तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

सुमार. हाच शब्द वापरायचा होता मला. काही दर्जाच नाही. ना धड आॅफिस, ना धड चाळीतलं वातावरण, ना धड हिरवीण. काहीच नीट दाखवता येत नाही यांना. मोठे कलाकार म्हणून आपण बघायला जातो पण पदरी निराशाच पडते. हा आता ट्रेंड झाला आहे. एखादा नाव असलेला अनुभवी कलाकार आणि बाकी सगळे लिंबूटिंंबूू. झीने आपली प्रतिमा धुळीला मिळवली. यापुढे ही मालिका चुकूनही बघणार नाही.

काल चुकून एक भाग बघितला हयाचा. बिपिन " इशा माझी होणारी बायको आहे' म्हणाला म्हणून विक्रान्त चक्क चिडला म्हणे इशावर. पण नन्तर इशाला हा साखरपुडा करायचा नाही ऐकून खुश झाला. इशाचा साखरपुडा ठरला काय, मोडला काय ह्याला काय करायचय? Uhoh

इशा आणि विक्रान्त रोजच एकत्र जेवतात का?

काल इशाचे बाबा सेन्सिबल वागले. माबो वाचला वाटत त्यान्नी. बिपिनच्या घरच्यान्नी दिलेला फ्रिज परत दिला. माझ्या मुलीला जो मुलगा पसन्त असेल त्याच्याशीच मी तिच लग्न लावून देईन म्हणाले. जानुचे बाबा आठवले.

ती इशाची मैत्रिण बिपिनवर फिदा आहे वाटत. सारख बजावत होती इशाला, "बिपिन्याला काही बोलू नको" , "बिपिन्याला काही बोलायच नाही हा." Wink

आधी मला तो बिपिनचा भाऊजी 'बिपिन' वाटलेला. Proud नन्तर कळल, हे ध्यानच 'बिपिन' आहे.

त्याची बहीण म्हणत होती की, "बिपिनसारख्या श्रीमन्त मुलाला तुम्ही नाकारत आहात." बिपीन श्रीमन्त आहे? Uhoh

त्या बॉसने जेवणाचा टाइम अर्ध्या तासावरून 1 तास केला. आता पुढच्या भागात प्रत्येक शनिवार आणि दुसरा चौथा शुक्रवार सुट्टी देणार आहे

झी आपल्याच सिरीयल्सच्या प्रेमात वहावत जाते.
सात सासवा काढा आणि श्रीच वय वाढवा.
हि होणार सुन्न मी च आहे.

झी मराठीच्या पेजवर ह्या सिरीयल ला लोक खूप लाईक करत आहेत. अगदी बेबी ईशाच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करत आहेत. पण बहुतेक लोक केवळ सुभा साठी बघत आहेत. तिथे कुठेच नाराजीचा सूर नाही दिसला सिरीयल बद्दल.

नाराजी व्यक्त करणाऱ्या बहुतेक पोस्ट उडवतात झी वाले. Happy

Submitted by Nidhii on 4 September, 2018 - 03:24 <>>>>>हो असेच असेल मी तिथे एक कमेंट टाकली - नुकताच एक भाग दाखवणार / दाखवला त्यात ती गणपतीला फुल वाहून तो सुभा आय लाईक ऐवजी आय लव्ह यू म्हणाले तर चालतील वैगरे त्या भागावरून.

नाराजी व्यक्त करणाऱ्या बहुतेक पोस्ट उडवतात झी वाले. Happy

Submitted by Nidhii on 4 September, 2018 - 03:24 <>>>>>हो असेच असेल.
मी तिथे एक कमेंट टाकली - नुकताच एक भाग दाखवणार / दाखवला त्यात ती गणपतीला फुल वाहून तो सुभा आय लाईक ऐवजी आय लव्ह यू म्हणाले तर चालतील वैगरे त्या भागावरून.

गायत्री दातार लहान असताना तिला सुभाच्या हातून बक्षिस मिळालं होतं आणि ती म्हणाली होती की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तो फोटो सुभाने काल टाकला होता आणि नंतर काढला.

काल तो धाकटा भाउ दाखवला. काय पात्र आहे. यू आर फायर्ड कश्यावरऊनही. अश्यानेच मराठी माणूस पुढे जात नाही. आणि गेट वे ऑफ इंडिया विकत घेतो.!!!!! अन बिलिवेबल. इशाचा मागच्या आठवड्यातला गुलाबी टॉप मस्त होता. पण ती फारच बालीश वागते इतक्या मोठ्या बॉसला सर सांगा ना मी काय काम करू काय काम करू असे लाडे लाडे विचारते. आईव्डीलांचे संवाद बरे वाटतात मला. असे असू शकते. एकच पेस्ट्री सर्वांनी शेअर केली. सुभा छान काम करतोय आहे त्यात. पण सूट फार बोअर आहेत. झेंडे पात्र अगदीच गुंड आहे. पण असतात अशी माणसे व गावा
कडे कसे असते ते रोख टोक सांगायची सवय आव डली.

सुभा भावासा ठी सर्व सांभाळ तो आहे म्हणजे काय रहस्य आहे सावत्रं मोठा भाउ आहे का?

खरे तर राधाक्का फार पीळ मार ते आता म्हणून हे बघायला बरे वाट्ते. मी अ‍ॅप वर बघते फोन वर झिंदाबाद.

हो ते काहीतरीच होते.. गेट वे ऑफ इन्डीया विकत घेण्याचा सिन! Proud
आणि तो लहान भाउ सायकिक दाखवायचाय काय् ? सुभा अगदी त्याला साम्भाळुन घेताना दाखवलाय. कि कम्पनीचा खरा मालक तो लहान भाउ आहे?
तसेच झेन्डे मागच्या कुठल्यातरी एपिसोड मधे दरवाजा लावुन घेउन सुभाला अरे तुरे करुन इशाबद्द्ल खडे बोल सुनवत असतात... ते काय? झेन्डे पण सुभाचा मित्रच आहे कि काय? आणि इथे ऑफीसमधे स्टाफ असल्यासारखे नाटक करत आहेत? काही कळेनासे झालेय.

कालच्या एपि मधे तर इशाबाईचे अगदीच शाळकरी मुलिसारखे ...बाप्पाला 'कौल दे' काय, आणि 'एकदा तरी मागे वळुन बघाल' काय... 'फिन्गर क्रोस्ड' काय... ते मैत्रीणीला 'एक बोट पकड' काय.. असे खेळ सुरु होते.
त्यात पार्श्वभुमीला ते सैराटचे गाणे.

कालच्या एपि मधे तर इशाबाईचे अगदीच शाळकरी मुलिसारखे ...बाप्पाला 'कौल दे' काय, आणि 'एकदा तरी मागे वळुन बघाल' काय... 'फिन्गर क्रोस्ड' काय... ते मैत्रीणीला 'एक बोट पकड' काय.. असे खेळ सुरु होते.
त्यात पार्श्वभुमीला ते सैराटचे गाणे.>>>>ऐसा होता हय इस उमरमें. Happy त्यात समोर सुभा आहे. म्हणजे हरखणारच ती Happy आता सुभा तिला बघुन का हरखलाय ते कळायचं बाकी आहे. Lol
<<<<<<<<एकदा तरी मागे वळुन बघाल' काय... 'फिन्गर क्रोस्ड' काय... ते मैत्रीणीला 'एक बोट पकड' >>>>>>. हे सगळं करुन झालंय. इशाच्या किंवा तिच्यापेक्षा जरा कमी वय असताना Happy
काल सुभा तिला मंदिरात अचानक समोरा येतो तेव्हा इशासोबत मलापण मस्त वाटलं. गोड वाटलं.

मी सुबोध भावे ला बालगंधर्व च्या प्रमोशन च्या वेळी प्रत्यक्ष पाहिलं आहे. उंची छान आहे (अगदी बुटका नाही) आणि अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे, तितकाच तो हुशार ही आहे. मराठी भाषेवरचं प्रभुत्व वाखाणण्याजोगं आहे.
तत्ववादी लोक असतात तसा आहे तो.
या मालिकेत त्याचे काही ओरिजिनल ट्रेट्स दिसतात, कामगाराला जेवू घालणे, इशाच्या बाबांना गाडीतून घरी पोहोचवणे. इशाचे २४ रुपये आठवणीने परत करणे इ.

सुबोध जाम आवडतो मलापण, तो असा अचानक समोर आला तर कोणीही होईलच की फ्लॅट.. Happy
मस्त पर्सनॅलिटी आहे त्याची आणि बोलायला पण चांगला आहे, आमच्या आॅफीसमध्ये आला होता तो ‘कट्यार’च्या प्रमोशनसाठी, मस्त गप्पा मारल्या सगळ्यांशी
Happy

जयदीप कसला पकाव आहे.
आणि त्यात इशा काय गण्पतीची गोष्ट सागुन पकव्त होती. बरं गोष्ट पण ठीके पण त्यासाठी गणपतीची मुर्ती कशाला हवी होती.
सरंजाम्यांना तर इशा काहीही बोलली, काहीही केलं तरी गोड / बरोबरच वाटतंय. Happy
सुभाचा अभिनय त्याच्या चेह्र्यावर/ डोळ्यातुनही दिसुन येतो.

सुभा असा अचानक समोर आला तर मलाही गोSSSSSSSSSडच वाटेल> >>>>>>>>>> Happy समोर सुभा आहे म्हणुन इशाचं पहिल्यांदा त्याच्या प्रेमात पडणं समजु शकते. Happy उलट सुभा जर का आधी हिच्या प्रेमात पडला असं दाखवलं असतं तर मला नसतं आवडलं. Happy
कारेदु मधे त्या अंजलीला प्रपोज केल्यावर मला खुप राग आला होता त्याचा Lol
सुबोध जाम आवडतो मलापण, तो असा अचानक समोर आला तर कोणीही होईलच की फ्लॅट >>>>> +१

येस येस. काल सुबोध मला पण जाम आवडला. साधा पांढरा शर्ट. किती गोड दिसत होता. इशा प्रकरण काय बालिशच. पण बघायला गोड आइसक्रीम सारखी वाट्ते लव्हस्टोरी.

राधाक्का परत गुरू ला पदरात घेणार. तिचा तो भैताड मित्र वगैरे जाम बोअर होते आहे आताशा.

tulapahatere.jpg

सुबोध भावे
"दुनिया गोल हैं"
काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता.
तेव्हा ती म्हणाली की मला पण तुमच्या बरोबर काम करायचं
मी म्हणालो नक्की
आणि अचानक एक दिवशी "तुला पाहते रे " च्या सेट वर तिची गाठ पडली.
आणि तिनी मला ह्या प्रसंगाची आठवण करून दिली .
मी थक्क!!!!!!!
ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती "इशा" म्हणजेच "गायत्री दातार"
स्वप्नांवरचा माझा विश्वास अजुनच वाढला.
***
तुपारे बद्द्ल हे व्हॉए वर व्हायरल झालय सध्या. सुभाची ट्विटर पोस्ट हीच असावी.

That is not निरागस...that is just बावळट. Uhoh
एकुणच बावळटपणा डोक्यात जायला लागलाय आता. ग्रॅज्युएट झालेली कुठली मुलगी इतकी dumb असते? कुठे कसं वागायचं, काय बोलायचं एवढा सेन्स आणि मॅच्युरिटी आता दहावी झालेल्या मुलींकडेपण असते.
आणि लगेच पडली पण प्रेमात? क्रश असणं ठिक आहे एकवेळ...पण हे जरा जास्तच. वय वगैरे काही दिसणं अपेक्षित नाहीचए म्हणा...
सुभाकडे या सिरियलला द्यायला एका वर्षापेक्षा जास्त वेळ असेल असं नाही वाटत. सिनेमा त्याची वाट बघत असेल.

कुठे कसं वागायचं, काय बोलायचं एवढा सेन्स आणि मॅच्युरिटी आता दहावी झालेल्या मुलींकडेपण असते.>>>> +१

विक्रांत आणि मायरा ची जोडी पण मस्त दिसेल.>>>>>> नहीssssssssssssss

Pages