तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इतक सहन करण्यापेक्षा सोनी मराठी वरच्या मालिका छान आहेत.. >>
त्या मालिकांमध्ये सुबोध भावे आहे काय?????????? >>>>> नाही. पण भेटी लागी जीवा मध्ये समीर धर्माधिकारी आहेच की. >>> सु भा च्या वेळी अक्षय वाघमारे आणि ती अस्मितावाली वाघ यांची असते सोनीवर. स ध ची पार रात्री आहे साडेदहाला.

वाघ आणि वाघमारे असणारी ती फुलराणी. मी बघत नाही पण एक शॉट छान होता. विषय छान आहे, गरिबीतही शिक्षणाची आस असलेली नायिका, एकीकडे जॉब करून शिकत असलेली तरीही स्वाभिमान जागृत ठेवणारी, लाचार नसणारी.

लोल पब्लिक. शिक्षा वगैरे काही नाही. धमाल आहे ही सिरीज.

कालच तो बहुचर्चित "सर आज मी कोणते काम करू?" सीन पाहिला. मी तुमच्या वैतागात सहभागी आहे.

लोल पब्लिक. शिक्षा वगैरे काही नाही. धमाल आहे ही सिरीज.
कालच तो बहुचर्चित "सर आज मी कोणते काम करू?" सीन पाहिला. मी तुमच्या वैतागात सहभागी आहे.>>>>>>
चला आता मस्त चिरफाड वाचायला मिळेल या अपेक्षेने या धाग्यावर रोज यायला हरकत नाही.

सगळे काय मागे लागलेत इशाच्या लग्नाच्या? ती बाई येते तीपण ओटी भर म्हणते ईशालाच!कर्जतच्या देवीची जी बहुतेक विक्रांतची कुलदेवी असणार। सुबोधचे शॉट्स किती कमी आहेत ! अक्खा वेळ ती इशाची आई नैतर झेंडे पकवत बसतात । विक्रांतला नवीन शर्ट आणा रे कुणीतरी। एकच एक पिवळा शर्ट आणि चौकडी सूट घालून फिरत असतो। आजच्या एपी मधलं गूढ म्युझिक ऐकून हॉरर सिरीयल आहे कि काय वाटलं एक्दम।

मी प्रेमात पडत चाललीये सुभा च्या ... फक्त आणि फक्त यांच्यासाठी इतर पात्रांना आणि केड्याला झेलावं लागतंय...
gmp7072_991160x.jpg
फोटो इंटरनेट वरून साभार

इशाचे ते लहानपणिचे फोटो सुभा बरोबरचे पाहिले इन्स्टाग्राम वर त्यात ती बरिचशी उर्मिला मातोन्डकर टाईप वाटली (लहानपणिची उर्मिला मासुम मधली)

मला एक कळत नाही की सु भा ची अशी काय मजबुरी होती की त्याला असल्या सुमार सिरीयल मध्ये काम करावं लागतंय. ताकदीचा ऍक्टर आहे. प्रोजेक्ट्स ची कमी नसणार, स्वतः फिल्म्स produce आणि डायरेक्ट ही केल्याहेत. पैशाचीही कमी नसणार, मग का?

नटुकाकी फोटो मस्तच.... मी पण प्रेमात पडतेय tyachya... वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे ईशा नक्कीच पुनर्जन्म आहे त्याच्या बायको किंवा प्रेयसीचा, आजचा एपिसोड बघून तर हेच जाणवलं....

मला एक कळत नाही की सु भा ची अशी काय मजबुरी होती की त्याला असल्या सुमार सिरीयल मध्ये काम करावं लागतंय. ताकदीचा ऍक्टर आहे. प्रोजेक्ट्स ची कमी नसणार, स्वतः फिल्म्स produce आणि डायरेक्ट ही केल्याहेत. पैशाचीही कमी नसणार, मग का?

<<<
ब्रेड अँड बटर , रोझीरोटी इ. फुल टाइम प्रोफेशन आहे कलाकारांचे शेवटी !
डेलि सोप मधे बरे मिळत असतील पैसे ! सिनेमे असे किती येतात वर्षातून ? सगळे सिनेमे हमखास हिट होतात का ? प्रेक्षक थिएटरला जाऊन बघतात का ?
खान लोकांसारखा एखादा सिनेमा करून उरलेलं वर्ष त्याच्या प्रॉफिटवर , एन्डॉर्समेन्ट्स करत जगण्याइतकी मराठी फिल्म इंडस्ट्री श्रीमन्त आहे का ?
बाकी ही सिरीयल एकदा पाहिली आणि पुढे बघुच शकले नाही !
ट्रॅफिक चुकवण्यासाठी सु.भा ची हेलिकॉप्टर मधून एंट्री, मग सायकल, मग रिक्शॉ , मग कार.. एका एपिसोड मधे मॅक्स वहाने रेकॉर्ड चालु आहे असं वाटत होतं ! Biggrin

सिरीयल चं आणि इशा च लक भारी आहे सुबोध सोबत काम करायला मिळतंय। केवळ त्याच्यामुळेच चाललीय सिरीयल।

एव्ढे खास पाव्हणे जेवायला आले आणि इशाची आई सक्क्का ळ पासून पारोशाने तशीच वावरते. ऑफिसात जाउन आमंत्रण देउन आली तेव्हाच घामाघूम झाली असेल. मग स्वैपाक आवरा आवर. निदान तोंड हात पाय धुवून बरी साडी नेसायची होती. आणि यप्पड दाखवत काय बसते कंदिल लावलाय रांगोळ्या काढल्यात. ... पुढील एपिसोड घरी जाओन बघेन. जेवायचा मेन्यू काय होता?

ती साडी व ब्लाउज एकदम धन्य आहे.

हो ना.....मला एकदम वाटले झी ची दिवाळी कशी काय चालू झाली? कितीही खास पाहुणे असले तरी आपण आकाश कंदिल लावतो? मी तर नाही बुआ पाहिलेले... इव्हन गणपती बाप्पा आले तरी नाही लावत...कैच्या कै केड्याचं डोकं!
आणि तिची साडी व ब्लाऊज, तोंड उघडे टाकत बोलणे, अजागळपणा, सतत नवर्‍याचा .."बोलले...!!" म्हणत पाणउतारा करणे.....अगदीच बेकार आहे. .... म्हणजे मी जर सुबोध च्या जागी असते ...तर ईशाला आईमुळे केव्हाच रिजेक्ट केले असते!!
(पण सुबोध.................... अगदी अहाहा !!!!!!! )

काल ती देवी घेउन आलेली बाई म्हणते की १ महिन्यात लग्न होणार आणि कर्जत च्या देवी च्या दर्शनाला येणार ई ई..
कर्जत ची देवी सुभा ची कुलदेवता की शिल्पा तुळसकर शी काहीतरी रीलेशन..?
सुभा ची आधीची बायको ( शिल्पा ? ) मरण पावली तेव्हा तिचे ऑर्गन डोनेट केले असतील...ईशा ला शिल्पा चे डोळे डोनेट वगैरे केले असतील...
म्हणुन "तुला पाहते रे"...ईशा च्या नजरेतुन शिल्पा आली परत असं काहीतरी.. Wink
काईच्या काई विचार करतेय मी ...हा हा हा...

बाप रे स्मिता...किती अफाट कल्पना शक्ती!
पण हे नक्कीच आहे की शिल्पा त्याची गेलेली बायको -- ऑर मोअर लाईकली -- लग्न व्हायच्या आधीच गेलेली प्रेयसी आहे (म्हणून तर एव्हढं प्रेम शाबूत आहे Wink !! )
तिच्याशी हिची कंपॅरिझन करतो तो.............
Happy

>>सुभा ची आधीची बायको ( शिल्पा ? ) मरण पावली तेव्हा तिचे ऑर्गन डोनेट केले असतील...ईशा ला शिल्पा चे डोळे डोनेट वगैरे केले असतील...<< नसेल नसेल.. ह्रुदय डोनेट केलं असेल... झालेला ट्रॅक आहे झी हिंदी च्या हिटलर दिदी मधे..

ते बाप-लेक ईतके का मागे लागलेत ईशालाच सुन करुन घ्यायला?असं काये ईशामधे?ती श्रीमंत पण नाही पैशासाठी तिला गटवायला..
ते यडपट लाजुन लाजुन सु भा कडे पहातय.. Lol अरे त्याच्या मनात काये हे माहितीये का तुला??!हिने गृहीतच धरलय की तो हिच्याशीच लग्न करऩारे?
काल ती साडी निमकरांनी तुमच्या mrsसाठी असं सांगुन दिली ना सु भा ला? त्यानेही ती घेतली. तरी ईशाला धक्का नाही बसला ऐकुन.
काल झेंडे मस्त ऊभे राहिले मला ईशाच्या लग्नाबद्दल बोलायचं म्हंटल्यावर..मग पुढचं वाक्य ऐकुन परत relax झाले Lol

ते बाप-लेक ईतके का मागे लागलेत ईशालाच सुन करुन घ्यायला?असं काये ईशामधे?ती श्रीमंत पण नाही पैशासाठी तिला गटवायला..>>
त्यांचा कसलातरी बिझनेस आहे आणि ते विकीच्या कंपनीला माल सप्लाय करतात. ईशा विकीकडे कामाला लागलीय मग तिच्या वशिल्याने हे लोक आपला मालाचा सप्लाय वाढवणार आणि बिझनेस पण वाढवणार.
हे सगळं बिपीनच्या बापाचं डोकं. बिपीन यात सामील नसावा.
मला बिपीनची अॅक्टींग पण आवडते. खूप छान करतोय तो.

अर्रे मला आधी वेडोबा म्हणजे मेल आयडी वाटलेला. Happy म्हटलं हा माणूस का सुभाचे फोटो टाकू टाकू कलेजा खलास करुन ऱ्हायला. आता ती वरची बुढाऊ वरची रिअॅक्शन वाचून अगदी विचित्र वाटलं म्हणून अकाऊंटवर जाऊन बघितलं तर फिमेल आयडी निघाली. Lol
साॅरी गं वेडोबा. (तुला आता वेडाबाई म्हणायला पाहिजे. ) Wink

त्या ५० वर्षाच्या मिसोने तर १८ वर्षाच्या मुलीशी लग्न केलय. >>> हो का? मी कुठेतरी ती १८ वर्षाची आहे अस वाचल होत.

सुलू.. कैच्याकै तुलना बै. कुठे सुभा नि कुठे सध. Uhoh
सुभाचे डोळेचं सगळं बोलून जातात, अॅक्टींग पण किती परफेक्ट. समीर धर्माधिकारीला फक्त लुक्स आहेत. ते आमच्या कामाचे नाहीत >>>>++++११११११

इशाचे ते लहानपणिचे फोटो सुभा बरोबरचे पाहिले इन्स्टाग्राम वर त्यात ती बरिचशी उर्मिला मातोन्डकर टाईप वाटली (लहानपणिची उर्मिला मासुम मधली) >>>>> सेम पिन्च

ताकदीचा ऍक्टर आहे. प्रोजेक्ट्स ची कमी नसणार, >>>>> हो, हल्ली तर तो खुप बिझी असणार. श्रुती मराठेबरोबरचा पिक्चर (त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी, काशिनाथ घाणेकर बायोपिक, तृप्ती भोईर बरोबरचा अगडबम्ब पार्ट२ वगैरे वगैरे. हे वर्ष सुभा गाजवणारेय वाटत. Proud

ईईईई बुढाऊ काय म्हणता। he is 42 only >>>>>++++१११११

वाघ आणि वाघमारे असणारी ती फुलराणी Rofl

सगळ्याच काॅमेंट्स मस्त.. ही सीरियल धन्यवाद आहे.
एकट्या सुबोध साठी काय काय सहन करावं लागतं रे देवा!!!
रच्याकने मी भेटी लागी जीवा आधी समीर धर्माधिकारीसाठीच बघायला सुरू केली होती, कसला दिसतो तो Happy
पण नंतर मालिका पण इंटरेस्टिंग व्हायला लागली ना !!!

हो ना.....मला एकदम वाटले झी ची दिवाळी कशी काय चालू झाली? >>>> ती म्हण आहे ना, 'साधु सन्त येती घरा तोचि दिवाळी दसरा', ती म्हण इशाच्या आईने फॉलो केली असावी.

बर हा एवढा सगळा कशाला घातला तर, त्याला जेवायला का बोलावल तर त्याने इशाला बिपिनशी लग्न करण्यासाठी कन्विन्स कराव, म्हणून. काहीही.

निदान तोंड हात पाय धुवून बरी साडी नेसायची होती. >>> नन्तर तिने नेसली की दुसरी साडी. पण ती तेवढी बरी नव्हती.

काल झेंडे मस्त ऊभे राहिले मला ईशाच्या लग्नाबद्दल बोलायचं म्हंटल्यावर..मग पुढचं वाक्य ऐकुन परत relax झाले Lol >>>>> Biggrin

सुभा ची आधीची बायको ( शिल्पा ? ) मरण पावली तेव्हा तिचे ऑर्गन डोनेट केले असतील...ईशा ला शिल्पा चे डोळे डोनेट वगैरे केले असतील..., >>> इशाच्या वडिलान्नी बिपिनच्या वडिलान्कडून कर्ज घेतलय अस काहीतरी ऐकल होत. मेबी ते इशाच्या ऑपरेशन साठीच असावेत.

ते यडपट लाजुन लाजुन सु भा कडे पहातय.. Lol अरे त्याच्या मनात काये हे माहितीये का तुला??!हिने गृहीतच धरलय की तो हिच्याशीच लग्न करऩारे? >>> ती लाजताना छान दिसत होती. ती कालच्या गुलाबी टॉपमध्ये आणि आजच्या लाल ड्रेसमध्ये मस्त दिसत होती.

नशीब मायराने काल आकान्डतान्डव केला नाही, गुपचुप निघून गेली. चुक विकीची होती, आपला बेत बदलल्याची पुर्वकल्पना दयायला हवी होती तिला.

आता होसुमियाघचा ट्रेक येईल बहुधा. इशा विकीच्या लग्नाविषयी विचारेल, आधी कुणाच्या चुकीमुळे तिचा 'विकी मॅरिड आहे' असा गैरसमज होईल.

इशाचे बाबा म्हणत होते, 'मी माझ्या मुलीचा सौदा करणार नाही.' पुन्हा एकदा जानुचे बाबा आठवले. Bw

बाकी सिरियलच शीर्षकगीत मस्त आहे. Happy

Pages