तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

कालचा एपी उपलोड नाही केलाय का झी ५ वर>> नाही माहिती गं. मी एक्स्पर्ट ब्लॉग वर बघते .. तिथे तरी आलाय >> लिंक द्याल का? मला सुभाला रडताना बघायचाय. खुप प्रशंसा चालुये ईकडे त्या सिनची.

काल मी शेवट बघीतला ज्यात सु भा तिच्या बाजुला बसतो, अन ती चिडते, खुप क्युट सिन वाटला तो.

होना... सीन सुभा मुळे क्युट होतात.. Blush नाहीतर स्क्रीन वर रडके ई बाळ किंवा तिचे नाटकी ओव्हर acting आई बाबा Angry आले की भकास चिरके सिन बघण्यापेक्षा मी स्वयंपाक घरात जाते... त्या पेक्षा तिची ती शेजारची मैत्रीण आणि बिपीन पण कितीतरी सुसह्य आहेत... आणि डीजे Biggrin # का पाहताय रे

काल एक जण म्हणाली की इशाच्या घशात लाटणं अडकल्यासारखं वाटतं ती बोलताना तेव्हा दुसरी म्हणाली की लाटणं नाही, तारेची घासणी अडकल्यासारखी बोलते.

<<काल एक जण म्हणाली की इशाच्या घशात लाटणं अडकल्यासारखं वाटतं ती बोलताना तेव्हा दुसरी म्हणाली की लाटणं नाही, तारेची घासणी अडकल्यासारखी बोलते.<< अग आई ग! पण खरच.. काल तिच्या मैत्रीणीशी आणि बिपिनशी इबाळ बोलत बोलत रड्त होती तेव्हा काही एक समजत नव्हत. Biggrin

इंडिया बाहेरून पाहण्यासाठी हि एक लिंक ahe.
http://desitvflix.site/?redir=y.. but indiatओपन होईल की नाही माहिती नाही. यात पूर्ण एपी upload होतात विथ ads.... चॅनेल वर क्लीक करुन source 2 सिलेक्ट करावा लागतो मराठी चॅनेल्स साठी...

खूपच हँडसम आणि क्यूट दिसत होता रडताना देखिल..............
आणि अभिनयही अगदी उत्तम >>>>>>>> ++++++++११११११११

ही का आता भाव खातेय जादा... >>>>>>>> बरोबरच आहे तिच. एवढच होत तर त्या दिवशी देवळात तिच्यासमोर यायच होत ना. इशा लगेच त्याला बघून एक्साईट झाली आणि हो म्हणाली तर मान जाईल ना तिचा.

अभिनय मस्तच केला. त्याला टोचणी लागून राहिली आहे भेटलो तरी तोंड लपवलं आणि आता हि चाललीये बंगलोर ला .. आपल्याला ती आवडते हे मान्य करूया कि नको .. आपण काहीतरी लपवतोय का ?/कश्यापासून तरी दूर पळतोय का ?
अश्या द्विधा मनःस्थितीत आपोपाप डोळ्यातून गंगा यमुना >>>>> अगदी अगदी.

सुभा इशाच्या शेजारी बसलेल्या मुलीवर धडपडला. इशावर धडपडताना दाखवल असत तर बॅकग्राउन्डला 'तुला पाहते रे' वाजल असत.

इथे कुणी एक Observe केलय का की, फ्लॅशबॅक दाखवताना सुरुवातीच्या काही एपिसोडसमध्ये सुभाचे केस काळे होते. थोडा स्लिमसुद्दा दिसत होता. चान्गला दिसत होता की तेव्हा सुद्दा. मग त्याला अचानक वजन वाढवायला आणि केस पान्ढरे करायला का लावले नन्तरच्या एपिसोडसमध्ये? Uhoh

कुणाचं भाग्य कधी उजळेल ह्याचा काही नेम नाही बघा. जवळपास 20 वर्षे हा मुलगा काम करतो आहे पण अचानक एका म्हातार्याच्या रोलने त्याला कमाल ग्लॅमर मिळवून दिलंय. त्याला अवंतिकापासून कारेदु पर्यंत अनेक मालिकांतून चाॅकलेट बाॅयच्या रुपात पहिलं तेव्हाही, छान आहे, ठीक आहे , चांगला अभिनय करतो इतपतच आवडायचा, असा देखणा बिखणा कधीच वाटला नव्हता. वय वाढवलयावर स्टार्स बदलले की त्याचे. >>>>>> हो ना. मटामध्ये किव्वा कुठेतरी वाचल होत की, तो इन्ड्र्स्टीत उशिरा आलेला. त्याला प्रसिद्दी आत्ता कुठेतरी मिळते आहे. Happy

तिचे नाटकी ओव्हर acting आई बाबा >>>> इतके काही वाईट नाहियेत ते. त्यान्ची भान्डणे ऐकायला छान वाटतात. Happy

काल तिच्या मैत्रीणीशी आणि बिपिनशी इबाळ बोलत बोलत रड्त होती तेव्हा काही एक समजत नव्हत >>>>>> 'मेरा पहला प्यार अधुरा रह गया' टाईप बडबडत होती ती. पण मला अस का वाटल की त्या सिनमध्ये तिचा अभिनय 'नॉट बॅड' असा होता. आधीच्या एपिसोड्सच्या मानाने आता तिची अ‍ॅक्टिन्ग हळूहळू सुधारतेय अस वाटतय.

काल बिपिन चक्क नॉर्मल वागत- बोलत आणि दिसत होता.

तुला ध्याते रे चाललं असतं...किंवा............तू दिससी नयना ....वगैरे.......तरी! >>>>> तुला ध्याते रे >>>>>> खुप कठीण जाईल समजायला लोकान्ना. .तू दिससी नयना >>>>> हे मात्र मस्त.

दिवाळी निमित्त खास ऑफर ***

आमच्या येथे एका 'राजनंदिनी' साडीमधुन २ ईशा ड्रेसेस, १ मायरा स्कर्ट आणि १ झेंडे जाकिट शिवुन मिळेल..!

# का पाहताय रे >>>>>>> Rofl

सोनाली. लिन्कबद्दल धन्स Happy

वाळदवाटमध्ये मला त्याच्यापेक्षा चिमां जास्त आवडला होता >>> मलाही चिमां आणि लोकेश गुप्ते तिथे जास्त आवडलेले. सुभा आणि चिमां सिन्स मध्ये तर चिमां सहज मात करायचा, सु भा कडे लक्षही जायचं नाही माझं पण आदिती आवडत नसल्याने फार नाही बघितली ती मालिका.

सुभा आणि चिमां सिन्स मध्ये तर चिमां सहज मात करायचा, सु भा कडे लक्षही जायचं नाही माझं >>>>> खर तर चिमां सुभाचा रोल करणार होता वादळवाटमध्ये.

आमच्या येथे एका 'राजनंदिनी' साडीमधुन २ ईशा ड्रेसेस, १ मायरा स्कर्ट आणि १ झेंडे जाकिट शिवुन मिळेल..! >>> Lol

मस्त प्रवास सुरु झालाय दोघांचा. आज इशा पण आवडली खूप. निरागस वाटली अगदी पण फार बोलते त्याला. वाईट वाटलं अगदी. गाडी दिली वाटेत सोडून अन् निघाला तो पण. सुभामहोत्सव सुरु झालाय आता Happy
तिला ओरडताना लोकमान्य अन् तिनं भोकाड पसरलं की बालगंधर्व आठवतात.

इशाच्या बाबांची अ‍ॅक्टींग आवडते. थोडे ओव्हर प्रोटेक्टीव्ह, सारखा मुलीचा विचार करणारे, तिच्या सुखःदुखात सहभागी होणारे छान दाखवलेत, बायकोशी लटके वाद घालणारे. असे बाबा मी अनुभवले आहेत म्हणून जास्त कनेक्टेड वाटतात. तो अ‍ॅक्टर कोण आहे माहित नाही, पण पहिल्यांदाच काम करत असेल तर त्यामानाने छान वाटतेय .

पण पहिल्यांदाच काम करत असेल तर त्यामानाने छान वाटतेय . >>> हो ते दोघेही मला कपल म्हणून चांगले वाटले. असे लोक पाहिले आहेत आजूबाजूला. अगदी ईशाची आई सुद्धा - मनात येइल ते सरळ करून टाकणारी, फटकळ, असलेल्या पैशात घर चालवणारी, सहसा आनंदी राहणारी - अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत. ते सुभाच्या ऑफिस मधे जाणे वगैरे भंकस प्रकार होते - पण ते सगळे स्क्रिप्ट तसे असल्याने आहेत. या कपल चे घरातले किंवा एकूणच घरगुती रोजच्या लाइफमधले सीन्स आहेत ते जनरली चांगले आहेत.

आज पुन्हा भोकाड पसरलं ईबाळाने. >>> Lol

८-९ दिवसांचा बॅकलॉग आहे. तो सर्व्हे वाला एपिसोड पाहिला त्यानंतर पाहिल्याचे आठवत नाही. खूप सपक होउ लागल्याने बोअर झाले. नंतर काही आवर्जून बघण्यासारखे "ऑफिस" मटेरियल आहे का? तिला प्रमोशन मिळाले वगैरे ऐकले

ईशाचा बाबा झी युवा वरच्या बनमस्का सिरियलमध्ये सौमित्रचा बाबा होता. त्यात एकदम छान रोल होता. आणि सुंदर काम करायचे.

नंतर काही आवर्जून बघण्यासारखे "ऑफिस" मटेरियल आहे का? तिला प्रमोशन मिळाले वगैरे ऐकले>> प्रमोशन मिळून ती बेंगलोरला जायला निघते.
मी आजचाच एक एपि पाहिला मला लयच बोअर झाला. अरे एकदाच काय ते होय तर होय, नाय तर नाय बोलून टाका ना. Angry
कोणी काही म्हणो ईशा मला लयच गळेपडू वाटली आज तरी. समोरचा माणूस विषय टाळतोय तर मी तरी त्या माणसाकडे पुन्हा लोचटासारखा तो विषय काढणार नाही. ही आपलं एकच टुमणं धरुन.
आणि सुभाला ती विचारतेय, सर तुम्ही मला का थांबवताय?? मी का जाऊ नको तर ह्या शुंभाने घडाघड बोलून सांगायचं ना, तुझ्या आईने फोन करुन सांगितलं म्हणून. बावळट लेकाचे.
अख्खा एपिसोड यातच खाल्ला. का एवढे गुळमुळीत लिहितात काय माहीत. Angry

ईशाच्या आईबाबांचे सीन चांगले होते. बाबांची तळमळ अगदी जाणवत होती.

थे कुणी एक Observe केलय का की, फ्लॅशबॅक दाखवताना सुरुवातीच्या काही एपिसोडसमध्ये सुभाचे केस काळे होते. थोडा स्लिमसुद्दा दिसत होता. चान्गला दिसत होता की तेव्हा सुद्दा. मग त्याला अचानक वजन वाढवायला आणि केस पान्ढरे करायला का लावले नन्तरच्या एपिसोडसमध्ये? Uhoh>>>>>>>> हो पहिल्या दाेन तिन भागा मध्ये होते..बरोबर
ईशाचा बाबा झी युवा वरच्या बनमस्का सिरियलमध्ये सौमित्रचा बाबा होता. त्यात एकदम छान रोल होता. आणि सुंदर काम करायचे.>>> Te rudram Mukta barge chya serial madhye pan hote... Addicted father Cha role Hota

पुष्पक विमान मधेही छान वाटला सुबोध भावे..
इशा इतकी अपिलिंग वाटत नाहिये.. रडकी शेंबडी लहान मुलगी हट्ट करतिये असं वाटतं.. त्यात डायलोग आणि तिची अ‍ॅक्टिंग मुळे बर्याचदा चालु टाईप वाटते..
सुभा इज वाईन ग्रोइंग ग्रेसफुल..
सुभा वादळवाट मधे आवडला होता.. तेव्हा लोकेश गुप्ते आणि चिमां पण आवडले होते.. पण चिमा नंतर च्या सिरियल मधे आजिबात आवडला नाही..

ईबाळाने सुभा सोबत असताना एवढ्या रात्री अनोळखी माणसाला लिफ्ट मागितली किती हा बावळटपणा.. तिला राग आला होता ठीक आहे पण तो राग ती नंतरपन काढू शकत होती. आणि नेहमीप्रमाणे सुभाचा अभिनय अप्रतिम.. आणि तो तिला बेंगलोर ला जाण्यापासन अडवतो तेंव्हा तर खूपच छान वाटला. त्याच प्रेम काळजी प्रेम असून लपवाव लागतंय ते दुःख त्याग सगळं अगदी डोळ्यात दिसत..

>>>रडकी शेंबडी लहान मुलगी हट्ट करतिये असं वाटतं>>
हो...आणि काल तर बस मध्ये ती बोलत होती कसला खरखरीत आवाज काढत होती...शहारा आला अंगावर अगदी...ते रेडिओ स्टेशन सिग्नल मिळत नसेल तर कशी खरखर ऐकू येते ना तशी... शी ..आणि नंतर पण किती खोट खोटं भोकाड पसरलं... आणि आधी बाबांनी बॅग पकडली आणि नंतर आपल्या हिरो ने... सगळं हातात पाहिजे...साडीची महिती पण त्या सिनियर कलीग ला विचारत होती...अजिबात स्वावलंबी नाहीये ई बाळ...

प्रेम बिम कळण्यायेवढं वय आहे पण कुवत नाहिये.. भवरे बिवरे डोक्यात बघणारी मुलगी क्युट्ट्ट न वाटता.. येडी वाटते..
और जानबुझके सब लोग .. सुभा की वाइफ है या नही ये प्रश्न पे सायलंट है

कालचा एपी सॉलिड विनोदी होता अन तो बस मधुन ईशाला उतरवायचा तर जास्तच

मलातरी ईशा जास्त सेन्सिबल वाटते विस पेक्षा, म्हणजे भले ती जे काही करतीये , किमान तीला माहित तरी आहे की ती काय करतेय, ईकडे विस ५०शी आली तरी धड निर्णय घेता येत नाहीये.

बाबा रे, घे न एकच काय तो ठाम निर्णय , ईशा याला जरी नाचवत असेल तरी नाचायचे की नाही हे ह्याच्याच हातात आहे न

आधी बाबांनी बॅग पकडली >>> अन त्या ईतक्याश्या बॅगेत, सगळ्या डाळी, पिठं, तांदुळ , गहु, कपडे अन ईतर गरजेच्या वस्तु आरामात मावल्या Uhoh

Pages