अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा किस्सा माझ्या काकु बद्दल आहे, मला घरच्यांकडुन कळालेला आहे.. आमचं जुनं घर गंगावेशीत होतं. माझ्या चुलतभावाचा नुकताच जन्म झालेला होता. म्हणजे काकु ओली बाळंतीण! आमच्या घराच्या मागे मुस्लिम कुटुम्ब राहत होते पठाण आडनावाचे. त्यांचे अब्बा नुकतेच वारले होते! तर काकु पाणी ओतायला म्हणुन घराच्या मागच्या दारी गेली आणि धुमसतच परत आली. एकदम पठाणी बोलायला लागली पुरुषी आवाजात. काय करायच कुणालाच कळेना. बाळाला म्हणजे माझ्या चुलतभावाला पाजण्यासाठी तिच्याकडे दिलं तर जोरात त्याला वर फेकायची. आमच्या घरचे जे देवर्षी होते ते ज्योतिबाचे पुजारी होते, अप्पांनी म्हणजे आजोबांनी त्यांना बोलवुन घेतलं. मग त्यांनी मंडल घालुन आत काकुला बसवलं तेव्हा काकुने म्हणजे त्या आत्म्याने सांगितलं कि शेजारच्या पठाणांचे अब्बा होते ते आणि दुपारच्या जेवणाच्या आधी त्यांच निधन झाल! पुर्ण मटणाच्या जेवाणाचा उतारा घेऊन नदी जवळच्या शेतात जाऊन टाकुन आल्यावर काकु एकदम नॉर्मल आणि आपण काय करत होतो ह्या गोष्टीची तिला आज्जिबात आठवण नव्हती!

माझी मोठी बहीण ३० वर्षांपूर्वी गेली त्यावेळीस मी १० वित्त होते. ती आणि मी अंगणात बसलो होतो आणि ती मला १० वीचे गणित शिकवीत होती. अचानक ती म्हणाली तो बघ साप आणि सापाचे पिल्लु आकाशाकडे बघून रडत आहे. मला मात्र काहीही दिसले नाही. घरी आई आल्यावर याबाबत चर्चा झाली (वडील व नसल्याने आई एकटीच ४ बहिणी आणी भाउ याना सांभाळात होती.) काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले. मुंबईला अंधारीला पोस्टल कॉलोनी भाड्याने राहत
असताना ती घर एकटीच होती तिला एक केस मोकळी सोडलेली बाई दिसली तिच्या हातात आंबा होता आणि बहिणीला म्हणाली तुझे माझ्यासारखे होईल . ९ महिने झल्यावर अचानक बाळ गेले आणि १५ दिवसात अचानक बहीण गेली. तिचे क्रियाकर्म माहूर ला केले. बहिणीचे मिस्टर सांगतात कि हे क्रियाकर्म चालू होते तेंव्हा एक साप वाळूत येऊन थांबला होता . बहीण ऊचाशिक्षित होती आणि बहिणीचे मिस्टर उच्चशिक्षित ( ऊस गावातून डॉक्टरेट केले होते ) त्यामुळे अंधश्रद्धेचा प्रश्ण येत नाही.
नंतर कुणीतरी सांगितले कि बहीण साप योनीतील होती. काय झाले हे मात्र शेवटपर्यंत कळले नाही पण आमची सुंदर हुशार तरुण बहीण तडकाफडकी गेली
आणि आमचं घर मात्र कायम मूक झालं.

स्वप्नं खूप पडतात, कधी खूप सूचक पण असतात, पण आपल्याला दिसलेल्या घटना आपल्या बरोबरच होतील असे नाही. मला एकदा स्वप्न पडलं होतं की माझ्या डोक्याला एक मोठी गाठ झाली आहे, मी घाबरून उठले, अन् सकाळपासून डिस्टर्ब होते. त्या रात्री माझ्या काकूंचा फोन आला तेव्हा तिने सांगितले, तिच्या बाबांना डोक्यात एक गाठ डिटेक्ट झालिये. सहा महिने उपचार घेतल्यावर ते पूर्णपणे बरे झाले.
एकदा तर आई गावी होती, मी नातेवाईकांकडे गेले होते , तेव्हा मला स्वप्नात मीच घाणीने पूर्ण बरबटलेली (शी:) दिसले, संध्याकाळी कळलं आईला हाॅस्पिटलला एडमिट केलेलं त्या पूर्ण दिवसात ती लूज मोशनने हैराण झाली होती.
मला आलेला एका पंजाबी मैत्रीणीचा अनुभव. ह्या मैत्रीणीने मला फोन केला म्हणाली भेटायचे आहे, पाच वाजता येते घरी. मी दोघींसाठी अननस, पपई व जी फळे घरात उपलब्ध होती ती कापून चाट बनवलं व तिची वाट पाहत बसले. ती यायच्या बरोबर दहा मिनिटे आधी मला उगाच वाटलं की तिला ते पपई, अननस चाट अजिबात देऊ नकोस ती प्रेग्नंट आहे. ती आल्यावर अगदी दरवाजातच तिने बातमी दिली, अगं तू मावशी होणार म्हणून. ती येऊन गेल्यावर दोनच दिवसांनी स्वप्न पडलं, मैत्रीण स्वप्नात, तिने माझ्या हातात एक बाळ दिलं, मुलगी. विचित्र गोष्ट म्हणजे बाळाचा चेहरा अगदी म्हातार्या बाईचा होता. हातातल्या बाळाने पटकन् डोळे उघडून माझ्याकडे बघितले व मी दचकून जागी झाले. स्वप्नावरून मी अंदाज केला की हिला नक्की मुलगी होणार व घरातीलच कोणी तरी बाईमाणूस परत जन्म घेणार . तीला मुलगी झाली. तीच्या डिलीवरीनंतर एका महिन्याने मी तिला व बाळाला बघायला तिच्या घरी गेले. तेव्हा तिचा नवरा सांगायला लागला, खूप वर्षांपूर्वी त्याची आई त्याच महिन्यात, त्याच तारखेला वारली होती, तिचा आपल्या मुलावर खूप जीव होता, मला वाटतं माझी आईच आलिये परत जन्म घेऊन म्हणाला. मग मी बाळाला बघण्यासाठी आतल्या खोलीत गेले, बाळ पाळण्यात निवांत झोपले होते. मैत्रीण लगेच आले हं म्हणत जरा किचन मध्ये गेली, तेवढ्यात त्या गाढ झोपलेल्या बाळाने अचानक माझ्याकडे डोळे उघडून पाहिले, स्वप्नातल्या बाईसारखं व ते बाळ परत गाढ झोपी गेलं. मी शाॅक.
मी त्यांच्या घरात माझी ती मैत्रीण सोडून कोणालाच ओळखत नाही, मग मला ते स्वप्न का पडलं असावं?

माझा एक शाळेतला मित्र। त्याच्याशी कित्येक वर्षात माझा काही कॉन्टॅक्ट नव्हता, एकदा माझ्या स्वप्नात आला आणि त्याचा accident झाला. मी त्याच्या घरी कॉल केल्यावर समजले की त्याआधीच्या आठवड्यात त्याला सिव्हीअर अपघात झाला होता!

@ वेब.... अरेरे फार वाईट Sad ...पूर्वी कुठेतरी वाचल्यासरखी वाटते.. कुठे पोस्ट केलेली का याआधी

@ वेब - आधी कुठे तरी वाचल्यासारखे वाटते ... आधी कुठे दुसरी कडे पोस्ट केला आहे का?

अनामिका, तुम्हाला frequently असे अनुभव (अमानवीय ) अनुभव येतात असे दिसते. तुम्ही पारलौकिक माध्यम ( paranormal medium) प्रकारात मोडत असाव्यात असे मला वाटते. मला याची विशेष माहिती नाही परंतु अश्या व्यक्ती असतात एवढे नक्की. तुम्ही थोडा तपास करावात. You never know the possibilities unless and until u palpate. पहा, विचार करा.

धन्यवाद डॉक्टर मनाली, भुत्याभाऊ, तुम्ही म्हणताय तसा विचार आला होता अनेकदा मनात पण अगदी ठामपणे असा नव्हता. आधी मी एक छंद म्हणून टॅरो कार्ड रिडींग वगैरे करीतअसे. तेही विना मोबदला. (दुसर्‍यांच्या दुःखाचे, किंवा त्यांच्या प्रश्नांचे पैसे घेणे मला पटत नसे.) पण त्याचा परिणाम असा झाला की मला अगदी फोनवर वेळी अवेळी प्रश्न विचारले जाउ लागले, प्रत्येकाला अर्जंसी. आणि आपल्याला तर नाही म्हणणे जमत नाही. थोडी माणसे यायची घरी, (म्हणजे मित्र मंडळी व नातेवाईक. ) बाकी कोणाला ही कल्पना नाहीये. पण जास्त फोनवर. वर लोकांचं सांगतेस स्वतः चं पण बघत जा कधीतरी हा घरच्यांचा टोमणा पण असायचा. पुढे पुढे मी ह्या कामासाठी ठराविक वेळ ठेवली, पण दिवसभर फोन यायचे. या सगळ्या गडबडीत साधनेला वेळ कमी पडू लागला. मला वाटतं हया कामी माझी स्वतःची उर्जा जास्त खर्च होत असावी. मला प्रचंड थकवा यायचा. शेवटी कंटाळून हे बंद केलं, कार्डं तर विसर्जन करायची ठरवली होती, पण एक मैत्रीण अगदी काकुळतीला येउन म्हणाली, अगं कार्डं नको तर नको काढू पण प्लीज ठेव, अगदी विसर्जन वगैरे नको, पुढे मागे कधीतरी विचार बदलेल तुझा. तेव्हापासून ती कपाटात आहेत. अजूनही कधी कधी फोन येतात परत सुरु केलं का म्हणून.

माझी एक मैत्रीण आहे, तशी माझ्या पेक्षा वयाने बरीच लहान आहे. तिच्या आईला तिच्या वेळी सोनी टीव्ही वर लागणाऱ्या 'आहट' मालिका पाहण्याचे डोहाळे लागले होते..... आता त्या मैत्रिणीचे एक एक अनुभव ऐकले की मला 'अनामिका' ह्यांचे अनुभव नॉर्मल वाटतात.

तिच्या आईला तिच्या वेळी सोनी टीव्ही वर लागणाऱ्या 'आहट' मालिका पाहण्याचे डोहाळे लागले होते.>>>>>> अनामिकाचे किस्से खरे असु शकतात पण.

हे आहटचे वेड मला पण लागले होते. रात्री एकटीच पहात बसायची, मग साधे पाणी पिण्यासाठी उठायला पण भीती वाटायची. त्यातला एक एपिसोड बेक्कार होता. एक ख्रिश्चन माणुस गेल्यानंतर स्वतःच्या कबरीतुन उठुन लोकांच्या मागे रात्री अपरात्री फिरतो, त्यांना धरतो असे काहीसे त्या एपिसोड मध्ये होते. मग बरेच लोक एकत्र येऊन क्रॉस वगैरे आणुन त्याचा बंदोबस्त करतात. पण काही दिवसांनी काहीतरी फिस्कटते आणी तो कबरीतुन परत वर येतो. तो एपि पाहुन मी जाम टरकले होते.

रश्मी - तुम्ही the grudge हा चित्रपट पहा नक्की ... मला आजवरचा सर्वात भीतीदायक वाटलेला चित्रपट. कदाचित रात्री अंधार करून एकट्याने हेडफोन्स लावून पाहिल्याचा परिणाम असेल परंतु चित्रपट एकदम भन्नाट आहे

नको भुत्याभाऊ. मी भुतांच्या पेक्षाही त्या वातावरणाला जाम टरकते. लोक मला मुर्ख समजतील पण दिवसा सुद्धा मी एकटी रहायाला घाबरते. Sad

रश्मी - तुम्ही the grudge हा चित्रपट पहा नक्की ... मला आजवरचा सर्वात भीतीदायक वाटलेला चित्रपट. कदाचित रात्री अंधार करून एकट्याने हेडफोन्स लावून पाहिल्याचा परिणाम असेल परंतु चित्रपट एकदम भन्नाट आहे>> आजपर्यंत सर्वात जास्त टरकलेली ते हाच पिच्चर पाहिल्यामूळे.. देवा देवा.. ते ही दिवसाढवळ्या पाहूनही..
मला मूळात दिवसा भूत फिरायला लागले असले पिच्चरच आवडत नाही.. कमीने रात्रीपात्तुर मर्यादित राहा ना...पण नाही यांना डि जीवनसत्व कमी पडते ना..त्रास कुंकडला..
रश्मी पाहाच तू..

मी खुप घाबरते पण मला ऑब्सेशन आहे भयपट पाहायचं, वाचायच.. एकदा पुढ्यात आला कि सोडवत नाही पाहिल्या, वाचल्या बगैर..
एवढ्यात तर कुठलेच पिच्चर घाबरवेना.. त्यातल्या त्यात काँजुरिंग युनिवर्स बरी वाटते.. पहिल्या पिच्चरने वाट लावलेली..
आणि लेटेस्ट आलेला मराठी चित्रपट लपाछपी पन तसलाच.. ड्यांजर नाही पण त्यातले जंपिंग पॉईंट्स लक्षातच येत नाही म्हणुन नको तिथे माइल्ड हार्ट अटॅकची संभावना येते.

अनामिका, बरोबर आहे तुमचं. पुण्यातील माझ्या मैत्रीणीचे एक स्नेही अश्या प्रकारचे काही करतात. ते स्वतः असेच अनुभव सांगत. त्यांना विलक्षण थकवा आणि मानसिक त्रास होतो. त्यांनीसुद्धा यातून अंग काढून घेतले अखेर.

supernatural सिरीज पहा>> कोळून प्यायलीए मी. इथे बरेचदा रेकमेंड पन केलीए..

६००

हा किस्सा माझी आत्या जेव्हा काॅलेजला होती त्या वेळचा आहे. तिच्या हाॅस्टेलची इमारत फार वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या जन्माच्या आधी पासून एक हाॅस्पिटल होते. नंतर त्याचे रुपांतर मुलींचे हाॅस्टेल(डाॅक्टर,नर्स वगैरेंना ) रहाण्यासाठी केले गेले. मोठ मोठे हाॅल असल्यामुळे, त्यांच्या वेगळया अशा खोल्या नव्हत्या पण डाॅरमेटरी सिस्टीम होती. जुने वार्डच कदाचित ह्यांच्या रहाण्यासाठी सोय म्हणून वापरात असावेत. तिथे भुताटकीचे खुप प्रकार होत असत. बंद केलेल्या खिडक्या रात्री आपोआप उघडत, बाथरुमचे नळही खूप वेळा रात्री अपरात्री सुरू होत. खूप मुली रहात असल्याने त्यांना वाटले की कोणाकडून नजरचुकीने ह्या गोष्टी घडत असाव्यात. किंवा मुद्दाम एखादी चेष्टा करते का म्हणून पाळत ठेवली गेली, झोपतांना खिडक्या, नळ चेक केले जाऊ लागले, तक्रारी मेट्रनबाई पर्यंत गेल्या, तरीही हे प्रकार चालूच. एकदा आत्याला टाइफाॅइड झाला, मैत्रीणी डाॅक्टर, नर्सेस असल्याने त्यांनी तिला हाॅस्टेललाच ठेवून तिच्यावर उपचार सुरू केले. आत्याचा ताप वाढत होता, ताप चार झाला. बिचार्‍या मैत्रीणी थंड पाण्याच्या घड्या आलटून पालटून घालत होत्या. आत्या ग्लानीत होती, संध्याकाळची वेळ होती, तेवढ्यात एका मुलीला आत्याच्या बेडच्या पायाशी एक बाई उभी असलेली दिसली, तिला आधी वाटले की असेल एखादिची नातेवाईक, भेटायला वगैरे आली असेल, घड्या घालता घालता तिने विचारले, काय काम आहे? कोणाला भेटायचय का? तर ती काही बोलेना , फक्त नजर न हटवता आत्याकडे रोखून पहात होती. तिचा वेगळेपणा म्हणजे ती पांढरी साडी नेसली होती, पदर डोक्यावर अर्धवट घेतलेला आणि तिच्या डोक्याचा चमन गोटा. (खूप आधीच्या काळात विधवा बायका करत असत, असे ऐकले आहे. ) थोड्या वेळाने ती बाई तिथून निघाली व बाहेरच्या जिन्यावरून वर जायला लागली, मुलींना ते जरा विचित्र वाटले म्हणून तिचा पाठलाग केला, तर ती बाई गच्चीवर गेली, मुली गच्चीच्या जिन्यात थांबल्या की ही आता येईल खाली, दहा मिनिटे वाट पाहून मुली वर गेल्या तर बाई गायब. बरं खाली यायला दुसरी अजून वाट नाही, उतरायला तोच जिना जिथे मुली उभ्या. मुली बिचार्‍या खूप घाबरल्या. त्यांनीच ही गोष्ट आत्या पूर्ण बरी झाल्यावर तिला सांगितली. आत्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पण तिथलं काही बाही कानावर यायचं . मग सरकारी हस्तक्षेप होउन ती वास्तु बंद ठेवण्यात आली. मी काॅलेजला असतांना एका खासगी संस्थेने ती (माझ्या नाही) जिर्ण इमारत काॅलेज म्हणून वापरायला घेतली, परत काय झाले माहित नाही, काॅलेज पण बंद केले गेले. आता कानावर आलय की ती इमारत मोडून दुसरी बांधण्यात येणार आहे.

माझ्या चुलत बहिणीची मुलगी खुप डॅशिंग आहे अगदी टॉम बॉय म्हणायचे तिला! २००५-०६ मधे सुरतला तिच्या प्लेझरवरुन कॉलेज सुटल्यावर दुपारी २.३० च्या सुमारास घरी येत होती. वाटेत एका वयस्क गुजराथी बाईने लिफ्ट मागितली, भर उन्हात एक प्रौढा लिफ्ट मागतेय म्हणुन हिने तिला बसवुन घेतले. मधे मधे हिने विचारु पाहिले कुठे उतरणार वगैरे....पण ती बाई लवकर सांगेचना कुठे उतरायचय ते ! एका ठिकाणी सिग्ननलला गाडी थांबल्यावर हिने तिला विचारावे म्हणुन मागे वळुन पाहिले तर अर्थातच मागे कुणी नव्हते. बरं अशा गोष्टींवर विश्वास ही विश्वास ठेवणारी नव्हती म्हणुन हिने घरी आल्यावर आई-बाबांनाही सांगितले नाही...विसरुन गेली. काही दिवसातच हिला पोटदुखी सुरु झाली..इतकी की अक्षरशः गडबडा लोळेपर्यंत! सूरतमधल्या निष्णात डॉक्टरांना दाखवुन झाले....अपेंडीक्स, एक्स-रे, सोनोग्राफी सर्व चाचण्या नॉर्मल! मग तिची चिडचिड, विचित्र वागणं, .... आदिवासी भाषेसारखी भाषा!
घरचे घाबरले... धुळ्याजवळ 'खर्दे' नावाचे गाव आहे तिथे अशा बाधित व्यक्तिंना आणलं जातं आणि उतरवलं जातं! तिथे कुणी मांत्रिक, बाबा-बुवा नाही...पण काळ्या पाषाणातील दत्तमंदिर आहे. दुपारी १२ची आरती सुरु झाली की त्या आवाजाने हे असे लोक विव्हळु लागतात. त्यांना त्यावेळेस तिथले पुजारी चामड्याची चप्पल तोंडात धरुन मंदिराभोवती प्रदक्षिणा मारायला सांगतात. भर उन्हात अनवाणी पायांनी हे सर्व लोक/बाया असं करतांनाचं दृष्य विचित्र असते. तिथे हिने सांगितले की ती गुजराती बाई आणि तिने आणखी दोन बायकांना (एक नंदुरबारजवळच्या आदिवासी खेड्यातली आणि एक कर्नाटकातली) बोलवले होते...ह्या 'झाडा'वर रहायला.
अजुनही ह्या मुलीला असा मधुन मधुन त्रास होतो. मधली कॉलेजची वर्ष मग अशीच ड्रॉप घेउन गेली, नोकरीतुनही तिने १-२दा गॅप घेतलाय आणि आई-बाप हवालदिल!
रच्याकने, मला एक समजलं नाही... भुतं ही अशी एक दुस-याला बोलवतात की "ये हे 'झाड' चांगलं आहे" म्हणुन!!! Uhoh
*****
हा किस्सा मी पहिल्या 'अमानविय' धाग्यावर टाकला होता.
आता याच्यापुढची गोष्टः Proud
वर उल्लेखलेली कर्नाटकातील बाईची पण एक गोष्ट आहे.
ही मुलगी म्हणजे माझी भाची, आपल्या इतर मावश्या आणि मावसबहिनींबरोबर या मधल्या काळातच गाणगापुर दर्शनाला गेल्या होत्या.
दर्शन घेतल्यानन्तर त्या सगळ्या संगमावर स्नानासाठी गेल्या... पाण्यात खेळल्या. हिचे केस लांबसडक , अगदी कंबरेच्या खाली. आणि आजकालच्या मुलींप्रमाणे केस मोकळे सोडाय्ची सवय. नन्तर एका झाडाखाली या सगळ्या मुली कपडे बदलत होत्या... केस वाळवत होत्या. तेव्हा पाण्यात स्नान करत असलेल्या एका कानडी बाईचे म्हणे यांच्यावर लक्ष होते. ती बाई जादुटोणा करणारी होती, ती परत कर्नाटकात गेलयवर काही कारणाने तिच्या नवर्याने तिला मारुन टाकले. आणि ती मेल्यानन्तर हिच्या अंगात शिरली. असा काहीसा प्रकार! आता हे कुठल्या विश्वातले आहे हे माहीत नाही. पण सूक्ष्मांतले जगच निराळे असते म्हणतात.
खखोदेजा आणि ती बाई जाणे.

यानन्तर भाचीला तिचे आईवडील वर्षभर खर्द्याला सगळ्या पौर्णिमान्ना नेत होते. तिथे कोणी सुचवले म्हणून या मुलीचे थोडे केस कापून जमिनीत खिळ्याने ठोकुन दिले.
मग परत वर्ष दोन वर्ष गेली. पुन्हा तो खिळा निघाला म्हणे... आणि पुन्हा ही मुलगी असे अंगात असल्यासारखे वागू लागली. मग पुन्हा काहीतरी कायमचा बंदोबस्त केला.

हो आर्या, तुझ्या बहिणीचा हा किस्सा ( आधीच्या भागात ) वाचला होता.

ही मुलगी म्हणजे माझी भाची, आपल्या इतर मावश्या आणि मावसबहिनींबरोबर या मधल्या काळातच गाणगापुर दर्शनाला गेल्या होत्या.>>>>>> ज्यांना भुतबाधा झालीय, त्यांना गाणगापूरला नेतात म्हणे. आणी ज्या बायकांना झपाटले आहे, त्या बायका ओरडत, किंचाळत केस मोकळे सोडुन सैरावैरा पळत असतात. आणी ए दत्त्या सोड की मला , दत्त्या सोड म्हणून हंगामा करतात असे ऐकले आहे.

<<आणी ए दत्त्या सोड की मला , दत्त्या सोड म्हणून हंगामा करतात असे ऐकले आहे.<< हो हो अगदी! हे ही मी ऐकले आहे.
तिकडे खर्द्याच्या दत्तमन्दिरातही असेच प्रकार होतात.बाधित स्त्री पुरुष घुमत घुमत खाम्बावर, झाडान्वर चढतात, उलटे लटकतात... अन काय काय ऐकिवात आहे.

Pages