अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथले किस्से वाचुन भिती वाटायला लागलीये आता, कालचीच गोष्ट, एकटीच मोबाईल मधे टाईमपास करत बसले होते, अचानक भाऊ आला तर दचकले अन घाबरुन अक्षरश: किंचाळले मी.

अनामिका, भलत्याच शुर आहात तुम्ही, मला तर विचारही करवत नाहीये

माझं नाव पण नका घेऊ, नाहीतर अजूनच जमायची. Lol>>

तुमचं नांव शितं आहे का?
नाही ती म्हण आहे ना म्हणून विचारले! Wink Light 1

अनिष्का, किल्ली, उपाय सुचवल्याबद्ल धन्यवाद. शांतीपुजा दोनदोनदा झालेल्या आहेत, नवनाथ पारायण, गुरूचरित्र पारायण ही अनेक वेळा केली. हो पण तात्पुरता फरक पडतो, नाही असे नाही. पण मग हेही नसे थोडके. रामरक्षा पाठ नाही, पण मोबाईलवर लावत जाईन.

अनामिका, ११ वे स्थान हे पत्रिकेतले लाभ स्थान मानले जाते. पण नेपच्युन हा अशुभ ग्रह ( पाप ग्रह) आहे. त्यामुळे त्यावर शनी, राहु वगैरेची नजर असेल तर अशुभ फळे मिळतात. पण हा नेपच्युन तुम्हाला ( जर त्या ११ व्या स्थानावर गुरुची नजर नसेल तर ) मित्र - मैत्रिणींकरवी गोत्यात आणु शकतो, फसवु शकतो. सावध असावे. सगळे वाईट होतेच असे नाही. पण लाभ स्थान हे पैशाबरोबर मित्र मैत्रिणींचे पण मानले गेलेय. ( ज्योतिष्य शास्त्रावर ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी कृपया इथे वाद घालु नये, कारण मी वाद कधीच घालत नाही, त्यामुळे उत्तर पण देऊ शकणार नाही. )

पण गंमत म्हणजे हा नेपच्युन शुभ असेल तर अफाट पैसा पण देतो. मीन राशीत असेल तर चांगली कला देतो, उदा. सतार, जलतरंग वादन, गायन वगैरे.

बाकी हा ज्योतिष्य विषयावर धागा नसल्याने इथेच थांबते. अजून एक, भुत व अतृप्त आत्मे हे राहुचे उद्योग आहेत, नेपच्युनचे नाहीत.

तरी खरच भीती वाटत असेल, तर वर किल्लीने लिहील्याप्रमाणे श्री रामरक्षा, मारुती स्तोत्र, दत्तबावनी वगैरे वाचावे.

अनामिका, त्या पत्रिकेतील नेपच्युन वर जास्त लक्ष देऊ नकोस, कारण बाकी ग्रह पण विचारात घ्यावे लागतात.

बोटात गौमेद ची अंगठी घातली तर या गोष्टींपासून रक्षण होते असे ऐकले आहे. तसेच असे कही झाले तर कापूर आरती घ्यावी असे पण ऐकले आहे.

माझी हॉस्टेलमधली रूममेट मूळची अकोल्याची होती. तिचे भूतिया अनुभव भन्नाट आहेत.
तर तिचे आजोबा तिच्या जन्माआधीच वारले होते. तरी ती म्हणे बाळ असताना तिला विचारले की, " तुझे नानू कुठे आहेत ?" तर एका विविक्षित जागेकडे बोट दाखवून हसायची.

अकोल्याला तिचे कुटुंब एका बंगल्यात भाड्याने रहात असे. तिथे त्यांना काही विलक्षण अनुभव आले. एका रात्री तिचे वडील झोपले असता त्यांना छातीवर दाब जाणवला आणि ते जागे झाले. त्यांना दिसले की एक स्त्री त्यांंच्या छातीवर बसून हिंस्त्र नजरेने त्यांना पहात आहे. त्यांची भीतीने अक्षरशः दातखिळ बसली होती.

पुढे एकदा ती स्वतः मध्यरात्री अचानक जागी झाली. तर बेडरूमच्या दारात एक स्त्री, पुरूष आणि लहान मुलगा अश्या तीन व्यक्ती उभ्या होत्या. बराच वेळ ते तिथे होते. अखेर तिने सगळे बळ एकवटून आईला हाक मारली. तेव्हा ते तिघे पाठ फिरवून निघून गेले. असा अनुभव तिला पुन्हा एकदा आला. तेव्हा मात्र त्यांनी एका माहितगाराला विचारण्याचा निर्णय घेतला.
तिची आई त्या व्यक्तीकडे जाताच काही कथन करण्यापूर्वीच ते म्हणाले," लवकरात लवकर ती जागा सोडा. तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला जबरदस्त धोका संभवतो." त्यांंनी दिलेली कसलीशी उदी घेऊन आई लगबगीने घरी परतल्या. संध्याकाळची वेळ होती. दार उघडून त्या आत आल्या तर समोर देव्हाऱ्यात एक स्त्री चक्क देव मांडीवर घेऊन बसली होती. ती छद्मी नजरेने पाहात हसत होती.
पुढच्या काही दिवसात ते संपूर्ण कुटुंब तिच्या वडीलांच्या कंपनी क्वार्टरमध्ये शिफ्ट झाले. सामान सुद्धा जुजबी घेतले होते. लगेचच दसरा होता , त्या दिवशी दहाबारा मित्र आणि नातेवाईकांना बोलावून पटापट सामान हलवले. नेमके क्वार्टरवर पोचल्यावर संध्याकाळी तीच्या आईला वाटले की आज दसरा आहे तर बंगल्यावर जावून दिवा लावावा आणि येताना त्यांंची स्कूटर तिथे राहिली होती तेवढी आणावी. त्या दोघी बंगल्यावर गेल्या. मैत्रीण मागील बाजूला स्कूटर काढायला गेली आणि आई आत गेल्या. त्या आत जाताच, घरात कुठेतरी नळ चालू झाल्याचा आवाज आला. त्या पहायला गेल्या तर कीचनचा नळ चालू. बंद करताहेत तोवर बाथरूमचा, मग टॉयलेटचा असे एकामागून एक नळ चालू होऊ लागले. घराच्या खिडक्या जोरात उघडू लागल्या. त्या बिचार्या दिवा न लावताच घाबरून बाहेर आल्या.

पुढे कळले की त्या बंगल्यात तिथले मूळ मालक , एक आजीआजोबा होते ,ते शिफ्ट झाले. त्या आजी महीन्याभरात वारल्या म्हणे. तर या घरमालकांची मुलगी मैत्रीणीच्या आईला रस्त्यात एकदा भेटली. ती आणि तिचे यजमान आई वारल्यानंतर काही दिवस सोबतीला म्हणून वडिलांच्या सोबत थांबले होते. त्या दोघांना वारंवार ,आजोबांच्या खोलीतून बोलण्याचा आवाज ऐकू येत असे. अखेर एका रात्री, ते दोघे काय प्रकार आहे ते पहायला उठले. तिथे ते आजोबा चक्क दिवंगत आजींसोबत बोलत बसले होते. त्या आजी पलंगावर पाठमोर्या बसल्या होत्या. ते पाहून दोघांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी त्यांनी वडीलांसकट तेथून मुक्काम हलवला. ते आजोबा लहान मुलासारखे तिथेच रहण्याचा हट्ट करीत होते.

त्यांना कळलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी ती भूत मंडळी ,सात ची साखळी करण्याचा प्रयत्न करीत होती.असा काही प्रकार असतो म्हणे.ख खो दे जा.

आमच्या हॉस्टेलमध्ये बंक बेड होते. ही मैत्रीण माझ्या वरच्या बेडवर झोपत असे. एके रात्री मला कसलीतरी भुकटी वरून पडलेली दिसली, मी पहायला उठले. तर बाईसाहेब कसलीतरी उदी अंथरूणाच्या कडेने टाकत होत्या. मी विचारले तेव्हा तिने वरील सगळी स्टोरी सांगितली. ती कोण बाई होती , ती काल तिच्या स्वप्नात आली बर्याच वर्षांनी. सकाळी तिच्या आईचा फोन आला,की त्यांच्याही स्वप्नात ती आली. ती म्हणत होती ," मी तुला घेऊन जाईन."

मग हॉस्टेल लाइफ सुखरुप पार पडले. मी मुंबईत परतले. तीन वर्षांनी एकदा रात्री मैत्रीणीचा फोन आला. ती खूप रडत होती. तिच्या आईला मूत्रपिंडाचा कँसर डिटेक्ट झाला. पुढचे सहा महीने फार त्रास झाला काकूंना. गेल्या त्या. अर्थात याचा त्या भूतमंडळीशी संबंध असावा की नाही हे माहिती नाही. माझी अजून तरी विचारण्याची हिंमत झाली नाही.

@अनामिका - तुम्ही लिहीत राहा बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष नका देऊ. मी देखील असाच माणूस दिसण्याचा अनुभव घेतला आहे आणि तो इथे टाकला पण होता .. भीती नाही वाटली त्याची कधी पण उसुक्ता होती तो कोण आहे याची. तो तिथे दिसायचा त्या खोलीत मी झोपलोय कितीदा.

अनामिका ताई, तुमची चेष्टा करत नव्हतो मी. पण तुम्हाला खरोखरच खूपच अनुभव आलेत. तुमच्या डेअरींगला सलाम..!

विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही. माझा अजून एक अनुभव लिहीतो. (हा अनुभव मी मिपावर लिहीला होता).

माझ्या आई वडिलांबाबत थोडे फार असे झाले. वडिल गेल्यावर १५ दिवसांत आई गेली. जायच्या आधी आई दोन दिवस ग्लानीतच होती. त्यावेळी मला म्हणायची की तुझे बाबा आहेत येथे..तसेच दादा (म्हणजे आईचे वडिल) पण आहेत..त्यावेळी वाटत होते की तापातच बोलत असेल..
आधी माझ्या आईला खुप स्वप्ने पडायची. दर महिन्या दोन महिन्यातून कोणतरी गेलेली व्यक्ती तिच्या स्वप्नात येऊन काहीतरी सांगायची..त्यामुळे मला आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिचे असे सांगणे म्हणजे नेहमीचाच प्रकार वाटला होता.

माझ्या बाबांची आई माझे बाबा लहान असतानाच गेली. पण ती मात्र माझ्या आईच्या स्वप्नात यायची. माझ्या आईने तिचा (म्हणजे तिच्या सासूचा) फोटो पण पाहिला नव्हता पण त्या कश्या दिसतात हे सर्वांना सांगितले होते. आणि ज्यांनी बाबांच्या आईला पाहीले होते ते सर्वजण हे बरोबर आहे असे सांगत. असे बरेच गेलेले नातेवाईक आईच्या स्वप्नात यायचे आणि बरेच काही सांगायचे. जसा जसा मी मोठा झालो, तसे मला आईचे ते स्वप्नांबद्दल सांगणे या गोष्टी म्हणजे तिच्या मनाचे खेळच वाटायचे. . म्हणूनच आईच्या शेवटच्या दिवसात यावर विश्वास बसला नव्हता. पण आज इथे काही लोकांचे अनुभव वाचून असे वाटते की त्यात निश्चित काही सत्यता असावी. म्रुत्यू जवळ असेल तर आपलेच आधी गेलेले नातेवाईक बरोबर न्यायला खरोखर येत असावेत. असे कोठेतरी वाचले की गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे. किंवा ती व्यक्ती हे मानायला तयार नसते की आपले निधन झाले आहे...त्यामुळे त्याला समजावयाला त्याचे जवळचे आधी गेलेले मित्र, नातेवाईक त्याला येऊन भेटत असावेत.

हो, आलेले अनुभव मी लिहीत राहीन भुत्याभाऊ, तुमच्या सपोर्ट बद्दल धन्यवाद. डॉ. मनाली तुमच्या मैत्रिणीचा अनुभवही अंगावर शहारा आणणारा आहे. राजू 76 तुम्ही सुचवलेले विचारात घेण्यासारखे आहे, पण खूप जिकीरीचे काम आहे. एकतर बंगला बराच जुना आहे व आता पर्यंत अनेक मालक बदललेले आहेत. सर्वात आधीचे मालक आता हयात असतील का? ही सुद्धा शंका आहे. आमचे नातेवाईक बहुतेक सातवे मालक असावेत. माझ्या माहिती प्रमाणे.

हो ही शक्यता वाटते योगी, मी पण हे असं ऐकलंय, आमच्या ओळखीच्या एक काकू गेल्या, आजारी होत्या, त्या जायच्या चार दिवस आधीपासून काकांना सांगायच्या मला घ्यायला लोकं आलेत, रथ बाहेर ऊभा आहे, मला बोलावतात , चार दिवसांनी त्या गेल्या. तुमच्या आईबाबांबद्ल ऐकून खूप वाईट वाटले. आईवडिलांचे छत्र हरवणे हे खूप वाईट आहे.

अनामिका, तुमचे अनुभव एकदम भयानकच आहेत. सर्वसाधारण म्हणजे माझ्यासारखा माणूस तर पहिल्या एक-दोन वेळेतच हार्टअॅटॅकने जाईल. पण इतके भयानक अनुभव येऊनसुद्धा त्याच वास्तुत राहणे थोडे जास्तच नाही का? अजून किती मोठा अनुभव यायची वाट बघायची?

आमच्या बिल्डिंगमधील काकू बुधरानीला अ‍ॅड्मीट होत्या कॅन्सर ट्रिटमेंट साठी. लास्ट्स्टेज होती. खुप अशक्त झालेल्या कि बोलताही येत नव्हते.
एका संध्याकाळी त्यांनी काकांकडून पेन अन कागद घेतला. मोठ्या कष्टाने “ उद्या १ नाही “ अस लिहिलं.

दुसर्‍या दिवशी साधारण दुपारी १ च्या आसपास त्या जग सोडून गेल्या.
नंतर तो कागद काकांनी आम्हाला दाखवला होता

@ बोकलत...>>>>>आजूबाजूची 7-8 माणसं काठ्या वैगरे घेऊन गेली , बघताहेत तर हा फोनवर बोलतोय, नशीब भूत समजून नाय मारला नायतर खरोखरचा भूत झाला असता.>>>>भुताला काठीने लागते ...कोण शहाणे होते ते Rofl

कच्चा लिंबू, अजिबात टेंशन घेऊ नका, अगदी टकल्या भूतबाईंचे सुद्धा किस्से आहेत, पण मी अनुभवलेले नाहीत, ऐकीव आहेत. लिहीनच पुढे केव्हा तरी सविस्तरपणे.

भुताला काठीने लागते ...कोण शहाणे होते ते Rofl>>>>मुलगी भूत पाहिलं सांगत अली तेव्हा लोकांना वाटलं चोर वैगरे असेल म्हणून काठ्या घेऊन गेली लोकं .

आता लिहितेय ती घटना आठ वर्षांपूर्वी घडली. माझं एक काम अडलं होतं. माझ्या दृष्टीने मी सर्व प्रयत्न केले होते, तरीही घोडं अडलेलं होतं. मी एकदा एका मैत्रिणीला म्हटलं की असंअसं एक काम अडलय, माझे सगळे प्रामाणिक प्रयत्न करून झालेत तरीही काही होत नाही. तिने बराच विचार केला व शेवटी म्हणाली की मी येत्या शनिवारी तुला एका ठिकाणी नेते, तिथे एक व्यक्ती सांगते वगैरे. मी म्हटलं तुला त्यांचा अनुभव आहे का? कधी गेली आहेस का तिथे? तर म्हणाली नाही, पण आपल्या अमुक तमुक ना खूप अनुभव आलेत. म्हटलं बरं, ट्राय करायला काय हरकत आहे? ती म्हणाली की तुझे काय प्रश्न असतील ते नीट तयार कर किंवा लिहून घे. तिथे गेल्यावर गोची नको, म्हटलं पैशांचं काय, किती घेतात? तर हीचं आपलं तिथे गेल्यावर बघू. अशा ठिकाणी मीही पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे मीही खूप एक्साईट होते. शनिवारी तिने आणलेल्या पत्यावर शोधत गेलो. बाहेर व्हरांड्यात आमच्या आधी दोन माणसे होती. आमचा तिसरा नंबर लागला, आमच्या मागे अजून चारपाच माणसे आली. चांगला दीड तासंनी आमचा नंबर आला. आम्ही दोघीही आत गेलो. आतली व्यक्ती अतिशय किडकिडीत मध्यम वयाची, पंचा गुंडाळलेली होती. ते म्हणाले कोणाचा प्रश्न आहे? मैत्रिणीने सांगितले हिचा. मला वाटतं तिला बाहेर थांबायला सांगतात की काय? पण तसे काही झाले नाही. त्यंनी मला आपल्या समोरच्या पाटावर बसायला लावले, मैत्रीण बाजूला चटईवर. त्यांनी आधीच्या दोन अगरबत्त्या लावल्या होत्या त्या काढल्या, विझवून दोन नवीन लावल्या. त्यांची काहितरी पद्धत असावी , नवीन क्लायंट नवीन अगरबत्त्या. पण काही केल्या त्या अगरबत्त्या नीट पेटेनात, दोन तीनदा तरी पेटलेल्या विझल्या. आत वारा नव्हता तसा व फॅनही बंद होता, मागची पूर्ण भिंत देवादिकांच्या फोटोंनी भरलेली होती. व त्यांवर निरनिराळी फुले खोचलेली होती, माझं आपलं प्रश्न आधी कुठला विचारावा हे मनात घोळवत, भिंतीवरच्या फोटोंचे निरीक्षण सुरू होते, तेवढ्यात एक दोन नव्हे तर अगदी सात आठ फोटोंवरची फुले एकदम टपाटप खाली पडली, एकतर अगरबत्त्या पेटेनात व आता फुले पडल्याने बहुतेक तेच घाबरले असावेत, त्यांनी जवळ जवळ आम्हा दोघींना हाकलूनच लावले. बाहेर आल्यावर आम्ही दोघी एकमेकींना टाळ्या देउन खूप हसलो. ही घटना आम्हाला नाही पण त्यांना अमानवीय वाटली असावी.

Pages