तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

मायरा (उर्फ मॉनिका) ला नेहमी विक्रांत नावाच्या हीरोशींच का डील करावं लागतं ?
खुकखुमधे मानसी होती, इथे ईशा आहे! ............................................

ईई कैच्या काय।।।मायरा आणि झेंडे!!! तो झेंडे किती म्हातारा आहे आणि शंकेखोर नजरेने बघत असतो.. जयदीप झालेल्या ऍक्टर ने काम छान केलंय सनकि माणसाचं। इशा पण बोर करतेय सध्या। फक्त आणि फक्त सुबोधसाठी बघत आहोत सिरीयल।

इशाची आई बावळट्ट आहे. इशा बावळट्ट आहे. इशाचे बाबा सरबरीत आहेत.
जयदीप मायरा सणकी आहेत.
झेंडे शंकेखोर आहे.
ऑफिस स्टाफ येडछप आहे.
विक्रांत सरंजामे हॅन्ड्सम आहे Happy

काल इशाच्या आईने जाम डोकं फिरवलंय. Angry

सस्मित Happy भा. पोच अगदी. सात्विक संताप कळला Happy
सरंजामे खरंच मस्त दिसतोय. आवडी निवडी पंचतारांकीत आहेत बाकी सायबांच्या.
ह्य् येड्या पोरीशी संसार करणं कठीणच जाणारे एकंदरीत. त्यापेक्षा पाळणाघर काढ म्हणावं.
तिची आई किती ओढून ताणून बावळट दाखवतायत.
पण बास्केटमधे साठवण वाळवण देण्याची आयड्या आवडेश.

डोळ्यात बदाम वाली स्मायली कुठेशी मिळेल मला?
ह्या धाग्यात वापरावी लागेल ना. Happy
ते स्क्रॅपबूक का काय दिलंय इशाने त्यात असे ऑप्शन्स का लिहिलेत आधीच. फुटबॉल की लगोरी वैगेरे?
जो तो लिहिल की आपले फेव्हरेट.
आणि मॅरीटल स्टेट्स इतक्यात आपल्याला सांगायचं नाहीये वाटतं म्ह्णुन त्या पानावरच पुस्तक बंद केलं Happy
बाकी कुणीतरी मस्त शॉफॉ करा विक्रम सरंजामेचा किंवा छानसं पेट नेम द्या त्याला.
विक्रम सरंजामे सारखं लिहायला लैच मोठं आहे.

विकी म्हण की स्मिते. गोड वाटतं. Happy

मी दोन भाग बघितलेच नाहीत. सुभासाठी बघावे वाटतात पण आधीच्या भागातलं ते ईशाचं, "सर, मी आज काय काम करु?" इतकं डोक्यात गेलंय ना की बासच. आणि हिला मायराची असिस्टन्ट म्हणून अपाॅईंट केलंय ना मग ही सुभाला का विचारायला जाते काय काम करु म्हणून. आणि प्रत्येक पोस्टची काही कामं असतात ना नेमून दिलेली हिला काय ट्रेनिंग का नाही दिलं.

निधी चालयचंच. हे इतकं सगळं आता आपण कारेदु आणि मानबा ची ऑफिसं बघुन मनावर घ्यायचं नाही. Happy

सर, मी आज काय काम करु?" >>>>> इरीटेटींग.

तो फकीर काय मध्ये मध्ये येऊन बोलत असतो काहीतरी। त्याला दुसरं काय काम नाही वाट्त। सुबोध दिवसेंदिवस चिकणा दिसत चाललाय। मायराने आजचा रागावल्याचा अभिनय एकदम मस्त केलाय।

ऑर्किड Happy

इथल्या चर्चेमुळे थोडी पाहिली. तो सरंजामे पूर्वीच्या अरेबियन गोष्टींतील सुलतान्/बादशहाप्रमाणे निर्णय घेतो असे दिसते (आठवा तो "चाँद अस्मानातच का राहतो" या प्रश्नाचे उत्तर योग्य दिले म्हणून घोड्यांचा खरारा करणार्‍याला डायरेक्ट वजीर करणारा पुलंच्या "लोकशाही एक चिंतन" मधला सुलतान). इशाने एक गोष्ट चांगली केली, लगेच त्याची असिस्टंट ती. ते ही ऑफिस मधे आल्या आल्या समोर उभ्या राहिलेल्या डायरेक्ट रिपोर्ट्स समोर आधीच्या असिस्टंटला सर्वांसमोर झापून बदल करणार. अरे तिच्याशिवाय पान हलत नाही टाइप असिस्टंट आहे ना? स्वतःच्या ऑफिस्/केबिन मधे बोलावून तुझे काय चुकले वगैरे काही नाही?

इशा बहुधा सकाळी फोन वर व्हॉट्स अ‍ॅप मधे जीवनाबद्दल वाचलेली वाक्येच डॉयलॉग म्हणून बोलते. कामाच्या ठिकाणी/कामाच्या वेळेत झोपण्याचे यावर्षीचे अल्लाउद्दिन खिलजीचे रेकॉर्ड ती मोडणार असे दिसते. कंपनीचे ड्रेस कोड काय आहे? सुभा एकदम फॉर्मल. बाकी एक दोघे फॉर्मल. इतर स्टाफ जे पाहिजे ते घाला मोड आणि इशा एकदम जीन्स मधे.

त्या 'राइट हॅण्ड' चे सुभा बरोबरचे डायनॅमिक खरे चांगले आहे. बहुधा जुना मित्र दिसतो. ऑफिस चे दार बंद करून याच्याशी एकेरीत बोलून त्याच्या चुकांबद्दल स्पष्ट बोलतो - तो थ्रेड वाढवायला हवा. पण एरव्ही त्याचे कॅरेक्टर काय च्या काय आहे. त्या इशाच्या मैत्रिणीला रस्त्यावर कोंडीत पकडून जाब विचारण्याचा सीन जाम विनोदी आहे. त्यात इतक्या मोठ्या कंपनीच्या इतक्या मोठ्या जबाबदारीवरचा माणूस आपल्या कंपनीत कामालाही नसलेल्या एखाद्या मुलीला अगदी बढाई मारल्यासारखा तो 'राइट हॅण्ड' आहे कशाला सांगेल? इथे ती मैत्रिण "ओह तू माझ्या मैत्रिणीच्या कंपनीच्या बॉस चा 'राइट हॅण्ड' आहेस? ओह माय! मग मी काय नाचू का?" असे विचारताना दाखवायला हवे होते. त्याला काही पद वगैरे आहे का नाही? दुसरे म्हणजे सुभा च्या मागावर आलेल्या पोराला सिक्युरिटी च्या केबिन मधे नेउन दरडावून सोडायचे, की डायरेक्ट सुभाच्या ऑफिस मधे नेउन विचारायचे? आणि कानाला पिस्तुल? जाम जसलो तेव्हा.

चाळीत दारात फ्रीज येतो तेव्हाच्या सीन मधे गोदरेज बरोबर प्रॉडक्ट प्लेसमेण्ट चे डील फिसकटलेले दिसते. बॉक्स वर गोदरेज मधले सुरूवातीचा जी आणि शेवटचा जे खोडलेले आहेत.

आणि एच आर मधे सिंगल स्टेटस दिल्याबद्दल तिला का झापले? लग्न ठरायच्या काळात विविध स्टेजेस मधे एचआर ला कळवत राहायचे असते का? मॅरायटल स्टेटसः पर्यायः १. सिंगल, २. पाहण्याचा कार्यक्रम झाला. ३. होकार आला. ४.बैठक झाली. ५. देण्याघेण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ६. झाल्या. ७.साखरपुडा झाला. वगैरे वगैरे.

फारेंड Rofl सुभाच्या ऑफिसमध्ये सबकुछ सुभा आहे. इतर डिपार्टमेंट आहेत की नाही असा प्रश्न पडतो. इशाचे आई बाबा पिळ आहेत. तो शेजारणीचा रिकामटेकडा भाऊ हास्यास्पद आहे. ही सर्व गर्दी फॉरवर्ड करत सुभा बघते. मग फ्रेंडस किंवा द मिडल बघते.

बिपिनचा काही सेकंदांचा नाच आवडला. तो काम छान करतो.
सुभा एरवी चष्मा वापरत नाही का? फक्त ती रंगीबिरंगी वही भरतानाच चष्मा लावून दिसला. ऑफीसात काय करतो मग?
तसंच बायफोकलमधे चष्मा पुढे ओढून लावतात तसा का लावला होता? त्याला फक्त लिहा-वाचायचाच चष्मा आहे तर मग बायफोकल का वापरतोय?

Pages