तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

रविवार चा एपी अपलोड नाही केलाय मेल्याने .. Sad
मी मारे ऐटीत आज महाएपिसोड आहे असं सांगून बघायला गेले आणि पोपट झाला ना राव जोरात भोकाड पसरून रडणारी बाहुली ..
इथे वाचून कळलं बऱ्यापैकी .. शेवटी त्यांची भेट/ नजरानजर झाली
कालचा बघून पण लिंक लागली अर्थात .. आजच्या भागातील बुके देण्याच्या वेळी कसले expressions दिले सुभाने>> हो ना !

हिरोहिरविनीपेक्षा अंबाबाई, पीरबाबा, जोगतीण, फकीर ह्यांनाच जास्त टास्कस् आहेत>>
यांची कसली पादरी चॅलेंजेस?>> Rofl Rofl
काल इशा समारोपाचं भाषण करताना दृढनिश्चयी तरी "लेकी बोले सुने लागे "किंवा "तारीफ अधिक टोमणा " अश्या अविर्भावात बोलत होती तो चांगला केला तिने अभिनय ..
पण घरी कोणी असं सांगतात का ?मी उद्यापासून बंगलोर ला जाणारे परत केव्हा येईन माहित नाही .. आणि सगळे धक्के मारून शेवटी माझं प्रमोशन झालंय असं सांगतात का .. !? कै च्या कै च . .. आणि त्या नंतर तिची आई म्हणते म्हणजे उद्यापासून इशा चा डबा नाही करायचा Sad !??
अगं कालपासून लग्नासाठी मागे लागलीयेस ना ? लग्न करून गेलीच असती ना तेव्हा होतीच ना मनाची तयारी !? काहीही डायलॉग होते ते

ईशा ची लोद्याई >> म्हणजे काय मला नाही कळलंय कुणीतरी सांगा इस्कटून जरा

मायरा आणि झेंडे एका शॉट मधे खेटून आणि मधेच लांब असे दाखवले. एडिटिंग मधे गड्बड झाली म्हणायची.

काल इशा समारोपाचं भाषण करताना दृढनिश्चयी तरी "लेकी बोले सुने लागे "किंवा "तारीफ अधिक टोमणा " अश्या अविर्भावात बोलत होती तो चांगला केला तिने अभिनय . >>>>>>> ++++++१११११११ काल ती छान,फ्रेश दिसत होती.

पण घरी कोणी असं सांगतात का ?मी उद्यापासून बंगलोर ला जाणारे परत केव्हा येईन माहित नाही .. आणि सगळे धक्के मारून शेवटी माझं प्रमोशन झालंय असं सांगतात का .. !? कै च्या कै च . .. आणि त्या नंतर तिची आई म्हणते म्हणजे उद्यापासून इशा चा डबा नाही करायचा >>>>>>>> नैतर काय. आणि मुलीच प्रमोशन कॅन्सल व्हाव म्हणून कुणी तिच्या बॉसला फोन करतात का? ती इशाई सारखी सारखी सुभाच्या मागे का लागलीय?

जोरात भोकाड पसरून रडणारी बाहुली >>>>>> इशासारखी.

अजून बारीक झाल्या तर अजून सुंदर दिसतील. फिचर चांगले आहेत.>>+१

रविवार चा एपी अपलोड नाही केलाय मेल्याने>>>चूकून मन बावरे या मालिकेत तो भाग अपलोड केलाय.

हो काल त्यांनी ओम शांती ओम चा डायलॉग मारला >>>>> मला तर रविवारच्या सम्पुर्ण सिच्युएशनमध्ये ओम शांती ओम चा डायलॉग दिसत होता.

मायरा आणि झेंडे कसले खेटून उभे राहीलेत काॅ. रूम मधे. >>>>>> ++++++११११११११

मला मायराचे डायलॉग आवडले, " तसही तु ऑफीसमधे काही काम करत नव्हतीसच.. !"
नन्तर सुभा तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो, मग लगेच चाचपुन..." आय मिन इतका कमी अनुभव असताना तुला प्रमोशन मिळुन तु बेन्गलोरला जाते आहेस वै वै >>>>>> Biggrin

आणि सुभा केशरी झब्ब्यात काय क्यूट दिसत होता.....अतीच सुंदर. >>>>> हो ना. देवळात एन्ट्री करताना, चालताना किती हॅन्डसम दिसत होता.

आणि काल बुके देतानाही कसला गोड अभिनय केलेला.. त्याला बोलायच नव्हत ..tension aal hot. हे तो tyachya pratek expressions मधुन sangun गेला.... really hats of to him.. आधी सुभा कधीच आवडला नव्हता. पण म्हातारा सुभा जाम आवडला. इथे छान वाटतात. अजून बारीक झाल्या तर अजून सुंदर दिसतील. फिचर चांगले आहेत. >>>>>>> ++++++ ११११११११

तसा गेटप केलाय. फनी वाटावं म्हणून असेल. आणि ते गाणं, त्यात तो आणि ती अगडबम बाई जे काही करताहेत ते अगदीच काहीतरी आहे. >>>>>> 'प्रीती सुमने' हे ना ते गाण? मला तर आवडले ते गाणे. Happy

काहीतरीच दिसतोय तो त्यात >>>>>>>> हिरो हिरवीणीने नेहमीच सुन्दर, चान्गलच दिसाव अस थोडीच आहे. सुभाला काहीतरी वेगळ कराव वाटल असेल हयावेळी.

आणी काशिनाथ घाणेकर ट्रेलर पाहिलाय का... तो बघा.. interesting vatat ahe.... and subha look very different in this film >>>>> +++++++१११११११११

अगं कालपासून लग्नासाठी मागे लागलीयेस ना ? लग्न करून गेलीच असती ना तेव्हा होतीच ना मनाची तयारी !? काहीही डायलॉग होते ते>>>>> हो अगदीच. पण तिच्या आईला वाटलं लग्न करून गेली असती तरी शेजारीच राहिली असती ना त्या बिप्यासोबत... मग दिला असता रोज डबा.

आजचा विसं म्हणजे हॅन्डसमतेची परिसीमा होता Happy रडताना किती गोड दिसत होता.
तो पण चालला की काय बेंगलोरला ? मजा चाल्लीये.

रविवार चा एपी अपलोड नाही केलाय मेल्याने .. >> एक्सपर्ट ब्लॉग ला का? मन बावरे मधे अपलोड केला होता, ब्लॉग वाले कधी कधी घोळ घालतात.

ईशा बंगलोरला चालली आहे तर काय आकाश कोसळलंय?
दहशतवाद्यांच्या गावात प्रबोधन करायला चालली आहे तसे सगळे रडत होते.
चला, आता विक्रांतने ईशाला गाठले म्हणजे लवकरचं लाडू मिळतील. एस. एल. ए. एक महिन्याचा होता ना. किती दिवस राहिले आता? तो एक महिना एक वर्ष पण चालू शकतो म्हणा.

सुभा डोळ्यात पाणी असताना पण काय कातिल दिसतो. आनंद, दु:ख, काळजी, वेदना सगळे भाव कसले मस्तं व्यक्त करतो. याआधी कधी जाणवलं नव्हतं की तो एवढा हँडसम आहे. अरेरे. बराच काळ वाया घालवला. Blush

ईशाची आई एखाद्या गोष्टीला अनुमोदन किंवा दुजोरा देताना, नाकाचं सेंटर पकडून हनुवटीने हवेत लोअर सेमी-सर्कल काढताना जशी मान हलेल तशी हलवते. Biggrin
ही मानेची हालचाल ती एकदाही चुकवत नाही.

मी मालिका कधीकधीच पाहते; त्यातही अंदाज बांधते की आता हवेत सेमी-सर्कल येणार; आणि बहुतेकदा ते येतंच. Proud

छ्या, मला वाटलं होतं गेली एकदाची सुभाच्या मागची ब्याद! Biggrin
पण सुभाने तिला शोधलेच. आणि आता बाई भाव खातायत. सुभा गिरीकंद ट्रॅव्हलमध्ये तिच्या शेजारी बसून विदाऊट तिकीट चाललाय.
त्याला काय कमी आहे म्हणा... गिरीकंद सारख्या छपन्न ट्रॅव्हल विकत घेईल तो. Lol

आजचा विसं म्हणजे हॅन्डसमतेची परिसीमा होता Happy रडताना किती गोड दिसत होता.>>>>शब्द च नाहीत.........इतका हॅन्डसम दिसत होता खुप खुप बदाम असलेली बाहुली... अभिनय ला तर ताेड नाही

खूपच हँडसम आणि क्यूट दिसत होता रडताना देखिल..............
आणि अभिनयही अगदी उत्तम....... ही का आता भाव खातेय जादा...! Angry

कुणाचं भाग्य कधी उजळेल ह्याचा काही नेम नाही बघा. जवळपास 20 वर्षे हा मुलगा काम करतो आहे पण अचानक एका म्हातार्याच्या रोलने त्याला कमाल ग्लॅमर मिळवून दिलंय. त्याला अवंतिकापासून कारेदु पर्यंत अनेक मालिकांतून चाॅकलेट बाॅयच्या रुपात पहिलं तेव्हाही, छान आहे, ठीक आहे , चांगला अभिनय करतो इतपतच आवडायचा, असा देखणा बिखणा कधीच वाटला नव्हता. वय वाढवलयावर स्टार्स बदलले की त्याचे.

"तुला पाहते रे.." हे हिंदीचं अनुकरण वाटतं .... "तुम्हे देखती रहूं....!"
आपण कुणा 'ला' पाहतो का? की कुणा 'कडे' पाहतो?
त्यापेक्षा....तुला ध्याते रे चाललं असतं...किंवा............तू दिससी नयना ....वगैरे.......तरी!! Biggrin

अवंतिकामध्ये सुभा होता का. आठवत नाही. वाळदवाटमध्ये मला त्याच्यापेक्षा चिमां जास्त आवडला होता, अगदी हॅन्डसम वाटायचा तेव्हा. प्रसाद ओकपण आवडायचा वादळवाटमध्ये. नंतर तेवढा कधीच आवडला नाही.

"तुला पाहते रे.." हे हिंदीचं अनुकरण वाटतं .... "तुम्हे देखती रहूं....!">> अगं जुनं गाणं पण आहे की एक "तुला पाहते रे तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते" त्यावरुन इन्स्पायर असेल. पहिल्या प्रोमोतही मला आणि बऱ्याच जणांना ती आंधळी वाटली होती. Happy

किती कचरा जमवलाय बघा डोक्यात >>>>>>> +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९

कोण कोणत्या मालिकेत काय रोल मधे होत हे सगळ लक्षात आहे, गरज नसलेला हा डेटा डिलिट करायची सोय हवी होती Lol

सुभा गिरीकंद ट्रॅव्हलमध्ये तिच्या शेजारी बसून विदाऊट तिकीट चाललाय>> हे काल झालं का ? कारण काल शेवटची ५ मिनिटं नव्हती अपलोड केली .. ती गाडीत बसते आणि मग "थोड्याच वेळात.." मध्ये सुभा विचारतोय असं दाखवलं नंतर संपली मालिका Angry
रविवार चा एपी अपलोड नाही केलाय >> आहे आपली मराठी वर, सोमवारी अपलोड झाला .>>> थँक्स .. बघू आता केव्हा बघायला जमतंय

याआधी कधी जाणवलं नव्हतं की तो एवढा हँडसम आहे. अरेरे. बराच काळ वाया घालवला>> Biggrin
क्यूट दिसत होता रडताना देखिल >>> क्यूट?? मला क्यूट नाही वाटला पण अभिनय मस्तच केला. त्याला टोचणी लागून राहिली आहे भेटलो तरी तोंड लपवलं आणि आता हि चाललीये बंगलोर ला .. आपल्याला ती आवडते हे मान्य करूया कि नको .. आपण काहीतरी लपवतोय का ?/कश्यापासून तरी दूर पळतोय का ?
अश्या द्विधा मनःस्थितीत आपोपाप डोळ्यातून गंगा यमुना ... Happy

सेमी-सर्कल>> Lol

*** दिवाळी निमित्त खास ऑफर ***

आमच्या येथे एका 'राजनंदिनी' साडीमधुन २ ईशा ड्रेसेस, १ मायरा स्कर्ट आणि १ झेंडे जाकिट शिवुन मिळेल..!

# का पाहताय रे Lol Lol Lol

DJ. >> Lol Lol
कालचा एपी उपलोड नाही केलाय का झी ५ वर>> नाही माहिती गं. मी एक्स्पर्ट ब्लॉग वर बघते .. तिथे तरी आलाय

Pages