मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यातल्या नटाला ( किंवा कोरिओग्राफरला, to be fair to him) बहुतेक प्रेक्षकांच्या सामान्य ज्ञानाबद्दल काहीतरी मोठा गैरसमज होता. धरणी आणि आकाश यातलं नेमकं वर काय आहे आणि खाली काय आहे, हे प्रत्येक वेळी त्याने ठासून हात वर आणि खाली दाखवून सांगितले आहे. >>>
एक चष्मा आणि नऊवारी ऐवजी पाचवारी पातळ असे बेमालूम वेषांतर करते त्यामुळे नवरा तिला आजिबात ओळखत नाही (दवाखाना उघडताना डॉक्टरचे नाव लिहावे लागत नाही का हा तपशील विसरा)! >>

Lol

आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते.

>>>>आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते.
Rofl

चोळीके पिछे क्या है .. ला रांगड मराठी उत्तर आहे हे! मान वर करून सांगा सगळ्यांना Biggrin Rofl
हा पिक्चर कुठला? बघितला पाहीजे.

त्या वरुन आठवलं , लक्ष्या आणि विजय कदम (?) अतिशय वाह्यात एक चित्रपट आहे . तो मांडीवर तीळ असणारी मुलगी शोधत असतात.>> यावरुन आठवल कि याचा एक हिंदी रिमेक सुद्धा आ।ए.. आहात कुठं Lol>>>

देव आनंदचाही एक चित्रपट आहे ना, त्याने दिग्दर्शन केलेला..त्यात त्या करोडोंकी जायदाद की इकलौती वारिस लडकीला शोधत असतात. आणि तिला ओळखायची खूण काय तर तिच्या मांडीवर गुलाबाच्या फुलाचा tattoo असतो Happy योगायोगाने ती देवच्याच ऑफिसमधे त्याची पी.ए. असते. तिची ओळख पटवण्यासाठी देवसाब तिला 'तू ते dress वर उचलून कोणतंतरी गाणं म्हणत नाच करायचीच ना, तो मला आत्ता इथे ऑफिसमधे करून दाखव' अशी ऑर्डर सोडतात आणि त्यामुळे तिची ओळख पटते Happy

चोळी पिक्चर Lol
त्याकळच्या मराठी सूना म्हणजे काय बोलावं! Lol

देव आनंदचाही एक चित्रपट आहे ना, त्याने दिग्दर्शन केलेला..त्यात त्या करोडोंकी जायदाद की इकलौती वारिस लडकीला शोधत असतात. आणि तिला ओळखायची खूण काय तर तिच्या मांडीवर गुलाबाच्या फुलाचा tattoo असतो Happy योगायोगाने ती देवच्याच ऑफिसमधे त्याची पी.ए. असते. तिची ओळख पटवण्यासाठी देवसाब तिला 'तू ते dress वर उचलून कोणतंतरी गाणं म्हणत नाच करायचीच ना, तो मला आत्ता इथे ऑफिसमधे करून दाखव' अशी ऑर्डर सोडतात आणि त्यामुळे तिची ओळख पटते Happy
>>>>>>

सच्चे का बोलबाला.

देव आनंद, हेमा मालिनी, जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, स्वप्ना, प्रेम चोप्रा.

विलनीश मामंजीं किंवा छळवादी सासूबाईंना साप चावल्यानंतर त्या सापाला मनोभावे नमस्कार करून त्याचा आशिर्वाद घेऊन साप चावलेल्या मामंजीं किंवा सासूचे विषारी रक्त वँपायरसारखे तोंडाने चोखून मग.. सासूच्या पार्टीतल्या नवर्‍याचे आपला पराक्रम पाहून मतपरिवर्तन झालेले बघितले की चक्कर येऊन पडण्याचे जिवितकार्यही अनेक सुनांनी कैक वर्ष केले आहे.
एखाद्याला साप चावल्यावर असा जीव वाचवता येतो हे लाईफ सेविंग लेसन आम्ही मुलांनी लहानपणीच बघून ठेवले होते. आमच्या कॉलनीतला एक मुलगा बांधकाम चालू असलेल्या बंगल्याच्या हौदात पडला तेव्हा त्याला धामण चावली म्हणून तो ओरडत होता. लोक जमा झाल्यावर आमच्यातला एक जण पुढे होत म्हणाला मी त्याचा पाय चोखून विष काढून टाकतो, तर त्याच्या काकाने त्याच्या डोक्यात जोरदार टपली हाणत 'अय व्हय मागं.. आलाय मोठा विष चोखणारा...डॉक्टरला घेऊन ये पळ' म्हणत दंडाला खेचून पिटाळले.

इथे आठवण निघाली म्हणून " दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखीते" बघितलं युट्युब वर. ती हिरॉइन कोण वंदना पंडित आहे कोणीतरी आणि हीरो महागुरू सचिन.
(तेव्हाची फॅशन बघता एकदम हाय राइज बेल बॉटम पांढरी पँट घालून सचिन ची गाण्यात एण्ट्री. ती पँट बघून पहिला विचार माझ्या मनात आला की त्या पँट्स ना केव्हढा मोठा क्रॉच असायचा Lol ). गाण्याची सुरूवात ती हिरॉईन एका स्टुडियोत गाणं म्हणताना होते. इलेक्ट्रिक गिटार, बाँगो(?), अकॉर्डियन इत्यादी वाद्यं एकाच लयीत वाजवत आहेत लोक (गाण्याच्या म्युझिक मध्ये काहीच जाणवत नाही पण मी काय त्यातली एक्स्पर्ट नाही)!! मग हिरॉईन आणि हीरो थेट बागेत भेटतात.
"प्रीत तुझी माझी फुलावी, ह्या फुलत्या वेली परी"
असं ती हिरॉईन एका मोठ्या झाडाखाली उभी राहून झाडाच्या खोडाला कुरवाळत म्हणते आहे! Lol

आता पूर्ण व्हिडीयो बघितल्यावर कळलं. सचिन बरोबर बागेत बागडणं हे ती स्टुडियोत गाणं म्हणताना स्वप्नरंजन करते.
"मी तुझीया मागून यावे आस ही माझ्या उरी" असं म्हणताना ती लिटरली मागून येऊन मिठी मारते सचिन ला. मग त्यानंतर
" तुजसंगती क्षण रंगती निमीषात मी युग पाहते" ह्या ओळीच्या वेळी सचिनच्या गळ्यातल्या मोठ्या गणपतीच्या पेन्डन्ट ला नमस्कार केल्यासारखं ते पेन्डन्ट डोळ्यांनां लावते. त्या मोठ्या पेन्डन्ट वर फोकस केलेला एक शॉट ही आहे. धार्मिक भावना: चेक!
गाण्याच्या शेवटी सचिन आणि शरद तळवळकर रेडियो वर ते गाणं ऐकताना दाखवले आहेत. इकडे स्टुडियोत हिरॉईन मनात मांडे खातेय, तिकडे सचिन थोड्या गंभीर चेहेर्‍याने पुढचा विचार करतोय तर शरद तळवळकर मात्र " अगदी शालीन, सुंदर, सुशील मुलगी सून म्हणून मिळाली हो" अशा अर्थाचे भाव चेहेर्‍यावर आणत आहेत त्यांच्या सिग्नेचर स्टाईल मध्ये.

हे गाणं आमच्या लग्नाच्या कॅसेट मध्ये घातलं होतं!!!

हाब, सशल Lol

सशल - आख्खे वर्णन धमाल आहे. आणि शेवटची लाइन तर सुपरलोल. ते गाणे अष्टविनायक मधले असल्याने पेण्डण्ट्ला नमस्कार वगैरे असावे. गाणे ऐकायला मात्र सुरेख आहे.

इलेक्ट्रिक गिटार, बाँगो(?), अकॉर्डियन इत्यादी वाद्यं एकाच लयीत वाजवत आहेत लोक (गाण्याच्या म्युझिक मध्ये काहीच जाणवत नाही >>> लोल

हाब-

नवर्‍याचे आपला पराक्रम पाहून मतपरिवर्तन झालेले बघितले की चक्कर येऊन पडण्याचे जिवितकार्यही अनेक सुनांनी कैक वर्ष केले आहे >>

हो सुनांना चक्कर येण्याचे दोन मार्गः
- नवर्‍याचे आपला पराक्रम पाहून मतपरिवर्तन झालेले बघितले की चक्कर येऊन, किंवा
- मतपरिवर्तन झाल्यावर नवर्‍याने केलेल्या पराक्रमामुळे Wink

हाब सशल Biggrin
सशल एक अ आणि अ रिव्हू झालाच पाहिजे.
व्हिडिओ कॅसेट मध्ये नक्की कुठल्या विधीला हे गाणं आहे हा प्रश्न विचारल्याशिवाय रहावत नाहीये Proud

सशल Rofl

टिने, मला पण आवडतं ते गाणं Proud

आणि दिसते मजला सुख चित्र नवे गाण्यात. ते नवरा बायको असतात ना...मग तो बागेच्या एक साईड ने आणि ती दुसऱ्या साईड ने का येते??? घरातून एक च वेळी निघाले असतील ना एकत्र??? आणि तो ज्या पद्धतीने तिच्या गळ्यात किंवा खांद्यावर हात घालून त्या लांब रोड वरून चालत जातो असं कोण जातं???
सचिन पिकनिक ला आलेला असतो कायतरी पिवळा पांढरा टीशर्ट घालून नि त्याची बाय लग्नाला ... भरजरी साडी नि गजरे घालून.
निदान त्याला झब्बा किंवा सफारी तरी घालायला द्यायची होती म्हणजे लग्नाला च आलेत हा तरी फील आला असता प्रेक्षकांना!

अजून एक गाणं आहे तुझी माझी जोडी जमली .
त्यात अशोक सराफ आणि किशोरी शहाणे आहे ना...त्यात काय डान्स आहे तो??? पूर्ण शरीर विचित्र हलवत, मध्येच पिटी च्या तासाची कवायत करणे आणि ते करता करता प्रेम करणे....
मध्येच एक सीन मध्ये अशोक सराफ चा ब्राऊन रंगाचा शर्ट वर होतो आणि त्याचं सुटलेलं पोट बाहेर पण येतं... नाही अगदी मी 6 पॅक्स वगैरे अपेक्षा करत च नाही .... पण हे असं हात वर केले की खाली लटकणारं पोट???? नॉ चॉलबे

आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते. >>> Rofl

शिकलेली बायको, अंगाई किंवा तसम चित्रपट पाहताना त्या काळात suspension of disbelief मुळे कसलेही प्रश्न पडत नव्हते.
डोंगरची मैना चित्रपटात आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी जयश्री गडकरला उकळत्या तेलात हात बुडवायला लागतो. आता अशी प्रथाच काही ठिकाणी आहे, असं कळतं.
सुगंधी कट्टा या चित्रपटात डॉ लागू क्रांतिकारक असतात. ते कुठल्याशा सरकारी तिजोरीवर दरोडा घालून मोठी रक्कम पळवून आणतात. पोलीस त्यांच्या मागावर त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचतात, तेव्हा जयश्री गडकर हे सगळे पैसे लपवते. कुठे? आपल्या लांबसडक केसांत.

खूप मजेदार धागा..

दादा कोंडकेंचा अजून उल्लेख नाही कोठेच. तीव्र निषेध..!! माझे दुर्दैव म्हणून माहेरची साडी हा चित्रपट बघायचा योग आला होता. कोल्हापुरच्या शाहू टॉकीज मध्ये हा चित्रपट बरीच वर्ष चालला. त्याच थेटराबाहेर नात्यातले कोणीतरी २-३ तास लाईनीत उभे राहून (आणि काही भांडणे करून) ह्याची तिकिटे आणली होती. म्हणून जाणे भागच होते. झोपायची इच्छा असून झोपू शकलो नाही कारण आजूबाजूला फार रडारड चालली होती. गावाकडून ट्रकच्या ट्रक भरून लोकं हा चित्रपट पहायला यायचे. आख्ख थेटर रडत असायचे. चित्रपट निर्माता विजय कोंडकेने शंभराव्या का दोनशेव्या शोला चित्रपट पहायला आलेल्या प्रत्येक बाईला साडी वाटली होती.

हा विजय कोंडके म्हणजे दादांचा पुतण्या. त्यावेळी दादांनी हा चित्रपट आणि त्यांचा एक चित्रपट (बहूतेक पळवापळवी) असे दोन्ही प्रदर्शित करायचे ठरवले होते. रडवा चित्रपट आधी लावू, ३-४ आठवड्यात रडवा असल्याने तो चित्रपट उतरेल आणि मग आपला हसरा चित्रपट लावू असे दादांचे गणित होते. पण एरवी कधीच न चुकणारे दादा, ह्यावेळी सपशेल तोंडावर आपटले. माहेरच्या साडीला एवढा रिस्पान्स मिळाला की दादांना त्यांचा स्वःताचा चित्रपट प्रदर्शित करायला खूप थांबावे लागले. ह्या सगळ्या आठवणी त्यांनी त्यांच्या "एकटा जीव" ह्या पुस्तकात लिहील्या आहेत. नंतर माहेरच्या साडीच्या यशाने हुरळून जाऊन त्यांच्या पुतण्याने (विजय कोंडके) दादांशी वितूष्ट घेतले होते असाही उल्लेख आहे.

त्यातल्या त्यात राजा गोसावींचे आणि शरद तळवलकरांचे चित्रपट पहायला मजा यायची. त्यांचे टायमिंग फार जबरदस्त होते. त्यांचा आणि रंजनाचा एक चित्रपट (त्यात "ही कशाने धुंदी आली" हे गाणे आहे) त्यात राजा गोसावी "आयला" शब्दाचे महत्व सांगतात...तो भन्नाट सिन होता. राजा गोसावींनी निगेटिव्ह पण विनोदी अंगाने काम केलेला चित्रपट म्हणजे "पंढरीची वारी" जो त्यांच्यामुळेच सुसह्य झाला. त्यात धरीला पंढरीचा चोर हे गाणे होते. (ह्या गाण्यात विठ्ठलाचे काम करणारा मुलगा खरोखर स्पेशल चाईल्ड होता...तो त्या चित्रपटाच्या निर्मात्याचा मुलगा होता असे कळले. तो नंतर गेला असे सकाळच्या मुक्तपिठातील त्याच्या आईच्या लेखामुळे कळले). शरद तळवलकर, राजा गोसावी, अशोक सराफ, निळू फुले यांच्यामुळे बरेचसे मराठी चित्रपट त्यातल्यातात सुसह्य झाले.

राजा गोसावींचा अजून एक मुव्ही आहे... त्यात त्यांना हिरोईन कदाचित पद्मा चव्हाण...तिच्याशी लग्न करायचं असतं. पण बाप अट घालतो, की लग्न करायचं असेल तर 1 लाख रुपये मी देतो ते अमुक एक दिवसांत सम्पवून दाखवायचे.
मग राजा गोसावी नाना उचपत्या करतात. जसे घोड्यांच्या रेस वर वगैरे पैसे लावताना मुद्दाम हरणार्या घोड्यावर पैसे लावतात. पण नेमका तो घोडा जिंकतो आणि अजून 3 लाख मिळतात...कॉमेडी आहे हा मुव्ही...
मला आवडला होता.
त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे

हेही बहुतेक या मुव्ही मधील च असावं

चोळीवरून आठवलं.

गुपचुप गुपचुप सिनेमात पद्मा चव्हाण आणि श्रीराम लागूंचं लफडं असतं. तो तिच्यासाठी कपडे आणतो त्यावेळचे संवाद इतके चावट आहेत. ते बघून मला धक्का बसला होता हे आठवतंय.

https://www.youtube.com/watch?v=QBZ2z3g4ZVc इथे 1:33:41 पासून ते 1:35:39 पर्यंत बघा. Lol

पण अशोक्/लक्ष्या ने जो पिक्चर इरा बदलला त्याला तोड नाही. त्यासाठी त्यांना हजार बटनं उघडी वालया केसाळ छात्या नि सुटलेली पोटं माफ. Happy

लाखाची गोष्ट. राजा परांजपे आणि राजा गोसावी. रेखा आणि चित्रा.
हाही हिंदीत आलाय .मालामाल नावाने. नसीरुद्दीन आणि सतीश शाह.
आता शोधताना कळलं की दोन्हीची मूळ कल्पना ही आहे.

आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते. >>> Lol
मस्त धागा.
आशा काळेचा मी वर उल्लेख केलेला सिनेमा थोरली जाऊ. प्रिया तेंडुल्कर धाकटी जाऊ असए.
कृष्णधवल मधे नवरे सगळे गाढव मस्त आहे.
लक्ष्या, अशोक सराफ आणि डॅमीट कोठारे चे सिनेमे पण अचाट.
कवठ्या महाकाळ Lol
गाणी पण भारी असायची.
बम चिकीन चिकीन बम
बम चिक बबमबम

Pages