तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

फारेण्ड नशिब तु मानबा नाही बघत , त्यात तर घरगुती मसाले विकणारी राधिका ५ किलो बटाटे एकदम घ्यावे तसे ३०० करोड ची कपनी विकत घेते...

फारएण्ड, ऑर्कीड.. Biggrin

त्यात तर घरगुती मसाले विकणारी राधिका ५ किलो बटाटे एकदम घ्यावे तसे ३०० करोड ची कपनी विकत घेते...>> Lol

अरे शेवटी या दोन्ही सिरियलचा लेखकु कोणे... "द भैताड केड्या"
येडचापसारखं काहीही असतं त्याच्या शिरेलीत. Angry

सुभासाठी सहन करायचं सगळंच>>>इतक सहन करण्यापेक्षा सोनी मराठी वरच्या मालिका छान आहेत.. मी 2च बघते.. भेटी लागी जीवा अन्‌ ती फुलराणी.. पण बाकी पण zee मराठी पेक्षा better आहेत

इतक सहन करण्यापेक्षा सोनी मराठी वरच्या मालिका छान आहेत.. >>
त्या मालिकांमध्ये सुबोध भावे आहे काय??????????

मी सोनी वरची हम बने तुम बने बघते फक्त.

निधी बरोबर. बाकी सिरीअल्स एक तरफ आणि सुभा दुसरी तरफ. हिराॅईनपेक्षा तोच चांगलाय. पण् वयातलं अंतर 25 म्हणजे मुलीच्या वयाची झाली ती...जरा जास्तच होतंय.

इथे पहिल्या पानांवर "केड्या" लिहीले आहे तो लेखक कोण? गूगल मधे सिरीज बद्दल फारशी माहिती दिसली नाही.

तो जयदीप सरंजामे नक्की काय रोल मधे आहे कंपनीत? त्याच्या मालकीची कंपनी आणि सुभा मुख्य आहे असे काही आहे का? या कंपनीत कोणीही कोणालाही कामावरून कमी करू शकतो का?

आणि गेटवे ऑफ ईण्डिया ची भानगड काय आहे? तीस कोटीच्या परचेस ला काही लीगल रिव्यू, अ‍ॅप्रूव्हल्स, इन्व्हॉइस वगैरे नसतो का? त्याच्या केबिन मधे तीस कोटी असेच जनरल पडलेले असतात का? नाहीतर बॅंकेतून पैसे काढून देताना कंपनीच्या एकही दुसर्‍या डिपार्टमेण्टचा इतक्या मोठ्या खरेदीमधे काहीच सहभाग नसतो असे दिसते Happy एकूणच कंपनीत डिपार्टमेण्ट वगैरे आहेत की नाही शंकाच आहे. त्या मानबा मधल्या घरगुती मसालविक्रीवाल्या कंपनीचा सेट अप, का रे दुरावा मधल्या कंपनीचा सेट अप आणि या कंपनीचा सेट अप यात फारसा फरक दिसत नाही.

एकूणच एचआर, सेल्स, फायनान्स, लीगल वगैरे प्रोसेसेस अजून या कंपनीत यायच्या आहेत असे दिसते. कदाचित इशाच एका चुटकीसरशी त्या आणेल Happy

इथे पहिल्या पानांवर "केड्या" लिहीले आहे तो लेखक कोण? >>> अभिजीत गुरु त्याचं नांव. मानबामधे तो अभिनयही करतो, तिथे त्याच्या कॅरॅक्टरचं नाव केड्या आहे. त्यामुळे बरेच जण केड्या म्हणून ओळखतात. म्हणून ते नाव लिहीलंय.

अन्जूताई, अगं "केडी" नाव आहे त्याचं त्याच्यात.. आपण त्याला केड्या केलाय. Proud

जयदीप मालक आहे कंपनीचा. विकी झेंडेशी प्रायव्हेटमध्ये बोलताना म्हणतो की, "हे सर्व जयदीपचंच आहे, हे तू विसरू नकोस ."
आता विकी नक्की कोण हे समजायचं आहे.

गेटवे ऑफ इंडिया महेश शंकर नावाच्या माणसाने जयदीपला विकली. Proud आणि याने ती 30 करोड कॅश देऊन विकत घेतली. Uhoh
तीस कोटीच्या परचेस ला काही लीगल रिव्यू, अ‍ॅप्रूव्हल्स, इन्व्हॉइस वगैरे नसतो का? त्याच्या केबिन मधे तीस कोटी असेच जनरल पडलेले असतात का? नाहीतर बॅंकेतून पैसे काढून देताना कंपनीच्या एकही दुसर्‍या डिपार्टमेण्टचा इतक्या मोठ्या खरेदीमधे काहीच सहभाग नसतो असे दिसते Happy >> हेच प्रश्न मलाही पडलेले. Happy

पहिल्या की दुसऱ्या भागात विकी झेंडेंकडे थोडी कॅश मागतो (इशाला द्यायला ₹24 हवे असतात) तर झेंडे एक ब्रीफकेस भरुन ₹ 2000 च्या नोटा लगेच घेऊन येतो. Uhoh

आमचे कणेकर म्हणतात तसं ह्या लोकांना आयुष्यात लहान सहान काही माहितच नसतं !
बी ए - फर्स्ट क्लास फर्स्ट येणं, स्वित्झर्लॅड ला विंबल्डन खेळून आचारी झारा फिरवतात तशी रॅकेट फिरवून गोल्ड मेडल जिंकणं, इंटर नॅशनल म्युझिक काँपिटिशन जिंकणं वगैरे वगैरे... त्यामुळे छोट्या मोठ्या बाबी जसं बाथरुम मधला नळ गळतोय वगैरे गोष्टींची माहितीच नसते. आता तुम्ही म्हणाल की सुभा ने फ्रीज रिपेअर केलाय पहिल्या १-२ भागात कधीतरी, तर ते त्याचं इंजिनियर असल्याचं कौशल्य तसेच कोणत्याही कामाला छोटं मानु नये वगैरे गुणगान व्हावं यासाठी होतं.. तर त्यामुळे २४/- रुपडे वगैरे चिल्लर भानगडच नाय आमच्याकडे ! आम्ही थेट कोटीच्या कोटी उड्डाणे करतो. म्हणजे कसं की जरा ३०/- रुपयाची फुलपुडी बांधून दे, निशिगंध जास्त घाल, झेंडू पाकळ्या नको हे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्याच सहज निरागस पणे हे लोक - एक ३०० करोड ची कंपनी द्या हो किंवा वरची २००० च्या नोटा भरलेली ब्रीफकेस नाचवणे वगैरे प्रकार करतात ! Happy

पहिल्या की दुसऱ्या भागात विकी झेंडेंकडे थोडी कॅश मागतो (इशाला द्यायला ₹24 हवे असतात) तर झेंडे एक ब्रीफकेस भरुन ₹ 2000 च्या नोटा लगेच घेऊन येतो. Uhoh>>> आयटी ची चौकशी आयोग बसेल इतकी कॅश नेलीतर. मला वाट्ते लेखकांनाच प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी माहीत नसावी. काहीही दाखिवता त.

इशा बाळ तितके काही निरागस नाही. खोटे बोलून बॉसच्या गाडीत लिफ्ट मिळवावी हे बरे कळले? माझा त्या पात्राबद्दलचा भ्रम गळून पडला. श्रीमंत माणसाच्या गळ्यात पडायचा फुल्टू प्लेन दिसतो. असे वाग णे बिल्कूल बरोबर नाही. ते गिफ्ट बास्केट आवडले. व खाराच्या मिरच्य म्हणताना सुभाचा अभिनय पण गोड. कुटुंबासाठी धंद्या साठी पर्सनल लाइफ बाजूला ठेवून लढ णारे काही असतात तश्यातला तो दिसतो.
मग एकदम थोडे कोणी लक्ष दिले की पाघळायला होते ते.... सावरायला हवे. इन लोगं तो गलेमे पडरे.

इशाची आई पेनफुल आहे. काय साडी,ब्लाउन ज यप्पड पणा. पण बघायला मजा आली. असतात अश्या बायका. मी पण मुंबईत पहिल्यांदा घर उंचावर चे घेतले तेव्हा काचेला नाक लावून बघितले होते. एकदा साहेबांना कैरीची च ट्णी मला मस्त येते आण ते तुमच्यासाठी म्हटले होते ते आठवले. आता इमेल नसेल तर शेपटी पण उचलून बघत नाही.

फारेन्डा Biggrin
मालिका नियमित बघत जा आणि मग इथे खास तुझ्या स्टाईलने लिहित जा. Proud

मानबा आणि ह्या सिरेलचा लेखक एकच असल्याने कार्पोरेट जगाता विषयी तांत्रीक बाजूंचा नियम लावून सिरेल पाहू नये अशी तळटीप खरेतर प्रत्येक एपिसोडआधी दाखवायला हवी आणि वरील धाग्याच्या शेवटीपण टाका बघू त्यामुळे हे असे कसे? ऑफिसात असे घडते का? मिटिंगा प्रेझेंटेशन असे असते का? इतकी रक्कम सुटकेसभर २००० च्या नोटात लगेच येते का? गेट वे ऑफ विकत घेता येते का सहजा सहजी? आम्ही आख्खा हिमालय घेऊ, सात आश्चर्ये घेऊ नाहीतर चंद्र मंगळादी ग्रह उपग्रह घेऊ कृपया असे प्रश्न विचारू नयेत!

सुभाचा वयस्कर फोटो मस्त आहे.
वेडोबा वेलडन.
फारेण्ड ह्या धाग्याची मजा वाढवणार.
फारेण्ड, नियमित मालिका बघा. Happy

इशा बाळ तितके काही निरागस नाही. खोटे बोलून बॉसच्या गाडीत लिफ्ट मिळवावी हे बरे कळले? माझा त्या पात्राबद्दलचा भ्रम गळून पडला. श्रीमंत माणसाच्या गळ्यात पडायचा फुल्टू प्लेन दिसतो. असे वागणे बिल्कूल बरोबर नाही >>>>> करेक्ट.. मलापण सेम असेच वाटलेले.
बरोब्बर त्याच्या कडे पहात पहात टॅक्सी वाल्याला कटवलन..... उगाच नाही मायराला राग येत!
तिची आई मात्र हॉरिबल आहे .
सुबोध अतिशय गोड. वरच्या गॉगल च्या फोटोत तर एकदम कातील दिसतोय. Happy
त्याची काय मजबूरी आहे हिला आवडून घ्यायची कोण जाणे!! Sad
फारएंड....केड्याला कॉर्पोरेट प्रोसेसेस वगैरेचा काडीचाही गंध नाही..आम्ही कायम त्याच्या नावाने ओरडत असतो........!!

Angry

त्याची काय मजबूरी आहे हिला आवडून घ्यायची कोण जाणे>>> ती त्याला त्याच्या हयात नसलेल्या किंवा सोडून निघून गेलेल्या बायकोची आठवण करून देत असावी..
केड्याची आत्तापर्यंतची (त्याला वाटत असलेली) हुशारी बघता पुनर्जन्म वगैरे गोष्टी दाखवल्या तरी आश्चर्य वाटणार नाही.
शिल्पा तुळसकरचा पुनर्जन्म ईशा बाळ.. मग सुभा शिल्पाला वेळ देऊ न शकल्याचे किंवा इतर वाईट वागण्याचे प्रायश्चित्त ईशा बाळाशी चांगले वागून घेणार..
शिल्पा ईशाच्या रुपात गेल्या जन्मी अर्धवट राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करून घेणार..

अहो कच्चा लिंबू का आयड्या देताय? Uhoh
दुसरी गोष्ट म्हणजे सुभा च्या चष्म्याला काड्याच नव्हत्या हे कुणाच्या लक्षात आलं का?
गरजुंनी पुन्हा लाभ घ्यावा.

दुसरी गोष्ट म्हणजे सुभा च्या चष्म्याला काड्याच नव्हत्या हे कुणाच्या लक्षात आलं का?>>> हो हो.. मी पण पाहिलं..
अंकल स्क्रूज सारखा चष्मा.. नुसता नाकावर ठेवला होता

काल मी एबीपी माझा ला मि. सरंजामेंची मुलाखत पाहिली. चार्टर्ड विमानात बसुन विक्रम सरंजामे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होते.. याचच अर्थ असा की मालिकेत चार्टर्ड विमानात बसण्याचा सीन लवकरच दाखवतील. Happy

परवा इशा 'मी माझ फेवरिट स्ट्रॉबेरी आइस्क्रिम मागवते' म्हणाली तेव्हा विक्रम सरंजामे आतून हलला (बहुधा शिल्पा तुळसकरच सुद्दा हेच फेवरिट फ्लेवर असाव). तो अभिनय सुभाने छान केला. Happy

विक्रम आणि इशाच लग्न कधी ना कधी होणारच आहे हे सगळयान्ना माहिती आहे , तो फकिर का सारखा कडमडतो मध्ये मध्ये भविष्यवाणी करायला? Uhoh

ते गिफ्ट बास्केट आवडले. व खाराच्या मिरच्य म्हणताना सुभाचा अभिनय पण गोड. >>>> ++++१११११११

सुभाचे वरचे फोटो मस्त Wink

बिचारी मायरा, एकटीच वाट बघत बसली विक्रमची. Proud

बाकी इशाच्या आई बाबान्चा स्त्री पुरुष समानतेवर विश्वास आहे वाटत. आई वरती चढून कन्दील लावत होती, आणि बाबा रान्गोळी काढत होते. '
इशा बाळ तितके काही निरागस नाही. खोटे बोलून बॉसच्या गाडीत लिफ्ट मिळवावी हे बरे कळले? माझा त्या पात्राबद्दलचा भ्रम गळून पडला. श्रीमंत माणसाच्या गळ्यात पडायचा फुल्टू प्लेन दिसतो. असे वाग णे बिल्कूल बरोबर नाही. >>>> चला म्हणजे निदान हि नायिका तरी 'आदर्श नायिका' च्या कॅटगरीतली नाहीये हे बघून तर आनन्दच झाला. Biggrin

श्रीमंत माणसाच्या गळ्यात पडायचा फुल्टू प्लेन दिसतो. >>>> पण तो बिपिन आहे की श्रीमन्त (अशी त्याची बहीण म्हणते) त्याच्याशी कराव की इशाने लग्न.

इतक सहन करण्यापेक्षा सोनी मराठी वरच्या मालिका छान आहेत.. >>
त्या मालिकांमध्ये सुबोध भावे आहे काय?????????? >>>>> नाही. पण भेटी लागी जीवा मध्ये समीर धर्माधिकारी आहेच की.

पण् वयातलं अंतर 25 म्हणजे मुलीच्या वयाची झाली ती...जरा जास्तच होतंय. >>>>> त्या सिरियलच काय घेऊन बसलाय? त्या ५० वर्षाच्या मिसोने तर १८ वर्षाच्या मुलीशी लग्न केलय. Happy

पण तो बिपिन आहे की श्रीमन्त (अशी त्याची बहीण म्हणते) त्याच्याशी कराव की इशाने लग्न.>>> ऑफीस-ऑफीस खेळण्या इतका श्रीमंत नाही ना तो!! Happy

पण भेटी लागी जीवा मध्ये समीर धर्माधिकारी आहेच की.>> सुलू.. कैच्याकै तुलना बै. कुठे सुभा नि कुठे सध. Uhoh
सुभाचे डोळेचं सगळं बोलून जातात, अॅक्टींग पण किती परफेक्ट. समीर धर्माधिकारीला फक्त लुक्स आहेत. ते आमच्या कामाचे नाहीत. Happy

इशा बाळ तितके काही निरागस नाही. खोटे बोलून बॉसच्या गाडीत लिफ्ट मिळवावी हे बरे कळले? माझा त्या पात्राबद्दलचा भ्रम गळून पडला. श्रीमंत माणसाच्या गळ्यात पडायचा फुल्टू प्लेन दिसतो. असे वाग णे बिल्कूल बरोबर नाही. >>>> +1.

Pages