अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय योगायोग आहे आर्या, मी आत्ताच पहिल्या 'अमानवीय' वर तुमच्याच भाची बद्दल वाचत होते, आता बरी झाली का ती?

<<<काय योगायोग आहे आर्या, मी आत्ताच पहिल्या 'अमानवीय' वर तुमच्याच भाची बद्दल वाचत होते, आता बरी झाली का ती?<<< इथेही योगायोग.. क्या बात अनामिका! Happy
हो हो, आता एकदम बरी आहे. दोन वर्षापुर्वी तिच्या आवडीच्या मुलाशी .. घरच्यान्ना सगळी कल्पना देउन,लग्नही झाले. समाजात अर्थातच या प्रकाराची कानोकानी खबर झाल्याने मिळत नव्हते.
आणि आता तिला छानशी मुलगी ही आहे... ४ महिन्याची.

, त्या बायका ओरडत, किंचाळत केस मोकळे सोडुन सैरावैरा पळत असतात. आणी ए दत्त्या सोड की मला , दत्त्या सोड म्हणून हंगामा करतात असे ऐकले आहे >>> हे मी पाहिलंय

गाणगापूरात संगम इथे तर असल्या लोकांसाठी रहायची सोय आहे, ज्यांना अशी बाधा होते ते लोक तिथे सेवा करायला राहतात, रोज संगमावर स्नान करून मग दत्त दर्शन घेतात.

माझ्या घरचे दत्तभक्ती करतात, त्यांच्यामुळे मलाही वर्षांतून ३-४ वेळा गाणगापूर ला जावे लागते. आधी मलाही वाटायचं की तिथे ढोंगीपणा जास्त आहे. पण एकदा असेच रात्रीचे नगारे वाजताना एका कुटुंबाची ओळख झाली, नवरा mnc त कामाला तर बायको प्रेस मध्ये. ती बाई अगदी नीट वागत होती. पण नगारे वाजताच ती पण घुमू लागली, खांबावर चढू लागली,

अजमेर दर्ग्याच्या इथे पाहिलेलं ... वर्ष बहुदा २०११-१२ ...

अचानक एक हॅंडसम मुलगा जोरजोरात ओरडू लागला. डोकं दाबून धरू लागला. आणि 'सोड रे, जातो रे, आजच जातो रे माझ्या ठिकाणी' असं म्हणून ओरडू लागला. अचानक जोरात ओरडला, ' जातो ना रे.... तुझे घोडे नको नाचवू अंगावर, दुखतंय रे...'
दुसरी बाई पाया पडली, ती ही डोकं धरून बाहेर गेली. बाहेर जाऊन ओरडू लागली, 'सोड रे दादा, जाते रे दादा' आणि कण्हू लागली.

एका बाईचा आवाज येत होता, पण मी आत असल्यानी तीला पाहिले नाही. ती म्हणत होती, 'मी नाही जाणार, माझी मुलं....' आणि रडू लागली. परत जरा वेळानी ती म्हणू लागली, 'मारू नको रे बाबाजी, माझी मुल.... ऐकून त घे बाबाजी माझं....' असं म्हणून बराच वेळ रडत रडत काय तरी मुलांबद्दल सांगत राहीली. मी दर्शन घेऊन बाहेर आलो तर ती अजून रडतच होती. या लोकांना कोणी हात पण लावत नव्हतं. त्यांचे तेच रडत, ओरडत होते.

नक्की काय होतं कळलं नाही

( सूचना: लेखक बोकलत आहे त्यामुळे बोकलत हेटर्सनी इथेच थांबावे, नंतर वैयक्तिक हल्ले चढवून धागा भरकटवू नये ही नम्र विनंती.)
ही घटना माझ्यासोबत १० वर्षांपूर्वी घडली होती. तर त्यावेळी गणपती सणाला मी गावी गेलो होतो. आदल्या रात्री साधारण गावी पोहचायला मला रात्रीचे दोन वाजले. गावामध्ये मंदिरासमोर माझे दोन मित्र सणाची तयारी करत होते. त्या दोघांना पाहून जरा आश्चर्य वाटलं कारण त्या दोघांव्यतिरिक्त तिथे कोणीच न्हवतं. मला पाहताच ते आनंदाने खुश झाले, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, दहा एक मिनिटानंतर मी जायला निघणार इतक्यात माझ्या हातातून रुमाल खाली पडला. तो उचलायला वाकलो आणि या दोघांच्या पायाकडे पाहतोय तर चक्क उलटे, माझी पाचावर धारण बसली. हे आपले मित्र नसून माळरानावरचे भयानक पिशाच्च आहेत हे मला कळून चुकलं. अंगाला दरदरून घाम सुटला. मी पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच मला त्या दोघांनी पकडलं आणि स्मशानात घेऊन गेले. तिथे मला एका खांबाला बांधला आणि विचित्र आवाजात ओरडले. त्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातली सगळी भुतं पळत पळत स्मशानात अली, कोणी झाडावरून आला, कोणी कालव्यातून, कोणी नदीतून तर कोणी आजूबाजूंच्या शेतातून. मग सगळ्यांचा जल्लोष सुरु झाला,ते सगळे तुझा झगा ग या गाण्यावर नाचायला लागले, थोड्याच वेळानी वेताळाची पालखी निघाली. गाव शांत झोपलं होतं आणि मी त्या भुतांच्या तावडीत सापडलो होतो. माझं मरण मला दिसू लागलं होतं. इतक्यात माझे बांधलेले हात कोणीतरी सोडायला लागलं मागे वळून पाहतोय तर काय ती एक जखीण होती, मला पाहताच माझ्या प्रेमात पडली होती. सगळे नाच गाण्यात मग्न असताना तिने मला हळूच त्या भुतांच्या जत्रेतून सही सलामत बाहेर काढलं, भुतांना समजताच ते आमचा पाठलाग करू लागले पण तेव्हा खूप उशीर झाला होता. आम्ही त्यांच्या हद्दीतून लांब आलो होतो. ती खरंच खूप सुंदर होती. मला घरी सोडताना तिचे डोळे पाणावले मलाही खूप वाईट वाटलं, कुठेतरी माझं पण हृदय मी तिला देऊन बसलो होतो. ती मला बोलली आता मी परत गेले तर ती भुतं मला जगवतील.मी इथेच बाजूच्या वादाच्या झाडावर राहते. मी आनंदाने होकार दिला. आजपण गावी गेलो की आम्ही दोघे रात्री भेटतो आणि मस्त मनमोकळेपणाने गप्पा मारतो. लवकरच विवाहबंधनात अडकण्याचा आमचा विचार आहे.

मस्त किस्सा बोकलत.

इथे असे किस्सेच टाकावेत. उगाच उपाय म्हणून मंत्रतंत्र, बुवाबाजी, जपजाप्य असा फालतूपणा कोणी चालू केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम राबवण्यात येईल.
हुकुमावरून

बोकलत पोस्टीच्या डोक्यावर बोकलत ने लिहिलेली आहे असा डिस्क्लेमर लिहायचा राहिला ना.

सगळे तुझा झगा ग या गाण्यावर नाचायला लागले>>> Rofl
तुम्ही झगा घातला होतात Uhoh

बोकलत पोस्टीच्या डोक्यावर बोकलत ने लिहिलेली आहे असा डिस्क्लेमर लिहायचा राहिला ना.>>>>>टाकला, विसरूनच गेलो होतो. नशीब आठवण केलीत नायतर परत भरकटला असता धागा. Lol

the grudge हा चित्रपट पहा नक्की ... मला आजवरचा सर्वात भीतीदायक वाटलेला चित्रपट. >>>>> ती फिल्म पाहीली कि टि व्ही मधुन पाणी, भुत येते तो का?
हिरवनीला मुलगा तिच्या नावाने हाक मारत असतो तो का ?

तो मला डेन्जर वाटलेला.... ग्रज पण पाहीलाय नक्कीच एका मित्राच्या सांगण्यावरून पण आता आठवत नाही

Rofl @ बोकलत...तुमचे विनोदी लेखन पण अमानवीय असते

लेखक बोकलत आहे>>
हे 'लेखक कोकलत आहे' सारख वाटतय.., वाक्यरचना बदलायला हवी..

हे 'लेखक कोकलत आहे' सारख वाटतय.., वाक्यरचना बदलायला हवी..>>>>>ते सगळं जाऊ द्या पहिलं सांगा माझी कथा कशी वाटली? आहे कि नई जीवाचा थरकाप उडवणारी? अहो तुम्हाला सांगतो गावी सगळे माझी वाट पाहत खोळंबलेले असतात. कधी एकदा साहसी बोकलत येतोय आणि आम्हाला सत्य आणि जीवाचा थरकाप उडवणाऱ्या भयकथा सांगतोय. जेव्हा मी गावी जातो तेव्हा लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे लवकर जेवण उरकून आमच्या अंगणात जमतात. पहिल्या रांगेत कोण बसणार यावरून लोकांची जुंपते. जेव्हा मी गोष्ट सांगायला सुरवात करतो तेव्हा तर विचारूच नका. अहो लोकांना इतकी हुडहुडी भरते कि मे महिन्यात लोकं गोधडी आणि स्वेटर घालून बसलेले असतात. लहान मुलं भीतीने रडत किंचाळत असतात. काहींना तर भोवळच येते. तसंच काही कमी जास्त झालं तर दोन तीन डॉक्टर आणि रुग्णवाहिका बाहेर उभ्या असतात. आता बोला. आणि तुम्हाला सांगतो दर पौर्णिमा अमावसेला ' लेखक आहे बोकलत, ऐका बिना कोकलत' अशी स्पर्धा आमच्या गावात भरवली जाते. जो माणूस हे आव्हान स्वीकारतो त्याला एका काळोख्या खोलीत एकटं ठेवलं जातं आणि माझ्या कथा ऐकवल्या जातात. जर कथा संपेपर्यंत तो त्या खोलीत राहिला तर त्याला ५५५ रुपयांचं बक्षीस आणि माझ्या कथा ऐकण्यासाठी पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळतो. आतापर्यंत एकही माणूस हे अवघड आव्हान झेलू नाही शकला. एक जरा जास्तच आगाऊपणा करत होता. अंधाऱ्या खोलीत गेल्यावर माझी कथा सुरु झाली आणि अक्षरशः पाच मिनिटात त्याची बोबडी वळली, बाहेर काढा म्हणून दरवाज्याला नुसत्या धडका देत होता पण बोललो राहूदे आतच जिरू दे चांगली. शेवटी बिचारा माळ्यावर चढून कौलं वगैरे तोडून कसाबसा बाहेर पडला, काय बोलताय नि काय नाय. असं सगळं आहे. जसा वेळ मिळेल तसं इथे लिहीत राहीनच.

लेखक आहे बोकलत, ऐका बिना कोकलत ......खूप हसले !अरेरे बोकलत ! तुम्ही तर भुताटकीच्या सिरीयस धाग्याला कॉमेडीच बनवून टाकलं कि हो ......

माझ्या आज्जीने सांगितलेली कथा ..थोड्याफार बदलांसह
आटपाट गाव होत. त्या गावात एक शेतकरी राहत होता. एक दिवस तो शेजारच्या गावातून आपल्या गावी रात्री चालला होता.
पहिला दळण वळणांची सोयी फारश्या नव्हत्या म्हणून पायीच चालला होता. मध्ये एक जंगल लागत होत. जंगलातून जाताना त्याला कोणातरी बाईचा रडण्याचा
आवाज ऐकू आला. पाहतो तो काय एक सुंदर बाई एका झाडाखाली रडत बसली होती. त्याने तिला विचारले कि तू कोण आहेस व इथे का रडत बसली आहेस
ती म्हणाली माझ्या नवऱ्याने मला टाकली आहे मला या जंगलात सोडून तो निघून गेला. मी काय करू आता.. मला आता जीव देण्याशिवाय पर्याय नाही.
तो शेतकरी म्हणाला, हे बघ मलाही या जगात कोणी नाही व माझे लग्नहि नाही झाले तर तू माझ्या बरोबर येशील का, मी तुला नांदवीनं.
ती बाई तयार झाली व तेंव्हापासून ते एकत्र राहू लागले.
तिचा पायगुण चांगला होता, तिच्या येण्याने त्या शेतकऱ्याच्या शेतात हि उत्तम पीक आले, फायदा झाला. पैसा अडका खेळू लागला. एका वर्षात २ मुले हि झाली त्यांना. ती बाई हि खूप कष्ट करायची. सकाळी लवकर उठून नदीवरून पाणी आणायची,घराची सर्व कामे न थकता करायची.
एक दिवस त्या गावात एक पिंगला आला. पहाटे थंडीचं तो एका लोहाराच्या भात्याजवळ शेकत बसला होता. त्याने पहिले कि एक अंत्यंत सुंदर स्त्री
नदीवर पाणी आणायला जात आहे, त्याने लोहाराला विचारले हि कोण आहे . लोहार म्हणाला हि बाळू शेतकऱ्याची बायको आहे. तो पिंगळा म्हणाला माझे एक काम कर, त्या बाळू ला सांग मी बोलावलंय म्हणून आणि एकटाच ये भेटायला.
लोहाराचा निरोप मिळताच बाळू आला व हात जोडून पिगळ्याला म्हणाला, महाराज का बोलावंण केलंत?
सकाळी नदीवर पाणी भरायला जाते ती तुझी बायको का ? - पिंगळाने विचारले
होय ती माझी बायको - इती बाळू.
ती कोणाची कोण सांग जरा - पिंगळा
मग बाळूने सर्व हकीकत सांगितली.
पिंगला म्हणाला , आता मी जे सांगत आहे ते तुला काळजावर दगड ठेवून ऐकावं लागेल.
तुझी बायको साधारण स्त्री नसून भूत आहे. व तिचा येथील वास्तव्य संपत आल आहे आणि ती जाताना एकटी नाही जाणार तर जे जे तुला मिळालं आहे
ते सर्व घेऊन जाणार आहे.
बाळू म्हणाला, काहीही सांगू नका महाराज माझी बायको भूत काही असेल, अहो गेली एक वर्ष आम्ही सुखाने संसार करत आहोत
आम्हाला २ मुले आहेत, आता कुठे माझी परिस्थिती सुधारली आहे,सर्व नीट चाललं आहे तिच्या पायगुणाने आणि तुम्ही तिलाच दोष देत आहात
अरे तुझ्या शेतात कधी एवढा माल पिकाला होता का ? कधी एवढा पैसा मिळाला होता का? ती न थकता एवढ काम कसे करते ?
तिचे वास्तव्य आता संपत आले आहे आणि ती जाताना तिने जे धन दौलत दिली ते सर्व घेऊन जाईलच शिवाय मुलांना पण घेऊन जाईल
तरी तुझा विश्वास नसेल तर तुझी मर्जी..तुझं नशीब चांगलं कि मी या गावात आलो..
बाळू तेथून निघाला पण मनातून पिंगळ्यांचे बोलणे काही जाईना.. खरंच आपली बायको भूत आहे का.. आपली जी भरभराट झाली त्याला आपण
तिचा पायगुण समजला...पण जाताना ती हे सर्व घेऊन जाईल का..धन दौलत जाऊदे पण आपली मुलं ?... बाळूला रात्री झोप लागत नव्हती तो सारखं बायको कडे पाहायचा.. ती आपली कामात मग्न असायची.. बाळू तोंडावर चादर घेऊन झोपला होता पण हळूच तो चोरून बायको कडे संशयाने पाहायचा
त्याची बायको चुकलीवर काहीतरी बनवत होती.. अचानक चुलीतील थोडा विस्तव चुलीच्या बाहेर आला.. त्याच्या बायकोने हळूच इकडेतिकडे पहिले व हाताने तो लाललाल निखारा अलगत उचलून परत चुलीत टाकला...तसे चादरी खालून पाहणाऱ्या बाळूला घाम फुटला.... (क्रमशः)

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिसादांमुळे माझी लेखणी चैतन्याने स्फुरण पावली असून, लवकरच माझ्याकडे असलेल्या कधीही न संपणाऱ्या सुरस, चमत्कारिक, थरकाप उडवणाऱ्या सत्य घटनांचा खजाना तुमच्यासमोर उलगडण्याचा माझा मानस आहे. तुमच्या सगळ्यांची अशीच साथ मिळाली तर कार्य नक्कीच सिद्धीस जाईल यात शंका नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

Pages