तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

अरे किती हे सुभा प्रेम तुमचे, छान वाटते वाचायला.☺️ पण मला काही तो इतका नाही आवडत. ह्या शिरेलीत जर तो नसता तर कुठला दुसरा म्हातारा घेतला असता हे काही सुचत नाहीये

हिरोहिरविनीपेक्षा अंबाबाई, पीरबाबा, जोगतीण, फकीर ह्यांनाच जास्त टास्कस् आहेत>
यांची कसली पादरी चॅलेंजेस? Uhoh>>
ईशा ची लोद्याई , चिरकुट इशा>>।
Rofl Rofl

तो तिच्यावर खरं प्रेम करत आहे म्हणून तिच्यासाथी तो तिच्या वयामुळे काळजी घेत आहे.>>>> उद्या हाच ‘बच्चा बच्चा’ करत फिरेल तिच्यामागे Happy

सुभाने पार तोन्ड लाल करुन घेतल होत गुलाला फासुन , मन्दिरात एन्ट्रिला किती छान दिसत होता.

हिरोहिरविनीपेक्षा अंबाबाई, पीरबाबा, जोगतीण, फकीर ह्यांनाच जास्त टास्कस् आहेत >>> Lol

त्या सॉन्याचे नाव इथे टाइप करताना आपल्याला वैताग यावा, २-३ वेळा बॅकस्पेस मारावी लागावी म्हणून खास तसे ठेवलेले आहे.

ह्या शिरेलीत जर तो नसता तर कुठला दुसरा म्हातारा घेतला असता हे काही सुचत नाहीये>>सुभाला पर्याय नाही. Happy
तरुण सुभा पेक्षा म्हाताराच सुभा आवडलाय सगळ्यांना. फॅन स्पेक्ट्रम पण मोठा आहे त्याचा. आमच्याकडे आज्जी व नात दोघी डोळे लावून बसतात त्याच्या दर्शनासाठी.

आजच्या भागातील बुके देण्याच्या वेळी कसले expressions दिले सुभाने. हा माणूस अख्या शरीरातून अभिनय करतो, पण चुकीच्या सिरियल साठी अभिनय वाया घालवतोय असं वाटतं सारखं.
बादवे झी अवॉर्डस मध्ये बहुतेक बक्षिसं या सिरियल ला मिळाली म्हणे.

आजच्या भागातील बुके देण्याच्या वेळी कसले expressions दिले सुभाने. हा माणूस अख्या शरीरातून अभिनय करतो,>>>>>>>...खरच..मी तर माेठी पंखा झालिय.....सुभा ची...♥♥♥♥♥

मायरा आणि झेंडे कसले खेटून उभे राहीलेत काॅ. रूम मधे Happy

मला एक प्रश्न पडतोय...जर विसं तिच्या अनुरुप वयाचा असता, तरी ती तो आवडतो व लग्न करायचंय असं सुचवू शकली असती का? मग तिनं नक्कीच हैसियत/ खानदान की इज्जत वगैरेचा विचार केला असता आणि प्रेम व्यक्तही केलं नसतं कदाचित. मग अगदी विसं नं पुढाकार घेतला असता तरच दोघांचं लग्न झालं असतं. पण आता ती उघडपणे प्रेमाचा प्रस्ताव मांडते तेव्हा त्यात " तू म्हातारा आहेस तरी मी तुला ऑफर देतीये, बघ विचार कर अन् हो म्हण असाच अर्थ निघतो ना?

कणेकरांनी सॉल्लिड लिहिल.य Lol

मायरा आणि झेंडे कसले खेटून उभे राहीलेत काॅ. रूम मधे.. >>>>> नैतर काय. असम कुणीएवढ्या जवळ उभं राहिलं तर किती विचित्र Uhoh

विसाई शाखा फॅन दिसतेय>>> हो काल त्यांनी ओम शांती ओम चा डायलॉग मारला
मला त्यांचा चेहेरा थोडा प्रार्थना बेहेरे सारखा वाटतो.

विसाई शाखा फॅन दिसतेय>>> हो काल त्यांनी ओम शांती ओम चा डायलॉग मारला
मला त्यांचा चेहेरा थोडा प्रार्थना बेहेरे सारखा वाटतो.>>>>>कोणा बद्द्ल बोलत आहात कळाल नाही

कालच्या एपिसोडात कितीदा एकटक बघत असते इशा सुभाकडे. त्याच्याकडे बघुनच लेक्चर झाडते.
पण काल जरा एक्टीन्ग जमली एकदाची इबाळाला. डोळ्यातुन तिला मनापासुन काय हवे आहे ते सही दाखवले तिने.

मला मायराचे डायलॉग आवडले, " तसही तु ऑफीसमधे काही काम करत नव्हतीसच.. !"
नन्तर सुभा तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो, मग लगेच चाचपुन..." आय मिन इतका कमी अनुभव असताना तुला प्रमोशन मिळुन तु बेन्गलोरला जाते आहेस वै वै..." Lol

खरंच झेंडे आणि मायरा (आमच्या कामवाल्या बाई तिला 'माया' म्हणतात...!! मायाची चांगली जिरली बगा वैनी काल ! ! )
किती खेटून उभे होते!
आणि सुभा केशरी झब्ब्यात काय क्यूट दिसत होता.....अतीच सुंदर...तर सगळं तोंड माखून घेतलंन कुंकवाने.....काय तरी एकेक आयड्या केड्याच्या !!
आणि काल बुके देतानाही कसला गोड अभिनय केलेला....मी ईशाच्या जागी असते तर अजून एकदा चॅलेंज घेऊया ना सर असं म्हटलं असतं !!!! Happy

आणि काल बुके देतानाही कसला गोड अभिनय केलेला....>>>>> त्याला बोलायच नव्हत ..tension aal hot. हे तो tyachya pratek expressions मधुन sangun गेला.... really hats of to him... Happy

त्या सॉन्याचे नाव इथे टाइप करताना आपल्याला वैताग यावा, २-३ वेळा बॅकस्पेस मारावी लागावी म्हणून खास तसे ठेवलेले आहे.>>ते डिफिकल्ट कॅरेक्टर आहे हे कसे सूचकतेने दर्शवले आहे बघा. Happy

मला त्यांचा चेहेरा थोडा प्रार्थना बेहेरे सारखा वाटतो.>>>>>कोणा बद्द्ल बोलत आहात कळाल नाही

विसाई म्हणजे विक्रांत सरंजामे ची आई

काहीतरीच दिसतोय तो त्यात> हो. तसा गेटप केलाय. फनी वाटावं म्हणून असेल. आणि ते गाणं, त्यात तो आणि ती अगडबम बाई जे काही करताहेत ते अगदीच काहीतरी आहे.

Pages