तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

निधी..असं दाखवलं तर नाहीए..पण असू शकतं.... परफेक्ट प्लॉट आहे. Happy
कारण एकदोनदा विक्रांत म्हणताना दाखविला आहे की , " ही कंपनी जयदीपचीच आहे!" . ..वगैरे....
पण शिल्पा तुळसकर चा काय रेफरंस मग?
Happy

पण शिल्पा तुळसकर चा काय रेफरंस मग?>> ती अजून साबांच्या व्हिजनमध्ये आली नाहीये. >>>> मला एक खटकतय, ती विक्रान्तची आई त्याच्या लग्नाचा विषय काढताना त्याच्या पहिल्या बायकोचा म्हणजे शिल्पा तुळसकरचा उल्लेखच करत नाहीये! Uhoh का? जस 'चान्दनी' चित्रपटात वहिदा रहमान विनोद खन्नाला 'जाणारे जातात त्याच्न्या आठवणी ठेवून, त्याच्या मागे राहणार्या माणसान्नी आपल आयुष्य का थाम्बवाव?' म्हणते तसही ही सुभाला काहीच कस म्हणत नाही?

त्या फिफ्टी शेडवाल्या खोलीत शिल्पा तुळसकरचा फोटो असावा (मोठ्ठा आणि हसरा- मोहब्बते मध्ये एश्वर्या रायचा होता तसा ) आणि सुभा रोज त्या फोटोशी बोलण्यासाठी खोलीत जात असावा.

ते दोघ फेर्या मारत असताना , ईशी त्याच्याकडे काय भारावून बघते .. तसंही तिच्या जागी मी असते तर मी ही तेच केलं असतं म्हणा >>>>>++++++१११११११

म्हातारडा वगैरे प्लिजच म्हणू नका. कसला हँडसम आहे तो. आणि फक्त डोळ्यांतून काय भाव व्यक्त करतो. >>>>>> अगदी अगदी. आणि हल्ली ४०-५० वयोगटातल्या स्त्री-पुरुषान्ना कुणी म्हातार या गटात टाकत नाही. हा, पण काही माणसे कृत्रिमरित्या तरुण होण्याचा प्रयत्न करतात ते मात्र चुकीच आहे. एखाद्यात/एखादित जेनेटिकली कुठल्याही वयात तरुण दिसण असेल तर गोष्ट वेगळी.

आई साहेबही सावत्र असाव्यात अशी मला शंका आहे! आईसाहेबांना विक्रांतबद्दल माया असतेच. त्या त्याला आपल्या घरी आणतात. आणि विक्रांत कंपनीचा मालक बनून सर्व व्यवहार चोख सांभाळतो. >>>>> तिला जयदीप काय कामाचा नाही हे माहित असाव. तरीच ती Sownya विक्रांत वर राग धरुन असते.

ईशा सुभा च लग्न झाल्यावर मायरा च काय होइल?>> आत्ता जेवढं नाक फुगवत आणि शिरा ताणून बोलते त्यापेक्षा अजून फुगवून आणि ताणून बोलेल आणि डोळे फिरवेल आणि मी आता कसा बदला घेते ते बघच असं पुढचे अनेक एपिसोड म्हणत राहील Wink
तरी आम्हाला आधीच माहितेये लग्न कुणाचं होणारे ते> >>>>>> Rofl

त्या बिपिनच्या मोठया बहिणीला Doubt यायला लागलाय विक्रान्तवर, हा असा सारखा सारखा चाळीत का टपकतो म्हणून.

तुम्हा लोकांना शितु कुठे दिसते ?? >>>>> म्हणजे? तुम्ही शीर्षकगीत नाही बघितल का? त्यात आहे ती विक्रान्त आणि इशाच्या बॅकग्राउन्डला. Happy

तुम्हा लोकांना शितु कुठे दिसते ??>> बहुतेक टायटल सॉंग मध्ये .. मला पण नाही दिसलेय अजून Wink
निधी>> परफेक्ट प्लॉट आहे! असू शकतं असं

त्या बिपिनच्या मोठया बहिणीला Doubt यायला लागलाय विक्रान्तवर, हा असा सारखा सारखा चाळीत का टपकतो म्हणून.>> तिला, तिच्या आईला, मायराला संशय येत आहे. पण बाकिच्या लोकांना अजिबात नाही. आई-बाबा(विसरंजामे पण त्यांना आई-बाबाच म्हणतो Uhoh ) तर इतके भोळे आहेत कि प्रत्येकवेळी त्याच्या प्रत्येक गोष्टीला 'एव्हढा मोठा माणूस पण पाय जमीनीवर आहेत' असेच म्हणत असतात.

आई-बाबा(विसरंजामे पण त्यांना आई-बाबाच म्हणतो Uhoh ) तर इतके भोळे आहेत कि प्रत्येकवेळी त्याच्या प्रत्येक गोष्टीला 'एव्हढा मोठा माणूस पण पाय जमीनीवर आहेत' असेच म्हणत असतात.>>> आमच्या आई-बाबांनी एवढ्यात डझनभर काठ्या मोडल्या असत्या फटकवून...दोघांनाही. Lol

म्हणजे? तुम्ही शीर्षकगीत नाही बघितल का? त्यात आहे ती विक्रान्त आणि इशाच्या बॅकग्राउन्डला>> अगं ऑनलाईन नाही दिसत... निदान मला तरी मालिका विदाउट टायटल सॉंग दिसते ..
कधी कधी असतं टा. सॉ. पण आम्ही अर्थातच लग्गेच ते फाफ़ॉ करायचं सत्कर्म करतो Wink

जयदीप भारी आहे खरंच। तो खरंतर मनाने चांगला आहे पण कोणी मोठं समजवणारं नसल्यामुळे वाया जातोय। इशाबाळाच्या गोष्टीमुळे भुलून जाऊ दिलं तिला चक्क!!
इशाच्या आईला चारदोन बऱ्या साड्या नेस म्हणायला पाहिजे, png मधल्या बायकांचा युनिफॉर्म पण उत्तम म्हणला पाहिजे तिच्या साड्यांपुढे। किती overacting करते ती।

जयदीप खरंच आवडला आज. निरागस टाइप्स...
त्याला कसला तरी मानसिक वगैरे आजार असावा का? एकदम कजाग ते एकदम हळुवार असा स्विच होतो तो. म्हणूनच कदाचित विक्रांत त्याला इतका जपतो आणि बिझनेस त्याच्या हातात नाहीये.

इशाबाळाने 3 लाख रु चं मंगळसूत्र घेतलं. सुभा ने ते लपवून वगैरे ठेवण्याचा प्रसंग काय झेपला नाही...

ते थ्री इडियट्स मधून ढापलयं.
म्हणजे टिल्लूना बघा पैसे किती महत्वाचे. त्यावरून किती बोलतात ईशाला ते निमकर कुटुंबाला दाखवण्यासाठी

म्हणजे? तुम्ही शीर्षकगीत नाही बघितल का? त्यात आहे ती विक्रान्त आणि इशाच्या बॅकग्राउन्डला. >>>> OK. बघितलं. ती सावली शितु आहे का ??? अच्छाSSSSS.
कविता लाड , सचित पाटील ची आई असू शकते तर मग ......

ते थ्री इडियट्स मधून ढापलयं.
म्हणजे टिल्लूना बघा पैसे किती महत्वाचे. >>>> 3 lac च मंसू हरवलं तर कोण डोक्यावर बर्फ ठेवून राहील ????

3 lac च मंसू हरवलं तर कोण डोक्यावर बर्फ ठेवून राहील ???>> हो ना आणि तेही मध्यमवर्गीय लोकं. विकीला तीन लाख रुपयांचं नसेल काही पण सामान्य माणसासाठी ते खूप जास्त असतात की.

बिल व्हायच्या आधी मं. सू हरवलं तर टेन्शन नहीं लेनेका, पीएनजी शोधतील बाबू Happy
तसंही कॅमेरे बशीवलेत म्हणाव.

ते मं. सू चं डिझाईन बघताना सुभा अन् इशा (सुभाष म्हणावं का? ) मंसूचं डिझाईन म्हणजे कसा जुन्या नव्याचा संगम वगैरे बोलत होते ना, तेव्हा ते दोघेजण पण नव्या जुन्याचा संगम वाटत होते.

आजचा भाग : कश्यासाठी आई-बाबांसाठी....
आज इशाबाळाला कळले कि जयदीपला गोष्ट सांगून आपल्याला हवे ते करवून घेता येते. आधीही कोणीतरी तसे करत होते म्हणे पण कोण बरे? ते अजून गुप्त ठेवले आहे.
आज तिला हिरकणीची गोष्ट आठवली आणि ती हिरकणी झाली... तर हिरकणी पत्र पोचते करायला कार्यालयात गेली होती. ती तिकडेच अडकली. आपल्या उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या आई-बाबांसाठी तिला कार्यालयाचा गड उतरुन जायचे होते. ते अतिशय अवघड काम होते. पण शक्कल लढवून म्हणजे जयदीप गडकरीला तिने शेंडी लावून, लिफ्टने येण्याचा मार्ग तिने मोकळा केला.

बिल व्हायच्या आधी मं. सू हरवलं तर टेन्शन नहीं लेनेका, पीएनजी शोधतील बाबू >> Lol

शक्कल लढवून म्हणजे जयदीप गडकरीला तिने शेंडी लावून>> जयदीपचं आडनाव गडकरी???

तसा प्लॉट असण्याची खूप शक्यता आहे. पाहिलेल्या भागांतून तसेच वाटते.>> ओके. म्हणजे माझ्या साबांना केड्याच्या मनातलं कळायला लागलंय तर. Proud
तसा प्लाॅट असूही शकेल पण हे असं दाखवल्याचं मी या धाग्यावर वाचलं नव्हतं त्यामुळे कन्फर्म केलं. Happy

आज तो चिमटा सीन पाहिला. ज्यांच्या घरी ते चिमटे असतात त्यांनी अनेकदा फावल्या वेळात हे चिमटे बोटात अडकवून बघितलेले आहेत. त्यामुळे कोणालाही तो स्पर्श आणि इतर कोणताही रोमॅण्टिक टच यात गल्लत होणार नाही Happy

किमान गुलाबी रंगाचा तरी दाखवायचा तो!

माना डोलावण्याचे रेकॉर्ड नक्कीच केले आहे ऑलरेडी या सिरीज ने. प्रत्येक सीन मधल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी मान डोलावली पाहिजे अशी सक्ती असावी. त्या दुकानातील सीन मधे तो या निमकरांचा मित्र गण्या, तो ही बळंच एकदोनदा मान डोलावतो.

सरंजामेंच्या ग्रूप ऑफ इण्डस्ट्रीज मधे साड्या बनवण्याचा कारखानाही दिसतोय.

तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात ते त्याच खोलीत असतील, तर देवाशी स्वगत बोलताना मोठ्याने म्हणून नये हे ईशाला माहीत नसावे.

तसेच तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात त्यांच्या खोलीशेजारी उभे राहून ते बोलू नये हे सरंजामेंना माहीत नसावे Happy

रच्याकने, आज शीर्षक, क्रम, मज्जा मधे असं दिसतंय -

तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता
तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी
वेळ असा वाचवला जाऊ शकतो!
Wink

तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात ते त्याच खोलीत असतील, तर देवाशी स्वगत बोलताना मोठ्याने म्हणून नये हे ईशाला माहीत नसावे.
>>
ते सगळं जाणूनबुजून हो. माझं कित्ती प्रेम आहे आणि मी प्रेमासाठी कसा त्याग करतीये ते विक्रांतला वेगवेगळ्या पद्धतीने सतत सांगायचे. त्यामुळे कदाचित त्याचे मत बदलेल अशी आशा असावी.

बाकी मुलगी हुशार आहे. तिची आई तिला पैशांचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तिच्या दृष्टीने त्यातल्या त्यात बरं स्थळ बघत होती. ह्या ईशाने तर किती मोठी उडी घेतली. फक्त स्वतः:चाच नाही तर आई बाबा, आणि पुढच्या बऱ्याच पिढ्यांचा प्रॉब्लेम मिटवण्याचा प्रयत्न करतीये.

ती इशुटली भयानक मुळमुळीत आहे. टिल्लूनी आवाज चढवला तर लागली रडायला. इतका वेळ ताटकळत ठेवले उशिरा येउन परत रडका सूर , नंतर 3लाखाच मंसू निवडलं आणि मग ते इथेतिथे ठेवलं ,शोधताना परत गळे काढणं सुरुच , टिल्लू चिडणार नाय तर काय Angry

Pages