अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत,
तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कधीही न संपणाऱ्या सुरस, चमत्कारिक, थरकाप उडवणाऱ्या सत्य घटनांचा खजाना एक वेगळा धागा काढुन लिहाल का प्लीज. म्हणजे कसं एकत्र वाचायला मिळतील ना आम्हाला. Happy

<<<<सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिसादांमुळे माझी लेखणी चैतन्याने स्फुरण पावली असून, लवकरच माझ्याकडे असलेल्या कधीही न संपणाऱ्या सुरस, चमत्कारिक, थरकाप उडवणाऱ्या सत्य घटनांचा खजाना तुमच्यासमोर उलगडण्याचा माझा मानस आहे. तुमच्या सगळ्यांची अशीच साथ मिळाली तर कार्य नक्कीच सिद्धीस जाईल यात शंका नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.>>> तुम्हास शुभेच्छा. पण त्या ह्या धाग्यावर न लिहिता नविन धागा काढ्ला तर बरे होइल.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद पण नवीन धागा काढला तर बोलतील यासाठी अमानवीय धागा असताना नवीन कशाला काढलात, त्यामुळे इथेच लिहायचा मानस आहे.

<<<तुम्ही एव्हढाच आग्रह करताय तर पुढे विचार करेन स्वतंत्र धागा काढण्याचा. पण अजून थोडे दिवस इथेच लिहीत जाईन.>>>
साहेब लवकरच काढा धागा. या धाग्यावर नका पोस्ट करत जावु तुमचे अनुभव.

<<<अभिप्रायाबद्दल धन्यवाद पण नवीन धागा काढला तर बोलतील यासाठी अमानवीय धागा असताना नवीन कशाला काढलात,>>>
कोणि नाहि बोलणार. जरा मनावर घ्या आणि लवकरच नवीन धागा काढा.

किती ती धास्ती घेतलीये लोकांनी बोकलत यांची

नीट सांगून झाले अन आता तर गोडीगुलाबी करून सुदधा झाली, पण बोकलत काही माघार घ्यायला तयार नाहीत असे वाटतेय☺️

बाकी बोकलत खरंच घ्या मनावर नवीन धाग्याचे, कारण उगाच एक छान गंभीर असा धागा विनोदी वाटतोय तुमच्या किस्यांमुळे

त्याची बायको चुलीवर काहीतरी बनवत होती.. अचानक चुलीतील थोडा विस्तव चुलीच्या बाहेर आला.. त्याच्या बायकोने हळूच इकडेतिकडे पहिले व हाताने तो लाललाल निखारा अलगत उचलून परत चुलीत टाकला...तसे चादरी खालून पाहणाऱ्या बाळूला घाम फुटला.... (पुढे चालू )

दुसऱ्या दिवशी बाळू त्या पिगळ्याला भेटला व सर्व हकीकत सांगितली, पिंगळा म्हणाला, दोन दिवसांनी आमावस्या आहे आणि तो तिचा जाण्याचा दिवस आहे .
तू प्रथम तुझ्या दोन्ही मुल्लांना बाहेर गावी पाठव, ती नका पाठवू म्हणेल पण तू जबरदस्तीने पाठव. आमावस्याच्या दिवशी तू बाहेर झोप. पण झोपी जाऊ नकोस
रात्री ती पाणी उकळायला ठेवेल तेंव्हा तू तिथे न थांबता माझ्याकडे ये. मी इथेच रात्री सर्व पूजेची तयारी करून बसलेला असेन.
त्या प्रमाणे बाळूने मुल्लाना लांबच्या काकांच्या गावी पाठवतो म्हणून आपल्या मित्राकडे ठेवले. त्याची बायको मुलांना नका पाठवू म्हणत होती.
असे अचानक काय झालाय तुम्हाला कशाला पाठवलाय गावी म्हणून अडवत होती. पण बाळूने जबरदस्तीने पाठवले व मुलांना ताकीद दिली कि जर आरडाओरडा करून लवकर घरी आलात तर तंगड तोडीन. आमावस्याच्या दिवशी , आज फार उकडतंय म्हणून बाळू घराबाहेर ओसरीवर झोपला. पण दाराच्या फटीतून आत लक्ष ठेवून होता.
रात्री बाराच्या सुमारास त्याची बायको उठली , तिने भलं मोठं लालभडक कुंकू कपाळाला लावलेलं, केस मोकळं सोडलेले, तिने चूल पेटवली व त्यावर मोठ्ठ पातेलं भरून पाणी ठेवलं तसा बाळू हळूच तिथून निसटला व गावाबाहेर तो पिंगळा जिथे बसला होता तिथे जाऊन बसला.
पिंगळ्याने आपली सर्व तयारी केली होती. समोर एक रिंगण आखाल होत, हातात वेताची छडी होती, तो बाळूला म्हणाला "हे अभिमंत्रित तांदूळ घे व तुझ्या घराच्या उबंरठ्यावर याचे तीन भाग करून ठेव"
"मी आता तिकडे नाही जाणार" बायकोचा अवतार पाहून घाबरलेल्या बाळूने म्हंटले
"तुला जावंच लागेल, आणि घाबरू नको हे माझे पादुका घे आणि जा "
पिंगळ्याने बाळूला आपली झोळी दिली ज्यात त्याने अभिमंत्रित तांदूळ ठेवले होते व आपल्या पादुका दिल्या.
नाईलाजाने बाळू उठला व आपल्या घराकडे जाऊ लागला. अमावसेची रात्र , अंधार मी म्हणत होता, सर्व गावात स्मशान शांतता...
बाळू रामराम म्हणत घराजवळ पोहचला.. लांबून ते घर शांत दिसत होत.. पण आत ती हडळ त्याचा घास घ्यायला बसली असणार याची पूर्ण कल्पना
बाळूला होती.. तो आवाज न करता मांजरीच्या पावलाने उबरठ्याजवळ गेला. झोळीत हात घालून तांदूळ बाहेर काढले व पहिला भाग उबंरठावर ठेवला
तसा आतून "हुं.... " असा आवाज आला. बाळूचे ह्रद्य इतके जोरात धडकत होते कि त्यालाही त्याचा आवाज ऐकू येत होता.
तरी हिम्मत करून त्याने दुसरा भाग उबंरठावर ठेवला तास " हुं...... " असा परत आवाज आला मात्र या वेळेस तो अगदी दाराच्या जवळून आला.
बाळूने थरथरत्या हाताने तिसरा भाग उंबरठ्यावर ठेवला तसा दार उघडून त्या हडळी ने "भ्वा.. " असा विचित्र आवाज काढून बाळूचा हात पकडला
तसा मेलो मेलो म्हणत बाळू बोबलत हात हिसकावून मागे पळत सुटला. ती सुद्धा त्याचे मागे धावत होती मात्र त्या पादुका लांब लांब पडत बाळूला
पिंगल्या जवळ घेऊन आल्या.
मागून ती हडळ पळत आली तसे पिंगळ्याने तिला समोरच्या रिंगणात बसायला सांगितले, तिने नकार देताच पिंगळ्याने जवळची वेताची काठी जोरात
जमिनीवर मारली तसे ती हडळ ओरडत खाली बसली.. पिंगला म्हणाला तूझ्या जाण्याची वेळ झाली आहे ना मग तू एकटीच जा.."
मी एकटी नाही जाणार मी तुम्हा सर्वांचं रक्त पिऊन जाणार आहे
पाहतोच मी तू कस आमचं रक्त पितेस ते असं म्हणून पिंगळ्याने आपल्या जवळची एक बाटली काढली व तिला म्हणाला या बाटलीत मुकाट्याने बैस
ती हडळ हसू लागली.. मी एवढी मोठी त्या बाटलीत कशी मावेन...
मला शिकवतेस काय असे म्हणून पिंगळ्याने जवळची काठी जमनीवर जोर जोरात बडवू लागला तशी त्या हाडळीचा आकार हळूहळू लहान होत गेला व ती ओरडू लागली
तिला पिंगला म्हणाला जा आत बाटलीत.. ती बाटलीत जाऊ लागली तसा पिंगला म्हणाला "चलाखी नको करू डोकं खाली व पाय वर असे करून बैस "
तसे उलट्या पद्धतीने तिला बाटलीत कोंबून ती त्या गावाच्या पुलाखाली त्या पिंगळ्याने पुरली व बाळूला वाचवले....

अजूनही अमावसेला रात्री १२ वाजता त्या पुलाखालून त्या हाडळीचा आवाज येतो म्हणे ....... (समाप्त)

>>>जुळं असेल तरच हे शक्य आहे.
असंच काही नाहीये.. लोकं लर्नर्स लायसन्स किंवा लायसन्स शिवाय देखील गाडी चालवतात की Wink Lol Light 1

एक छान गंभीर असा धागा विनोदी वाटतोय तुमच्या किस्यांमुळे>>> मला अनुभवच तसे आलेत, त्याला मी तरी काय करू. आता तुम्ही सगळे एव्हडा आग्रह करताय तर अमानवीय 3 धागा मी काढेन असं म्हणतोय.

सर्वात छोटी भयकथा...

मी दारावरची बेल वाजवली तसे बायकोने दार उघडले..
आज वेगळीच दिसतेस आजारी आहेस का? - मी
बसा , मी जेवणाची तयारी करते असे म्हणून बायको स्वयंपाक घरात गेली
इतक्यात माझा फोन वाजला
हॅलो - मी
"अहो मी बोलतेय, मी जरा मैत्रणीबरोबर बाहेर आलीये थोडा उशीर होईल यायला" - बायकोचा आवाज

मी खूप वर्षांपासून मायबोलीचा चाहता व वाचक आहे. अमानवीय माझा खूपच आवडीचा धागा आहे. इतका की काही तासा तासांनी नवीन काहीतरी आलंय का हे चेक करत असतो. बोकलत,रावल तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज ह्या धाग्याचे झाड सोडा. तुमची खूप चीड येतेय.

एकंदर सगळ्यांचा सूर पाहता मी इथे न लिहिलेलं बरं असं वाटतंय, पण दुसरीकडे मला असं सुद्धा वाटतंय कि काही लोकांना माझ्या कथा आवडतात. त्यामुळे इथले सगळे वाचक बोलले झाड सोडून जा तर मी झाड सोडून नक्की जाईल.

रावल , कथा इंटरेस्टींग आहे.
अशी एक कथा लहान असताना ऐकलेली ती आठवली पुसटशी. त्यातही शेतक-याचे लग्न हडळीशी होते. मुलं होतात. नंतर त्याला साधू कडून कळाल्यावर तो तिचे केस कापून मांडी चिरून त्यात लपवतो. ती लपवलेले केस शोधत राहते. नंतर कसे ते लक्षात नाही पण शेतकरी बोलून जातो कि केस मांडीत लपवलेत. त्याच क्षणी ती त्याला मारून केस घेऊन जाते.
याच गोष्टीचे निराळे व्हर्जन असावे हे.

<<रावल तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज ह्या धाग्याचे झाड सोडा. तुमची खूप चीड येतेय.>> कारण नाही समजले
<<कथा इंटरेस्टींग आहे.>> धन्यवाद @ डागदार अड्डावाला,
हि कथा मी माझ्या आज्जी कडून लहानपणी ऐकली होती. थोडा फार बदलांसह लिहली. साधर्म्र असू शकते
पण वास्तविक भुतांचा अनुभव नाही
कुणी इथे प्लँचेट केलंय का.. मी केले होते मित्राबरोबर पण तो प्रयन्त फसला...
कुणाला अनुभव व त्याची योग्य पद्धत माहित असेल तर कळवावे

मी खूप वर्षांपासून मायबोलीचा चाहता व वाचक आहे. अमानवीय माझा खूपच आवडीचा धागा आहे. इतका की काही तासा तासांनी नवीन काहीतरी आलंय का हे चेक करत असतो. >>>>>११

Lol
विनंती आता गयेवयेमधे रुपांतरीत होऊ लागलिये. भूतकथांपेक्षा 'बोकलत'कथांचा धसका घेतलाय सगळ्यांनी.

@बोकलत : खरचं दुसरा धागा काढा हो प्लिज ! शिर्षक : अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!! असे काहि तरि ठेवुन द्या Happy

मी खूप वर्षांपासून मायबोलीचा चाहता व वाचक आहे. अमानवीय माझा खूपच आवडीचा धागा आहे. इतका की काही तासा तासांनी नवीन काहीतरी आलंय का हे चेक करत असतो. बोकलत,रावल तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज ह्या धाग्याचे झाड सोडा. तुमची खूप चीड येतेय. >> +++ १

मी खूप वर्षांपासून मायबोलीचा चाहता व वाचक आहे. अमानवीय माझा खूपच आवडीचा धागा आहे. इतका की काही तासा तासांनी नवीन काहीतरी आलंय का हे चेक करत असतो. बोकलत,रावल तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज ह्या धाग्याचे झाड सोडा. तुमची खूप चीड येतेय.>>>>> +११११११

हाॅस्टेलला रहायला होते, तेव्हाची घटना आहे. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने गावी गेले होते, परत सोमवारी आल्यावर बातमी कळली की होस्टेल मधल्या काही मुलींनी प्लेंचेट केलं होतं. मग काय त्या रात्री माझ्या सकट अजून सात आठ अतिउत्साही मुलींनी त्यांची खोली गाठली. बर्‍याच उशीरापर्यंत गप्पा रंगल्या व सगळी इत्यंभूत माहिती गोळा झाली. दुसऱ्या दिवशी रात्री प्लेंचेट करायचे ठरले, पण करणार कोणाच्या खोलीत? त्याच्यावरुन वाद सुरू झाले. अगोदर जिच्या खोलीत केलं होतं ती परत स्वतःच्या खोलीत करायला तयार होइना, कारण आता तिला काही विचारायचं नव्हतं, वर लिडर ती होती व प्लेंचेटसाठी लागणार्‍या तीन व्यक्तीपैकी एक होती. काॅमन रुममध्ये, मधेच रेक्टर बाई उगवण्याचा धोका होता, मग अजून तिघींजणी होत्या, त्या तयार झाल्या पण त्या नुसत्या प्रेक्षक म्हणून बसणार होत्या.
प्लेंचेटमध्ये दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार, ठराविक आत्मा बोलावणे. दुसरा प्रकार, त्यात कोणीही येऊ शकते, ठराविकच आत्मा नाही.
आम्ही पंधराजणीं खोलीत जमलो. सुरूवात करण्याआधीच पाच मुली घाबरून आम्ही जातो म्हणून गेल्या. आता आम्ही दहाजणीं होतो. परत एकदा नीट सर्वांना विचारण्यात आले, कारण एकदा सुरुवात झाल्यानंतर पळ काढायला मिळाले नसते. इथे वातावरण निर्मीती वगैरे गरज नसते, जसे की मेणबत्त्या लावणे, किंवा लाईट बंद असायला हवा असे काही नाही. परत टेबल किंवा चार्ट हवा असेही नाही. तिने जमीन (दुसर्‍या मजल्यावरची खोली ) नीट पुसून घेतली. ती वाळल्यावर खडूने अक्षरे व आकडे लिहिले, एक वाटी जमीनीवर उलटी ठेवली, व अजून दोघींना बोट ठेवायला सांगितले, त्यातल्या एकीने माघार घेतली, मी नुसतं बघते म्हणाली. शेवटी ती लिडर मुलगी, मी आणि एक मुलगी अशा तिघी तयार झालो. तिने एक विशिष्ट मंत्र म्हटला,( व इतर तपशील जो मी इथे मुद्दाम देत नाही, तुम्हा वाचकांना तो मोह होऊ नये म्हणून. ) व सुरूवात केली. पाच मिनिटे गेली तरी काहीच झाले नाही. परत पाच मिनिटे गेली, तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आले की भिंतीवर मारुतीचा फोटो आहे, तो काढून कपाटात ठेवला गेला, मग तीने परत प्रयत्न केला व आत्माला आवाहन केले, ( तिला पहिला प्रकार येत नव्हता, ) आम्ही जे काय केले ते दुसर्‍या प्रकारात मोडणारे होते, त्यामुळे जे काही आलं ते कोण आहे ती उत्सुकता आम्हाला जास्त होती, तो एक मुलगा होता, तेरा चवदा वर्षांचा, नावही सांगितले, मृत्यू अपघाती. आमचे जे काही प्रश्न होते त्यांची सर्व उत्तरे त्याने बरोबर दिली, पण शेवटी जेव्हा त्याला जायला सांगितले तर तो जायला तयार नाही . आम्ही खूप प्रयत्न केले, तरी उपयोग नाही, आता मात्र सगळ्या प्रचंड घाबरलो, तेवढ्यात एका मुलीला कपाटातला मारुतीचा फोटो आठवला, तो लावला व परत आत्मा गेल्याची खात्री करुन घेतली, तो गेलाय हे कळून सुद्धा जमीन परत पुसून घेतली व तिथे व भिंतींवर ' जय श्रीराम ' असे लिहिले, पुढे काही त्रास नाही झाला पण सगळ्यांनी ठरवले की हा प्रकार परत कधीच करायचा नाही. प्लेंचेट किंवा तत्सम
प्रकार मुळीच करू नये . जरी उत्तरे बरोबर आली तरी सुद्धा.

अनामिका - मला आजवर कोणीही भेटलेला नाही जो खात्रीशीर सांगू शकतो प्लॅन्टचेत बद्दल ... मला तर हा शुद्ध TP वाटतो. कारण हे जर खरे असते तर मग तपास यंत्रणांच्या कमला काहीच अर्थ उरत नाही ... सरळ आत्मा बोलवा आणि जाणून घ्या बस एकदम सोप्पं ....

भुत्याभाऊ, मी प्लेंचेटबद्ल ऐकून होते, पण नेमकं काय होतं, खरच असं काही असतं का? किंवा हा शुद्ध बनाव आहे, ह्याच्याशी आमचं तेव्हा काहीच देणं घेणं नव्हतं. आम्हाला तेव्हा फक्त कुतूहल होतं की हा प्रकार काय आहे हे बघायचं. अनुभवायचं . मी जेव्हा त्या वाटीवर बोट ठेवलं आणि ज्या वेगाने ती फिरत होती, त्यावर मी शंभर टक्के सांगू शकते की आमच्यापैकी कुणीच ती एवढ्या वेगात अगदी ठरवून सुद्धा फिरवू शकतो नसतो.
एक असू शकतं, ते म्हणजे आम्हा तिघींची मानसिक एकाग्रता. जसा की संमोहनाचा प्रयोग एखाद्या व्यक्ती किंवा प्राण्यावर होतो तसा तो निर्जीव वस्तूवर म्हणजे ती वाटी (एक शक्यता) होतो का? पण मग तो मुलगा त्याची ती उत्तरे, म्हणजे तेपण खरच होतं की? पण कसं? ते मी पण नाही सांगू शकत.

Pages