तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

सारीका यांची पोस्ट आवडली, लॉजिकल आहे. पण मालिकेत जरासंही लॉजिक दिसणार नाही याची खबरदारी घेतात सर्व. इथे ती पहील्या भागापासून घेतली असावी.

शिल्पा तुळसकर दाखवली फ्लॅशबॅक वगैरे मधे तर जरा सुसह्य असेल.

अगं सारिका चितळे किती त्रास करून घेतेस मुली सोडून दे.
३५०० हजार कोटी रुपयांच्या १३ कंपन्या आणि ४ मिलचा मालक विक्रांत सरंजामे ऑफिसमध्ये असा वेठबिगारीवर काम करणाऱ्या मजुरासारखा खुरटी दाढी ठेऊन का येतो? >> वयाने अधिक मोठा वाटावा म्हणून असेल.

यावेळी सोनी बघा हवं तर, त्या चॅनेलची अ‍ॅड करत नाहीये, तिथली ह्यावेळेची मालिकाही बघत नाही पण एक शॉट बघि तला तो आवडला. कलाकार अभिनय छान करतात. ती फुलराणी नांव बहुतेक.

सारीका यांची पोस्ट आवडली, लॉजिकल आहे. पण मालिकेत जरासंही लॉजिक दिसणार नाही याची खबरदारी घेतात सर्व. इथे ती पहील्या भागापासून घेतली असावी.>>>+111
Lol

३५०० हजार कोटी रुपयांच्या १३ कंपन्या आणि ४ मिलचा मालक विक्रांत सरंजामे ऑफिसमध्ये असा वेठबिगारीवर काम करणाऱ्या मजुरासारखा खुरटी दाढी ठेऊन का येतो?
>>> स्टाईल म्हणतात त्याला. उद्या म्हणाल विराट कोहली दाढी का करत नाही Light 1

त्या ईशी ला नोकरी मिळाली ??? परमनन्ट की इन्टर्न म्हणून ?
त्या मायराच्या जागी आपली सेक्रेटरी वगैरे नेमली का तिला ? आता तिचाही मेकओवर करणार का ?
रच्याकने तो विक्रान्त आहे की विक्रम ?
बिपिन कोण आहे ते बघितला नाही अजून मी .

मायराची असिस्टन्स म्हणून ईशाला विक्रांत सरंजामेच्या ऑफीसमध्ये नोकरी मिळाली. परमनंट कि इन्टर्न काही समजलं नाही.
सेक्रेटरीला असिस्टन्स व्हाईस प्रेसिडंट म्हणून प्रमोशन मिळू शकतं तर ईशाला काही न करता डायरेक्ट परमनंट नोकरी मिळाली तरी आश्चर्य नाही.

Btw मला वाटलेलं "असिस्टन्स व्हाईस प्रेसिडंट" म्हणजे कंपनीतली महत्त्वाची पोस्ट असेल पण मायरा तर शिपायाची कामं करताना दिसतेय. (कदाचित त्याला पण ही कामं करायला लागत नसावीत) ईशाला चपला घेऊन द्यायचं काम मायरानेच करणं गरजेचं होतं का??
ईशाला स्वतःच्या चपला पण घेता येणार नाहीत इतकी ती लहान आहे??
आणि मायराने दुसऱ्या चपला कुठून काढल्या?? ती डेस्कवर चपला घेऊन बसते??
या केड्याच्या तर.... Angry

अच्छाSSSSSSSSS , म्हणजे assistant of assistant vice president . बरयं , कुणाच भलं होत असेल तर आपण आपल्या पोटात का दुखवून घ्यावं !!!!

तेच तर..!! मायराने इशाची चप्पल तुटली तर तिला आपल्या कडची पेअर दिली..!! काहीही.. केड्याचं डोकं...!!
असं कुणी ऑफीस मधे एक्स्ट्रा चपलेचे जोड घेऊन बसतं का? Uhoh

सु भा साठी पाहत होतो पण आता चिड यायला लागलीय.
पाहण बंद आता >>> सेम हिअर..... मी पण काल पासून बंद केले पहाणे....

असं कुणी ऑफीस मधे एक्स्ट्रा चपलेचे जोड घेऊन बसतं का? Uhoh>>>>. मी ठेवते

रोजचा प्रवास इतका किचकट आहे सो ठेवते मी एक चपलेचा जोड ऑफिस मध्ये, कधी कामाला येईल सांगता येत नाही

असं कुणी ऑफीस मधे एक्स्ट्रा चपलेचे जोड घेऊन बसतं का?
>> हो आंबटगोड आमच्याकडे आमच्या हापिसात बर्‍याच मुली एक्स्ट्रा जोड ठेवतात. कारण आमच्या हापिसात चप्पल तुटली तर चांभार मिळवायला २० मिनिटाचा ड्राईव्ह (कमीत कमी) माझ्याकडेही असतो एक चप्पल चा जोड हापिसात.

रोजचा प्रवास इतका किचकट आहे सो ठेवते मी एक चपलेचा जोड ऑफिस मध्ये, कधी कामाला येईल सांगता येत नाही >>> हो बरोबर. इथे केड्याने अभ्यास केलाय बहुतेक.

पण मला खरोखर केड्या कमेंट्सनी हसायला आलं. मस्त राग व्यक्त केलाय दोघांनी.

मी फक्त कालचा भाग बघितला .. पण १ ल्या दिवशी पूजा करणे उदबत्या लावून हे जरा अती होतंय असं वाटलं मला ... कितीही बाबांचं ऐकणारी मुलगी असेल तरी तानमान बघून वागतात .. असो.. केड्या ची आयडिया .. Sad
हो हापिसात ठेवतात ना जोड! पण एखादा जोड ठीके तिचं ते चप्पल ठेवायच जे काय प्रकरण होतं त्यात ७ जोड मावण्याइतपत खण होते .. Uhoh
त्या सु भा च्या टेबल वर काहीच नाही ? साधा लॅपटॉप पण नाही ?

अंजू.. Biggrin .. खरंच... केड्याचा अगदी राग येतो. त्याला केड्या च नाव शोभतं आता....!!!!

चपला.........मे बी ठेवत असतील मुली मुंबईच्या....इथे पुण्यात इतका काही अनुभव नाही .. !!!
आणि फार तर एक जोड......२-३ एक्स्ट्रा? Happy

मानबा आणि ह्या मालिकेचा लेखक एकच आहे ना! मग असेच असणार!

स्वतः कंपनीचा मालक ऑफर लेटर घेऊन चाळीत जाणार.. कंपनी एव्हीपी हेरॉईनला १०००० चप्पल घेऊन देणार! १०़ हजाराची चप्पल कंपनी जॉईन केल्याच्य पहिल्याच दिवशी!!

ही मानबाच्या पुढची बथ्थड सिरेल आहे!

अरे मुलींनो, ठेवतही असतील चप्पलचे एक्स्ट्रा जोड. पण मायराच्या चप्पल ईशाला होऊ शकतात का?? हा खरा प्रश्न पडला मला. ईशा आणि मायराचे पाऊले अजिबातच सारख्या मापाची नाहीयेत.

ईशा आणि मायराचे पाऊले अजिबातच सारख्या मापाची नाहीयेत.>> हो म्हणुनच इशाला त्या चपला होत नव्हत्या. तरी ती मायरा तिलाच ओरडत होती. तिला तिच्या मापाच्या चपला द्यायच्या ना !!!

दोन तीन जोड ठेवताना बघितलंय मी. एक जोड तर बहुतेक सगळ्याच ठेवतात. आमच्याईथेे पुरूषही आॅफिसमध्ये आल्यावर फाॅॅर्मल शूज घालतात. प्रवासात खराब होतात म्हणून. मालिका रविवारी सलग बघतेे. आत्ता नो कमेंट्स.

चप्पल वरुन आठवलं... मायरा चे पाय फेगडे वाटतात नै...?? खु.क.खु. मधे तंगड्या उघड्या टाकायची गरजच पडली नव्हती.. पण इकडे तुपारे मधे भुमिकेचि गरज म्हणुन शोर्ट स्कर्ट्स काय घालावे लागले आणि नको ते व्यंग जग्जाहीर होउन बसलं..!! Proud Proud Proud

मी स्वता एक जोड ठेवतो बुटांचा आँफिस मध्ये.....

सध्या तरी न चुकता बघितले सर्व एपी..... असंच चालु राहीलं तर मला बंद करावी लागेल ही सिरीयल बघनं.

सुभा 8वेळा all the best म्हणतो इशा ला. चप्पल हातात घेऊन फिरण्याचा सीन अगदीच अजागळ वाटला

बरं. सरंजामे कडे resume कसा पाठवायचा कोणाला माहित आहे का ??
आता पहिल्यांदाच ताजा ताजा एपिसोड पाहिला तर पहिल्याच दिवशी joining बोनस ज्यातून 4+3+6=13 हजार ची देणी भागवून सुद्धा 2हजाराच्या काही नोटा राहतात आणि वर गहाण टाकलेलं मंगळसूत्र देखील सोडवता येतं असं दिसलं. मी पण out of box thinking करु शकतो !

Pages