मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही नाही. लिला गान्धी म्हणायचय का ?
ती मागे असलेली लिला गान्धी नाहिये.>> अर्र नावात गोंधळ झाला माझ्या.. चेहरेपट्टी सारखीच वाटली मला..

>> ते एक अध्यात्मिक बापू आहेत त्यांच्या सारखे दिसताहेत निळूभाऊ नाचताना

तरीच मला वाटत होते कुणासारखे तरी दिसत आहेत. आता लक्षात आले Rofl Rofl no really Lol ...

जयश्री गडकर शर्ट पॅन्ट मधे>>>>>पाहिला विडीओ. मस्तच दिसताहेत.
निळु फुलेंचा नाच अचाट आहे.
अध्यात्मिक गुरुसारखे दिसताहेत ला +१

भले बरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर,
हे घरगुती पार्टीतील गाणे आहे,
गाणे छान आहे,
अलका कुबल जरीच्या साडीत, संपन्न घरातील बाई म्हणून छान दिसलीये,
पण ते गाणे ज्या पद्धतीने गाते ते फनी वाटते,
हॉल मध्ये लोक बसले आहेत त्या हॉल मध्ये गरगर फिरत गाणे म्हणते,
मध्येच स्वतःभोवती गिरक्या घेते,
परिवलन आणि परिभ्रमण शिकवायला या गाण्याचा उपयोग होईल,
अशोक सराफ बरोबर काहीतरी हिस्टरी असावी, गाण्याच्या सुरवातीला त्याच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत असते,

परीवलन आणि परीभ्रमण... लोल
बाय द वे मुलीला बघायला आलेले असताना मुलीने 'भले बुरे जे घडून गेले' अश्या थीम चे गाणे का गावे बरं? Happy
लग्नानंतर ४-५ वर्षांनी गायले तर एकवेळ ठीके.

बाय द वे मुलीला बघायला आलेले असताना मुलीने 'भले बुरे जे घडून गेले' अश्या थीम चे गाणे का गावे बरं? >>>>> असतील काही गोष्टी विसराव्या अशा.

अतुल पटवर्धन म्हणजे सिंबा हो, रावपाटील हा तुमचा सहकारी आयडी कुणाचा हे तुम्हाला कसे काय नाही ओळखू आले ? तुम्ही तर निष्णात आहात ना ड्युआयडी ओळखण्यात ?

अहो काय सिनेमाचं नाव वैगेरे द्याल का नाही.
भले बरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर ने शोधु का?>>>>>
"तुझ्या वाचून करमेना"

अहो काय सिनेमाचं नाव वैगेरे द्याल का नाही.
भले बरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर ने शोधु का? >> तुझ्यावाचून करमेना.. असं आहे सिनेमाचं नाव.

अलका आणि अशोक हॅप्पी कपल असतात आणि काहितरी बिनसते आणि एकाच घरात वेगळे रहायला लागतात. मग एक दिवस खूप पाऊस पडतो, भिजतात, फुलाला फुल भिडते.. "गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं... असं गाणं म्हणत भांडणे मिटतात Proud
झाली स्टोरी...

>> पण ते गाणे ज्या पद्धतीने गाते ते फनी वाटते

Lol अगदी अगदी

हॉल मध्ये पार्टी असताना भावी नवऱ्यासमोरच मुलीचा प्रियकर गाणं म्हणतो कि मी तुला इथून पुढे भेटायला येणार नाही, आणि भावी नवरा आणि बाकीचे लोक येड्यासारखे ऐकत राहतात. असं गाणं हवं असेल तर हिंदी "तेरी गलीयोंमे ना रखेंगे कदम" बघा.

<अशोक सराफ बरोबर काहीतरी हिस्टरी असावी, गाण्याच्या सुरवातीला त्याच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत असते,>
चित्रपट तुझ्यावाचून करमेना.
खुप छान चित्रपट आहे. हे गाणे तर अप्रतिम.
मी जुन्या मराठी चित्रपटांचा फार मोठा पंखा आहे. गाणी किती सुरेख असायची. सुवासिनी चित्रपटामधलं सीमा- रमेश देव यांच्यावर चित्रीत झालेलं 'राजहंस सांगतो' हे गाणं परवा अचानक ऐकलं आणि मग किती तरी वेळ ऐकतच राहिलो, चित्रपट पाहिला आहे हेदेखिल आठवलं.
जगाच्या पाठीवरची तर अचानक एखाद्या दिवशी आठवण येते आणि मग सगळी गाणी, निवडक सीन्स बघत बसतो. राजा परांजपेंचे सगळेच चित्रपट खुप भारी आहेत. वर लाखाची गोष्ट बद्दल आलच आहे, पण 'हे वेड मजला लागले' हे गाणं ज्या चित्रपटात आहे तो कोणता? कुणाला आठवतंय का?

हे तर कायच नाय. सगळ्या जमान्यासमोर हिरॉइनच्या एंगे़जमेंट मध्ये 'जैसे तूने तोडा मेरा दिल, तेरा दिल टूटेगा' आणि 'मेरे बाद अब किसको बरबाद करेगी' म्हणायला डेरिंग लागतंय.
https://www.youtube.com/watch?v=jlET2zboDrQ
२ मिनीटाला बघा. ज्याप्रकारे चाललंय त्याप्रकारे एखाद्या मुलीच्या मंगेतर ने आणि मुलीच्या आईबाबांनी या मुलाचे दात पाडून घरी पाठवलं असतं Happy

>> तेरी गालीयोंमे ना रखेंगे कदम. हे कदम कोण ?

एडीटले Wink त्याचे आडनाव कदम असेल. रखेंगे कदम म्हणजे स्वत:ला तसेच भावकीतल्या कुणाही कदमला पाय ठेऊ देणार नाही असे सांगतोय बहुतेक

>> २ मिनीटाला बघा. ज्याप्रकारे चाललंय...

सिरीयसली Rofl Rofl हे फक्त सिनेमातच

२ मिनीटाला बघा. ज्याप्रकारे चाललंय त्याप्रकारे एखाद्या मुलीच्या मंगेतर ने आणि मुलीच्या आईबाबांनी या मुलाचे दात पाडून घरी पाठवलं असतं Happy>> मला हेपन गाणं आवडायचं त्याकाळी ऐकताना. म्युझिक बिजीक काय असत ते..
अर्जुन रामपाल आपला क्रश होता कोणे एकेकाळी.. पण हे गाणं बघीतलेलं आठवत नाही.. काय कवायती चाल्ल्याय मस्त..

<<एखादा 75 वर्षांचा गावातला खडूस म्हातारा चालत नाही?>>
खडुस म्हातार्‍याला बघायला कोण येईल सिनेमा बघायला?
पण कल्पना चांगली आहे. सिनेमा नाही काढला तरी असे करायला हरकत नाही.
खडूस नसला तरी चालेल - ७५ वर्षाचेच काय, ६० वर्षाचे झाले की बळी देऊन टाकायचे - लोकसंख्या तरी कमी होईल. पेन्शनचे पैसे वाचतील, ज्ये. ना. डिस्काऊंट वाचतील.
मग हळू हळू बळी देण्याचे वय कमी करत करत ५०, नंतर ४० पर्यंत आणावे. म्हणजे काय, बांधकाम सुखरूपपणे होईल, अगदी भेसळ असलेला माल वापरला तरी. बिन भेसळीचे मिळतेच काय भारतात आजकाल? त्यावर तोच एक उपाय!

चोळी काढल्यावर बाईंना नसेल का थंडी वाजली? अक्षरशः हावरटासारखा 'पोळी दे' म्हटल्यासारखं 'दे दे चोळी दे' म्हणतोय. अरे काही स्त्रीदाक्षिण्य-बिक्षिण्य...

>> 'पोळी दे' म्हटल्यासारखं 'दे दे चोळी दे' म्हणतोय

त्या आधी "काय बी दे चालंल" म्हणतो. म्हणजे तिच्याकडे अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीही नाही हे माहित असूनही

पण 'हे वेड मजला लागले' हे गाणं ज्या चित्रपटात आहे तो कोणता? कुणाला आठवतंय का?>>> अवघाची संसार

पण 'हे वेड मजला लागले' हे गाणं ज्या चित्रपटात आहे तो कोणता? >> हे गाणं तर सुरेख आहेच,
पण रूपास भाळलो मी, सांगू नको कुणाला पण छानच आहे.

Pages