तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

कसला खुश झाला होता पण सुभा काल .. जेव्हा इशा ची काही चूक नाही हे सिद्ध झालं .. मस्त अभिनय! गालातल्या गालात हसल्याचा ,खुश झाल्याचा!
बघितलं? माझी इशा आहेच गुणाची !! टाईप .. ; आणि तरी बाकीच्यांना कळू न देता (अर्थात झेंडे ना कळलंच .. पण तो काय जवळचाच आहे )
आणि ती बावळट इशा तू अपमान केला का तर हो काय म्हणते?! Uhoh चटचट बोलायचं कि तुम्हाला एकच बाजू माहित आहे .. दुसऱ्याला फसवायचं नाही तसं आपण पण फसवलं जात नाही ना हे पण तितकच महत्वाचं नाही का !!
आणि कसली ती मायरा .. शिंदे नी सांगितलं ठेवला विश्वास .. नगरकर ने सांगितलं ठेवला विश्वास .. पण इशा जी आपली एम्प्लॉयी आहे ती गेली तेल लावत .. हे काय हे ? आणि नंतर पण काही सॉरी वगैरे नाही Uhoh

सिनेमाच्या प्रिमियरला सु.भा.ला प्रत्यक्ष पाहिलं>> भारीच !
आम्ही आपले इन्स्टा वरच्या फोटों कडे बघून समाधान मानतो Happy

मी पण सुभाला मराठी पाऊल पडते पुढे च्या एका एपिसोडच्या शूट च्या वेळी (बालगन्धर्व च्या प्रमोशन साठी) आलेला असताना प्रत्यक्ष पाहिले होते. तो फक्त दिसतच चांगला नाही तर त्याचे मराठीवर खूप चांगले प्रभुत्व आहे, वक्तृत्व ही प्रभावी आणि तो हुशार सुद्धा आहे. उगिच त्या मुग्धा गोडसे सारखं फक्त खूप छान खूप छान नाही म्हणाला.

गाडीत बस्त्ताना उज्व्या सिटवर बस्लेला सु भा एफ एम सुरु होताना दुसर्या सिट वर कसा

कसला खुश झाला होता पण सुभा काल .. जेव्हा इशा ची काही चूक नाही हे सिद्ध झालं .. मस्त अभिनय! गालातल्या गालात हसल्याचा ,खुश झाल्याचा! >>>>>>>> +++++++११११११११

काल जेव्हा सुभा 'आता इशाच काय करायचय ते तुम्हीच करा' अस मायरा आणि झेन्डेला बोलला, तेव्हा मायरा इशाच्या विरोधात बोलली. सुभाने त्यावेळी मायराकडे ज्या जरबेने कटाक्ष टाकला, ते तर कातिल होत. Wink

आणि कसली ती मायरा .. शिंदे नी सांगितलं ठेवला विश्वास .. नगरकर ने सांगितलं ठेवला विश्वास .. पण इशा जी आपली एम्प्लॉयी आहे ती गेली तेल लावत .. हे काय हे ? आणि नंतर पण काही सॉरी वगैरे नाही >>>>> अगदी अगदी. ती सॉरी सुद्दा म्हणाली नाही ईशाला. खरतर, ' विकी आणि आपल्यामध्ये काहीतरी चालू आहे' हे ऐकून तिच्या मनात उकळया फुटत असतील. पण दाखवत नसेल तस.

बादवे, त्या सिनमध्ये मायराचा अभिनय छान झालाय. कुठेही ती शिरा ताणून, नाकपुडया फुलवून ओरडली नाही. गुड! Happy

आणि ती बावळट इशा तू अपमान केला का तर हो काय म्हणते?! Uhoh चटचट बोलायचं कि तुम्हाला एकच बाजू माहित आहे >>>>>> नैतर काय. ती मायरा झापत होती तिला, तर हि नुसती 'मायरा मॅडम मायरा मॅडम' करत होती.

सिनेमाच्या प्रिमियरला सु.भा.ला प्रत्यक्ष पाहिलं>> भारीच ! >>>>> वॉव! Happy

त्याचे मराठीवर खूप चांगले प्रभुत्व आहे, वक्तृत्व ही प्रभावी आणि तो हुशार सुद्धा आहे. >>>>>>> त्याला वाचनाची आवड आहे अस मटामध्ये वाचलय. सेटवर दोन शुटिन्ग्जच्या मधल्या वेळेत तो पुस्तक वाचत असतो. कदाचित त्यामुळेच त्याच मराठी छान आहे. Happy

एपिसोडदरम्यानच्या एका प्रोमोत सु.भा. एफएम रेडिओवरचा सेम सिच्युएशनबद्दलचा संवाद ऐकतो, (२० वर्षांचं अंतर, वगैरे) मग ऑफिसच्या काचेतल्या प्रतिबिंबाकडे बघत दाढीवरून हात फिरवतो, त्यावरून आता 'सबसे पहले सुनो मियां, कर के वर्दिश बनो जवां' ऊर्फ मेक-ओव्हर मोड ऑन होणारे त्याचा. >>>>>>>> प्रेम जर असेल तर ते तुमच्या चेहर्यावरुन दिसतच, ते लपल जात नाही हे तो एफएमवाला सान्गत होता. सो, ऑफिसमध्ये सगळयान्कडे डाउटफुली बघत होता की, आपल्या चेहर्यावरच प्रेम कुणाला दिसत तर नाहीये ना. Proud म्हणून तर तो आरशात बघत होता.

मला वाटल प्यूनला कामाच्या वेळी मोबाईलवर बोलताना बघून सुभा त्याला झापेल की काय. Lol

ती बावळट इशा तू अपमान केला का तर हो काय म्हणते?! Uhoh चटचट बोलायचं कि तुम्हाला एकच बाजू माहित आहे >>>>>>>>>>>>>> झी चा रुल फॉलो करतेय.. अशा वेळी कोणीही पटपट बोलायचे नाही. आपली बाजू मांडायची नाही.

गाडीत बस्त्ताना उज्व्या सिटवर बस्लेला सु भा एफ एम सुरु होताना दुसर्या सिट वर कसा >>> लोल. कंटिन्यूटीवाले डुलक्या मारत असतील डेस्कवर ईशाप्रमाणे Happy

आता ईशाविरूद्ध तक्रार वगैरे आली का? फायनली! Wink पण ती डेस्कवर झोपण्यासंबंधी नसून काहीतरी वेगळेच दिसते. मी अजून त्या "सर्व्हे" एपिसोडपर्यंतच आलो आहे. सर्व्हे मुळे काल बर्‍याच दिवसांनी मजा आली. नाहीतर काही घडतच नव्हते एपिसोडस च्या एपिसोड्स मधे.

वरती ईशाबाळ वगैरे उल्लेख आलेत त्यावरून असे वाटले की नशीब तिच्या हातात एक बाहुली वगैरे घेउन फिरताना नाही दाखवले कायम. नाहीतर घडलेला प्रत्येक प्रसंग व त्यावरचे तिचे विचार ती त्या बाहुलीशी बोलताना दाखवली असती. कल्पना करा किती वेळ खाल्ला असता प्रत्येक एपिसोड मधे Happy ऑफिस मधे ती बाहुली डेस्कवरच ठेवणे. सरांशी बोलून आल्यावर, मायरा कडून झापून घेतल्यावर "आपले मन मोकळे करणे" छाप संवाद. मग कधीतरी ती बाहुली हरवणे, ती सरांनीच शोधणे - त्यावर एक एपिसोड. फार मोठ्या संकटातून सर्व प्रेक्षक वाचले आहेत.

सुभापुढे तत्वज्ञान पाजळताना कशी चुरूचुरू चालते इशाबाईची जीभ. काय ते एकेक डायलाॅग्ज.... उंचीला शोभले तरी पाहिजेत हो...

इशाला प्रमोशन ऑफर केलं सायबानं चांगलं काम केलं म्हणून. Happy खूपच तळमळून अभिनय करावा लागला असणार दोघांना हसू आवरून गंभीरपणे संवाद म्हणण्यासाठी Happy

इशा डायरेक्ट लाईन देतीये आणि आपला सुभ्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरतोय असं वाटायला लागलंय Happy

इशाला प्रमोशन ऑफर केलं सायबानं चांगलं काम केलं म्हणून. Happy खूपच तळमळून अभिनय करावा लागला असणार दोघांना हसू आवरून गंभीरपणे संवाद म्हणण्यासाठी >>> Lol एकाच सजेशन मुळे प्रमोशन?

मेधावि _/\_
आता इशा ट्युशन घेणार सुभा ची

एका महिन्यात एक आयडिया दिली म्हणुन डायरेक्ट प्रमोशन!!
आम्ही वर्षानुवर्ष खपुन ढिगभर आयड्या पुरवल्या तरी कोणी विचारत नाही ओफीस मधे.

एका महिन्यात एक आयडिया दिली म्हणुन डायरेक्ट प्रमोशन!!>>> त्याबाबतित इशा निमकरच नशिब अगदी इशा अम्बानीच्या तोलामोलाच आहे.

सर्व्हे एपिसोड मजेदार होता. दळणवळणाची साधने येउन जाउन असतात म्हंटलेच आहे वरती. या भागात १९७० सालची साधने त्यांना उपलब्ध होती. त्यामुळे सुभाला सर्व्हे टीम कोठे आहे याची माहिती मिळणे हा मोठ्ठाच प्रॉब्लेम झाला. मग झेंडेने जाउन दूत पाठवले असणार त्यांचा माग काढायला.

तर तो सर्व्हे. असा मार्केटिंग किंवा टार्गेटेड सर्व्हे म्हणजे डीलर लोकांचे काही स्पेसिफिक प्रश्न काही दुकानदारांना ते विचारून पडताळणी करायची वगैरे असेल असा माझा समज होता. ईशामॅडमने आधीच्या ब्रिलियंट सजेशन ला किमान जमिनीवर आणणारी उपसूचना जी केली होती - कूपन्स देण्याची - ती कितपत उपयोगी पडेल असे तुहाला वाटते वगैरे प्रश्न. पण ही कंपनी असामान्य आहे. त्यामुळे हे पाच लोक नुसतेच रमतगमत दुकानदारांशी गप्पा मारून आले. इतर दुकानांत काय झाले माहीत नाही पण ईशाच्या वडलांच्या दुकानात ट्रम्प बोलतो तसे "राजनंदिनी साडी भारी, एकदम ग्रेट" वगैरे फीडबॅक मिळाले. ज्याचा सर्व्हेशी काहीही संबंध नव्हता. तेथे त्या कूपन्स बद्दल काहीच बोलणे झाले नाही, किंवा ड्रेस शिवण्याबद्दलही.

आणि ईशा तिच्या सरंजामे कंपनीची प्रतिनिधी म्हणून गेली होती, की त्या डीलर्सची साहाय्यक म्हणून तेथे गेली होती का नोट्स काढायला त्यांच्या सूचनेनुसार? तो प्रकार अगम्य होता.

आणि हे चार डीलर्स वेगवेगळे चार डीलर्स आहेत असा माझा समज होता. असे दिसते की ते सगळे एकाच कंपनीचे लोक आहेत. म्हणजे इतकी मोठी कंपनी इतक्या लोकप्रिय व जुन्या उत्पादनाच्या प्रॉब्लेम्स बद्दल एकाच डीलर कंपनीशी बोलत होती इतके दिवस? नाहीतर हे वेगवेगळे डीलर्स सगळे एकच एरिया - तो ही कंपनीच्या हेडक्वार्टर्स च्या आसपासचाच, आणि एकच प्रॉडक्ट बघतात का?

शेवटचे दुकान तर त्याहून भारी. सर्व्हे करायचा आहे ते दुकान ईशाचे वडिल काम करतात तेच. तेथे डीलर्स ना कळणार की इथे ईशाचे वडील काम करतात. मग यावर सर्वसामान्य माणसे दोन्हीपैकी एक उपाय करतीलः
- डीलर्स ना कल्पना द्यायची आणि जमले तर या दुकानाऐवजी दुसरे कोणते दुकान निवडू म्हणून सांगायचे. किंवा त्या एका दुकानात ईशाने जायचे नाही
- सर्व्हे करायचा पण डीलर्स ना माहिती देउन. म्हणजे त्यात लपवाछपवी काही नसेल

पण इथे ईशाचा उपाय अफलातून होता: वडलांना फोन करून सांगायचे मला तेथे ओळख दाखवू नका (दळणवळणाची साधने या दशकात आली इथे). ते ही ते स्वतः अशा बाबतीत बहिर्जीने त्यांच्याकडे शिकवणी लावावी असे तरबेज असताना. म्हणजे एका दुकानाने काहीच फरक पडत नसताना उगाचच केलेली लपवाछपवी. ही बहुधा भावी ड्रामेबाज एपिसोड ची सोय असावी, नंतर डीलर्स ना कळले की.

पण मला सर्वात गंमत वाटलेला सीन म्हणजे एकदा सुभा त्या कॉन्फरन्स रूम मधे बसलेला असताना झेण्डे येतो आणि सांगतो "आजचे काम झाले. चल". जणू काय हे दोघे फॅक्टरीत किंवा जनरल ऑफिस मधले कलीग्ज शेजारच्या मशीन्स वर काम करत आहेत आणि भोंगा नुकताच झाला आहे. अरे लेका तो सीईओ आहे, तुला काय माहीत त्याचे आजचे काम झाले का?

फारेंड, ज्या कंपनीचा मालक बिझनेस ग्रोथसाठी तुळशीबागेतल्या दुकानांमधल्या सर्व्हेवर लक्ष ठेवून असेल त्याचा आवाका आणि काम कितीसं असणार Happy
पूर्वी सुभाचं केबिन दाखवायचे पण हल्ली सदानकदा तो काॅ. रुमातच पडलेला असतो. तिथं सार्वजनिक लॅपटाॅपवरच काम करतो. लाॅगीन, पासवर्ड वगैरे भानगडी दिसत नाहीत.

पूर्वी सुभाचं केबिन दाखवायचे >> सुरवातिच्या १-२ भागातल ना? मागे एक्दम स्कायस्क्रेपर बॅग्राउन्डला असलेल केबिन कॉम्युटर इफेक्टने तयार केल होत त्यामुळे पौराणीक सिरियल मधे जसे देव्देवता ढगावर वॉक करताना दिसत तसे मायरा आणी सुभा दिसले होते, सध्या कॉन्फरन्स रुम नाहीतर निमकर चाळ नाहितर सुभा गाडितच दिसतो , मागच्या एक-दोन भागात तर जेटलॅग मधे असल्यासारखा दिसत होता.

मेधावि, प्राजक्ता Lol

आत्ता पुढचा भाग पाहिला, त्यात ईशाने वडील तेथेच काम करतात हे सांगितले. त्यामुळे आधीचा सस्पेन्स क्लिअर झाला. हा भाग एकूण ओके होता. "अंकल" वाले संवाद जेन्युइनली फनी होते.

तुला पाहते रे चे भाग नेहमी पाहिले जात नाहीत. काय चालले आहे ते समजण्यासाठी दररोजच्या भागांचे विस्तृत वर्णन करा प्लिज.

झेंडेच्या मते वयातलं अंतर हा दुय्यम मुद्दा असून, दोघांच्या हैसियतीतला फरक हा मेन बाॅटलनेक आहे...आणि ह्या वाक्यावर वि.सं पोपटासारख्या माना डोलावतो आणि इशापासून दूर व्हायचं ठरवतो... आता तर मला विसंपेक्षा जास्त कर्तृत्ववान ती देवीचा फोटो घेऊन फिरणारी बाई आणि कर्जतची देवी वाटायला लागलीये. किमान तिला जे वाटतंय ते होणारच असा दृढ विश्वास आहे तिचा.

इशा डायरेक्ट लाईन देतीये आणि आपला सुभ्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरतोय असं वाटायला लागलंय>> Lol
फारएण्ड>> नको रे बाबा आता यात बाहुली वगैरे Proud

प्रमोशन? Uhoh>> ते आपलं डिस्टन्स प्रेमकथा रंगवण्यासाठी दिलंय सो ती बंगळुरू ला जाईल आणि सारखी सुभा च्या डोळ्यासमोर नसेल असं 'झेंड्याने' सुचवलं !!सुभाला यातून बाहेर पडायला तो मदत करणारे.. थोडक्यात अजून त्रांगडं करून ठेवणार Wink
कालचं झेंडे च मत मला काय पटलं नाही .. "नुसतं वयाचा फरक एवढंच नाही तर तुझी पोझिशन स्टेटस निमकरांपेक्षा खूपच हाय लेवल ला आहे " अश्या अर्थाचं बोलत होता तो .. प्रेमात असं बघतात का ? मला काय कळलं नाही .. Uhoh उलट वयाचाच जास्त विचार करायला हवा ना .. तो हि मानला तर आहे नाही तर नाही ..
काल सुभा ने प्रमोशनं चं सांगताना तिच्याकडे न बघता सांगितलं .. आवडत नव्हतं त्याला ते सांगायला तो अभिनय छान केला .. आणि नंतर इशा ने ते सहज ऍक्सेप्ट केलं तेव्हा हि अनपेक्षित उत्तराने तो बावचळला तेव्हा चेहऱ्यावरचं आश्चर्य पण मस्त दाखवलं त्याने ..
आणि त्यानंतर ... इशा च तत्वज्ञान चालू Wink
सुभापुढे तत्वज्ञान पाजळताना कशी चुरूचुरू चालते इशाबाईची जीभ. काय ते एकेक डायलाॅग्ज.... उंचीला शोभले तरी पाहिजेत हो Lol

एका महिन्यात एक आयडिया दिली म्हणुन डायरेक्ट प्रमोशन!!
आम्ही वर्षानुवर्ष खपुन ढिगभर आयड्या पुरवल्या तरी कोणी विचारत नाही ओफीस मधे.+१
त्यासाठी कामापेक्षा तिला बॉसला तिच्यामध्ये इंटरेस्टचा असल्याचा जास्त फायदा झाला आहे.

इशा डायरेक्ट लाईन देतीये आणि आपला सुभ्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरतोय असं वाटायला लागलंय>> Rofl

सरंजामे इंडस्ट्रीची प्रॉपर्टी मिळाल्याशिवाय आता ती काही शांत बसणार नाही. वडिलांचं दुकान सोडवण्याचा आणि घराची गरिबी घालवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग मिळाला आहे. आता नोकरी करण्यात कशाला वेळ घालवा?

तिला त्याच्या मॅरिटल स्टेटसबद्दल काहीच माहित नाही. तरी इतकी मागे लागली आहे. की वेळ पडली तर शनाया सारखं पण राहायची तयारी आहे की काय तिची?

एका महिन्यात एक आयडिया दिली म्हणुन डायरेक्ट प्रमोशन!!
आम्ही वर्षानुवर्ष खपुन ढिगभर आयड्या पुरवल्या तरी कोणी विचारत नाही ओफीस मधे>>> इथेच तर चुकतं ना आपलं ! प्रमोशन तेव्हाच मिळतं
जेव्हा आपण windows ८/१० किंवा एक्सेल शीट चं चित्र चिकटवलेल्या कॉम्पुटर रुपी खोक्यासमोर बसतो आणि उगाच काहीतरी महत्वाचं टंकतोय असं दाखवत कडकट्ट कडकट्ट करतो Wink
पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या रिकाम्या फायली उगाच इकडून तिकडे ठेवतो/देतो /वाचल्याचे नाटक करतो Wink
अतिशय महत्वाची मेल ताबडतोब बॉस ला पाठवतो (आणि यात महत्वाचं हे कि त्यासाठी तो बॉस आपल्या टेबला शेजारी येऊन ती मेल पाठवायला सांगतो ) Wink
आणि त्याहून हि महत्वाचं म्हणजे दुसऱ्याच प्रेसेंटेशन न वाचता बघता आयत्या वेळी ppt न वापरता आणि त्या विषयाची काहीही माहिती नसताना काहीतरी भंपक युक्ती सांगून क्लायंट चं मन जिंकतो Wink
बाकी साध्या/ पौष्टिक /टाकाऊ तुन टिकाऊ जेवणाच्या पदार्थांचे फिलर्स हि असायला हवेत Wink
Light 1 घ्यालच ! आणि हि यादी वाढवायचं सत्कृत्य हि Wink

काल सुभा ने प्रमोशनं चं सांगताना तिच्याकडे न बघता सांगितलं .. आवडत नव्हतं त्याला ते सांगायला तो अभिनय छान केला .. आणि नंतर इशा ने ते सहज ऍक्सेप्ट केलं तेव्हा हि अनपेक्षित उत्तराने तो बावचळला तेव्हा चेहऱ्यावरचं आश्चर्य पण मस्त दाखवलं त्याने .......>>>>>>>>>> खरच... फक्त सुभा साठी बघावीशी वाटते ..खुप छान अभिनय आहे त्याचा

मला आवडते आहे ही सिरीयल. अजिबात डोक्याला ताप नाही, कोणी कोणाचा दु:स्वास् करत नाही, कोणी कोणाला पाण्यात बघत नाही. साध्या माणसांची चुकत-माकत प्रेमाची गोष्ट. त्यांना फक्त छान प्रेम कथा दाखवायची आहे बाकी presentasion, report, survey फक्त निमित्तमात्र Happy ज्या दिवशी ह्या सिरियलमध्ये वाईटप्रवृत्ती दाखवतील त्या दिवशी सिरीयल ला रामराम. तोपर्यंत मज्जानी life Happy

anjali_kool >>> Lol "झटपट प्रमोशन" ची यादी आवडली Happy

Pages