तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

बेअक्कल आहे का चालू gold digger आहे ते नक्की ठरवून मगच ईशाला नीट नावं ठेवली तर Happy कोणाला जमलंय का आजवर कशात काही नसताना, दिसायला सोसो, आवाज विचित्र असताना बॉस ला आपल्या बोटाच्या तालावर नाचवायला! झोपा काढून काही महिन्यांत प्रमोशन मिळवायला! त्याला स्वतः च्या लग्नात रामगड्यासारखं राबवून घ्यायला Happy

दिग्दर्शक इशाचा निरागसपणा आणि हुशारी कधी तळ्यात कधी मळ्यात दाखवत आहे. ज्या मुलीला करोडपती उद्योगपतीवर लाईन मारण्याची अक्कल आहे, हात धुवून त्याच्या मागे लागताना त्याला चॅलेंज देण्याची, जाब विचारण्याची, टॉंट मारण्याची, तो सरळ सरळ टाळत असताना त्याला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारण्याची हिम्मत आहे, तिला त्या लॉज मधल्या माणसाला काय सांगायचं आहे ते कळू नये? उगीच काहीतरी.
जब वी मेट मध्ये निदान गीत तशी बिनधास्त, दुसऱ्याचा विचार न करणारी, कोण कसं आहे याची जाणीव नसणारी दाखवली आहे. त्यामुळे तिचं वागणं बेनिफिट ऑफ डाऊट मध्ये खपून जातं.
उद्या विक्रांत ईशाला कबूल करताना ती जागी आसणार बरं का. हुशारीने सगळं ऐकून घेईल आणि योग्य वेळी वापरेल. पण तरी ऑफिस कलीग बरोबर काही कारणाने लॉजवर राहावं लागलं तर निदान वेगळ्या रूमसाठी विचारावं हे कळत नाही?
तो रजिस्टरवाला माणूस नंतर म्हणतो ना की शेवटची रूम आहे म्हणून. तोवर दुसऱ्या रूमबद्दल हे दोघेही विचारतं पण नाहीत? ही काय शाळेत गेली नाही का? बेसिक मॅनर्स, स्वतःची काळजी हेही कळू नये?

सुभा काय ७-७ ८-८ वर्ष चालणाऱ्या पाचकट शिरेलीत काम करणारा वाटत नाही .. सो होपफुली कथा चांगल्या वळणावर राहील आणि वेळेत संपेल ..>>>> सुभा चा मटा संवाद कार्यक्रम ला मी गेले होते.... त्यात तो म्हणाला होता...कि serial ch start and end Adhich tharal ahe... So hi serial lambnar nahee... .ani Tyala he pan vicharal hot Ki Vikrant ani subodh swabhav same ahe kA.. He said no.. Ajibat nahee... Kalel ch Tumhala Ek Mahinyat.. Me Ata kahi Sangat nahee

Mala watatay, Subha's role is going to have a negative shade. Subha is not stepson, he is Son-in-Law (maybe adopted after the daughter's murder). Thats why Sonya calls him BroinLaw and not "Bhavajee". I think Isha is re-incarnation of his ex-wife and I think he will have to leave the empire if he gets married or have another "heir" to the empire.
I think they will portray as Subha killed his wife for money or Jaydeep killed his sister in one of his rage fits. And Isha is going to see him in her dreams trying to kill her. That is the "Tula pahate re" So it will be Karz/Om Shanti Om story as well. But enjoy Subha while we can.

omg

Oh. Asel that's why Subha said that you wait and watch... Me Vikrant sarkha nahee ajibat

Pan Aaj Cha Subha Che expression bhari hote... Mainly when Isha said is it destiny what you feel sir after that...

नाही मला नाही वाटत असं असेल. सुभा खुनी वगैरे असेल असं, आतापर्यंत चा मालिकेचा ट्रॅक पाहता असा ट्विस्ट निव्वळ अशक्य आहे. सुभा ची इमेज एक प्रेमळ न समजूतदार अशीच ठेवली आहे अजूनतरी.
आणि डोळ्यात इतके प्राण आणून भावना व्यक्त करणारा नायक खुनी.... नो way

आत्तापर्यंत बरं वाटत होतं सगळं पण इथून पुढे थोरांस शि. सा.न. वि.वि. व लहानांस पापा वळणावर चाललंय आणि जरा ऑकवर्ड होतंय. आज तो ILU म्हणेल असं दाखवलंय ते पण जरा कसंसंच वाटलं.

समहाऊ वि .सं.चं प्रेम असलं तरी ममताच जास्त जाणवते. ती पण लहान मुलीप्रमाणेच वागते त्याच्याशी.

असो...या मालिकेत सुबोध भावे नसता तर मी या मालिकेचं तोंडही पाहिलं नसत... फक्त त्याच्या नावावर खपवतायेत हे लोक खराब माल. >>> एकदमच पटलय हे

असो...या मालिकेत सुबोध भावे नसता तर मी या मालिकेचं तोंडही पाहिलं नसत... फक्त त्याच्या नावावर खपवतायेत हे लोक खराब माल. >>> एकदमच पटलय हे>>>>> +१

जरा ऑकवर्ड होतंय. आज तो ILU म्हणेल असं दाखवलंय ते पण जरा कसंसंच वाटलं.>>>>>> +१
गाठोडं बदला म्हणावं

बॉस बरोबर रात्री लॉज मध्ये हे खूपच विचित्र वाट ले. अनभिज्ञ मुलगी पण असे करायला दचकेल. त्यापेक्षा बस स्टँड वर राहणॅ सुरक्षित. शिवाय.
राजनंदिनी साड्यांचे लोकल डीलर असतील की. अश्यवेळी डीलर नेहमी कामाला येतात व घरी महिला फॅमिली सोबत मुलीला ठेवून घेतले असते रात्रीपुरते. धिस इस सीरीअसली क्रीपी फॉर मी. नोप नॉट डन. अनलेस शी रिअली वाँट्स टु गो ऑल द वे. गावाक डे सेल्स विजिट वगैरे ला गेले की डिलर च्या घरीच जेवण खाण असते.
त्यांचे धुम धडाक्यात लग्न होणार असे प्रोमोत पाहिले. सो ऑल इज जायज मूड आहे .

अ‍ॅड्मिन पोस्ट डिलीट का केली आधीची.

ममता इस द right वर्ड! तरी आता डोळ्यात एवढी दिसत नाही, पण तो ज्याप्रकारे ईशा म्हणतो ममत्व जाणवते, प्रेम नाही.

अहो अमा, intra-office जी लफडी होतात (लग्न झालं की मग ते प्रेम असतं!) ती काय अशी बस स्टँडवर राहून साजरी होतात की काय!

अहो अमा, intra-office जी लफडी होतात (लग्न झालं की मग ते प्रेम असतं!) ती काय अशी बस स्टँडवर राहून साजरी होतात की काय!>> देअर यु आर.

त्यांचे धुम धडाक्यात लग्न होणार असे प्रोमोत पाहिले. सो ऑल इज जायज मूड आहे .>>असा प्रोमो कधी दाखवला???

असो...या मालिकेत सुबोध भावे नसता तर मी या मालिकेचं तोंडही पाहिलं नसत... फक्त त्याच्या नावावर खपवतायेत हे लोक खराब माल. >>> एकदमच पटलय हे>>>>> +१

कालचा भाग बघताना इथल्या हॉटेल बुकींगवाल्या धाग्याची आठवण आली Happy

सुबोध भावे मला खूप आवडतो तरी ही मालिका बघू शकत नाही. त्यात तो नातेवाईक नसला तरी माहेरचा आडनांवबंधु असल्याने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तोच येतो आपोआप. त्यामुळे ओये होये, हाय हुय होत नाही Lol .

त्याच्याबरोबर कोणी दुसरी मला अपिल होणारी असती तर जोडी आवडली असती आणि त्या जोडीसाठी बघितली असती Wink .

अरे देवा! हि इशा मुलगी आहे की प्रश्नमन्जुषा? Uhoh लॉजमध्ये शिरल्यापासून झोपेपर्यन्त सुभाला प्रश्नच प्रश्न विचारुन भन्डावून सोडल हिने.

तो तिला सायकलवरुन हॉटेलकडे नेणार होता म्हणे हिला. म्हणजे आणखी एक जब वी मेट फॅक्टर इथे बघायला मिळाला असता आपल्याला.

बॉस बरोबर रात्री लॉज मध्ये हे खूपच विचित्र वाट ले. >>>>> इथे बॉस तसा चान्गला आहे हो . पण त्याने इशापासून सावध राहायला हव. कधी काय वागेल, बोलेल याचा काही नेम नाही.

दिग्दर्शक इशाचा निरागसपणा आणि हुशारी कधी तळ्यात कधी मळ्यात दाखवत आहे. ज्या मुलीला करोडपती उद्योगपतीवर लाईन मारण्याची अक्कल आहे, हात धुवून त्याच्या मागे लागताना त्याला चॅलेंज देण्याची, जाब विचारण्याची, टॉंट मारण्याची, तो सरळ सरळ टाळत असताना त्याला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारण्याची हिम्मत आहे, तिला त्या लॉज मधल्या माणसाला काय सांगायचं आहे ते कळू नये? उगीच काहीतरी. >>>>>> सगळ कळत तिला. निरागसपणाचा आव आणते ती. सुभा जेव्हा म्हणाला ना तिला की, मला इथे चोरान्पेक्षा पोलिसान्ची भिती वाटते तेव्हा हि म्हणते कशी हयाला, "तुम्ही माझ्याबरोबर असलात तर मला कुणाचीच भिती नाही. '

सुभा ने त्या रिसेपशनिस्ट च्या कानाखाली का नाही वाजवली? किती चावट बोलत होता तो. Angry

झेन्डे रात्री सुद्दा त्याच कपडयात असतात? हयान्ना गरम कस होत नाही बै? आणि त्यान्नी इशाच्या आईवडिलान्ना फोन करुन विचारायच होत ना, इशा बन्गलोरला गेली का ते. उगाच रात्रीच तडक घरी येऊन त्यान्ना घाबरवण्याची गरज काय होती? Sad

Subha is not stepson, he is Son-in-Law (maybe adopted after the daughter's murder). Thats why Sonya calls him BroinLaw and not "Bhavajee". >>>>> त्याच काय आहे की, सॉनयाला मुळातच इन्डियननेस आवडत नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट ती मॉडर्न पद्दतीने करते जसे की , प्रसादाला साध्या मोदकाऐवजी चॉकलेट मोदक, जेवणात वरण भाताऐवजी पिझ्झा खाणे ई. सो, तिला सुभाला भावजी म्हणायला आवडत नाही. ती त्याला ब्रो-इन-लॉ म्हणते. Proud

बेअक्कल आहे का चालू gold digger आहे ते नक्की ठरवून मगच ईशाला नीट नावं ठेवली तर Happy कोणाला जमलंय का आजवर कशात काही नसताना, दिसायला सोसो, आवाज विचित्र असताना बॉस ला आपल्या बोटाच्या तालावर नाचवायला! झोपा काढून काही महिन्यांत प्रमोशन मिळवायला! त्याला स्वतः च्या लग्नात रामगड्यासारखं राबवून घ्यायला >>>>>> आ राजसी तुम्हीसुद्दा? Uhoh तुम्हाला तर ही सिरियल आवडते ना. तुम्ही तर ह्या सिरियलच्या बाजूने होत्या. इतरजण निगेटिव्ह का लिहितात हयाच वाईट वाटत होत ना तुम्हाला? मग आता हे अचानक काय काय झाल तुम्हाला?

अरे देवा! हि इशा मुलगी आहे की प्रश्नमन्जुषा?>> नाही तर काय ! काल सुद्धा इतक्या वेळा तिने तेच तेच विचारलं .. मी डोक्यावर हात मारून घेतला... मी सुभा च्या जागी असते तर जोरदार शिव्या घालून खेकसले असते .. सारखं काई तेच तेच टुमणं .. Angry Angry
आणि दे कि वेळ त्याला जरा .... तुझं एक आहे प्रेम म्हणून समोरच्याने पण ते लगेच त्या क्षणी मान्य करायलाच हवं असं नाही ना ... माणूस अश्या वेळी नीट खोल विचार करायला वेळ घेणारच ..
कालचा एपी बिनडोक आणि बोर होता Sad

सुभा ने त्या रिसेपशनिस्ट च्या कानाखाली का नाही वाजवली?>> नाही ना तो करू शकत असं .. कारण मारल्यावर जर रिसेपशनिस्ट ने पोलिसांना बोलावलं असतं (तस नसतंच झालं म्हणा .. ) तर सुभा मोठा इंडस्ट्रियालिस्ट आहे ना मग तो या लॉज वर एकामुलीसोबत राहणार यावरून त्याची छी थू झाली असती .. म्हणून तर त्याने id नाही दाखवलं ! आणि रात्री मधेच उठून पोलीस तर नाही ना आले असं बघितलं ..

नाही ना तो करू शकत असं .. कारण मारल्यावर जर रिसेपशनिस्ट ने पोलिसांना बोलावलं असतं (तस नसतंच झालं म्हणा .. ) तर सुभा मोठा इंडस्ट्रियालिस्ट आहे ना मग तो या लॉज वर एकामुलीसोबत राहणार यावरून त्याची छी थू झाली असती .. म्हणून तर त्याने id नाही दाखवलं ! आणि रात्री मधेच उठून पोलीस तर नाही ना आले असं बघितलं .. >>>>>>> +++++++ १११११११११

मी सिरीयल च्या बाजू घेऊनच लिहिलंय की किती सिरीयल छान आहे Happy हिरोईन हुशार का माठ ठरवता येत नाहीये! (Keep ऑडिअन्स guessing )मला तर सुभा, निमकर, मायरा बरोबर ईशा पण आवडते Happy

त्यान्नी इशाच्या आईवडिलान्ना फोन करुन विचारायच होत ना, इशा बन्गलोरला गेली का ते. उगाच रात्रीच तडक घरी येऊन त्यान्ना घाबरवण्याची गरज काय होती? >>>

रोज वेदर चेक करतात ना, तसे या सिरीज च्या एपिसोड वर कोठे "दळणवळणाची साधने या एपिसोड मधे १९xx वर्षातील आहेत" असा इन्डिकेटर दाखवायला पाहिजे त्यांनी. कारण कधी फोन असतात, कधी शेअर्ड कॉम्प्युटर/रिसोर्सेस, तर कधी एकदम १९५० सालची कथा पाहात आहोत असे वाटते.

कालच्या भागात कोणीतरी म्हणल्याप्रमाणे हिरविण बाळ हे बेअक्कल नाही तर मतिमंद वाटत होतं... अरे तो हॉटेल वाला माणूस इतका भोचक पणा करतोय ..'एन्जॉय करा, डिस्ट्रुब नाही त्या साठी रेंज नाही ,डबल ब्लॅंकेट हवं का' वगैरे...आजकाल आठवीतल्या मुलीला पण एवढी मॅच्युरिटी असते.. ही मंदाड 'हा अस कां करतोय' (स्लो मोशन मध्ये 'चं'
हाताचा चंबू करून वाचावे)... अशा लॉज मध्ये एखादी चांगल्या घरची मुलगी होणाऱ्या नवऱ्याबरोबर पण जाणार नाही... मग तर कलीग,बॉस तर खूप दूर राहिले.. आणि त्या ई बाळाच्या आई बाबांना पण यात काही काही वावग वाटणार नाही...'विक्रांत सर होते ना रात्री रूम मध्ये ,मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही हम्म बाळा'(हे ई बाळाच्या आईच्या टोन मध्ये डोळे मोठठे करून मान गदागदा हलवून चं वाचावे)...
अरे हद्द झाली मंदाडपणाची...
आता मलाही भीती वाटायला लागली आहे की सुभा च काय हे अधःपतन चाललय.. मायरची काळजी खरंच खरीये..अरे मायरा वरून आठवलं.. मला असं वाटतंय हे ई बाळ म्हणजे त्या खु क खु मधल्या मॉनिकाच नको असलेले बाळ(ईशाच होत तीच नाव,ईशु म्हणायची ती मेंगळी मानसी ) असेल...तिथे ही विक्रांत(परत सेम नाव) हिच्या मुळे तिच्या हातून गेला आणि इथेही...म्हणून आता मायरा हेट्स ई बाळ... डेस्टिनी दुसरं काय (स्लो मोशन मध्ये 'च' म्हणावं)...

बंगलोर ची बस म्हणजे ओव्हरनाइट प्रवास असतो. फार नाही. माझी मुलगी इशाहून लहान पण एकटीने प्रॉजेक्ट मिळवून तो पूर्ण करून दोन अमेरिके च्या ट्रिपा करून आली इथून न्यु यॉर्क तिथून ऑर्लांडो व परत. येताना १५ -१६ तासाची फ्लाइट त्यात ट रब्युलन्स उतर्ल्यावर उबर करून घरी येणे . एक वावगे वागणे नाही की अमेरिकेत काही त्रास दायक नाही. विमानात पण पैसे देउन का होईना व्हॉट्सेप चालू होते मी वेळो वेळी अपडेट देणे घेणे, तिला टरब्युलन्स चालू असताना इतर सतर बोलून धीर देणे, असे केले टाइम झोन व नेट उपलब्धते नुसार लँडेड बोर्डे ड मेसेजेस, तिथे उबर केली तरी टॅक्सीचा नंबर, क्रेडिट कार्ड वर काय खाल्ले त्याची बिले ह्याचे खर्च केल्या केल्या मेसेजेस येणे ह्यामुळे मला तिचे स्टेट स घडोघडी कळत होते. आईवडिलांशी मुलांचे कम्युनिकेशन चालू च राहते इशा बंगलोरला बसने गेली म्हणजे काही आफ्रिकेला गेली नाही. ह्यांच लगेच नेटवरक नाही नेट नाही कसे चालू झाले.

मी वैय क्तिक उगीच भापायला लिहीले नाही. मुले दूर अस्णे व आईबाबांना काळजी वाटणे हे युनिवर्सल आहे. पण देअर आर वेज टू डील विथ इट.
नाहीतर बाबांनी तिला सोडायला घर लावून द्यायला बरोबर जायला हवे होते. मुलांना युनिवर्सिटीत सोडायला नाहीका जात? बरे बदली झाली तर तिथे राहायची सोय जेवायचे मेस वगैरे लावून द्यायला बाबा हवे होतेच. उगीच नको तिथे काळजी आणि गरज आहे तेव्हा मुलीला वार्‍यावर!!!

जब वीमेट मधील गीत वेगळीच होती व ती तिच्या वया अनुरूप मुलाबरोबर होती काही कारणाने. असले ओढून ताणून नाही.

Pages