने किस केले नाही? आणि 4 option दिले होते त्यात सिद्धार्थ, वरूण, अर्जुन कपूर आणि एकाचे नाव होते.

हे मन बावरे मधे शरा आहे म्हणुन एक-दोन भाग बघितले, सिरियल लाउड आहेच पण शरा बरिच यन्ग आणि छान वाटतिये.

तो पाचजणींचा भाग अगदी पाच मि बघितला आज दुपारी, किती वाईट मराठी सगळ्या जणींचं. मेघा काहीही हाताशी नसताना सरळ मुंबईत आणि तेही टीव्हीवर काम करायला आली त्याचं आश्चर्य वाटतं. रेशमची गुलाबी टिकली जात नव्हती त्या पांढ-या साडीवर. सई अगदी जुना ड्रेस घालून आलीये असं वाटत होतं, म्हणजे जुन्या फॅशनचा. स्मिता जाड झाली आहे. पहिल्याच उत्तरात फजित्या म्हणाली आणि मग नेहेमीसारखी सारवसारव, मी मुद्दाम म्हणाले वगैरे. आऊंना नेहेमी तोच प्रश्न विचारतात, तुला सगळे घाबरतात का आणि यंव न त्यंव. मला नाही वाटत कोणी तिला भाव देत असेल, शूटिंग झालं की तू कोण आणि मी कोण. कपडे आणि दागिन्यांची आवड असल्यामुळे माझं नेहेमी तिथे पहिले लक्ष जातं.

Amitabh ने KBC मध्ये हा प्रश्न विचारला होता
आलिया भट ला कोणत्या actor ने किस केले नाही? आणि 4 option दिले होते त्यात सिद्धार्थ, वरूण, अर्जुन कपूर आणि एकाचे नाव होते. >>> हो काय असा प्रश्न होता, मी बघितलं नसेल, असा विचित्र प्रश्न का निवडला टीमने, अमिताभला अचानक समोर येत असतील प्रश्न, त्याला माहीती नसणार, अर्थात त्याने टीमला विचारायला हवं होतं. बरेच मिस्ड होतात. यावेळी ठरवलेलं आवर्जुन बघणार तरी खूप एपिसोडस मिस्ड होतात. सातत्य राहीलं नाहीये. परत नेटवर मुद्दाम बघितलं जात नाही. पण मला आवडतो अमिताभ आणि हा शो.

तो पाचजणींचा भाग अगदी पाच मि बघितला आज दुपारी, किती वाईट मराठी सगळ्या जणींचं. >>> मी दोन्ही बघितले नाहीत, आता हे वाचून बघू का नको विचार करतेय.

मेघा हिन्दी बिग बॉसमधे येतेय वाइल्ड कार्ड एंट्री ,सोमवारपासून !
होप इथेही तिने गेम चेन्जर बनवून दाखवावे !

मेघा हिन्दी बिग बॉसमधे येतेय वाइल्ड कार्ड एंट्री ,सोमवारपासून !
होप इथेही तिने गेम चेन्जर बनवून दाखवावे !>>> अरे वा ! पण विनर असल्याने आतल पब्लिक आधिच विरोधात असेल.

मेघा गोड दिसत होती प्रोमोमध्ये!
पण मराठीत ती एकदमच अंडरडॉग होती.... इथे सेलेब म्हणून येतेय.... जरा स्ट्रॅटेजी बदलून खेळायला लागेल तिला!

मराठीत जे वर्क झालेले ते सगळे इथे वर्क होईलच असे नाही!

मस्त, आता पाहिलं! आता काही जरा इंटरेस्ट निर्माण झाला हिंदी बी बॉ मध्ये. Happy
तिला आधीच घ्यायला पाहिजे होतं खरं तर!

मेघाला हिंदी बिग बॉस मध्ये घेतले आणि तिथेही तिने दमदार
काम करत आहे हे पाहून आस्ताद फुसकी सई रेशम जुई भूषण जळून राख झाले असतील .

बाहेर पडल्यावर मेघा रेशम मध्ये दोस्ती झालीय त्यात शिल्पा शिंदे रेशमची मावसबहिण आहे, त्यामुळे रेशमला आरसा दाखवला असेल तिने. स्मिता तर आधीही मेघाशी चांगली वागायची आणि मेघाही तिच्याशी.

प्रश्न फक्त आता दोन जळू पु आणि स चा आहे. ते कायम जळत राहणार तिच्यावर. तिच्या सक्सेस पार्टीला पण नव्हते ते.

जुईला फार काही कोणी विचारत नाही. आ ची होणारी बायको आणि मेघा फार जुन्या मैत्रिणी आहेत त्यामुळे आ आणि मेघा पण एकत्र आले मागे, त्यांची कौटुंबिक पार्टी झाली जी राजन ताम्हाणे यांच्या घरी झाली.

जुईची नवीन मालिका येत आहे 'वर्तुळ' नावाची झी युवावर. जुई त्यात गृहिणी झालीये. मालिका हॉरर आहे अस प्रोमोवरुन वाटतय.

Pages