तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

काल झेंडे आणि विसं चे संवाद Rofl आपण इथे यायचो पूर्वी तेव्हापासून ही जागा तशीच वगैरे वगैरे..... वेगळाच संशय आला मला Lol
लुटुपुटूचं ऑफिस झालंय हे

धम्माल कमेंट आहेत. Rofl

कोणी कोणाचा दु:स्वास् करत नाही, कोणी कोणाला पाण्यात बघत नाही.>> मग मायरा काय करत असते?? Uhoh
यांच्या लग्नानंतर साॅनिया येणारच आहे नेहमीप्रमाणे घरगुती कटकारस्थानं करायला. Wink

मागे एक्दम स्कायस्क्रेपर बॅग्राउन्डला असलेल केबिन कॉम्युटर इफेक्टने तयार केल होत त्यामुळे पौराणीक सिरियल मधे जसे देव्देवता ढगावर वॉक करताना दिसत तसे मायरा आणी सुभा दिसले होते, सध्या कॉन्फरन्स रुम नाहीतर निमकर चाळ नाहितर सुभा गाडितच दिसतो >>>> Biggrin
ते helicopter विकलं का??
सुभा खिशात फक्त credit/debit cards घेऊन फिरतो का ?? रिक्षा, पावभाजी चे पैसे ईशीनेच दिले.

रिक्षा, पावभाजी चे पैसे ईशीनेच दिले>>
लहान लहान नोटा नसतात आमच्याकडे सांगायचा क्षीण प्रयत्न. परवा वडापावसाठी पण सुट्टे आहेत आज असं विलास म्हणाला. नंतर आपल्याकडे आता 500 च्या खालची नोट कशी नसते हे सांगून झालं. एखाद्याकडे लहान नोट असेल तर तो गरीबच असतो असं ठरलंय त्यांचं.

मायरा ओवरॅक्टिंगची दुकान आहे. तिला हाकला>>>> अगदी अगदी, ती फक्त इथेच नाहीतर सगळीकडे ओव्हरएकटिंग करते अगदी त्या न फुललेल्या कळ्यात सुद्धा.

आता कर्जतची अंबाबाई भेट घडवणार वाटते सुभा अन ईशाची, दोघांचाही किती तो विश्वास एकमेक अन न कबूललेल्या प्रेमावर

आता ईबाळ कर्जतला देवीची ओटी भरायला जाणार आणि तिथे विस त्याच्या आईबरोबर येणार. मग देवीच्या ईच्छेने त्यांचे लग्न होणार. Happy

अरे,हिचं काय कंपलशने? तुम्हाला कबुल करावच लागेल..आपण एक challenge घेऊ.. Lol
काय खुन्नस ने बघत होती..

इशा डायरेक्ट लाईन देतीये आणि आपला सुभ्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरतोय असं वाटायला लागलंय >>> Rofl Rofl

फारएण्ड, बाहुलीच्या अ‍ॅडिशन्स भारी आहेत Biggrin

त्याला इशारा देताना मॅच्युअर्ड बोलते इशा >> बापरे..तिचे एक्स्प्रेशन डरावणेच वाटले. कशी डोळे स्थिर ठेवून, रोखून बघत बोलते.

त्याने कबूल करावे म्हणून मागेच लागलीये त्याच्या! Sad

इशा डायरेक्ट लाईन देतीये आणि आपला सुभ्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरतोय असं वाटायला लागलंय >>> Rofl
फारेण्ड, इशा आणि बाहुली अगदी शोभेल. चिरक्या आवाजात लाडिक टोनमधे बाहुलीशी गप्पा. नक्को रे बाबा.
त्याला इशारा देताना मॅच्युअर्ड बोलते इशा >>>>>> हा सगळा प्रकारात इशा गळेपडु वाटते.

काल ती म्हण लीच की माझे नशीब काय आहे वगैरे. शी जस्ट वाँट्स टू लॅच ऑन टु धिस पूअर लिटिल रिच गाय. तोच जास्त व्हल्नरेबल वाट्तो आहे. ही गोड बोलून सर्व ताब्यात घेइल. प्रीनप कर रे बाबा वरना कचरेमे जाएगा प्यार के वासते. फुकट पनवती मागे लागुन घेण्याचा प्रकार आहे.

चहयेद्या मधे मारूती व्हॅनचं हेलिकॉप्टर केलं होतं Lol

Submitted by अंजली_१२ on 18 October, 2018 - 16:26 >>>>>>> मज्जा आली होती ते पाहताना, अगदी सुभा सुद्धा एन्जॉय करत होते.

काल ती म्हण लीच की माझे नशीब काय आहे वगैरे. शी जस्ट वाँट्स टू लॅच ऑन टु धिस पूअर लिटिल रिच गाय. तोच जास्त व्हल्नरेबल वाट्तो आहे. ही गोड बोलून सर्व ताब्यात घेइल. प्रीनप कर रे बाबा वरना कचरेमे जाएगा प्यार के वासते. फुकट पनवती मागे लागुन घेण्याचा प्रकार आहे. >>>>>
एक प्रोमो चाललाय त्यात ते कर्जत मंदिर etc दाखवत होते आणि ते प्रेमाचे डायलॉग ... माझी मुलगी (वयाने साडे नऊ पण उंची मात्र त्या इबाळापेक्षा २/३ इंच जास्तच ...शिवाय बोलण्यात पण क्लॅरिटी) म्हणते मम्मी तो काका तर तिच्या पप्पापेक्षा पण मोठा दिसतो आणि हिला त्याच्याशी प्रेम करायचे आहे तो खूप पैसेवाला आहे म्हणून काय ???? तिला फक्त सांगितले तू नको टेन्शन घेऊस उद्याच्या ओरलचे पाठांतर कर.

इशा डायरेक्ट लाईन देतीये आणि आपला सुभ्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरतोय असं वाटायला लागलंय > अगदी.
वर कोणी तरी म्हटलं त्या प्रमाणे , हाताचा चंबू .. एकदम योग्य शब्द Biggrin

इशाचे कडक रागावलेले एक्स्प्रेशन्स बघुन गौरी बाइ आठवतात कादिप मधल्या.. लुटुपुटुच्या चिडण्याऐवजी दात ओठ खाउन तिरस्कार करायची शिवचा Lol
इशा त्याच्याशी सौम्य बोलतच नाही.. कायम त्याला वेठिस धरुन बोलत असते..
प्रेमाच गोड गोड बोलण नाहिच मुळी

खरंय आनंदी.. Happy
ह्या झी च्या हिरॉईन्स सुरुवातीला हिरोंचा अगदी दुस्वास करतात...
पण इथे कदाचित गवरी शोभली असती.... आता थोडा तरी अभिनय जमायला लागला होता तिला....
ही म्हणजे चिरका आवाज, कडक डोळे, रफ टोन मधे त्याला झापत बोलणे, सरळ, कपाळावर आलेले केस, ..यांनी डोक्यात जातेय.

एक प्रोमो चाललाय त्यात ते कर्जत मंदिर etc दाखवत होते आणि ते प्रेमाचे डायलॉग............. हे कुठे दाखाव्ल आणि

५ करोडचं पेट्रोल. Rofl
जयदीप धडाधड कोणालाही नोकरीवरुन काढतो..वि.सं ही सांगतो..त्याचा शब्द शेवटचा ओफीसमधे.. मग एवढा मान असणारा.. १३ बिझनेस सांभाळणारा हुषार माणुस असा सहजपणे कसा फसतो??
आणि घरी सोन्या बाई म्हणतायत आम्हाला हात पसरावे लागतात वि.सं कडे.
आता हे एकटं रहायची भीती वाटते हे काय नविन प्रकरण?

'हे मन बावरे' कुणी पाहताय का? त्यातला अनुचा बॉस काय सॉलिड ठरकी अ‍ॅक्टिंग करतो. एकदम ऑस्कर पर्फोर्मन्स!

तिला फक्त सांगितले तू नको टेन्शन घेऊस उद्याच्या ओरलचे पाठांतर कर. >>> Lol . सत्याचा आवाज दाबून टाकलात Wink .

राया कोण actor आहे. सिरीयल बघत नाही, ती मृणाल आवडत नाही मला.

हो मृणालला अस्सं सासरमधून उचलून ईथे टाकलंय असं वाटतं, फक्त आजूबाजूचे चेहरे बदललेत. तिच गरीबी, मृणालचा साधेपणा, तिला सगळ्यांनी त्रास देणं, तरी तिचं आपलं चांगुलपणाचं भजन चालूच. चांगले कलाकार वाया घालवलेत.

मृणालचा साधेपणा, तिला सगळ्यांनी त्रास देणं, तरी तिचं आपलं चांगुलपणाचं भजन चालूच.>> ओव्हरअ‍ॅक्टिन्गचा ओव्हरडोस आहे ते , सगळेच दुसर टोक गाठतात... त्याच्या एका एप्सोडमधे वन्दना गुप्ते सहाणभर चन्दन उगाळते पण देवाला काहिच लावत नाही डायरेक्ट आरतीच... देव देव्हारा वैगरे नाहिच एक्दम केकता च्या सिरियल टाइप अन्बे मा, राम-सिता टाइप एकच गणपतीची मुर्ती, अशी मुर्ती मराठी घरात फक्त गणपतीच्या १० दिवसात असते हो... यान्चा पण विस सारखा मोठा बिजनेस पण नक्कि काय करतात ते कळत नाही..

>>>राया कोण actor आहे - नवीन आहे कुणीतरी, नाव ठाउक नाही. बाकी स्टारकास्ट चांगली आहे. सिरिअल मात्र बोअर आणि प्रेडिक्टेबल आहे. मी कंटिन्यु करेन असे वाटत नाही.

या सिरीज मधल्या कॉर्पोरेट्/ऑफिस्/मीटिंग्/प्रेझेण्टेशन ई. सीन्स ची अनेकदा खिल्ली उडवली आहे. पण ईशाच्या आई वड्लांचे सीन्स अनेकदा चांगले असतात. एखाद्या चाळीत आजूबाजूला सहज दिसणारे कुटुंब वाटते. अशा घरगुती सीन्स मधे एकदोनदा स्पार्क दिसतो. "आपल्या मुलीला कधी पैशाची चणचण जाणवू नये" असे तिची आई म्हणते तेव्हा ते जेन्युइन वाटते, तिच्या वडलांचेही अनेक सीन्स्/संवाद नॉर्मल आहेत. ईशा मात्र बोअर करते. सुभा चे बरेचसे सीन्स मस्त आहेत.

मात्र असे वाटत असतानाच हळूच कथानक ऑफिस मधे पोहोचते... Happy

Pages