Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इशाचे बाबा सारखे हात काय
इशाचे बाबा सारखे हात काय जोडतात ज्याच्यात्याच्यापुढे!
आणि आई सारखी मान हलवते. ऑफिस मधला मिहीर 10वी फ मधे होता child ऍक्टर।
मायराने इशाची चप्पल तुटली तर
मायराने इशाची चप्पल तुटली तर तिला आपल्या कडची पेअर दिली..! >>>> आ, खलनायिका कधी सुधारली? आणि तेही एवढया लवकर?
आज चप्पल देशील, उद्या डायरेक्ट विक्रान्त देशील इशाला.
पण मायराच्या पायांबद्दल अस लिहिलेलं आवडलं नाही. >>>>>> +++१११११११
खु.क.खु. मधे तंगड्या उघड्या टाकायची गरजच पडली नव्हती.. >>>> खु.क.खु. मध्ये घातला होता की वन पीस काही सीन्समध्ये.
तर नि. ईशा म्हणते, माझ विमान
तर नि. ईशा म्हणते, माझ विमान असच्चे! >>>>> सरळ सान्गायच ना की मला विमानच बनवता येत नाही ते.
हे असं दाखवलं मानबामुळे
हे असं दाखवलं
मानबामुळे काहीही (अ आणि अ) दाखवायची हिंमत वाढत चालली आहे केड्याची 
कालच्या भागात सरन्जामे किती
कालच्या भागात सरन्जामे किती चिडत होता ईशावर..!
आता नाही चिडणार. कारण तिनी
आता नाही चिडणार. कारण तिनी त्याला अचानक त्या साइट वर आणल्यामुळे त्याला कळलं ना तिथे लोकांना कसा त्रास होतोय ते. आता पुन्हा एकदा तिला बोनस मिळेल.
What does mean by स्किड्युल
What does mean by स्किड्युल in this serial??? आजपासून माझी सगळी स्किड्युल तू बघायचीस! ऑ!! का बरं ? बिचाऱ्या मायराला शिव्या खायचा पगार मिळतो का?
तो बिपीन अगदीच पांचट आहे. माझी होणारी बायको म्हणतो सरळ। फॅक्ट्री मधल्या कामगारांचा अभिनय बघून तर टडोपा
><:हहगलो:
ईशा स्किड्युल बघेल तेव्हाच ना
ईशा स्किड्युल बघेल तेव्हाच ना उपदेशाचे डोस पाजेल आणि तरच सुभा तिच्या प्रेेमात पडेल. मायराच्या पायांमध्ये मलाही काहीतरी दोष वाटला होता पण याला फेंगडे पाय म्हणतात हे माहित नव्हते.
आजचा भाग चक्क "Undercover
आजचा भाग चक्क "Undercover Boss" वरून बेतला होता.
भगवती, पहिल्या दिवसापासून ती
भगवती, पहिल्या दिवसापासून ती सिरियल "भेळ"/ "मिसळ" या कॅटेगरीत मोडतेय.
वेगवेगळ्या सिरियल / सिनेमाच्या आयडियाज एकत्र करुन वापरतोय केड्या.
हो ना...होसुमीयाघ, नांदा
हो ना...होसुमीयाघ, नांदा सौख्य भरे, काहे दिया परदेस, माझे पती सौभाग्यवती .... सगळ्यांची मिसळ आहे.
)
आणि मला तरी त्या सुपर वायझर चं बरोबर वाटलं...कुणीही येऊन अशी प्रॉडक्ट लाईन बंद करेल तर तो त्याला झापणार नाही का? की कौतूक करेल? काहीही.... केड्याला आधी ऑफीस चंच एन्व्हयर्नमेंट माहिती नाही..आता तर तो चक्क शॉप फ्लोअर वर आणि फॅक्टरीत निघालाय...
धन्य आहे!
फाइलीं ची अदलाबदल आणि तत्सम पाचकळ गोष्टी!
आणि इशा चक्क झोपली काय....? त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तेही......................!!!!
आणि त्यालाही काही गैर वाटलं नाही? ( आधी मी चुकून गैर च्य ऐवजी गॅरी लिहीलं होतं!!
इशा याय्च्या आधी सरंजामेचा
इशा याय्च्या आधी सरंजामेचा एवढा मोठा बिजनेस कसा बुवा चालला?
विक्रमला तर काहीच माहिती नाहीये.
एवध्या वर्षात त्याने एकदाही प्लाण्टला विझिट केली नाही?
मायराला प्रमोशन कशासाठी दिलंय?
आणि इशा चक्क झोपली काय....? त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तेही......................!!!!>>>>>एसी गाडीत आली असेल तिला झोप. आणि मग लगटली झोपेत त्याच्या खांद्यावर.
मी आजपर्यंत हजार वेळा
मी आजपर्यंत हजार वेळा वेगवेगळ्या बॉसेस सिनिअर्स बरोबर गाडीमधून गेले आहे.. पण हे
अस?? डोकं आहे की नाही त्या ईशाला?
साधी भोळी आणि बावळट यातला फरक कधी कळणार यांना?
आपलं जुळणाराच आहे हे माहीत असल्यासारखं वागत आहेत दोघ..
असा कुणाचा चुकून स्पर्श झाला तर शहारायला होतं / व्हायला पाहिजे.. त्यातही हा बॉस
सी इ ओ .. पण सराईतासारखं वागतात.. मस्त वाटणार्या लव्ह स्टोर्या गेल्या कुठे?
???????????????
शिल्पा तुळसकर(की तुळसणकर) कधी
शिल्पा तुळसकर(की तुळसणकर) कधी दाखवलिये का सिरियलमधे? आज पहिल्यांदा शिर्षक गीत बघितलं. दोघंपण छान दिसतात त्यात. फक्त सिरियलमधेच सुट होत नाहीत एकमेकाला.
साधी भोळी आणि बावळट यातला फरक
साधी भोळी आणि बावळट यातला फरक कधी कळणार यांना?>>> अगदी अगदी खरं. तिचा वावर पण इतका slow दाखवलाय ना की बासच...
आपलं जुळणारच आहे हे माहीत
आपलं जुळणारच आहे हे माहीत असल्यासारखं वागत आहेत दोघ..... अगदी अगदी...!!!!
सुभा कायम तिच्याच विचारात..आणि काय तर "दो रुपये भी बडे कामकी चीज होती है बाबू...."......
आणि ती काल किती थकलेली वाटत होती....केसांची स्टाईल बदलायला पाहीजे......!!
आणि प्रोमोज मधे दाखवितात ते येणारे ना? (अर्ध्या वयाच्या बायको सोबत चालायची लाज वाटते..? वगैरे..? :-))
नाहीतर खुलता कळी खुलेना सारखं आपण बसू वाट बघत...तो अंगठी चा सीन कधी आलाच नाही.. आणि तो विक्रांत गाडी चलावित असतो व मानसी येऊन बसते....तर म्हणे..की लोक मागे बसलं की समोरच्याला ड्रायव्हर समजतात व ड्रायव्हर च्या शेजारी बसलं तर निराळाच अर्थ काधतात.......काय पण डायलॉग्ज!
कुणी लिहीलेले खुकखु चे संवाद?
काल सरंजामेने काय झाप झाप
काल सरंजामेने काय झाप झाप झापलं ना त्या मायराला..!
मायराला का झापलं???
मायराला का झापलं???
शिल्पा तुळसकरचा पुनर्जन्म आहे
शिल्पा तुळसकरचा पुनर्जन्म आहे का इशा. विक्रांत एवढा भाळलाय तिच्यावर.
मुळात समोरचा माणूस आपल्या
मुळात समोरचा माणूस आपल्या मुलीला एवढा का भाव देतोय आणि घसट का वाढवतोय हा विचार पहिले आईवडिलांच्या मनात यायला पाहिजे. ते विचारी असते तर तिला ती नोकरी करू दिली नसती त्यांनी.
पहिले दोन भाग बघून तर कनिष्ठ
पहिले दोन भाग बघून तर कनिष्ठ मध्यमवर्गात कधीही न बघितलेलं दाखवलं आहे त्यात , प्रत्यक्षात बरेच जण समाधानाने, स्वाभिमानाने जगताना जास्त बघितलंय.
इथे ते बाबा किती लाचार, केविलवाणे, सगळ्यांना सतत हात जोडत असतात. आई हावरट. जानुची आई हावरट होतीच दाखवलेली पण बाबा लाचार नव्हते.
नंतर अजून एक पार्टीत जातात सर्व तो भाग बघितला, त्यानंतर नाहीच. पार्टीत काय होतं वगैरे ते नाही बघितलं. इथे वाचून समजलं.
तिचे डोळे/ heart इशाला लावलं
तिचे डोळे/ heart इशाला लावलं असणार लहानपणी
सुबोध भावे ला नंतर चिकणा करायला आत्ता असा फाटका, निर्जिव दाखवत आहेत 
जानु पण चांगली तरतरीत होती.
जानु पण चांगली तरतरीत होती. बोलता बोलता टुणकन उडी मारायची. इशापेक्षा हसरी खेळ्कर स्मार्ट वाटायची आणि तरीही साधी म म शोभली.
असा कुणाचा चुकून स्पर्श झाला
असा कुणाचा चुकून स्पर्श झाला तर शहारायला होतं / व्हायला पाहिजे.. >>> अग आनन्दी, हे तु का लिहिलस? आता त्यान्च जुळणार आहे हे दाखवण्यासाठी हि आयडिया सुद्दा वापरतील.
मस्त वाटणार्या लव्ह स्टोर्या गेल्या कुठे? >>>> नक्की कुठल्या लव्ह स्टोर्या म्हणायच्या आहेत तुला आनन्दी?
तिचे डोळे/ heart इशाला लावलं असणार लहानपणी >>>> सलमान खानच्या 'दिल ने जिसे अपना कहा' मध्ये दाखवल होत अस. प्रीती झिन्टाचे हदय भुमिका चावलाला. पण त्यात सलमान आधी भुमिकाला भाव देत नसतो. नन्तर त्याला जेव्हा सत्य कळत, तेव्हा तो तिच्याशी लग्न करतो. सिरियलमध्ये मात्र सुभा सुरुवातीपासूनच तिच्यावर लट्टू झालेला दाखवलाय.
खूपच छान पटकथा अभिजित .खरंच
खूपच छान पटकथा अभिजित .खरंच रोज साडे आठ चा टाईम संभाळून ठेवते मी या सिरियल साठी. एक हळुवार उलगडणारी प्रेम कथा बघायला खरंच मजा येतेय .शिवाय त्या नात्या त कसले बंधन नाही .खरतर दोघा मधे वयाचे अंतर जास्ती च आहे पण सुबोध भावे चा कामा मुळे ते झाकुन जाते ..अभिजित तुला यश मिळो हिच सदिच्छा .तू दोन सिरियल कसे एकावेळी करतोय ते खरंच कठीण आहेत आणी ते आम्ही पाहील आहे so we r proud on u अभि
मला सुरुवातीचा ttmm वाला
मला सुरुवातीचा ttmm वाला एपिसोड खूपच आवडला .तूझ तू mazh मी .पण अभि तुज्या या वाक्यानंतर मी sony मराठी चा दोन मालिका मधे हेच ऐकल .no doubt हे जुन आहे पण तूझ्या तुला पाहते रे मधे बघितल तेव्हा मस्त वाटल आणी लगेचच दुसऱ्या दिवशीच दुसरी कडे ऐकून बोर झाल .कारण boss फर्स्ट इम्प्रेशन is लास्ट अस त्या वाक्याबद्दल तिथे झाल होते .
बालनाट्य असतं तसं बालमालिका
बालनाट्य असतं तसं बालमालिका आहे ही. तो कोण दुसरा पोरगेलासा सरंजामे किती माजोरडा आहे. किती मॅनरलेस आणि अनप्रोफेशनल. मुळात ह्या दोन्ही सरंजामेंना काहीच काम नाही. वेळ घालवायला म्हणून ते आॅफिसमध्ये जातात आणि स्टाफही तसाच वेळ घालवायला आलेला. ईशा विचारते आज काय काम करू
ट्रेनिंग वगैरे देत नाहीत का. नविन लागलेली, चौथीतल्या मुलीसारखं वागणारी मुलगी सरंजामेला आलेले सगळे काॅल घेते आणि त्याला कोणी भेटायचंं ते ठरवते. तीला मायराच्या हाताखाली ठेवलं आहे ना, मग ती सुभाच्या अवतीभवती का करत असते. मायरासारखी मीही फारच वैतागले आहे 
दुसरा सरंजामे कोण आहे?
दुसरा सरंजामे कोण आहे?
दुसरा सरंजामे कोण आहे?>>>>
दुसरा सरंजामे कोण आहे?>>>> एलदुगो मधला उमेश कामत चा मित्र
अगदीच सुमार....सगळंच.
अगदीच सुमार....सगळंच.
आज काय काम करु???
'आज रात्री जेवायला काय करु' विचारल्यासारखं वाटलं. मायरा बिचारी इतकी वर्ष काम करत होती असेल प्रोफेशनली. निदान ती प्रोफेशनल दिसते तरी. हिरवीण तर आल्या दिवसापासून सगळ्या नियमांची खांडोळी करायला बसली.
आमच्या बाॅसने आजपर्यंत आमच्यासाठी केलेली सृजनशील गोष्ट म्हणजे त्याचे फेवरेट कपकेक्स आणणे आणि थोडावेळ काम बाजूला ठेऊन ते खायला देणे. आपापल्या जागेवरच.
Pages