अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनामि का, टोमणा म्हणून लिहित नाहिये, तुम चा अनु भवही नाकारत नाहिये.
पण खरच शक्तीबाहेरच काही असेल तर त्रास हो ऊ नये ह्या कळकळीपोटी लिहिल.

आसा, अशा घटना घड तात. लोक त्या नकारतात, अतिश योक्ती म्हणतात, मानसिक विकार वगैरे म्हणतात - म्हणून त्या मोकळेपणाने शेअर केल्या जात नाहित.
सध्याच्या प्रस्थापित भूमिकेच्या विरोधात कशाला जायच हा विचार नकळत केला जातो.
आनामिका, प्लीज मा झ्य॒ पोस्ट चा वेगळा अर्थ घेऊ नका. वर आदितीने म्हटल्याप्रमाणे ह्यात अडकायला नको कुणीच असे वाटते.

<<<अनिष्का, मृत्यू जवळ आल्यावर जवळचे मृत लोक न्यायला येतात म्हणतात.
आमच्या नात्यातल्या एक आजीही असेच गेले ल्या मुलान्ची नावे घेऊन तो मला बोलवतोय म्हणायच्या काही दिवस आधी पासून.<<
हो, हे आम्ही अनुभवलय... आमच्या बाबान्च्या वेळी. जायच्या आधी साधारण ६ महिने ते अचानक झोपेतुन जागे होउन म्हणाय्चे की कोणीतरी मला उठवत.. जागे करतय, हात लावुन/ हलवुन. शेवटी शेवटी हॉस्पिटलच्या रुममधे भिन्तीकडे आमची मृत आज्जी, काका दिसायचे.. बोलवायचे.

नानबा, मी अमानविय शक्तींच अस्तित्व नाकारत नाही. माझ्या आईला आलेले अनुभव ऐकले आहेत , जवळच्या मित्राला आय टी कंपनीत आलेला अनुभव, गावाकडे दोन जणांना आलेले अनुभव या धाग्यावर शेअर पण केले आहेत.

या धाग्यावर जरा गदारोळ झाल्यानंतर ३ दिवस १९ तासांपूर्वी जन्मलेल्या आयडी ला येणार्‍या अनुभवांवरील पोस्टवर जरा संशय आहे Wink

बापरे... अनामिका मानल ब्वा तुम्हाला..
काळजी घ्या.. नको तिथे डेरिंग न केलेले बरे अस मला वाटत.. आहे त ड्यांजर आहे.. आणि त्यातलं सातत्य पाहता तुम्ही लवकर काही उपाय करावे असं सुद्धा वाटत..

माझासुद्धा एक अस्सल अनुभव आहे. सख्ख्या मावशीचा. याची देही याची डोळा पाहिलेला पण तो इथे शेअर करेल अस वाटत नाही इथली पब्लिक पाहता. परत तेच.. हरेकाला हरेक गोष्टी जज करायचा पूर्ण अधिकार आहे पण सोशल फोरम वर लिहून कशाला आपल्या पर्सनल गोष्टींच आयतं कोलित द्यायच त्यापेक्षा नकोच..

माझ्या घरी मोहरमची सवारी बसते. त्यांचे देवही येतात घरातल्या एक दोन लोकांच्या अंगात. मी देवभक्त नाही खुप आणि खुप अंधश्रद्धाळू सुद्धा नाही. डोळे झाकुन एखाद्याच्या बोलण्यावर विश्वासही ठेवत नाही ना कधी समोरच्याच्या विश्वासाची खिल्ली उडवत. पण मोहरम साजरा करताना डोळ्यासमोर जे काही घडत त्याची कारणमिमांसा मला अजुनही देता येणार नाही. बरेच देवाधिक, बुवा वगैरे पाहिले पण मोहरमाचे काही अनुभव अशक्य आहेत...दुसर्‍या मितीतले वाटावे एवढे अशक्य.. त्यामुळे ज्याचा त्याच्या अनुभवावर ज्याने त्याने श्रद्धा ठेवावी. बस एखाद्याला प्रचिती येण्यापूर्वी ते तसच कर म्हणुन कोणी भरीस पाडू नये हे माझं मत. Happy

या धाग्यावर जरा गदारोळ झाल्यानंतर ३ दिवस १९ तासांपूर्वी जन्मलेल्या आयडी ला येणार्‍या अनुभवांवरील पोस्टवर जरा संशय आहे Wink>> आसा अहो बरेच जण रोमात वाचतात माबो. एखादा धागा मग सदस्यत्व घ्यायला मजबुर करतो जेणेकरुन जवळच काही आपण पन शेअर करु शकु म्हणुन... बाकी मी पन अनामिकांचे काही अनुभव वाचल्यावर पहिले सदस्यत्व आणि कालावधी पाहुन आले होते हे ही खरय Biggrin

Baap re हे नातेवाईक न्यायला येतात हे खतरनाक च आहे...
मला अजूनपर्यंत जितके ( जे काही 2 ते 4 ) आलेत ते सर्व माझे बाबा गेल्यानंतर च. तस बघायला गेलं तर माझं आणि बाबांचं नातं फार जवळीकीच नव्हतं. मी सावरले ही लवकर च त्यातून. पण तरी मला ते गेल्यानंतर काही महिने ते कामावरून आल्यावर त्यांच्या शरीराचा गंध यायचा....
नळ आपोआप चालू होणे, लाईट बंद चालू होणे अगदी बटणा सहित हे प्रकार काही महिने घडले.
त्यांचा अपमृत्यु होता , मे बी त्यांना काही सांगायचं असेल असं सर्व म्हणायचे. पण मला ते केव्हा च पटलं नाही.
नळ अचानक चालू होणे याला कारण नळाचा वाईसर बिघडलेला असू शकतो किंवा जास्त कमी लाईट फ्लक्चुएशन मुळे लाईट बंद चालू होते अशी कारणं मी द्यायचे.

कारण हे असं काही असेल हे मला घरात पसरू द्यायचं नव्हतं.
मात्र एकदा मी खरंच घाबरले ते म्हणजे मी ऑफिस ला जाण्याआधी माझी बॅग भरून ठेवली. अगदी टिफिन, पाण्याची बाटली वगैरे खूप गोष्टी ( नॉर्मली सर्वांच्या पर्सेस मध्ये असतात )भरल्या. आणि मी भांडी घासायला गेले. इतक्यात मला काही पडल्याचा आवाज झाला म्हणून पाहायला गेले. तर बॅग बेड च्या एक टोकापासून विरुद्ध दिशेला येऊन पडली होती.
त्यातल्या सर्व गोष्टी बाहेर आलेल्या.
डब्बा उघडला जाऊन त्यातलं सर्व जमिनीवर पसरले होते , पाणी खाली सांडलेलं होतं, लिपस्टिक, पास, पैसे, चिल्लर , अश्या सर्व गोष्टी बाहेर आलेल्या.

घरात उंदीर नव्हते, आणि पाण्याची बाटली बुचसाहित उघडणे शक्य नसते झाले कुठल्याही प्राण्याला..... आणि पडल्याचा आवाज ठक्क इतका च झालेला.

हे अमानवीय वाटलं. त्या दिवशी मला खरं च रडायला आलं. की ठीक आहे मी मानत नाही हे सर्व. पण जर खरं च कोणीतरी हे मला त्याचं अस्तित्व दाखवून देतंय तर मी काय मदत करू शकते.
माझ्या वडिलांचा खून होता हे फक्त मला आणि माझ्या सख्या मामाला माहीत होतं.
पण मी त्या दिवशी मनापासून एक च गोष्ट बोलले की गेलेला माणूस गेलाय. त्याला मुक्ती मिळू दे.. नंतर अचानक डोअर बंद होणे, लाईट लागणे प्रकार झाले पण मग ते बंद झालं. मला केव्हा त्रास नाही झाला.

आजोबा ही बाईक एकसिडेंट मध्ये गेले. त्यांना माझं लग्न पहायची इच्छा होती. पण आधीच गेले ते. मला दोनदा स्वप्नात दिसलेले. माझ्या लग्नात मिरवताना. आणि बाबा कधी स्वप्नात आले। तर त्यांच्या हातात नेहमी बॅग असायची. कुठेतरी जातायत किंवा कुठून तरी येतायत.

एकदा तर त्यांचा फोटो ज्या ठिकाणी आहे तो फोटो होताच पण बाबा जिवंत असून त्या फोटो च्या च आसपास फिरतायत असं स्वप्न पडलं...

भुत प्रेत संमंधादी रोग व्याधी समस्तही
नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने

मारुती स्तोत्र म्हणा रोज सकाळ संध्याकाळ! Happy

इथल्या लोकांना नक्की काय प्रॉब्लेम आहे समजत नाही. प्रत्येक अनुभवाकडे संशयाने पाहून तो खोटा ठरवायचा आणि खरे अनुभव का नाही टाकत अशी बोंब मारत सुटायचं. तुम्हाला एव्हडीच चाड आहे खरे अनुभव अनुभवायची तर काढा एक दोन रात्री स्मशानात नाहीतर झपाटलेल्या जागी. @अनामिका तुम्ही लिहीत राहा, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ.

अनिष्का बिग हग.
गेलेल्या माणसाला मुक्ती मिळावी.वाईट तर वाटतंच.

आमचे बाबा गेल्यावर पहिले १०-१२ दिवस बर्‍याचदा, नन्तरही वर्षभर मधुन मधुन मला दिवसातुन कधितरी असे पोटातुन ढवळुन यायचे... अग्दी पोटात आणि डोक्यात पोकळी निर्माण झालीय, पोट खोल खोल जातेय असे वाटाय्चे काही सेकन्द! काय होत होते माहीत नाही,असे एखाद्या ब्लॅक होल मधे आपण जातोय असे वाटायचे...कधी कधी तर बोलता बोलता!
आणि जुनी सान्गवीतुन स्पायसरच्या पुलाकडे जाताना, उजवीकडे एक पेट्रोल पम्प तर डावीकडे एक खानदेश खानावळ्चा बोर्ड आहे/होता... तिथुन भावाबरोबर गाडीवर जाताना दोन-चारदा त्याच स्पॉटला असेच गरगरुन आले.
अन्धारी येणे हा प्रकार मला माहित आहे. पण त्यापेक्षा वेगळा प्रकार होता तो.

पत्रिकेत ९ व्या स्थानात नेपच्युन हा गुढ ग्रह असला की असे अतिन्द्रीय अनुभव येतात असे कुठेतरी वाचलेले.
जाणकार सान्गतीलच.

अरेरे , नानबा तुमचा काही तरी गैरसमज झालाय, तुम्ही लिहिलेले मी अजिबात टोमणा म्हणून घेतलेले नाही, माझ्या काळजीपोटी तुम्ही हे लिहिलेय हे मला माहीत आहे. त्यासाठी मी तुमची आभारी आहे. टीना तुम्हालाही धन्यवाद. कृष्णा , बोकलत, समजून घेतल्याबद्ल तुमचेही आभार. माझा आयडी जरी नवीन असला तरी मला आलेले अनुभव एकदम आलेले नाहीत .आजपर्यंत मी हे शेअर केलेले नसल्याने धडाधड लिहिले गेलेले आहेत. आसा, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवलात त्या बद्दलही वाइट वाटत नाही. तुम्ही विश्वास ठेवावा का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला तसा आग्रह ही नाही. असे अनुभव येणे हे वाईटच, व कोणालाही ते येऊ नयेत. अनिष्कांना आलेला अनुभव ही ग्रेट आहे.

पत्रिकेत ९ व्या स्थानात नेपच्युन हा गुढ ग्रह असला की असे अतिन्द्रीय अनुभव येतात असे कुठेतरी वाचलेले.
जाणकार सान्गतीलच.>>>>>>>>>>>>>> बरोबर आहे आर्या. तसेच पत्रिकेतील चंद्र- नेपच्युन, गुरु- नेपच्युन यात नवपंचम योग असेल, किंवा बुध अष्टम ( आठव्या ) स्थानात असेल तर असे अनूभव येतात. पत्रिकेत गुरु- नेपच्युन योग असेल तर अध्यात्मात साक्षात्कार होतात. दृष्टांत होतात.

अदिती, तुमच्या म्हणण्यानुसार जागा बदलण्याचा विचार शेवटी शेवटी आला होता मनात, ती बाई दोनदा दिसल्यानंतर, पण हा विचार किती योग्य का अयोग्य आहे त्याचा प्रत्यय पुढच्या दोन आठवड्यानंतर आला. दोन आठवड्यानंतर कामासाठी मला आउट ऑफ स्टेशन जावं लागलं ऑफिसची गाडी होती व ड्रायव्हर होता. व अजून दोघीजणी होत्या ऑफिसच्या . एक रात्र राहून दुसर्‍या दिवशी परत यायचा प्लान होता. सगळी कामं आटपून हाॅटेलवर जरा उशिराच आलो, येतांना जेवूनच आलो असल्याने सरळ रूम गाठली. फस्ट फ्लोअरला आम्ही तिघी एका खोलीत, व ड्रायव्हरची रूम दुसर्‍या फ्लोरला होती. दमल्यामुळे आम्ही जास्त गप्पा वगैरे न मारता पटकन झोपलो. त्या रात्री मला एक स्वप्न पडलं( मला नेहमी खूप स्वप्नं पडतात व तीही खूप डिटेलमध्ये. तो लेखनाचा एक वेगळा विषय होऊ शकतो. ) मला स्वप्नात हाॅटेलचा मागचा भाग दिसला, व मागे जरा दाट झाडी व विटांनी बांधलेला एक पाण्याचा हौद दिसला. आता तिथे एक मुलगी उभी होती. नखशिखांत भिजलेली व चिखलाने माखलेली. मला म्हणाली मी इथेच असते. मी खूप दचकून जागी झाले. जाग आल्यावर पायाजवळ एक मुलगी उभी असलेली दिसली, पण तीन सेकंदात विरून गेली. मी पट्कन पाय पोटाशी घेऊन बसले. एसी चालू असूनही घामाने चिंब. दुसर्‍या दिवशी खाली नाश्ता घेतांना वेटरला सहज विचारले, काय रे म्हटले असा असा हौद आहे का मागे? तर तो म्हणाला आहेना, पण तो आता बुजवलाय . वापरात नाहीये.

<<,बरोबर आहे आर्या. तसेच पत्रिकेतील चंद्र- नेपच्युन, गुरु- नेपच्युन यात नवपंचम योग असेल, किंवा बुध अष्टम ( आठव्या ) स्थानात असेल तर असे अनूभव येतात. पत्रिकेत गुरु- नेपच्युन योग असेल तर अध्यात्मात साक्षात्कार होतात. दृष्टांत होतात.<< व्वा... रश्मि, तुझा तर फार अभ्यास आहे. Happy

बापरे अनामिका, असं लाइफ जगायला जाम भिती वाटेल.गळ्यात ओम किंवा हनुमान चालिसा घालून पाहिलास का?

मी_अनू, गळ्यात सद्ध्या बालाजीचं लाॅकेट आहे. हनुमान चालिसा ही मिळतो गळ्यात घालायचा? हे माहीत नव्हते.

अनामिका ला जिथे तिथे भुतं दिसतात..... अनामिका ब्रेव्ह आहेस. मला तर भीती वाटते. म्हणजे अगदी आता आता मला जरा भीती कमी वाटते. पण अगोदर मी खूप डरपोक होते....

अनामिका मला यातलं फारसं कळत नाही पण शांती करून घेणे वगैरे प्रकार असतात ते करू नाही का शकत??? म्हणजे असं काही देवाचं की ज्याने तुझा हा भुतं सोल्स स्पिरिट दिसायचा त्रास कमी होईल....

डेंजर सगळेच अनुभव एकदम !!
आता असे काही वाटले /दिसले /जाणवले की देवा ऐवजी अनामिका किंवा अनिश्का च नाव घ्यायला हवं असं वाटायला लागलय Wink Light 1 घ्या

Pages