मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by atuldpatil on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅन्ट की जम्प सूट काय होतं त्यात रंजना क्युट दिसलेली...
अस्सा नवरा नको नको असं काहीसं गाणं होतं

आणि तो प्रोफेसर धोंड वाला पिक्चर...काहीतरी गुंतागुंतीची कथा होती त्यात.
माधुरीचा दिल तेरा आशिक जरा तसा होता बहुतेक,

आर्या तो व्हीडिओ उघडत नाहीय इकडे. नवरे सगळे गाढव या मुव्ही मधला आहे का???? फुलपाखरं आली सहली वर वाला?????

मुळात उषा नाईक हिरोईन आहे असं केव्हा वाटलं नाही.... आणि सुटलेलं पोट आणि पोटावर चढवलेली ढगळ जीन्स. आणि टाईट टॉप.... त्यावर वेणी आणि टिकली असला प्रकार तिने घातलाय त्या मुव्ही मध्ये

ते मराठी विनोदी सिनेमे म्हणजे भीक नको पण कुत्रे आवर असे होते. चंबूगबाळे असं नावातच आवराआवर करण्याची सूचना देणारा सिनेमा आला होता. त्यांचे पोस्टर अतिशय दरिद्री असत. अशोक सराफचा भला मोठा सुटलेला चेहरा. त्यात त्याने चंबू केलेला (म्हणजे विनोदी). प्रत्येक पात्र विनोदी एक्स्प्रेशन मध्ये. ती उषा चव्हाणची ड्युप्लिकेट आली होती ती फारच ईनोदी वाटायची अशा पोस्टर्सवर (प्रिया अरूणच्या आधीची ).

घनचक्कर नावाचा प्रेक्षक कसे पडतील हे सूचित करणारा सिनेमा आला होता. हा सिनेमा लोक कसे काय बघू शकतात असा प्रश्न पडायचा. एक दिवस पुण्यालगतच्याच गावात गेलो होतो. त्यांच्याकडे व्हिडीओवर हा सिनेमा लागला होता. मी न राहवून विचारलं " आवडला का " तर म्हणाले अहो आमच्याकडे कधी पण लागतो. शंभरच्या पेक्षा जास्त वेळा बघून झालाय. मी म्हटलं एव्हढं काय आहे ? तर उत्तर मिळालं त्यांचा एक मुलगा आहे त्याला खूप आवडतो म्हणून तो दिवसभर लावतो. मग सिनेमा लावला की सगळे येऊन बसतात.
त्या मुलाला बोलवलं तर कळालं हा तो वेडा होता.

त्या बाई वेस्टर्न मध्ये चांगल्या दिसतील. फक्त प्रिंट ऑन प्रिंट मुळे सगळा कचरा होतोय.
प्लेन ब्लॅक शॉर्ट ब्लाउज चेकर्ड ब्लॅक व्हाईट पलाझो वर घातली तर शी विल बी फाईन. ओल्ड इरा सोनाक्षी किंवा हुमा कुरेशी.

चंबूगबाळे असं नावातच आवराआवर करण्याची सूचना देणारा सिनेमा आला होता. >>>>>> Rofl

अतुलजी, आली माझ्या घरी हीदि वाळी अशा काळेंचं आहे ना गाणं??? अष्टविनायकमधलं नाहीये.

चोळीचा सीन सगळ्यांना भारीच आवडलाय.

जयश्री गड्करचा अजुन एक अशी एक रात्र होती. त्यात पण भुत आहे.

हिदी वाळी :):)
लोल
तसंच ते फेमस गाणं आहे ना
होणा रसू नमी त्याघरची

<< निळू फुले हिरो आहे???<< हो हो , निळुभाउ हिरो! झोकान्ड्या देत आहेत काही सेकन्द! Lol
उषाबाईन्ना अश्या अवतारात पाहुन त्यान्ना नशा चढली असे दाखवाय्चे असेल.
जरा वाह्यात आहे गाणे अशी कुठल्याश्या धाग्यावर या गाण्यावर चर्चा ही झाली होती.

भारी हा धागा..
आली माझ्या घरी हीदि वाळी अष्टविनायकमधलं च आहे..

अजून एक अ आणि अ गाणं होतं..अशोक सराफ आणि अरूणा ईरानी चं. शोधून टाकते ईथे..

गाणी बर्याच वेळा हिंदी गाण्यांच्या चालीवर मराटी शब्द अशी असायची..

हो का? अर्र!!! मग आशा काळेच्या दिवाळी गाण्याशी मिसकनेक्शन केलं मी.
कोणतं ते बघते गुगलुन.

अशीच एक रात्र होती >> हो.
ह-या ना-या झिंदाबाद हा पण भूताचा सिनेमा होता. निळू फुले आणि राम नगरकर. पुण्यात झालेल्या सत्य घटनेवर आधारीत आहे.

दे दणादण मधली लक्षाची हिरविण कोण ? लैच चिरका आवाज. उषा चव्हाणचा मेणाचा पुतळा पाघळल्यावर कसा दिसेल डिट्टो तशी होती ती.

चक्क???? जयश्री गडकर शर्ट पॅन्ट मधे?
.. >>>> का ब्रं ? मी तर ललिता पवाराना पण पाह्यलंय प्यान्ट शर्ट मध्ये

जयश्री गडकर शर्ट पॅन्ट मधे>>> सर्च दिला तर मिशिवाल्या काकांचा फोटो येतोय. आणि "एक मानुस रागवलेलं" पँट शर्टमधे आणि बाजुला गडकर.

त्या गुपचूप गुपचूप मध्ये रंजना सुरेश भागवत (नुक्कड फेम) चा चशमा काढते आणि तुम्ही चष्मा नसताना किती सुंदर दिसता हो असे म्हणते त्यावेळी शरद तळवलकर "देखणेच आहेत ते" असे परफेक्ट टायमिंग ने म्हणतात.
काही कलाकारांचे परफेकट टायमिंग हाच यूएसपी होता मराठी पिक्चराचा.

अय्यो
पी एस पी ओ नही जानता Happy
http://www.rediff.com/movies/slide-show/slide-show-1-mahabharats-krishna...>>

ते rediff चालु है का अजुन, मला वाटलं ते आता उत्खनन केल्यावरच मिळेल अशा स्थितीत पोहोचलं असेल.

<<एका चित्रपटात जयश्री गडकर यांनी "आधुनिक काळातली मुलींची स्टाईल" दाखवण्यासाठी शर्ट पॅंट घालून डान्स केलाय.< चक्क???? जयश्री गडकर शर्ट पॅन्ट मधे? >>> हो... आणि त्या गाण्याचे बोल आहेत "राया आता रिक्शा होउद्या सुरु... ओ राया आता रिक्शा होउद्या सुरु...!!" खुप मस्त गाणं आहे ते... सिनेम - एक गाव १२ भानगडी

हैल्ला, भारीय हे डान्स! जयश्रीबाई छान दिसत आहेत. गणपत पाटील पण दिसले मागे.
ती डाव्या बाजुची मागे नाचणारी नेहमी पाहिलीय जुन्या मराठी सिनेमात.

Pages