बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकापेक्षा जास्त मते दिली तर ग्राह्य धरतात का? मी स्मिताला भरपूर मते दिली तर शेवटी I am not a robot असा मेसेज आला.

मला पण फुस्कीच टक्कल दिसलं होत...मग मध्येच परत व्यवस्थित दिसले केस...काय माहीत .. त्याने केलं असावं हेअर वेविंग का काय... मेघा शरा हगुबाई आ यांचे तर ओरिजिनल वाटतात...

अर्र्र्र्र्र्र्र! सगळे गेले फिनालेला? Uhoh
कोर्टाच्या टास्कमुळे बिबॉने दर्शकांची स्मृती रिफाईन करायचा प्रयत्न केलाय. जेणेकरून लोक त्यांचा निर्णय बदलू शकतील. कारण इथे सगळे एकामेकांवर आरोप करणार म्हणजे पहिल्यापासून सगळं बाहेर निघणार.

आजचा no eviction एपिसोड पाहिल्यावर असं वाटतं आहे की bigg boss marathi आपल्याला कापूसकोंड्याची गोष्ट सांगत आहे आणि सर्व प्रेक्षक हळूहळू कंटाळून झोपी जाताहेत...

सगळे एकामेकांवर आरोप करणार म्हणजे पहिल्यापासून सगळं बाहेर निघणार. >> सगळे कुठे एकमेकांवर? सगळे मिळून मेघावर असंच होत आलंय आतापर्यंत.

Now you will see पुरानीवाली मेघा coming back!
हाउसमेटसमध्ये नॉमिनेशन/इलिमिनेशन घेतले तर सगळ्यांच्या हिटलिस्टवर असू नये (आहेच ती.... पण स्वताहुन त्यांच्या हातात कोलीत देउ नये) म्हणून जरा दबून होती ती.... तिच्या सो कॉल्ड ट्रायोला धरुन रहात होती पण आता who cares मोडमध्ये जाईल बहुतेक ती!
आता घरातल्यांची भिती नाही आणि बाहेरच्या सपोर्टचा तिला अंदाज असावा!
आता लड बप्पू!
सगळ्यांची मापे व्यवस्थित ज्याच्या त्याच्या पदरात घाल!
धम्माल मज्जा येईल आता!
त्या पत्रकार परिषदेच्या प्रोमोमध्ये झलक दिसतीच आहे....
We want that fearless fighter meghaa back!

किती फेक आहे ती मेघा..जेव्हा सगळ्यांना वाटल की,सई आता जाणार आहे तेव्हा तिला सांगत होती की ती एकमेव माझी बेस्ट फ्रेंड आहे अॅन आॅल..

आणि ती फायनलमध्ये पोहचली तर लगेच इथून बाहेर गेल्यावर तिच तोंडही नाही बघणार वैगेरे...
असो हा तर एक रिअलटी शो आहे पण आपल्या रिअल जगात अशीच फेक माणसं पुढे जातात...

आणि खर्याला कुणी वाली नाही..हेच खरं ...

Jari megha jinkel asa vatat asal tari shevatachya 2 madhe tari smita yavi asa manapasun vatat..

एकापेक्षा जास्त मते दिली तर ग्राह्य धरतात का? मी स्मिताला भरपूर मते दिली तर शेवटी I am not a robot असा मेसेज आला >> tyavar tick kara ani vicharlelya prashnach uttar dya. Pudhe parat 9 votes karu shakata.

बाप रे ! मेघा क्षणात एक आणि क्षणात दुसरं बोलत होती Uhoh
एकिकडे फायनल ला लाईट बंद करताना मी फक्त तुला इमॅजिन केलं असं सईला सांगत होती आणि ती पण फायनल ला आल्यावर लग्गेच तिच्याविरूद्ध काहितरी बोलत बसली आहे शर्मिष्ठा सोबत. Sad

>>>>लग्गेच तिच्याविरूद्ध काहितरी बोलत बसली आहे शर्मिष्ठा सोबत. ---

मेघा काय म्हणाली ते नीट ऐका जरा. मी नेहमी सई आणि पुष्की दोघांशीही लॉयल रहायचे मात्र ते फक्त एकमेकांशीच लॉयल राहणार. ते दोघे एकमेकांना वाचवणार तर मी आणि तु (शर्मिष्ठा) एकमेकांना वाचवले तर लगेच मला डिसलॉयल म्हणतात. मला काय ते मुर्ख समजतात काय. सईने सगळ्या टास्कमध्ये माझ्याबरोबर राहुन स्वतःचा फायदा काढुन घेतला आणि आता तिच म्हणते की मेघा टास्क चुकीचे खेळली. मेघाच्या डोक्यावर खापर फोडून सई स्वतःला चांगले प्रुव करु पाहतेय. आणि पुष्करही मेघाला खाली दाखवण्याची संधी सोडत नाहीए. आता यात मेघा काय चुकीचे बोलली.
तिला दिसतेय ना की सपु ने कसे सोईस्कर रंग बदललेत. सर्वांनाच दिसतेय. आस्ताद तर मारक्या बैलासारखा आरोप करतो मेघावर. मेघा आहे म्हणुन टिकलेय. दुसरी कोणी त्याच्या चार कानाखाली लावुन बाद झाली असती खेळातुन. शर्मिष्ठाच एक नेहमी मेघाला सपोर्ट करते तर मेघानेही तिला सपोर्ट का करु नये. सपु एकमेकांचे आहेत तर मेघाला कुणी नको का. किती तो मेघाबद्दल आकस. नीट एपिसोड्स पाहायचे नाहीत. अर्धवट पाहुन काहीतरी कीबोर्ड बडवायचा.

फिक्स आहे का आणि थत्त्यांना ते कळण्याइतकी त्यांची पोहोच आहे का ते माहित नाही पण सध्या तरी पुष्कीच जिंकण्याचे चान्सेस वाटतायत मला. Sad मेघाला सपोर्ट खूप असला तरी तिच्याबद्दल भरपूर निगेटिविटी निर्माण झालेली आहे आता, आस्ताद, सई पण निगेटिवच आहेत. स्मिता, शराला चॅनल जिंकू देणार नाहीच. सो तोच लीस्ट ऑब्जक्श्नेबल वाटत असावा चॅनल ला.

पूनम म्हणते तसं ऑडीटींग वगैरे होत असेल तरच वोट्स ला अर्थ आहे थोडक्यात, बाकी थत्ते पत्रकार होते म्हणून असतील त्यांचे असं वाटतय पण काही गोष्टी कै च्या कै वाटल्या, म्हणे भूषणला अस्तादपेक्षा १ लाख वोट्स जास्त असून अस्तादला ठेवला, भूषण्ला घालवला.
इतका काउंट वगैरे थत्तेंना समजला असेल तर भूषणने बाहेर कांगावा केला असता कि !

>>सो तोच लीस्ट ऑब्जक्श्नेबल वाटत असावा चॅनल ला.<<
तर मग त्या न्यायाने स्मिता जास्त डिझर्विंग आहे, पुष्कर पेक्षा. पण चॅनलचं काहि सांगता येणार नाहि. थत्तेकाकांच्या मते - अब पब्लिकका रोल तो खतम हो गया है. ट्रॉफिवर पुष्करचं नांव कोरायला घेतलंहि असेल... Lol

>>>Anil Thatte reveals BB secrets and according to him winner is fixed , Fuski ! Sad>>> बिग बॉसचा दुसरा सिझन आणणार असतील तर ही घोडचूक ठरेल.

आत्ता पहिला एपिसोड. कोर्ट टास्कमध्ये हे अपेक्षितच होतं ,नेहमीचं टार्गेट.
पण कोणी ते पाहिलं का,मेघा रात्री श रा ला जे सांगत होती,सई म्हणे श रा ला आऊट करू म्हणून , नंतर तिघे पाहून घेऊ वगैरे(म्हणजे नंतर सई,पुष्कर मेघाला काढणार), हाच आणि असाच प्लॅन सईचा होता . किती अलर्ट राहावं लागतं खरंच गेममध्ये. मेघाला सईला बाहेर भेटायची इच्छा न होणे अगदी साहजिक आहे .
आणि ते सई , पुष्करचं तू बोल तू बोल, प्रचंड पकाऊगिरी. का दाखवतात, एडिट नाही का करता येत.

Anil Thatte reveals BB secrets and according to him winner is fixed , Fuski ! Sad>>पुष्करचे मी फॅन्स अगदी कमी पाहिलेत सोमी वर . पुष्कर विनर झाला तर पुढचे सिजन्स कोणी पाहणार नाही नक्की.

किती फेक आहे ती मेघा..जेव्हा सगळ्यांना वाटल की,सई आता जाणार आहे तेव्हा तिला सांगत होती की ती एकमेव माझी बेस्ट फ्रेंड आहे अॅन आॅल..
आणि ती फायनलमध्ये पोहचली तर लगेच इथून बाहेर गेल्यावर तिच तोंडही नाही बघणार वैगेरे...
असो हा तर एक रिअलटी शो आहे पण आपल्या रिअल जगात अशीच फेक माणसं पुढे जातात...
आणि खर्याला कुणी वाली नाही..हेच खरं ...>>>>>>

काय चूक आहे त्यात? जर दर वेळेस तिला सगळे जण त्याच त्याच मुद्द्यांवरून बोलत असतील ज्याची खरंच काही गरज नाहीये. चुका तिने केल्या असतील तर फक्त तिनेच नाही केलेल्या, बाकीच्यांनी पण भरपूर केल्या आहेत. पण फक्त तिलाच ऐकावं लागतंय. परवा सई त्या पुष्करला उशांच्या टास्कच्या वेळी मेघाने कसे पैसे जास्त सांगून खोटेपणा केला वगैरे सांगत होती. तेव्हा तुझं तोंड काय शिवलं होतं आणि हात बांधले होते कां? तेव्हा न बोलता सामील झालीस नां मग आता तिच्यावर सगळं टाकून हात वर का करतेयस?

राया मस्त पोस्ट. इथे मेघा हेटर्सना दुसरं काही दिसत नाही.

थत्तेंचा व्हिडिओ पाहिला नाही. वर जे वाचलं त्यानुसार त्यांनी असंच पिल्लू सोडलं असणार असं वाटलं. खरंच पुष्कर जिंकला, तर मी आधीच बोललो होतो, म्हणत स्वतःचा भाव ते वाढवून घेतील. पण आज घडीला जर खरंच बिबॉ ने पुष्करला विजेता ठरवलं असेल, तर थत्तेंच्या या वक्तव्याने बिबॉला डॅमेज कंट्रोलची (!) संधी मिळेल.
फायनलिस्ट कोण कोण आहेत ह्याचं चित्र जसं जसं स्पष्ट होऊ लागलं, तसं तसं मेघा बॅशिंग वाढलेलं दिसलं. कारण उघड आहे.. सगळ्यांच्या दृष्टीने तीचं घरात राहणं म्हणजे अंतीम विजेतेपदापासून दूर जाणं ह्याची खात्री पटणं असं वाटतंय. अचानक वासरात लंगडी गाय म्हणीप्रमाणे स्मिताची पॉप्युलॅरीटी वाढण्याचं कारण तेच असावं. त्या स्वप्नील काळे फोन प्रकरणापासून घरातल्या सर्वांनाच मेघाचं सोमि वरचं वर्चस्व जाणवलं.. आणि त्यांच्या दृष्टीने हे भितीदायक होतं ! त्यामुळे मेघाची मतं कशी दुभागता येतील असा प्रयत्न सुरु झाला. स-पु-आ उघडपणे प्रयत्न करताना दिसले ! कालच्या कोर्टरुम टास्क मधे स्मिता सुद्धा मेघावर बॉडी शॅमिंग वरुन तिला बोलली .. जे बाकीचे सदस्य देखील बोलले असतील, पण ते सध्या घरात नसल्याने मेघा फक्त आयती तावडीत सापडली ! आता मेघाचं भवितव्य फक्त वोटिंग वर अवलंबून आहे.
आजच्या प्रेस कॉन्फरन्स सारख्या टास्क मधे अचानक इलिमिनेशन आणलं तर आश्चर्य नाही वाटणार..
रच्याकने, सगळ्याच चॅनेल्स वाल्यांना 'शनाया-गॅरी' फॉर्म्युला का आवडतो हा प्रश्न पडलाय Wink
मध्यंतरी स्पर्धकांसाठी गाणी सुचवा वगैरे झालं तेव्हा, बॅकग्राउंडला कुठेतरी राजेश आणि रेशम ओरडून ओरडून 'मैं करु तो साला कॅरॅक्टर ढीला है" गातायत असं वाटलं Wink

ती हगाहगी ची प्रतिक्रिया मस्त होती...लोल..!!

बाकी सई पुष्कीने अजून रडावे आणि एकमेकांना हगाहगी करावे यासाठीच फेक नॉमिनेशन केले असावे. सईड्या नंतर तर जग जिंकल्याच्या थाटात हगाहगी करत होती.

बाकी सई सेफ झाल्यावर मेघाची चिडचिड बघितली. तिचे म्हणणे बरोबर वाटले. पण या लेवलला सईने असा विचार करावा याचे खतपाणी मेघानेच घातले होते. त्यामुळे जसे करावे तसे भरावे असे वाटले. शरा सुद्धा उगाच मेघाला तुझे बरोबर आहे वगैरे असे बोलत होती. खर तरं या वेळेला तिने उलटा स्टॅड घेऊन मेघाला ऐकवायला पाहिजे होते की जसे तू आधी प्लान करायचीस तेच तुला भोवतंय..!! त्यामुळे सर्व फेक लोकं हरावेत आणि स्मिता जिंकावी असे वाटते.

बाकी योग यांनी पूर्वी म्हणाल्याप्रमाणे मेघा जर जिंकली तर लांड्यालबाड्या करणार्‍याला प्रोत्साहन दिल्यासारखे वाटेल. म्हणून माझे मत स्मितालाच...!!

मेघा जर जिंकली तर सई आणि पुष्की चा जळफळाट पहायला मजा येणार हे माञ नक्की ... >> बर्‍याच जणांचा होणार आहे म्हणजे खरंतर होतच आहे तो अजूनच वाढेल. Lol

आपले बहुमोल मत मेघालाच द्या.

Pages