तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

"खरी गंमत कशात आहे सांगू/माहित्ये?" या वाक्याने जाम पकवलंय! दर दुसर्‍या मिनीटाला म्हणते आहे ती मुलगी हे.
>>>
अरारा!
खरी मजा कशात आहे हे मालिका पाहता पाहता प्रेक्षकांना नकळत दिसलं पाहिजे. लेखकाला कॉन्फिडन्स नसला की अशी थेट ताटं वाढली जातात. :डोक्यावर हात मारून घेणारी बाहुली:

पाणीपुरी खाऊन ठसका लागल्याचा सुभाचा अभिनय मात्र मी मिस केला म्हणायचा...

मी काल बघायला विसरले. Happy आज संध्याकाळी बघायला पाहिजे.
चार वेळा रिपिट असतात या सिरियलचे असं मैत्रीणीने सांगितलं. Uhoh

Biggrin
आणि ते "दो रुपए भी बहुत बडी चीज होती है बाबू..." पण बास झालं आता...
केड्या स्वतःच्याच (अँड नॉट सो ग्रेट!) वाक्याच्या एव्हढा का प्रेमात पडला ए कोण जाणे..!!

मानबा मध्ये कंगाल झालाय ना तो केड्या म्हणून सुचलं असेल हे वाक्य. पण संवाद शर्वरी पाटणकरचे आहेत. पटकथा केड्याची आहे.

आणि सुबोध खरंच किती पारोसा दिसतोय....! आणि ती लाँग शॉट्स मधे तर त्याच्या पुढे अगदीच एव्हढीशी दिसते... निरागस नाही...तर बालीश, शालेय...!!!
तो का पण हिच्या बरोबर यायलाय?
समहाऊ सुबोध भावे मला अगदीच नाईलाजास्तव ही भूमिका करत आहे असंच वाटतंय......!!

करोडपती बिझनेसमन खुपच निवांत दिसतो यात. इतका वेळ आहे इशासोबत बाहेर फिरायला, फ्रिज दुरूस्त करायला आणि मायराला घेऊन इशाच्या घरी जाऊन माफी वगैरे मागून द्यायला.
एवढं मोठं (म्हंजे नक्की केवढं काही माहिती नाही ब्वा) एंपायर असं चालवतो का?
खुप दिवस झाले पण जोडी अजूनपण जम्या नही. Uhoh

काल मी जरासा भाग पाहिला या सिरियलचा. ही हिरॉईन अगदीच कोवळी दिसते पण तिच्या गालाला पडणारी खळी मस्त आहे.
आता काय खायचं असं संभाषण, मग मका खाणे, दोनच रुपये उरणे, बबलगम खाणे, फुगा करणे .. समाप्त Proud

झी ५ वर बघू का? वर्थ आहे का?

तिला जे काही करायलात लावलंय ते तिला अजिबातच सूट होत नाहीये. ती अशी खट्याळ वगैरे वाटतंच नाही. पहिल्या भागात दाखवली तशीच साधी सरळ वाटते.

तुला पाहते रे...
मला वाटले राजा परांजपे च्या सिनेमात आंधळी बाई हे गाणे म्हणते. त्या वरूनच काही आहे की काय? म्हणजे शेवटी तो बाबा बाईला फसवतो, नि तरी ती म्हणते - जरी आंधळी मी तुला पाहते!

घरबसल्या appt letter...फक्त शहरभर फिरवलं बसमधून यावर खुष होऊन..पा.पु खायला घालून..
आम्ही उगाच उंबरठे झिजवले ईतक्या officesचे नोकरिसाठी.
बसची बेल गम्मत म्हणुन वाजवण्याइतकी ईशा काही लहान नाही व सु.भा पण भाळला लगेच..हिने बेल वाजवा म्हंटल्यावर वाजवली..
कांद्यापोह्याचा prog. ही हास्यासपद.

मी चुकून २-३ एपिसोड पाहिले आज आणि सगळी स्टोरी कळली.
काही नतद्रष्ट माणसं, (बिपिन्चा बाप, मायरा, मायराच्या दोन साळ्काया म्हाळ्काया) काहि चांगली (सुभा आणि इशा) काही कुचकी (मायरा आणि इशाची शेजारीण) काही मुर्ख (इशाची आई आणि बिपिन) यांनी गच्च भरलेली सिरियल...
झी ने मुर्ख पणाचा रेशो इतका उंच करून ठेवला आहे की जे काही सुरू आहे ते अजून तरी मुर्ख वाटलं नाही मला Lol (हा माझा मुर्खपणा :फिदी:)

आणि ती मायरा आधी सुभा ची सेक्रेटरी होती ना? Uhoh असं मी मागच्या कुठल्यातरी पानावर वाचलं. मग ती डायरेक असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट? Uhoh

हो ना. कै च्या कै दाखवतात. सेक्रेटरी असि वाईस प्रेे कशी होऊ शकते. बाकीच्या पोस्ट नाहीत का. खूप वर्ष मायराने प्रामाणिकपणे Uhoh काम केलंय म्हणे आणि म्हणून हे प्रमोशन. सुभा काढून टाकणार असं तिला सारखं वाटत असतं आणि म्हणून ती सारख्या विनवण्या करत असते की मला काढू नका. तिला हे असं प्रमोशन सरप्राईज म्हणून. ईशाचे बाबाही म्हणतात की आपण शंभर टक्के द्यायचे नोकरीत, तेच बाबा मालकाला न सांगता मुलीबरोबर परस्पर बॅंकेत नीघून जातात. ईशाची नोकरीसाठी काहीही परिक्षा न घेता खुद्द सुभा तिच्या घरी आॅफर लेटर घेऊन जातो. कुठे असतात अशा कंपन्या, आम्हालातरी सांगा.

बिपीन कोण.

मी पहिले दोन आणि पार्टीत जातात तो भाग बघितला, आठ रु कार्ड देतो सुबोध तो. त्यानंतर नाही. तो पार्टीत तमाशा वगैरे दारू पिऊन इशाच्या बाबांनी केलेला ते बघितलं नव्हतं. ते तीन भाग बघितले त्यात बिपीन आठवत नाहीये.

बिपीनला बघितलंय कशाततरी. पहिले मला वाटलं बिपीनच्या बाबांशी लग्न लावणार की काय, अनिल आपटेसारखं. तो बिपीनचा बाबा काय हुरळून जातो नोकरी मिळाली सरंजामेकडे म्हणून, काय पद आहे ते तरी बघायचं, कंपनीची पार्टनर थोडीच झालीये. ईशाचं बेबी सीटींग करणार वाटतं आता सुभा.

बिपीन म्हणजे तिला पहायला आलेला तो बहुतेक....
तिच्याच चाळीत राहतो की काय ...तिला बेस्ट लक देतांना आणि लाजताना दाखविला!! Angry
झेंडे कायम असे गोंधळेलेले का असतात?
अनिल आपटे आठवतो तुम्हाला अजून? Biggrin

झेंडे कोण?
मायर बरोबर रीकामटेकडे बोलत असतो तो?

मायरा कायम फोनवर बोलताना दाखवलीय। बाकी काय काम नसतं का कंपनी मधे!? आणि सारखी झेंडेशीच बोलत असते। स्वतः डिसीजन घेताना दिसतच नाही।

ईशा पहिल्याच दिवशी ऑफिस मधे उदबत्त्या लावुन कामाला सुरुवात करनार आहे.. त्यामुळे फायर अलर्म वाजुन सरंजामे'ज मधे पळापळ होणार आहे.. अस काहीसं दाखवलं 'पुढील भागात'..

अर्धा तास सिरीयल असायला पाहिजे त्यातले 15मिनिट जाहिरती आणि बाकीचा वेळ असले निरर्थक सीन दाखवतात

झी मराठीचा दर्जा एकूणच खूप खालावलेला आहे हे गेल्या काही मालिकांमधुन लक्षात येते आहेच. पण तरीही झी मराठीने ह्या मालिकेचा नक्की प्रेक्षकवर्ग कोणत्या वयोगटाला गृहित धरला आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिकणारे दहावीपर्यतचे विद्यार्थी यांचे प्रेक्षक आहेत का? आत्तापर्यंतच्या झी मराठीच्या मालिकांमध्ये किमान पहिले ५० भाग तरी बघण्याच्या लायकीचे होते. पण इथे तर पहिल्या भागापासूनच शुध्द खुळचटपणा दाखवला आहे. मालिकेचे कथानक बघुन त्यांची खरंच किव येते. ऑफिसच्या पहिल्या दिवशी टेबलवर चार-पाच उदबत्त्या! मग कापुर निरंजन लाऊन एखादी आरती म्हणून नैवेद्य प्रसाद नको का?
३५०० हजार कोटी रुपयांच्या १३ कंपन्या आणि ४ मिलचा मालक विक्रांत सरंजामे ऑफिसमध्ये असा वेठबिगारीवर काम करणाऱ्या मजुरासारखा खुरटी दाढी ठेऊन का येतो? त्याला ठराविक दोन-तीन कपड्यांचे जोड दिले आहेत का?
इशा अजुन कॉलेजमध्ये शिकते आहे. ना अजुन तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे ना नोकरीचा पत्ता! मग एकुलती एक मुलगी असुनसुध्दा तिच्या लग्नाची इतकी घाई का? चार भावंडामध्ये ती सगळ्यात मोठी आहे आणि तिच्यानंतर तिच्या धाकट्या दोन बहिणींची लग्न करायची आहेत अशी घाई का? तिच्या लग्नासाठी भरपुर हुंडा देण्याची तयारी निमकर कुटुंबाने नक्कीच करुन ठेवली असेल.

>>Submitted by सारिका.चितळे on 27 August, 2018 - 05:26<< किती ती चिड्चिड.. जाउद्या हो सारिका वैनी..... एवढं नसतं मनाला लाउन घ्यायचं.. उलट्पक्षी मी असं म्हणेन की झी च्या शिरेली पाह्यल्या की आपोआप सहनशक्ती वाढते.. Lol Lol Lol मग अशी चिडचिड होत नाही.. Proud Proud Proud कोन्वेन्ट बद्दल एवढा आकस का ब्रे..?? Uhoh

३५०० हजार कोटी रुपयांच्या १३ कंपन्या आणि ४ मिलचा मालक विक्रांत सरंजामे ऑफिसमध्ये असा वेठबिगारीवर काम करणाऱ्या मजुरासारखा खुरटी दाढी ठेऊन का येतो? >>>> मेबी पुढे इशाच्या प्रेमात पडल्यावर तो सुधारेल. दाढी सफाचट करेल. Proud

Pages