मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by atuldpatil on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"दिसते मजला सुखचित्र नवे " हे गाणं आमच्या लग्नाच्या विडिओ मधेही आहे. ते गाणे लग्नाच्या प्रसंगासाठी चपखल आहे !!

कुणाला "दोन्ही घरचा पाहुणा" आठवतो का? मला हा खूप धमाल चित्रपट होता यापलिकडे काहीही स्मरत नाही.

तसेच " जा शोध जा किनारा" हे बाबुजींच अप्रतीम गाणं असलेला चित्रपट कोणता? जयश्री गडकर होत्या बहुतेक त्यात.

"मानला तर देव" चित्रपटात आगीतून वाचवताना त्या माणसाचा चेहेरा जळून विद्रूप होतो असे दाखवलेले होते. तो चित्रपट पाहताना मला ताप भरल्याचे आठवते .... तो भीषण चेहेरा पाहून... यातही एक छान गाणे होते. ... तमाशा मधे रंग उधळायला गेलेल्या नवर्याची वाट पहाणारी सोशिक पत्नी असे फ्युजन गाण ..लावणी आणि करूण भावगीत...

आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते.

हा हा हा...

त्याआधीचा एक सिन मिस केलात. गाडीत बसलेला शिवा तिला काही तरी बांधायला दे ग असे सांगत असतो. ती एकदम हळू आवाजात (म्हणजे प्रेक्षकांनी ऐकू नये म्हणून) चोळी देऊ का विचारते तर त्यावर शिवा मोठ्याने काय चोळी, दे की ग, चालेल असे बोलतो...लोल लोल....

गडकर बाईंचा सीन पहिला, कसला आहे तो....
त्या हिरो आणि गडकर बाईंचे नाते शेवटपर्यंत कळले नाही
नवरा नसतो हे नक्की, पण मग तो तिला डोरलं का घालायला लावतो...
प्रश्न प्रश्न प्रश्न.... आता पूर्ण चित्रपट पाहायला लागणार

हो एकदम हावरटासारखा चेहरा करून "दे दे" करतो.
आणि हि बाई पण चोळी बांधल्यावर कशी मुंडावळ्या बांधल्यासारखी दिसते म्हणून त्याला सांगते ... कपाळाला हात smiley

अदिती, त्याला इल्लीगल खून होऊन(आता 'लिगल खून असतो का कधी' विचारु नका.) प्रेत दाखवायचं नसल्याने पुरलं.
नंतर खून उघड झाल्यवर दोघांना एकत्र जाळलं असावं.

जयश्री गडकरचाच अजून एगद्करि,
तिचा भाऊ तिला मंगळागौरी साठी घरी न्यायला येतो आणि तिचा खुन करतो, (हा सैराट चा मूळ चित्रपट म्हणावा का?)
तिकडे मंगळागौरीची पूजा सुरु होते आणि बाई परत उठून बसतात, तिकडे जाऊन रात्र जागवतात वगैरे.

एकंदरीत मेलेल्या माणसाने शेवटचे भेटून जाणे हि तेव्हाची आवडती थीम असावी

बब्बो! तो चोळीचा सीन अगदीच अ आणि अ आहे. चोळीचं बाशिंग आणि भुताशी गांधर्व विवाह .... जबरीच आहे कल्पनाशक्ती.

तो शिवा तिचा बालमित्र टाईप असेल असं वाटतंय. जयश्री गडकरचं लग्नं नाही बहुतेक झालेलं, झालं असतं तर तिचं पुन्हा कसं लग्न दाखवतील? मराठी संस्कृती बुडेल ना अशानं!

रुणुझुणु त्या पाखरा
जा रे माझ्या माहेरा
हे अप्रतीम गाणं आहे ... "टिळा लावते मी रक्ताचा" मधे!

<<आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते.<<<
अगागागा .. Rofl

आणि दिसते मजला सुख चित्र नवे गाण्यात. ते नवरा बायको असतात ना...मग तो बागेच्या एक साईड ने आणि ती दुसऱ्या साईड ने का येते??? घरातून एक च वेळी निघाले असतील ना एकत्र??? आणि तो ज्या पद्धतीने तिच्या गळ्यात किंवा खांद्यावर हात घालून त्या लांब रोड वरून चालत जातो असं कोण जातं???>> सशलने चिरफाड केल्यावर गाण पाहायला तूनळीवर गेली आणिबाग आल्याआल्या पहिला प्रश्न हाच पडला मला Biggrin

टिने, मला पण आवडतं ते गाणं Proud>> चला आहे तू माझ्या बोटीत म्हणायची.. हिहिहि

भूताने पिकअप करण्याचा सीन १.५० मिनीट पासून पुढे चालू आहे. चोळी बांधण्याचा सीन अंदाजे १.५५ ला असेल.>> किती उथळ पुरलय प्रेताला बघीतलं का.. हसुन हसुन डोळ्यात पाणी आलय म्झ्या.. बाकी जयश्री बाई लय सुंदर होत्या बा..

एका जुन्या चित्रपटात नऊवारी साडीतली , घरंदाज पण जुन्या चालीरिती मानणारी नायिकेची आई, तिच्या वडिलांन्ना अचानक एक-दोन इंग्लिश वाक्य ऐकवून आश्चर्याचा धक्का देते तो सीन फार आवडला होता.

एका चित्रपटात जयश्री गडकर यांनी "आधुनिक काळातली मुलींची स्टाईल" दाखवण्यासाठी शर्ट पॅंट घालून डान्स केलाय. सवय नसल्याने डोळ्याला झेपतच नाही. अगदीच कसं कसं होतं ते बघताना.

बाकी जयश्री बाई लय सुंदर होत्या बा.. >>>>>>>>>>>>>>>
बाई कधी कधी खूप आवडतात, कधी कधी जाम डोक्यात जातात.

एकदा मला जयश्री बाई आणि त्यांचे पती ट्रेन मध्ये भेटले होते, मी मिरज ला चाललो होतो ते kolhapur ला जात होते बहुदा शूटिंग असावे काहीतरी.
२००४-५ चा सुमार असावा, थकल्या होत्या , वाईट वाटले त्यांच्याकडे पाहून

>> दिसते मजला सुख चित्र नवे...

चाल सुद्धा तीन तीन अक्षरे एकत्र बांधून.. दिसते मजला सुखचि त्रनवे... असे आहे ते.
आणि त्यातच दुसरे गाणे दोन दोन अक्षरे एकत्र बांधून... आली माझ्या घरी हिदि वाळी

आणि ती सुखचि त्रनवे वाली हिरोईन पण किती साधी लुकडी. पण तरीही छान वाटते गाण्यात. काही म्हणा, गाणं आवडतंच तरीही ते आपल्याला.

सगळ्यात ठोकळी हिरेविन म्हणजे ते अजिंक्य देव च गाणं नाही का??? स्वर्ग त्या पुढे फिका पडे, की असंच काही. सत्यघटना होती... दोघे ट्रेन मधून सुसाईड करतात....

त्या बयेचा नवरा बोलतोय आपण जीव देऊया....तर तिच्या डोळ्यात फक्त पाणी आणि म्हणते इतकं झालंय काय.... तोंडावर भीती, दुःख, राग यातलं काही म्हणता काही नाही.....अख्खा पिक्चर ती तसल्या चेहऱ्याने वावरली आहे. दिसायला छान आहे पण नो acting.......

आणि एक पिक्चर होता ना. पसंत आहे मुलगी. नितीश भारद्वाज आणि वर्षा उसगावकर.
नितीश भारद्वाज ला पाहिले की डोळ्यासमोर सुदर्शनधारी कृष्णच यायचा. मनातली ती इमेज अजून कोणी रिप्लेस नाही केली.रामानंद सागर कृष्णा मधल्या स्वप्निल जोशी ने नाही आणि द्वारकाधीश मधल्या विशाल कारवाल ने पण नाही.

<<एका चित्रपटात जयश्री गडकर यांनी "आधुनिक काळातली मुलींची स्टाईल" दाखवण्यासाठी शर्ट पॅंट घालून डान्स केलाय.< चक्क???? जयश्री गडकर शर्ट पॅन्ट मधे? Uhoh

Pages