अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईबाबांना अचानक गावी काहीतरी काम निघाले. त्या आधी बंगला जरा आतून रंगवून घेण्याचे ठरले होते. पेंटर लोकं दोन दिवसांनी यायचे होते कामाला. पण आदल्या दिवशीच आईबाबांना गावी जावे लागले. ते ह्या लोकांना नंतर बोलवू म्हणत होते, पण मीच म्ह्टलं जावूदे. आधी माणसे मिळत नाहीत वेळेवर, त्यात मी वरच्या मजल्यावर शिफ्ट होणार होते, खालचं काम संपेपर्यंत. सकाळी आॅफिसला जाणार नि संध्याकाळी येणार. आईबाबा जाण्याच्या दिवशीच मी थोडी भांडी, जुजबी सामान व फर्निचर वरच्या मजल्यावर हलवले. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरून वाट आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. खालील मजल्यावरचे जादा सामान व फर्निचर नीट झाकून ठेवले.
ठरल्या दिवशी पेंटर आले व आपल्या कामाला सुरुवात केली. सात आठ दिवसांत त्यांचं काम संपवून ते गेले. मी वर मर मजेत रहात होते. वर कसलाच त्रास नव्हता. आईबाबांचे मध्ये फोन येवून गेले. त्यांची कामे खोळंबली होती, ती म्ह्टलं पूर्ण करूनच या. नाहीतरी रंगाचा वास येत होता जाम, आईला वासाने सर्दीच झाली असती. पेंटरलोकं जावून चार दिवस झाले होते, म्ह्टलं नेऊ सामान सावकाश खाली, काय घाई आहे? तोपर्यंत रंगाचा वास तरी कमी होईल. त्या रात्री दोन अडीच वाजता कसल्याशा आवाजाने जाग आली. डोळे उघडून निट कानोसा घेतला, तर आवाज खूप वाढले. खालच्या मजल्यावरून आवाज येत होते. फर्निचर सरकवण्याचे, बेड उलटवून टाकण्याचे, कपाटे जोरजोरात सरकवण्याचे. आईशप्पथ ......मला वाटले की बंगल्यात चोर शिरलेत का काय?? मी स्वतः ला एकटे रहाण्याच्या हुशारीवरून मनातल्या मनात खूप शिव्या दिल्या आणि काॅटच्या मध्यभागी जिवाची पुरचुंडी करून मोबाईल हातात घेऊन आता आणीबाणीच्या वेळी कोणाला फोन करावा याचा विचार करू लागले. पंधरा मिनिटांनी आवाज थांबले, मी तशीच बसून राहिले. वर कोण येतयं का या विचाराने, पण सकाळ पर्यंत काही झाले नाही. सकाळी खाली जायचीच भिती वाटत होती. कशी बशी दहा वाजता खाली आले. वाटलं होतं खालचा दरवाजा उघडा असेल, पण मीच दरवाजा उघडला. आत सगळे व्यवस्थित होते फर्निचर वगैरे जागच्या जागी. मला हायसे वाटले. त्याच दिवशी मी आॅफिसला दांडी मारून सगळे सामान खाली आणले. एक गोष्ट मात्र पक्की होती की जे काही होते ते फक्त खालच्याच मजल्यावर होते. मी मात्र दुपारी जेवून मस्त ताणून दिली, मला रात्री झालेली झोपमोड भरून काढायची होती.

बोकलत, तुमच्या किश्यातील भानामती म्हणजे उल्का वर्षाव असू शकतो. साधारणतः जेंव्हा धुमकेतूच्या पिसार्‍याच्या मार्गातून पृथ्वी जाते (किंवा इतर काही भौगोलीक कारणामुळे) असा खूप जास्त प्रमाणात उल्का वर्षाव होतो. तो काही दिवस चालू शकतो.

उल्कावर्षाव असता तर जळालेले दगड असते ना ते. ते दगड नदीच्या पात्रांमध्ये मिळतात तसेच होते. आणि रात्रीच बरोबर कौलांवर पडायचे ते दगड. असे रस्त्यात किवां मोकळ्या जागेत नाहीत पडायचे.

अफवा पसरवण्याच्या बाबतीत कोकण आणी पुणे आघाडीवर आहे. ( कृपया मान्यवरांनी राग मानु नये) ८०-८५ च्या सुमारास पुण्यात एक अफवा पसरली होती की एक मनुष्य ( एक की एकापेक्षा जास्त ते आठवत नाही ) अर्धा माणुस आणी अर्धा लांडगा अशा स्वरुपात फिरतो आणी लोकांना रात्री अपरात्री मारतो. झालं ! लगेच लोक रात्री गरज असेल तर बाहेर पडायचे, खबरदारी घ्यायचे. कुठे खून, अपघात झाला असेल तर या बाबाजीवर ते ढकलले जायचे. लोक रात्री कुणालाच दार उघडत नव्हते. मग अशी अफवा पसरली की हा बाबाजी म्हणजे वेअरवुल्फ जमिनीखालुन पण भुयार करुन येतो. आता लोक शहरच सोडायचे बाकी होते. आम्ही लहान असल्याने आम्हाला या कहाण्या मनोरंजक आणी तितक्याच भीतीदायक वाटायच्या.

यात भर म्हणजे माझ्या धाकट्या मामाने , जो खडकीला मिलीटरी विभागात नोकरीला होता,. त्याने रात्री घरी परत येत असतांना ३-४ लांडगे हायवेला ओरडत असतांना बघीतले होते. मामाने आणी त्याच्या दोन्ही मित्रांनी सायकली आधी हातात धरुन रस्ता पार केला आणी मग जोरात दामटत घरी पोहोचले. त्याकाळी पुणे-मुंबई हायवेला काय रहदारी असणार रात्री तरी. हा काळ ८० च्या आसपासचा.

बोकलत, हा प्रकार झी मराठीच्या रात्रीस खेळ चाले या अद्भूत मालिकेत पण दाखवला होता.

अनामिका आणी चिन्मयी तुमच्या जागी मी असते तर बहुतेक हार्ट अ‍ॅटॅकनेच गेले असते.

ही एक सत्य घटना आहे. माझ्या लहानपणी ची. इयत्ता ७वीत होतो मी. दिवाळीत शाळेला सुट्टी पडली की मी मामाच्या गावी भुसावळला जायचो. तिथे ओर्डनर्स फॅक्टरी आहे, खुप धम्माल असायची. माझा मामा आणि त्याचे काही मित्र माझ्यापेक्षा वयाने वर्षे मोठे होते तरी माझी चांगलीच गट्टी जमलेली होती.
मग ते शेतात हुंदड, नदीवर आंघोळ असे काही तरी करत वेळ घालवयचो. असेच एका संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. आजोबानी फटाके खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. आम्ही दोघानी फटाके खरेदी केले आणि घराकडे निघालो. बाजार ते घर अस २० मिनीटाच अंतर एवढंच की बाजारातून निघाल्यावर एक टेकड़ी पार करुन खाली आल्यावर नदी लागते त्या नदीचा ब्रिज ओलांडून पलीकडे आले की परत एक टेकड़ी चढून पार केल्यावर मामाचे घर होते. संध्याकाळी ७:३० च्या दरम्यान आम्ही ती टेकड़ी पार करुन नदीच्या ब्रिज जवळ आलो. एव्हाना काळोख झाला होता. हातात बैटरी नव्हती त्यामुळे खाचा खळग्यातुन वाट शोधत आम्ही चाललो होतो. तेवढ्यात आमच्या मागून कोणी तरी चालत असल्याचा भास झाला. मागे वळून पाहिल तर कोणी नव्हते. विन्या मामाला कसली तरी शंका आली म्हणून त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला मागे बघू नको चल पटापट...मला काही कळले नव्हते. नदीचा ब्रिज जसे क्रॉस करू लागलो तसा मागून येणारा आवाज प्रकर्षाने जाणवू लागला. काहीतरी विपरीत आपल्यासोबत घड़नार याची शंका मामाला आली होती. काहीच दिसत नव्हते पण हळू हळू तो आवाज आपल्या जवळ येतोय एवढे कळत होते. ब्रिज उतरून पलीकडे आलो तर नदीच्या किनारयावर असलेल्या स्मशानात कोणाचे तरी प्रेत जळत होते त्याचा उजेड आम्हाला दिसला आणि पाठोपाठ येणाऱ्या आवाजासोबत काहीतरी पांढऱ्या रंगाची ओबड़ धोबड़ आकृतीचे चित्र पुसटसे दिसत होते. आता मामा खुप घाबरला होता. नदी लगतच असलेली टेकडीचा टप्पा पार करुन गेलो म्हणजे सुटलो हे त्याला ठावुक होते. त्याने माझा हात घट्ट पकडून जवळ जवळ फरफटतच त्या चढणीने मला खेचत आणले. वर आल्यावर मामाच्या वस्तीतील घरांच्या दिव्यांचा उजेड दिसू लागला तसा आमच्या जीवात जीव आला. तिथुन आम्ही दोघानीही घराकडे धावतच धूम ठोकली. घरी विचारले कि इतके घाबरलात का पण कोणाला काहीच सांगिले नाही. परंतु आमच्या दोघांच्या ही मनात एक प्रश्न होता तो म्हणजे आपल्या मागून येणारी ती आकृति क़ाय असेल. तसाच आम्ही धाब्यावर (घराच्या गच्चीला तिकडे ढाबा म्हणतात) भिंती आड लपून पुलाकडे रस्त्याकडे पाहू लागलो. ५ ते १० मिनिटातच सगळ्या शंकांचे निरसन झाले. आम्ही आलेल्या वाटेने एक बिचार गाढव लंगड़त लंगड़त येत होत आणि त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगाच पोत होत. त्याला पाहिल्यानंतर आम्ही दोघेही हसायला लागलो. क़ाय झाल होत ते फक्त आम्हा दोघानाच माहित होत आणि बाकी सगळे आमच्या चेहरयाकडे पाहत होते कारण त्यांना माहित नव्हतं आम्ही नक्की का हसतोय...
एक अमानवीय किस्सा होता होता राहिला ...

आमच्या गावी आम्ही भावंडे असेच दुपारच्या वेळी डोंगरावर करवंदे आणायला गेलो होतो. बरोबर आमचा कुत्रा ही होता. आणि तो आमच्या पुढे होता. आम्ही गाव सोडून जवळजवळ डोंगराच्या पायथ्याशी पोचलो . दुपारची वेळ आणि आजूबाजूला कोणी नव्हते. तेवढ्यात आमच्या राजूला म्हणजे आमच्या कुत्र्याला काय झाले काय माहित, पण तो एका जागी झाडाकडे बघून भुंकायला लागला. आणि आम्ही जसे पुढे जाऊ लागलो, तसे आमचा राजू आमच्या पायात आडवा येऊ लागला.जसा तो सांगत होता की पुढे जाऊ नका. काय असेल तिथे???.

ऐकीव किश्श्यांपेक्षा सुरुवात स्वानुभवाने... हा काही फार भीतीदायक अनुभव नाही आहे परंतु त्यामध्ये घडलेल्या घटना जितक्या नाटकीय तितक्याच कोणत्या तरी अमानवीय हस्तक्षेपाकडे निर्देश करणाऱ्या होत्या, त्यामुळे जसा च्या तसा लक्षात राहिला..
..तर झाला असं, माझा चुलत भाऊ समीर जो आता गावी असतो, तो शिक्षणा साठी आमच्या इथे मुंबईत घाटकोपरला राहायला होता. हि गोष्ट साधारण १९९८-९९ घडली असेल. आमच्या घरी तेव्हा खूप जण राहायचे (एकत्र कुटुंब पद्धती) आता सर्व जण लग्न होऊन गेले पण तेंव्हा दररोज रात्री टीव्ही पाहण्या पेक्षाही आमच्या घरात गप्पा रंगायच्या. त्या दिवशी ही तशाच गप्पा चालू होत्या. समीरला कधीच झोप आवरायची नाही(आजही परिस्थिती तीच आहे), तो नेहमी प्रमाणे गाढ झोपलेला. त्या वेळी आमच्या घराच्या मेन डोअरला लॅच नव्हतं आणि कुणी यायचं बाकी असेल घरी तर कडी आणि साखळी लावलेली नसायची म्हणजे जो कुणी बाहेर असायचा तो सरळ दार ढकलून आत यायचा..
माझ्या दुसऱ्या काकांचा मुलगा रवी नेहमी प्रमाणे तसाच दरवाजा ढकलून आत यावा तोच घड्याळात १२ चे ठोके सुरु झाले..त्या वेळे आमच्या कडे जुन्यापद्धतीच ठोके होणार वॉल क्लॉक होत.... आणि अगदी त्याच क्षणी कुणी तरी कळ फिरवावी तसा समीर अचानक उठला , आणि रडायला लागला, जोरात अगदी... 'माझा हात तुटला ...माझा हात तुटला ' , मी अगदी त्याच्या पायाशी बसलेलो, तो झोपेत होता हे स्पष्ट होत, त्याचे डोळे बंद होते पण तो रडायचं काही थांबत नव्हता ....घरातल्या गप्पा क्षणात थांबल्या ...वातावरण गंभीर....सर्व जण विचारू लागले काय झाल....काही जण त्याला उठवू लागले कि झोपेतून जागा होईल नि थांबेल सर्व, पण परिस्थिती जैसे थे .. ५ मिनिटांतच सर्वाना समजून चुकल की काही तरी वेगळा प्रकरण आहे. आमच्या घरी श्री स्वामी समर्थांची भक्ती चालते, त्यांची अक्कलकोटहुन आणलेली उदी असायची घरात...माझ्या काकीने ती त्याच्या कपाळाला लावली आणि सेकंदात सर्व नॉर्मल झालं....तो जसा काही झालाच नाही, असा झोपला परत, अगदी तसेच डोळे न उघडता... आणि दुसऱ्या सकाळी त्याला काही आठवत पण नव्हतं त्याबद्दल...
आमच्या घरी अशी प्रकरणे फार मनावर घेतात सो दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रांना माझा मोठ्या भावाने विचारले कि काल समीर तुमच्या सोबत कुठे गेला होता का?... तर ते बोलले की, हो आम्ही घाटकोपर टेकडी परिसरात एक मैदान आहे ते अगदी निर्मनुष्य आणि अंधारे असायचे त्यावेळी, जवळच स्मशानपण आहे (आम्ही शाळेत असताना तर तिथे एक वाघ ही पकडला होता ) तीथे बाईक शिकायला गेलो होतो.. तिथे समीर एका ठिकाणी उभा होता नि त्याचा एक मित्र दुसऱ्याला बाईक शिकवत होता... सुदैवाने त्या रात्री नंतर तसा प्रसंग नाही झाला..

मागच्याच आठवड्यात एका मित्राच्या आजोळी गेलेलो. सहज गाव फिरायचे म्हणुन भटकत गावच्या एका टोकाला गेलो. एक ठिकाणी छोटी फुलझाडे दिसली. म्हणुन गेट मधुन आत गेलो आणि एका बाकड्यावर बसलेलो पण तेथे पाऊल ठेवताच गुदमरायला लागले. नंतर तो मित्र शोधत आला आणि गेटबाहेरुनच हाक मारु लागला. बाहेर गेल्यावर कळाले ते स्मशान होते. भीती वाटली नाही पण तिथे कसा गेलो याचे आश्चर्य वाटले. कारण समोरुनच दहनाची जागा दिसत होती. आणि निखारेही.

सर्वांचे च किस्से भयानक......
मला इथे हे नमूद करायला आवडेल की बोकलत यांनी टाकला होता तो लेटेस्ट दगडांचा किस्सा , ऐकीव असला तरी चांगला होता.... ( मी भुताला पळवून लावले टाईप नव्हता )
असं काही टाका जे वाचायला बरं वाटेल. Happy

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्ल धन्यवाद.
मी खाली रहायला आल्यावर आठ दिवसांनी आईबाबा आले. ते चांगले पंधरावीस दिवस राहिले, मग आईची सारखी भुणभुण सुरू झाली, तिचेही बरोबरच होते म्हणा, ते माझ्याबरोबर रहात असल्याने गावच्या वाड्याकडे व बागेकडे दुर्लक्ष होउ लागले. बागेची देखभाल करणारा गडी आजारी पडला, पाचोळा जमू लागला, झाडे सुकली. ह्या पंधरा दिवसांत वरच्या मजल्यावर एक भाडेकरू जोडपे रहायला आले. आईबाबांना वाटले की मी इथे बर्‍यापैकी रूळले आहे त्यामुळे निर्धास्तपणे आईबाबा गावी परत गेले. मला विशेष त्रास असा नव्हता फक्त अधूनमधून येणारे वेगवेगळे वास सोडून.
एक दिवस माझी एक मैत्रीण जी माझ्याच ऑफिसमध्ये काम करते ती रहायला आली, ऑफिसचेच काम होतं आणि डेडलाईन असल्याने पूर्ण करायला घरी आणलेलं. आम्ही उशिरापर्यंत जागून काम पूर्ण केलं आणि गप्पा मारत झोपी गेलो. तिची झोपमोड होऊ नये म्हणून मी रात्री दिवा चालू ठेवला नाही त्या ऐवजी अगदी किंचित उजेड देणारा झिरोचा दिवा लावला. माझी झोप खूप सावध असते, मी कितीही, अगदी गाढ झोपेत जरी असेल तरी जरा कुठे खुट्ट झालं तरी मला जाग येते. ती माझ्याच बाजुला झोपली असल्याने तिच्याच आवाजाने जाग आली, तर तिचं आपलं ऊं ऊं ऊं ऊं असा आवाज काडून तळमळणं चालू होतं. मला वाटलं हिला बहुतेक स्वप्न पडत असावं म्हणून मी उठून लाइट लावणार एवढ्यात माझे लक्ष समोर गेले, समोरच्या कपाटावर एक काळी कुळकुळीत आक्रृती पाय सोडून बसलेली दिसली. मी मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. थोड्या वेळात आक्रृती गायब झाली आणि मैत्रीणीची हालचाल थांबून ती स्वस्थ झोपी गेली. दुसर्‍या दिवशी चहा घेतांना तिला विचारले, तुला रात्री काही स्वप्न वगैरे पडलं होतं का गं? तर ती म्हणाली, होना ! एक काळी आकृती माझ्या छातीवर बसून माझा गळा आवळत होती. मी तिची मस्करी केली पण मला आलेला अनुभव तिला अजिबात सांगितला नाही. अजूनही ती मैत्रीण अधुन मधुन घरी येते, पण मुक्कामाला रहात नाही.

माझा पण आहे किस्सा स्वता: अनुभवलेला पण मराठि टायपिन्ग नाहि जमत लगेच म्हनुन अजुन नवता टाकला चुका असतिलच तर प्लिज समजुन घ्या.
७ वर्शा पुर्वि असेल माझे वडिल जाउन १ - २ वर्श झालि होति आम्हि सगळे माझि आइ, बहिण, भाउ आणि मि गावाला गेलेलो आणि मझा आतेचि सगळि मन्डळि पण आलेलि आमचा बरोबर रहायला २ दिवस. तर पहिल्याच रात्रि वळई मधे पन्खा नस्ल्यांं मुळे आम्हि सगळे जण आतल्या खोलित झोपलो पण खुप लोक असल्या मुळे आम्हि ४ जण (मि, मझा अत्तेचा दोन मुलि आणि त्यान्चा काका तो पण वयाने आमचा पेक्शा थोडाच मोटा होता) मझा वडिलानि आम्चा बाहेरचा ओटा आणि आतलि रुम कने़क्ट होईल अशि एक रुम बनवलि होति आमचा मुलिन साठि जिथुन आपण सरळ अत्ल्या रूम मधुनच ओट्या वर जाउ शकु म्हणजे पुर्ण वळई आणि मधला लोटा फिरुन जायचि गरज नाहि त्या रुम मधे झोपलो.

आमचा गावि घर जवळ जवळ नाहित इतर गावान सारखि. लाम्ब लाम्ब आहेत आणि दोन घरान माधे पुर्ण रान आहे आणि आम्चा घराचा समोर पडका मान्गर आहे म्हाणजे नुसता मातिचा डोन्गर आणि त्या वर रान आहे.

तर झाल अस रात्रि अचानक आमचा घरा बाहेर २ - ३ कुत्रे खुप जोरा जोरात रडायला लागले आणि माझि झोप मोड झालि खुप वेळ झाला तरि ते रडायचे थाम्बेनात १/२ तास झाला तारि चालुच आणि बाकि कोण जाग पण नाहि झाल त्या अवाजाने. माझा भुतावर विशवास नस्ल्या मुळे आणि माला गावाला साप सोडुन कसलिच भिति वाटत नस्ल्या मुळे आणि खुपच इरिटेड झाल्या मुळे मि सरळ ओट्या वरचि लाइट चालु केलि (जिचा प्रकाश फक्त आमचा अन्ग्णात दिसेल असा होता) आनि ब्याट्री घेउन ओट्या वर गेले आणि समोर ब्याट्री मारुन अन्धारत बघु लागलि आम्चा मान्गर वर, पण मला त्या फुल ब्याट्री चा लाइट मधे पण काहि एक दिसले नाहि समोर कि एक कुत्रा पण नाहि दिसला. तेवध्यात मला माझा आत्ते बहिणिचा आवज आला ति माझा कडे बघुन हसुन बोलि कि काय करतेस बाहेर आणि परत डोळे बन्द करुन झोपलि मि काहि बोलायचा आत. तरि पण मि बघत होते बाहेर तर मला माझा मोट्या बहिणिचा आवाज आला माझ नाव घेतल्या सरखा म्हणुन मि आत आले आणि आतल्या खोलित बघु लागले तर सगळे जण शान्त झोपले होते. आणि मग कुत्रे पण रडायचे थाम्बले म्हणुन मि दार लाउन घेतले आणि माझा जागेवर येउन झोपले परत पण पुर्ण रात्र माला काहि झोप लागलि नाहि आणि पहिल्यान्दा माझि पाट दुखायला लागलि.
दुसर्या दिवशि सकाळि मि सगळ्याना बोले कि काल रात्रि किति कुत्रे रडत होते तर सगळे बोले कि नाहि आम्हाला नाहि माहित. मग मि त्या बहिणिला विचारल कि तु जागि झालि होतिस ना तर ति पण बोलते कि नाहि मि नवते ऊटले. मग मि माझा बहिणिला विचारल कि तु मला आवाज दिलास ना काल तर ति पण बोलते नाहि मि कशि आवज देणार मि कधि उटते का काहि झाल तरि तिच पण बोलण बरोबर आहे कारण ति आमचा घरात खुप झोपण्या साथी प्रसिध आहे.
आणि तेवध्यात तिचा काका बोला कि हा मि बाघितल तूला आणि मि पण उटनार होतो पण तेवध्यात तु आतल्या रुम मधे गेलिस पण मि आतल्या रुम मधे गेलिच नाहि कारण गावच घर असल्या मुळे मला तिकडे जाण अलाव नवत.

अजुन पण मला कळत नाहि कि त्या रात्रि नक्कि काय झाल होत ते. पण परत कधि मला तसा अनुभव आला नाहि

मैत्रीणीबरोबर घडलेल्या घटनेनंतर मला वाटलं की मी झोपतेय तीच खोली बहुतेक झपाटलेली असावी म्हणून मी आईबाबांची खोली वापरायला सुरुवात केली. पण मला कुठे माहित होते की माझा आनंद थोडेच दिवस टिकणार आहे. ह्या खोलीत सुद्धा वास यायचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात होतं. पण काही दिसलं तर नव्हतं. असल्या विचित्र अनुभवांतून गेल्यामुळे असेल पण स्वरक्षणासाठी काहीतरी उपाय करणे मला गरजेचे वाटू लागले. पण का कोण जाणे, ती जागा बदलणे वा सोडून जाणे हा विचारही डोक्यात आला नाही. रोज सकाळी उठून देवाचा जप माळेवर करायला सुरुवात केली. एक दिवस नेहमी प्रमाणेच सकाळी पाच वाजता हाॅलमध्ये आसन लाऊन जप करणे सुरु होते, तेवढ्यात माझ्या अवती भवती कोणी तरी जोर जोरात श्वास घेत फिरत आहे हे स्पष्ट जाणवले. जसे की एखाद्या व्यक्तीला श्वास घेतांना भयंकर कष्ट पडत असावेत. मी डोळे उघडून बघितले तर आसपास कोणीही नाही. परत जप करावा तर परत तोच प्रकार. आता तर मला तो आवाज ऐकवेना . खरं सांगते, मला त्या आवाजाची भितीहि वाटली आणि दया ही आली. मी सरळ उठून आतल्या आईबाबांच्या खोलीत बसले व जप पूर्ण केला.

<<<आता मला अनामिकाचीच भिती वाटु लागली आहे Light 1 Lol<<< +111111
एक्झेक्टली... मी हेच म्हणणार होते. टाईप केलेला मेसेज पुन्हा डिलीट केला . Lol

2006 मध्ये, माझे बाबा जाऊन एक वर्ष पूर्ण झालं होतं. वर्षश्राद्ध साठी आम्ही गावी गेलेलो.
तेव्हा गावी मोबाईल ला रेंज नसायची. रेंज मिळवायला थेट गावाच्या तिकठ्यावर जिथे माझ्या चुलत काका चं घर होतं तिथे जावं लागायचं. त्या दिवशी रात्री लाईट्स नव्हते. मी मोबाईल रेंज मिळावी म्हणून तिथे गेलेले. सर्वकडे मिट्ट अंधार होता.
मी जिथे होते, तिथपासून 25 पावलांवर एका कट्ट्यावर काही तरुण मुलं बसून चकाट्या पिटत होते. अर्थात मी त्यांना दिसत नव्हते.
त्यांच्यातला एकजण घरी जायला निघाला . तेवढ्यात त्याने मला पाहिलं. अंधारात मी काही त्याला दिसले नाही. पण मोबाईल ची लाईट दिसली असावी. त्याने लांबून मला पाहिलं आणि जोरजोरात किंचाळत परत मागे गेला.
अंधारात कोणीतरी किंचाळलं म्हणून मी पण घाबरुन घरात पळाले.
दुसऱ्यादिवशी गावात सगळीकडे बातमी पसरली , की रम्या ( रमेश ) ने गावात तिकठ्यापाशी उंच भूत बघितलं. जे विडी पीत होतं आणि गोल गोल फिरत होतं.
मला ही गोष्ट काकाने सांगितली. आम्ही मरेस्तोवर हसलोय. मी उंच आहे ठीक आहे, लाईट मुले विडी पितेय असं वाटलं त्याला ते ही ठीक.... पण गोल गोल फिरत होती Lol हा तर भारी जोक होता.
आणि तो कोण रम्या होता त्याला ताप भरपूर दुसरे दिवशी Lol हा अजून मोठा जोक.

@अनिष्का असा मोबाईलचा प्रकार आमच्या गावी पण घडला होता, एक कॉलेजचा मुलगा फोनवर बोलत होता आणि लाईट गेला असल्यामुळे तिथून जाणाऱ्या मुलीला वाटलं भूत आहे, ती धावत पळत घरी आली सांगायला, आजूबाजूची 7-8 माणसं काठ्या वैगरे घेऊन गेली , बघताहेत तर हा फोनवर बोलतोय, नशीब भूत समजून नाय मारला नायतर खरोखरचा भूत झाला असता.

Lolzz...

Pages