अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याभावाच्या बाबतीत घडलेली सत्य घटना.........
माझा भाऊ रविंद्र हा खुप विज्ञानवादी आहे. भूत वैगेरे वर त्याचा अजिबात विश्वास नाही. ही घटना साधारण १० वर्षा पूर्वी ची आहे .
त्यावेळी तो पुण्याला तर मी फलटणला जॉबला होतो. गणपतीच्या सुट्टीसाठी भाऊ गावी गेला होता. मला तीनच दिवस सुट्टी होती म्हणून मी रात्रिच्या सांगली गाडीला बसलो जी दुसऱ्या दिवशी साधारण दीड वाजता आष्टागावी पोहचली .
आष्टा गावापासून माझे गाव दुधगाव ७ किलोमीटर आतील बाजूस आहे .
इस्लामपुर मध्ये आल्यावर मि तसा कॉल केला होता की अजुन अर्ध्या पाऊन तासात आष्टयात पोहोचेन . परंतु मी आष्टयात पोहचलो तरी भावाचा पत्ता नव्हता .
मी थोडा वेळ वाट पाहून परत कॉल केला. रिंग जात होती पण फोन उचलत नव्हता मला वाटलं जवळच आला असेल म्हणून कॉल उचलत नसेल . अजून १०-१५ मिनिटे गेली.. मी परत कॉल केला.. रिंग जात होती पण फोन उचलत नव्हता .
आता माझ्या मनात नको त्या शंका यायला लागल्या. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती..कारण एव्हड्या वेळात तर त्याला यायला हवे होते. गाडीचा कमीत कमी स्पीड धरला तरी अर्धा तास खूप झाला
मी ठरवलं कि अजून ५ मिनिटात तो नाही आला तर आपण चालत निघायचं गावाकडं . इतक्यात मला एक गाडी येताना दिसली पण दुसऱ्या कोणाचीतरी होती. मागून लगेच माझा भाऊ आला.
मी विचारलं एवढा वेळ कसा झाला ? तर तो म्हणाला बस गाडीवर नंतर सांगतो . घरी पोहचल्यावर त्याने जे सांगितले ते त्याच्या शब्दात :-
मी तुझा फोन आल्यावर निघालो. म्हसोबा ओलांडून पुढे गेलो ( म्हसोबा जवळ दुधगाव हद्द संपून आष्टहा हद्द चालू होते )पण मला पुढे रस्ताच दिसेना ..म्हसोबा पासून आष्टा १० मिनिटावर आहे . मध्ये एक ओढा लागतो त्याला काळा ओढा म्हणतात.
तो ओढा जास्तीत जास्त ५ मिनिटावर आहे पण जवळ जवळ एक तास गाडी चालवून हि मी ओढा जवळ सुद्दा आलो नाही . रास्ता सरळ आहे . गाडीचा वेग लक्षात घेता मी केंव्हाच पोहचायला पाहिजे होत पण काही कळत नव्हतं खिशात फोन वाजायचा पण मला गाडी थांबवायची भीती वाटत होती
मी विचारलं मग तू आलास कसा
माझ्या मागून एक गाडी आली व मग मला रस्ता दिसला व मी आलो .
आता माझ्या भावाविषयी :- तो कोणतीही नशा नाही करत, भूत वगैरे नाही मानत ..,तो चेष्टा करत नव्हता कारण निदान दुसऱ्या दिवशी मला त्याने सांगितले असते .
आता ज्याचा त्याचा प्रश्न किती विश्वास ठेवायचा

@रमेश रावल तुमच्या भावाला बहुतेक चकवा लागला असणार, चकवा लागला कि जमिनीवर बसायचं समोरचा रस्ता दिसू लागतो, कारण चकव्याचा प्रभाव कमरेच्या उंचीपासून वर सुरु होतो.

@बोकलत
धन्यवाद!
चकवा लागून माणूस दगावण्याची किती शक्यता असते. जर भूते असतात व त्यांच्यामुळे जीवित हानि होण्याची शक्यता असते
तर अजून मी एकदाही पेपर किंव्हा बातमीमध्ये एकाद्या भूताने खून केल्याची बातमी नाही ऐकली

@ रमेश रावल चकवा लागून माणूस कधीही मरत नाही. चकवा हा शक्यतो माणसाला निर्जन ठिकाणी लागतो. एकदा का तुम्ही याच्या तावडीत सापडला कि तुम्हाला पुढची वाट दिसत नाही. फिरून फिरून माणूस पुन्हा त्याच ठिकाणी येतो जेथे त्याला चकवा लागलेला असतो. तसेच चकवा हा वायुरूपी मनावर ताबा मिळवणारा पिशाच आहे त्यामुळे याच्यावर मंत्रांचा काहीही फरक पडत नाही. जर कोणी याच्यावर मंत्र वैगरे टाकून मारण्याचा प्रयत्न केला तर हा चकवा स्वतःला शून्यात एकवटून त्या मंत्रांपासून स्वतःचा बचाव करतो आणि मंत्रांचा प्रभाव संपला कि पुन्हा आपलं अस्तित्व दाखवतो. जे लोकं याच्या तावडीत सापडतात त्यांना वेळेचं भान राहत नाही. याच्या तावडीत सापडलेली लोकं सांगतात कि आम्ही १५-२० मिनिटं एकाच जागी गोल गोल फिरत होतो पण प्रत्यक्षात ते काही तास त्या ठिकाणी गोल गोल फिरत असतात.

मला लागला होता चकवा पुण्यातील वेताळ टेकडीवर. संध्याकाळची वेळ होती साधारण ६:३० - ६:४५ ची ... अंधार पडायला लागला म्हणून टेकडीवरून उतरायला लागलो सिम्बिओसिसच्या बाजूने पण रास्तच सापडत नव्हता १५ एक मिनिटे फिरलो असेल तिथल्या तिचे, कुठे जातोय काहीच कळत नव्हते. मग एका दगडावर बसलो विचार करायला म्हणून आणि 1-2 मिनिटात रास्ता दिसला. समोरच होता पण आधी दिसताच नव्हता .. का कुणास ठाऊक .. घरी आल्यावर बोललो तर घरचे म्हणाले तुला चकवा लागला होता म्हणून ...

माझ्या नवर्‍याच्या मावशीची नवर्‍यावर फार माया. मावशीला बरच बर नव्हतं पण पटकन जाईल असं वाटलं नव्हतं. आम्ही परदेशात असल्याने भेट झाली नाही, जेंव्हा देशात गेलो तेंव्हा पण भेट झाली नाही. परत अल्यावर कळलं की मावशी वारली. आम्हाला दोघांना फार वाईट वाटलं.

त्या दिवशी घरातली २ काचेची भांडी जागच्या जागी फुटली. पहिला ग्लास चांगला दणकट होता, जस्ट मुलाचा हात लागला आणि उभ्याचा आडवा होताना खळ करून चुरा होऊन फुटला. दुसरा ग्लास धुवून ठेवला आणि मी लाईट काढून झोपायला जात होते तर सिन्कवरून खाली पडला आणि फुटला, आम्ही दोघेही घाबरलो. सगळा पसारा आवरून आत आलो तर मिक्सर ची प्लास्टीक भांडी पडली, जी नीट वाळत घातली होती.

मी नवर्‍याला म्हटलं मावशीला मनापासून सांग की मी तुला विसरलो नाही आणि कधी विसरणार नाही. तुझ्या मुलींशी नातं देखिल पूर्वी सारहंच राहील. त्यानंतर मात्र काही पडलं नाही की फुटलं नाही.

रमेश, भुत्याभाऊ दोघांचेही किस्से भयानक. बोकलत म्हणतायत ते बरोबर आहे, चकवा लागुन कोणी मरत नाही, व तो लागलाय हेही बरेच उशिरा लक्षात येते. मी कुठेतरी वाचलय की चकवा हा लहान मुलांचा (भुत) प्रकार आहे त्यांच्यासाठी हा फक्त एक खेळ असतो. मजा. त्यांचा हेतू हा आपल्याला मारायचा नसतो.

भुत्याभाऊ, तुम्ही लिहिलय की तुम्हालापण एक माणूस दिसायचा खोलीत? तो कोण होता हे कळलं का? त्याच्या बद्दल मागे लिहिलं होतं म्हणालात, कुठल्या पानावर आहे ते? मागची पाने चाळली पण सापडलं नाही.

<<तर मी फलटणला जॉबला होतो >>>> कमिन्स, सुरवडी का ? >>
नाही, तहसीलदार कार्यालयात सेतू चा सेटअप करायच काम होत. सध्या मुक्काम पुणे असो,
तर लहानपणा पासूनच मला गूढ गोष्टीची उसुक्ता आहे. प्लँचेट केले,ज्योतिष शिकलो (आणि अजूनही शिकतच आहे),हिप्नोटिजम शिकलो गावातील गणपतीला कार्यक्रम करून पैसे हि मिळवले.
हिप्नोटिजम मुळे मी गावात खूप प्रसिद्ध होतो. एक दिवस आपच्या गावातील एक व्यक्ती ज्यांना आम्ही तात्या म्हणत असू हे माझ्या कडे आले व म्हणाले कि
माझ्या बायकोच डोकं सारखं दुखतंय तू हिप्नोटिजम करून तिला सूचना देवू शकतोस का कि तुझं डोकं आता दुखायचं राहिलय वगैरे
मी म्हणालो कि वेदना पण चांगल्या असतात. जर तुम्हाला वेदनाच झाल्या नाहीत तर तुम्ही उपचार कसे घेणार व बरे कसे होणार
ते म्हणाले आम्ही सर्व डॉक्टर्सना दाखवलं आहे मेंदू स्कॅन करून पण पाहिलाय. डॉक्टर म्हणतायत काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मानसिक आहे.
म्हणून तुझ्याकडे आलो. मी फक्त हिप्नोटिजमचे करमणुकीचे खेळ करायचो त्यातील मेडिकल बाबी मला नव्हत्या माहित. म्हणून मी स्पष्ट नकार दिला.
तरी माझी व त्यांची गट्टी नंतर चांगली जमली आम्ही बुद्धिबळ खेळायला तासन्तास बसू. दहावीची परीक्षा संपल्यामुळे मलाही ३ महिने सुट्टी होती.
पण एक दिवस त्यांनी त्यांच्या बायकोच डोकं दुखण्यामागील कारण सांगितलं ते एकूण मी चाटच पडलो.
त्यांनी सांगितलं कि ते त्यांच्या मेव्हण्याकडे गेले होते तेंव्हा तो म्हणाला की भाऊजी तुम्हाला अशा गोष्टी नाही पटत मला माहित आहे पण माझ्या साठी एकदा XXX बाबाकडे चला
तात्या तयार होईनात पण एवढे उपाय केले त्यात अजून एक असे म्हणून मेव्हण्याने त्यांना तयार केले
त्या बाबाने एक लिंबाचे वर्तुळ काढले होते बाकी धूप दीप होतेच. त्या वर्तुळात त्यांनी काकूंना बसायला सांगितले व तात्यांना म्हणाले कि तुमचा मेव्हणा म्हणत होता कि तुम्हला अशा गोष्टी नाही पटत तर तुम्ही तिथे बाजूला बसून पहा.
थोड्याच वेळात त्याने काही मंत्र म्हणून धूप पेटवला तश्या काकू खुमायला लागल्या त्या बाबाने त्यांच्या समोर ४-५ लिंबू टाकले तसे त्यांनी कराकरा कच्चे लिंबू खाल्ले. त्यानंतर त्या बाबाने काकुंना विचारले तू कोण आहेस?
काकू म्हणजे त्यांच्या अंगातील ते भूत म्हणाले कि माझे नवीन लग्न झाले होते व आम्ही गाडीने नवर्याच्या गावी चाललो होतो पण मध्येच अपघात झाला व आम्ही सर्व मेलो. माझी संसाराची इच्छा अपुरी राहिली म्हणून या बाईच्या शरीरात राहून मी माझी इच्छा पूर्ण करत आहे.
त्या बाबाने तिला सांगितले कि या बाईचा पण संसार आहे तू तिला त्रास नको देवू . ते भूत त्रास देणार्यातलं नव्हतं म्हणून लगेच तयार झालं
त्या बाबाने तिला नैवैद्य विचारला तर ती म्हणाली मला फोडणीचा भात द्या. नंतर फोडणीचा भात त्या बाबाने सांगितलेल्या ठिकाणी ठेवल्यावर परत कधी डोकं नाही दुखलं काकूंचं.
तात्या म्हणाले तेंव्हा मला समजलं कि हि घरी सारखं फोडणीचा भा त का बनवायची..मुले व मी सुद्धा कंटाळलो होतो भात खाऊन ...

ही घटना माझ्या आजीच्या तरूणपणी तिच्या गावी घडलेली आहे. ती व तिच्या चार पाच मैत्रीणी एकदा गावच्या जत्रेला गेल्या होत्या. तिथून रात्री जत्रेतुन फिरत परत येतांना एका मोठ्या झाडाखालून गेल्या. तिथून त्या जरा पुढे गेल्याच होत्या की त्यांच्यापैकी एक मुलगी जी खूप सुंदर होती ती कसेतरीच करू लागली व अंगावरचे कपडे फाडू लागली. तिला बाकीच्या मुलींनी कसेबसे धरून घरी आणले, तर ही एक कपडा अंगावर ठेवायला तयार नाही. मैत्रीणींनी, घरच्यांनी खूप समजावलं, सगळे खूप घाबरले. अंगारे धुपारे झाले, देवर्षी झाले तरी गुण येईना, तिला मारून बदडूनही झाले, परिणाम शून्य. ती एरवी शांत असायची पण कोणी तिला कपडे घालायला गेले तर खूप हायपर व्हायची व कपडे फेकून द्यायची. कायम दिगंबर अवस्थेत. घरातील लोक शेवटी सांगून समजावून कंटाळले. ती घरातून बाहेर पडत नसे . अगदी नाॅर्मल असे, सामान्य माणसासारखी फक्त कपडे घालण्याचा विषय सोडून. पण घरातील कामे, स्वयंपाक, कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे ही सगळी कामे ती करी, माझी आजी, व गावातल्या बायका जर तिच्या घरी गेल्या तर त्यांच्याशी व्यवस्थित बोले, त्यांची प्रेमाने विचारपूस करी, पण कोणी जर कपडे घालण्याचा विषय काढला, तर दुसऱ्या खोलीत जाऊन बसे. शेवटपर्यंत त्या बाईला कसल्याही औषधाने म्हणा किंवा उपायांनी गुण आला नाही. ती अगदी म्हातारी होउन वारली. आजी जेव्हा आमच्या लहानपणी तिची गोष्ट सांगायची तेव्हा अजाणतेपणी हसूच यायचे. पण आता कधी ही गोष्ट आठवली तर त्या अश्राप जिवाबद्ल करुणा दाटून येते. काय सोसले असेल तिने व तिच्या घरच्यांनीही.

अद्भुत असा श्री विष्णू सहस्त्रनामावली पठण महिमा आणि चमत्कार
एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. ह्या परिचित ताईंना काही दिवसांपूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या. बरीच दिवसांनी भेटल्ल्यांनंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या. काही अध्यात्मिक चर्चा झाल्यावरती त्या स्त्री म्हणाल्या गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही. कारण मला घरामध्ये ३/४ मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने दिवसा झोपावे लागत आहे. त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे.
हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णू सहस्त्रनामावली चे दर बुधवारी पठण करायला सांगितले. आणि कशा प्रकारे करायचे तेसुद्धा सांगितले. ह्या पठणामुळे त्या मृत व्यक्तीना चांगली गती मिळून त्यांची या योनीतुन सुटका होईल. त्या स्त्री आधीच घाबरल्या असल्या कारणाने म्हणाल्या हे एकाच बुधवारी केले तर चालेल का ? तर आमच्या ताईंनी सांगितले हरकत नाही करून पहा.

त्या परिचित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून ४ वेळा विष्णू सहस्त्रनामावली चे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या. बहुतेक दुसऱ्यासाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तींची मृत योनीतुन सुटका केली.
हे वाचून लोकांना प्रश्न पडेल कि हे मृतात्मे त्या बाईंनाच का दिसत असावेत याचे कारण म्हणजे शुभ स्थानातील उच्चीचा नेपच्युन आणि त्यावरती शुभ ग्रहांची दृष्टी अशी पत्रिकेत स्थिती असेल तर अशा व्यक्ती अतींद्रिय शक्तींशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात. यात मृतात्मे सुद्धा येऊ शकतात.
विष्णू सहस्त्रनामावली चे पठण कसे करावे याची माहिती खालीलप्रमाणे:-
ज्यांच्यामुळे आपले अस्तिव आहे त्या आपल्या पितरांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी दर बुधवारी " विष्णूसहस्रनामाचे " पठण करावे.
आधी आपल्या ज्ञात आणि नंतर अज्ञात पितरांसाठी याचे पठण करावे. लग्न झालेल्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या माहेरच्या पितरांसाठी आणि सासरच्या पितरांसाठी सदगती मिळवून देण्यासाठी याचे पठण करायला हरकत नाही.

१) ज्ञात पितरांसाठी खालील प्रमाणे सुरवातीला प्रार्थना करून मग पठण करावे.
मी xxx (नाव ) यांना सदगती मिळावी यासाठी विष्णूसहस्रनामाचे पठण करीत आहे . तरीही विष्णू भगवानांनी त्यांना सदगती मिळवून द्यावी.जेणेकरून त्यांचे शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्ही त्यांचाच एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे
२) ज्ञात पितर झाल्यांनतर अज्ञात पितरांसाठी खालील प्रमाणे सुरवातीला प्रार्थना करून मग पठण करावे.
आमच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना सदगती मिळावी यासाठी विष्णूसहस्रनामाचे पठण करीत आहे .तरीही विष्णू भगवानांनी त्यांना सदगती मिळवून द्यावी.
जेणेकरून त्यांचे शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्ही त्यांचाच एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे.
( जाता जाता ........ज्या व्यक्तीला त्या मृत व्यक्ती दिसायच्या ती व्यक्ती ,ज्यांनी हा उपाय त्यांना सांगितला ती व्यक्ती आणि मी हे सर्व योगायोगाने एकाच संस्थेचे जोतिष विद्यार्थी निघालो. त्यातल्या दोन व्यक्तींचा नेपच्युन विलक्षण प्रभावी आहे. शुभ गुरूबरोबर नवपंचम योगात असणार हे निश्चित. )

टीप: १) हि पोस्ट ज्यांना पटली नसेल त्यांनी दुर्लक्षित करावी उगाचच वाद घालत बसू नये.
२) श्री विष्णू सहस्त्रनामावली पठण इतर गोष्टींसाठी सुद्धा करतात पण पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो हे निश्चित.

ही वरची पोस्ट मला whats app मधून आली होती, तशी कॉपी पेस्ट केलीय.

अनिश्का , त्या बाईंच्या धाडसीपणाला दाद द्यावी लागेल.

किल्ली, श्री विष्णु सहस्त्रनाम फार प्रभावी आहे. माझे मोठे काका आजारी पडुन देवाज्ञा होईपर्यंत म्हणत होते. देवकृपेने त्यांना कसलीच कमी नव्हती. पपु ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे गुरु प पु श्री दासगणु महाराजांचा यावर एक लेख होता, तो नंतर लिहीनच.

रश्मी, संकल्प कसा करावा? आणि व्यक्ती आपल्या नात्यातील नसेल, बाहेरची असेल तर अशा व्यक्तीसाठी करू शकतो का आपण हे उपाय? प्लीज सांगा.

अनामिका, कोणतेही कार्य हे संकल्पाशिवाय सिद्धीला जात नाही याचा अनूभव मी घेतलाय. पण तसे मला ते डिटेल मध्ये नाही सांगता येणार तरी लिहीते. अंघोळ झाल्यावर देवापुढे बसुन उदबत्ती लावुन ( आधी देवाची पूजा झाली असल्यास उत्तम ) हातात पळीने पाणी घ्यावे १ ) ओम नारायणाय नमः २ ) ओम मधुसुदनाय नमः ३ ) ओम केशवाय नमः असे म्हणून हातातले पाणी प्यावे. म्हणजे प्रत्येक नाव म्हणून एकंदरीत ३ वेळा पाणी पिऊन मग शेवटी हातात ( तळव्यात ) पाणी घेऊन मनात संकल्प करावा की अमुक कार्यासाठी मी अमुक अमुक पूजा करणार आहे किंवा पारायण करणार आहे किंवा स्तोत्र वाचणार आहे. असे मनात म्हणून झाले की ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातले पाणी ताम्हणात सोडुन द्यावे. थोडक्यात काय तर आचमन करावे. पाहीजे तर कुणा मोठ्या ( वयाने ) व्यक्तींना तू संकल्पाविषयी विचारु शकतेस.

आणि व्यक्ती आपल्या नात्यातील नसेल, बाहेरची असेल तर अशा व्यक्तीसाठी करू शकतो का आपण हे उपाय? प्लीज सांगा.>>>> अनामिका आपल्या हातुन दुसर्‍याचे भले होणार असेल तर देवाचे नक्कीच वाचावे. शुद्ध हेतू व शुद्ध मनाने देवाचे केले की देव नक्कीच् साथ देतो.

हा किस्सा दैवी / अमानवीय मध्ये मोडतो हे माहित नाही. २०११ मध्ये आम्ही शिर्डीला जायला निघालो होतो, मोठी बहीण आई, मावशी, मी आणि माझ्या लहान मुली (वय 1/३ ). रात्रीच्या टिकेट्स होत्या मी डायरेक्ट ऑफिसमधून आईकडे जाणार होते. त्या टिकेट्स नेमक्या माझ्याकडे होत्या ऑफिसमधून (कासारवडवली-ठाणे) ६ वाजता सुटले, ऑफिसबसने आधी मीरा रोडला उतरले आणि ट्रेनने घरी जायला निघाले. प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर टीसी ने पास चेक करण्यासाठी थांबवले म्हणून पर्स काढली तेव्हा पास दाखवून झाल्यावर कळले कि टिकेट्स त्यात न्हवत्या. लंच टाइम मध्ये मी त्या ऑफिसच्या ड्रॉवर मध्ये काढून ठेवल्या होत्या. तशीच ट्रेन पकडून रिटर्न ऑफिसला जायला निघाले. मीरा रोडला उतरून एसटी ने ऑफिसला गेले तत्पूर्वी घरी फोन करून सांगितले. खूप उशीर झाला ९ वाजले होते टिकेट्स घेऊन बस स्टोप वर बस / एसटी यायची वाट पाहिली ज्या येत त्यात गर्दी असे किंवा त्या भलत्याच ठिकाणी जाणाऱ्या असत. मग प्रायव्हेट गाडी पकडून जाऊ म्हणून आजूबाजूला अजून कोण दिसते का बघितले तर जेन्टस गर्दीच होती लेडीज कोणी दिसेनात. एक व्हाईट कार आली म्हटले बघूया विचारून तर अजून दोघांनी पण तिला अँप्रोच केले मीही फार वैतागली होते म्हणून म्हटले जाऊदे आपण पण विचारू तर ती कार बोरिवली पर्यंत जाणारी होती. आम्ही तिघे त्यात बसलो मी ड्रायव्हरच्या शेजारी आणि ते दोघे मागे. मला मनात भीती वाटली कारण घोडबंदर रॉड ने रात्रीच्या वेळी अश्या अनोळखी लोकांबरोबर प्रवास करणे तितके शहाणपणाचे नाही आपल्या जीवाला धोका होऊ शकतो हे साधे गणित माझ्या डोक्यात असून ते मी सोयीस्कररीत्या विसरले होते. पूर्ण रस्ताभर मागील दोघे आपसातच बोलत होते आणि ड्राइवर माझ्याशी थोडेबहुत जुजबी बोलत होता. जंगली रस्ता पार झाल्यावर जेव्हा राज महाल पर्यंत आले तेव्हा थोडे हायसे वाटले, ते दोघे मीरा रोडला उतरले आणि ड्रायव्हरला मी म्हणाले मीही इथेच उतरते तर तो म्हणाला नको मी तुला बोरिवली पर्यंत सोडतो, तसे पण आता हायवे होता म्हणून मी घाबरायचे सोडून दिले आणि त्या ड्राइवर बरोबर गप्पा मारू लागले आणि त्याला तिकीट स्टोरी सांगितली, बरे आता हायवे होता म्हणून मला त्याच्या गाडीचे जास्त निरीक्षण करायला मिळाले होते जसे तो ड्राइवर सुद्धा व्हाईट कपडे घालून होता, त्याचा गाडयांच्या सोमोरील डेक वर साईबाबांचा छोटो फोटो होता etc etc बोरिवली ईस्ट ला गाडी आली आणि मी त्याला थँक्स म्हणून पैसे देऊ केले त्याने ते नम्रतेने नाही म्हंटले आणि साई बाबाना ते पैसे चढव असे सांगितले. या दरम्यान जवळ जवळ साडेदहा वाजले होते, मला अजून ट्रेन पकडून आईकडे जायचे होते मी कारमधून घाईत उतरून स्टेशनकडे निघाले मागे वळून त्याला पुन्हा थँक्स म्हणण्यासाठी वळले तर ती गाडी मला दिसली नाही. ........ रिअली उशीर होत असून सुद्धा मी तिथे थांबून अगदी डोळे फाडून पाहत होते तर गाडी मला दिसली नाही अगदी पुढल्या वळणावर दिसेल म्हणू मी टाचा उंचावून पहात होते.

@Ajnabi: अमानवी वाटला नाही पण भिडला अनुभव. ऐनवेळी अगदी अनपेक्षितपणे मदत करून सुखद धक्का देऊन गायब होण्याची घटना माझ्या एका मित्राबाबत पण घडली होती. सकारात्मक अर्थाने "वह कौन था". एकाच व्यक्तीला आयुष्यात "त्याच्या"कडून वेळोवेळी अशी मदत मिळते अशा प्रकारचा एक सुंदर चित्रपट होऊ शकतो यावर.

Pages