अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिष्का, तुमच्या बाबांबद्ल साॅरी. माझे बाबा ही माझा विक पाॅइंट आहेत. तुमची उंची काय आहे पण? सहज एक उत्सुकता.

5'10"......6फुटला 2इंच कमी....आमच्या घरात मी जास्त उंच आहे सर्वांपेक्षा. माझे बाबा पण 6 फूट होते... आणि आता नवरा ही 6'2"

तुमचे फ्रेंड्स ग्रुप सेल्फी काढताना तुम्हाला फोन धरायला सांगतात का हो ?
Light 1 घ्या
मी माझ्या उंच फ्रेंड्स ला हेच काम लावते

मी पुण्याला एका मुस्लिम कँम्पसमध्ये शिकायला होते. माझ्या सोबत हॉस्टेलमध्ये सुमारे ८०% मुस्लिम मैत्रीणी रहात असत.
त्याच्याकडून ऐकलेले काही किस्से.
मुस्लिम धर्मात जीन नावाचा एक प्रकार असतो. तो सुष्ट किंवा दुष्ट असू शकतो. तर माझी एक मालेगावची मैत्रीण सांगत होती की तिथे एक मोठी मस्जिद आहे. तिथे म्हणे रोज नमाजच्या वेळी जिथे हातपाय धुतात त्या नळांमधला कोपऱ्यातला नळ त्या वेळी आपोआप चालू आणि बंद होतो. असे म्हणतात की तिथे एक जीन वूजू करून नमाज करायला येतो.
याच मालेगावी मैत्रिणीचे मोठे एकत्र कुटुंब आहे. तिच्या एका सुस्वरूप आत्यावर एक जीन भाळला. तिला तिच्या खोलीत दररोज सायंकाळी सुगंधी अस्तित्व जाणवत असे. तिच्या लग्नाची खटपट सुरू झाल्यावर मात्र जीन तिच्या अंगात येऊन बडबडू लागला. "ये सिर्फ मेरी है. मै जाने नही दूंगा." वगैरे बडबड ती पुरूषी आवाजात करी. लग्नाचे बरेच प्रयत्न फसले. अखेर एका नातेवाईकासोबत, जो फार धार्मिक होता दुसरा निकाह केला. अर्थात पहिल्या पत्नीच्या संमतीने आणि केवळ घरकामाला फुकटची मोलकरीण म्हणून ही योजना होती. त्या जीनने तिच्या पतीला कधीही तिला स्पर्श करु दिला नाही. शिवाय घरकाम लादण्याचा प्रयत्न करून त्रास दिल्यास तिच्या सवतीला खूप त्रास देई. सवतीच्या अंगावर माराचे वळ उठत.अखेर दोन आठवड्यात ती माहेरी परत आली. कायम अविवाहित राहिली. ती सुमारे ७५ वर्षे जगली. मरेपर्यंत रोज तिला ते सुगंधी अस्तित्व जाणवे. घरातील बर्याच लोकांना अनेकदा तिच्या खोलीत धुसर आक्रुती दिसत असे.

माझी एक मैत्रीण हॉस्टेलमध्ये रात्री झोपेतून दचकून जागी झाली. तिला पायाशी एक आक्रूती बसलली दिसली. नीट पहाता ती एक स्त्री होती. तिला वाटले रूममेट असेल. पण सकाळी तिला आठवले की रूममेट बाजूच्या रूममध्ये अभ्यासाला थांबली होती रात्रभर. खोलीचे दार आतून बंद होते.
दोन दिवसानंतर तिला रूमच्या खिडकीतून नमाज पढताना एक स्त्री दिसली. तिचा चेहरा आमच्या हॉस्टेलसमोर असलेल्या मस्जिदीला पाठमोरा होता.नमाज नेहमी मस्जिदीकडे चेहरा करून पढत असत. ती सॉलिड घाबरून आमच्या रूममध्ये सांगत आली. आम्ही पहायला गेल्यावर मात्र तिथे कोणीही नव्हते. मैत्रीणीची नमाजची चादर मात्र तिथे उलगडलेली होती. पुन्हा मात्र असा काही अनुभव आला नाही.

डॉ. मनाली --> Sad Sad Sad

पण धागा काय पेट्लाय

पलक आठ फूट? कोण? बाबो, आणि अनिष्का 5',10" वाॅव. मग मी तुमच्या पुढ्यात अगदीच लिंबू टिंबू. 5'7".:हाहा:

माझी एक चुलत बहीण naseoh या संस्थेत काम करते तिच्या सोबत घडलेला हा प्रसंग, साधारणतः २०१० साली.
त्यांच्या ऑफिस मधल्या एका कलीगचा एकसिडेन्ट झाला, नेहमी जेवणाच्या / गप्पांच्या ग्रुप मधला. हे सर्व जण हॉस्पिटल मध्ये गेलेले, दुर्दैवाने तो त्याच दिवशी दगावला.
दुसऱ्या दिवशी यांचा जेवणाचा ग्रुप नेहमी प्रमाणे लंच टाइमला जेवायला कॅन्टीन मधे बसले आणि जेवायला सुरवात करणार इतक्यात, टेबलावर दोन हात भर अंतरावर असलेला ग्लास सर्रकन सरकत त्यांच्या टिफिन्स समोर येऊन थांबला. सर्वांची इतकी तंतरली कि सर्व जण तिथून पसार झाले नि ऑफिस डेस्क वर टिफिन खाल्ला ... Lol

उलटा ग्लास असेल तर तो सरकतो आपोआप . काहीतरी शास्त्रीय कारण आहे त्यामागे. मी पण पाहिलाय सरकणारा ग्लास. पण तो उलटा.

त्या डेस्क वरील सरळ ठेवलेला ग्लास असेल तर मात्र काही सांगता येत नाही

आमच्या ओळखीचे एक काका होते, शिर्डी साईबाबांचे निस्सीम भक्त, त्यांच्याकडे मी कधीतरी जात असे. एकदा सहज मी त्यांच्याकडे गेले असता त्यांनी मला श्रीपाद श्री वल्लभांचा (दत्त गुरुंचे प्रथम अवतार) एक फोटो दिला. म्हणाले हा तुला घे. मी म्हटलं त्यांना, काका यांचं सोवळं ओवळं काहीतरी असेल ना? कारण मी गावी हे माझ्या आजीला करतांना पाहिलं होतं. ती निस्सीम दत्त भक्त, व शाकाहारी. आमच्यावर मात्र तिने या गोष्टी कधीच लादल्या नाहीत.काका म्हणाले, काही नाही, स्वामींचे नाव असते ना मुखी? तेच आहेत हे, घे. फोटो बराच मोठा होता, म्हटलं हा लावू कुठे? तर ते म्हणाले तुला हवं तिथे लाव. मी फोटो घेऊन बंगल्यावर आले. फोटो फ्रेम करायचा होता म्हणून मी तो कपाटात ठेवून दिला. पुढे कामाच्या गडबडीत मी फोटो फ्रेम करून घ्यायला विसरले. एक दिवस कसलीतरी सुट्टी होती म्हणून मी दुपारच्या वेळी घरी होते, दुपारी जेवून मस्तपैकी बेडवर लोळत मोबाईलवर काहीतरी बघणे चालले होते . हातातला फोन ठेऊन मी कुशीवर वळले मात्र, आणि मला ती दिसली. माझ्या बेडवरच बाजूला बसलेली, पण पाठमोरी, पांढरी साडी व तसलाच पांढरा ब्लाऊज. केस लांब व मानेवर सोडलेले. नशीब तिचा चेहरा दिसला नाही. हे फक्त सात आठ सेकंदच टिकलं, मग ती गायब. (मागे बोकलतनी विचारले होते, ती बाई परत दिसली का?, तर परत दोनदा बाई दिसली, पण ती तिच होती की वेगळी हे काही कळले नाही, ) वेळ दुपारी तीन ते सव्वा तीन. थोड्याच दिवसांनी परत एकदा दुपारीच, सेम वेळ, पण ह्या वेळी ती बेडच्या दोन हात वर अधांतरी होती, मला फक्त केस दिसले हवेत. हेपण तितकाच वेळ टिकलं, ह्या दोन्हीही घटना आईबाबांच्या खोलीत घडल्या. जिथे मी स्वतःला सेफ समजत होते. आता मात्र हे जरा अतीच होतय हे माझ्या लक्षात आले, व मी बाहेर जाण्याच्या तिरीमिरीतच पर्स घेण्यासाठी कपाट उघडले. तेव्हा माझ्या हाताला फोटोची गुंडाळी लागली. ती धेउन मी तडक फोटो फ्रेमचे दुकान गाठले. व फोटो फ्रेम करून आणून खोलीत भिंतीवर लावला. त्यानंतर मात्र पुन्हा तिथे ती कधीच दिसली नाही. पण, गुलाब, मोगरा आणि सिगारेटचे वास मात्र अजून येतात.

मला आता अनामिका ताईंची सुद्धा भिती वाटू लागली आहे. पण तुमचे डेअरिंग एकदम सॉलिड आहे. काही दिवसांनी तुम्हाला याची सवय होऊन जाईल बहुतेक.

जर हे माझ्या बाबतीत घडले तर मी दोन शक्यता समजेनः
फ क्त मलाच अनुभव आला तर मी मला हॉलुसिनेशन्स होताहेत का पडतळून त्यावर मदत घे ईन.
२. जर तुमच्या मैत्रिणीच स्वप्न आणि तुम्हाला दिसल ह्यासारखे अनुभव असतील तर त्यातल्या मा हित गाराची मदत घे ई न.

हल्युसिनेशन वरून आठवलं.
माझ्या लग्ना आधी नवऱ्याची आजी बाथरूम मध्ये पाय घसरून पडली. तिच्या माकड हाडाला गंभीर दुखापत झाली. ऑपरेशन करून ही काही उपयोग नाही झाला कारण वय 88 होतं.
नवरा सांगतो आजीला खिडकीत तिची वारलेली बहीण भाऊजी दिसायचे. ते मला बोलवतायत असं सारख म्हणायची. त्यांच्याशी गप्पा मारायची. हसायची .....

Dr बोलले होते हे भास होतात...
पण तेव्हा घरातले लोक घाबरलेले...

अनु, स्वस्ति, ट्युलिप, योगी, नानबा, अनिष्का, वरील सर्व अनुभव मला आलेले आहेत. ह्यात कुठलीही अतिशयोक्ती, कल्पनेचा भाग किंवा ऐकीव गोष्टी मिसळलेल्या नाहीत. या गोष्टी स्वतः अनुभवल्यामुळेच मी यावर लिहिलय. एवढया ठामपणे लिहून कुठल्याही बुवाबाजी किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा अजिबात हेतू नाही. माझ्याकडे ऐकीव गोष्टींचा स्टाॅक अफाट आहे, पण मी त्या मुद्दाम लिहिण्याचे टाळलय, कारण ऐकीव गोष्टींत सत्याचा अंश कितपत असेल हे काही मी ठामपणे सांगू शकत नाही. नानबा तुम्ही म्हणताय त्या शंका ही मी नाकारत नाहीये. जसा की मैत्रीणीला व मला एकदम आलेला अनुभव. आजकाल कुण्या जाणकाराची मदत (ह्या फिल्ड मधल्या ) मिळणे एकदम दुरापास्त झालेले आहे. एकतर अशी लोकं फार कमी आहेत (जेनुइन) आणि सगळीकडे बुवाबाजी आणि देवाच्या नावाखाली लुबाडणूक करण्याचे प्रकार जास्त चालू आहेत. दुसरी गोष्ट हेलुसिनेशन्स, मला समजा एकटी असताना हे भास होत असतील तर कानाजवळ औषधाचं नाव सांगणे हा काय प्रकार होता? जे मला गुगल करेपर्यंत माहीत नव्हतं. ट्युलिप, योगी, मी धडाकेबाज , डेरिंगबाज मुळीच नाहीये. मी सुद्धा भित्रीच आहे. फक्त एकच गोष्ट मी पक्की लक्षात ठेवलीय की कुठल्याही परिस्थितीत आपण डगमगून जाउ नये. आपल्या अतीव भितीनेच असल्या गोष्टी आपल्या मनाचा आधी ताबा घेतात, आपणच जर त्या वेळेला कमजोर पडलो तर मात्र अशा शक्तींना आपल्या मनावर व शरीरावरही ताबा मिळवायला सोपे जाते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनावरचा ताबा ढळू देउ नये. वाडवडीलांची पुण्याई असेल किंवा इष्ट देवतेची कृपा असेल,पण त्या वेळेला ह्या प्रसंगातून मी तरून गेले हे नक्की.

@अनामिका : जरा स्पष्टच बोलतोय पण तुमच लिहिण आता अतिशयोक्तीकडे चाललयं. टाकायचे म्हणुन किस्से टाकताय अस वाटतय

अनिष्का, मृत्यू जवळ आल्यावर जवळचे मृत लोक न्यायला येतात म्हणतात.
आमच्या नात्यातल्या एक आजीही असेच गेले ल्या मुलान्ची नावे घेऊन तो मला बोलवतोय म्हणायच्या काही दिवस आधी पासून.

जर हे माझ्या बाबतीत घडले तर << तर अश्या ठिकाणाहुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडायचे बघेन. बाकी ईतर गोष्टी/अ‍ॅनालिसिस नंतर...

Pages