बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरा ला सोळा सोमवार करून काय फायदा झाला, (डिव्होर्सच झाला ना )असा पर्सनल रिमार्कही मारला होता स्मितानी, ज्यावर कधी नव्हे ते अस्ताद एम्सीपी काळेही रिअ‍ॅक्ट झाले Happy
नवीन Submitted by दीपांजली on 19 July, 2018
>>>>>

अरे हे विसरलोच... !!!

स्मिता ही खुप काही वागली बोलली आहे..
फक्त एवढच की व्हिलन ग्रुप मध्ये तिच्या पेक्षा महारथी होते ( आहेत) ज्या मुळे तिच वागण, बोलन तेवढ दिसल नाही.
त्याचा आर्थ तिने काहिच वागल बोलल अस नाही...

लक्षात ठेवा, राजेश, रेशम, सुशांत यांच्यासारख्या दबंगगिरी करणार्‍या लोकांना सामोरं जाणं सोपं नाही, ते पण मायनॉरिटीत असताना.>>> +१००
म्हणुनच मेघाच खरी विनर आहे !!

हा ढुस्की का इतका वैताग आणतोय..सै ला मस्त गप्प केले मेघाने कॉन्फरन्स मध्ये. तिचा नूरच पालटला नंतर. एकदम समेटाच्या गोष्टी करायला लागली.

पुष्कर जेव्हा मेघा la म्हणाला की तू माणसं गमावशील.. तेव्हा अस वाटल की एखाद्या पत्रकाराने त्याला social media दाखवावा म्हणजे कळेल त्याला कोण माणसे कमावतंय अन कोण गमावतंय.... असं झाल असतं तर त्याने पुन्हा त्याच घाणेरडं तोंड तरी उघडलं नसते.. अन्‌ आपला मनस्ताप कमी झाला असता...

आज पुष्कर आणि सई ला काय मस्त शालजोडीतले लगावले मेघानी !! Happy मानले मेघाला.
मेघा सांगात होती की सईला मी आधीच म्हण्ले आहे की अता उरलेला सगळा वेळ तू पुष्कर बरोबरच काढ. कारण इथून बाहेर पडल्यावर तुला पुष्करचा वेळ मिळणार नाही. पण बाहेर गेल्यावर माझा सगळा वेळ तुझ्या साठीच असेल

पत्रकार परिषद ठीकठाकच झाली पण तेच तेच आरोप पुन्हा पुन्हा मेघावर केले गेले. फेक आहे, डिसिव्ह केलंय इ इ. सईला काही हार्ड हिटिंग प्रश्न विचारले त्यावर तिनं अत्यंत गुळमुळीत उत्तरं दिली. पुष्कर म्हणे की बरं झालं आता इथे मी मनातलं बोलू शकेन .... आणि इतकं करून मेघाविरुद्ध गेले महिनाभर जे मुद्दे जाता येता मांडतोय तेच पुन्हा मांडले. त्याला उत्तर देताना मेघानं आपली मतं ठाम मांडली आणि ती वाघिण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं.

आज पत्रकार परिषदेत मेघानं एक गौप्यस्फोट केला की ते उशा शिवायच्या टास्कमधले पैसे १३००० होते त्याऐवजी जास्त सांगणे ही सईची कल्पना होती. पण सई ते सोईस्कररित्या विसरून त्याचं खापर निर्लज्जपणे मेघाच्या डोक्यावर फोडत होती. शेवटी न रहावून मेघानं सरळ सांगितलं की ही सईचीच कल्पना होती आणि त्यानंतर सई गप्प बसली.

अस्ताद म्हणे मला नाईलाजानं मेघाशी बोलावं लागणार बाहेर गेल्यावरही. त्याला बाकी इतर कोणाही सदस्यांबद्दल प्रॉब्लेम नाहीये. एमसिपी पुरुषांना स्ट्राँग स्त्रिया झेपत नाहीत.

रड्या पुष्की म्हणत होता की मेघा लविंग आहे, केअरिंग आहे पण फेक आहे त्यामुळे त्याला आता तिच्याशी बोलावसं वाटत नाहीये. आज पूर्ण एपिसोडभर तो हीच रेकॉर्ड पुन्हा पुन्हा लावत होता. पत्रकार परिषदे आधी, पप मध्ये आणि पप नंतरही. आणि तो बोलताना इतका काही अनकंफर्टेबल असतो की त्याला बघणं अत्यंत त्रासदायक होतं. सई आणि तो मिळून याच विषयावर किती दळण दळत बसले होते.

सईड्या मी कसं बोलू...
पुष्की बोल ना
नाही गं सईड्या कसं आहे ना की इतकी फेक आहे ना ती
पुष्की सोड ना, आता शेवटचे दोन दिवस राहिलेत, ते आनंदात घालवूयात
बरोबर आहे सईड्या पण कसं आहे ना .....

अरे काय पकाऊगिरी आहे ही.

मेघा अति बोलते ते सहन होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे बाळांनो, तिचा नाही. तुमच्यासाठी तिनं का बदलावं. ती बोलणार - तुम्हाला ते ऐकायचं नसेल तर तिच्यापासून दूर रहा नाहीतर कान बंद करून फिरा. दॅट इज नॉट मेघाज लुक आउट. यु अ‍ॅडजस्ट! डोन्ट अ‍ॅक्युज हर.

पुष्कर इतका किरकिर आणि पिरपिर का करत होता ते लक्षात आलं. त्याला आता मेघाची भिती वाटतेय फिनालेला. त्याच्या आणि ट्रॉफिच्या मध्ये मेघा येणार असं त्याला वाटतंय आणि तो जबरदस्त टेन्शनमध्ये आहे. फिनालेपर्यंत पुष्कीबाळ असंच इम्मॅच्युअर वागत रहाणार असं दिसतंय. त्याला स्ट्रेस घेताच येत नाही कारण ती मॅच्युरिटीच नाहीये त्याच्याकडे.

मामी चा सत्कार समारंभ करायला हवा मेघाकडून..
इतका कस काय लिहता बुवा तुम्ही एखाद्याबद्दल..

कुणी टीका केली की,आहेच मामी स्पष्टीकरण द्यायला...

मेघा काल रात्रीच बोलत होतीना की सई ला बाहेर गेल्यावर भेटणार नाही अन आज पत्रकार आले की वेगळंच..पक्की दोन तोंडी आहे..

मामी- डिटेल्सबद्दल धन्यवाद. पुष्कर पक्का इन्सिक्युअर झालाय. आस्ताद खरंच टिपीकल अहंकारी पुरुष आहे. त्या दोघांची लायकी मिडियाही जाणुन आहेच. सईला मिडियासमोर खोटे पडल्याची काही लाज वाटणार नाही. ती सध्या वेगळ्याच स्पर्धेत आहे. स्मिता, शरा साइडला गेल्यात.

छा रही है बस मेघा! टाळ्या, टाळ्या!

पत्रकार परीषद म्हणावी तशी रंगली नाही पण again it was all about Megha, Sai & Pushki
स्मिता आणि शरा तर तिथे होत्या की नाही हा प्रश्न पडावा इतक्या साईडलाइन झाल्या होत्या
आस्ताद पण बराच वेळ नुसतेच लुक्स देत बसला होता.... शेवटी जरा गाणे वगैरे म्हणायला लावून थोड फुटेज दिले त्याला!

मेघाला खुप माप पदरात घालता आली असती लोकांच्या पण अजुनही ती थोडी सावध पवित्रा घेउनच आहे .... तरी थोडी का होइना तिने तिची चमक दाखवलीच!
ते एपिसोड बघून भेटायच की नाही ते ठरवा वगैरे तर एक नंबर होत!

मामी (नेहमीप्रमाणेच) मस्त पोस्ट!

Morpankhis, त्या एखाद्या पत्रकाराऐवजी तुम्ही गेला असतात त्या परीषदेला तर स्मिताला जरा फुटेज तरी मिळाले असते!

आज पहिल्यांदा पाहिला बिगबॊस अस्ताद आणि मेघा दोघेच रिअल वाटतात. बाकिचे हिंदीवाल्यांची स्ट्रॅटेजी कॊपी करतायेत असे वाटले.
अस्ताद ने इम्युनिटी वाली कविता मस्त लिहिली आणि गायली.

सईड्या मी कसं बोलू...
पुष्की बोल ना
नाही गं सईड्या कसं आहे ना की इतकी फेक आहे ना ती
पुष्की सोड ना, आता शेवटचे दोन दिवस राहिलेत, ते आनंदात घालवूयात
बरोबर आहे सईड्या पण कसं आहे ना .....

अरे काय पकाऊगिरी आहे ही.

नवीन Submitted by मामी

>>>>>>>>>>>>>>>>>>>>.

एक नंबर मामी... मस्तच लिहलय.. Happy

मेघाने सईवर मस्त उलटवलं उशा टास्कचं, बोलती बंद झाली तिची.

मला स्मिता आवडत असली तरी जेव्हा ती चुकली तेव्हा मी इथेच नाही bb fb पेजवर जाऊन त्या त्या वेळी लिहिलं आहे, पुष्करला लाथ दाखवली तेव्हाही, सईला नॉमीनेट केल्याचा जाब विचारला तेव्हाही आणि मेघाला का एवढे पैसे खर्च करतेस दान कर म्हणाली तेव्हाही मी लिहून टीका केली, इथेही आणि तिथेही.

पण गुण दोष असं जेव्हा मी बघायला जाते तेव्हा स्मिताचे गुण मला जास्त दिसतात तिच्या दोषापेक्षा.

अनेक दिगगज grp मध्ये असताना, ही काय कधीच बाहेर जाईल dumb आहे, असं गृहीत धरून सतत तिला नॉमीनेट करणाऱ्या लोकांना मस्त चपराक की ती इथपर्यंत पोचली. सतत स्मिताला टार्गेट करून बडबडून शेवटी तिचे गुण गायला म मां ना भाग पडलं. काहीच कोणाच्या मराठी सामान्य लोकांच्या खिजगणतीतही नसलेल्या स्मिताचं हळूहळू फॅन following वाढत गेलं, भले तिचा पी आर उत्तम असो पण सो मि वर तिला नावं ठेवायचे, ते आता कौतुक करतायेत हा तिचा प्रवास आहे. पत्रकारांनी काल तिला तेच सांगितलं, आ सांगत होता स्मिताला.

हेच स्मिताचं यश आहे, तिचा ग्राफ bb मध्ये कस्पटासमान समजली जाणे ते दखल घ्यायला लागणं इतका मोठा आहे. सर्वात नावं ठेवणाऱ्या स पु ला पण कबूल करायला लागलं की ती एक चांगली मुलगी आहे आणि तिच्याशी मैत्री करायला हवी होती.

फक्त तिने आता जास्त पैसे वगैरे ऑफर झाले तरी फिनालेतुन बाहेर पडू नये.

अमिताच्य अथोड्या फार चुका झाल्या पण माणुस म्हणुन त्या होणारच की .. त्यात काय एवढं
ती मुळात स्वभावाने वाईट , कपटी वगैर्रे वाटत नाही

अगदी त्या सोळा सोमवार कमेंट्बद्दल पण तिचा फार संताप नाही आला... मुळात आपण काय बोलतोय ते तिला कळतंय का असं वाटलं..
म्हणून ती मला डंब वाटते..

या वयात इतकं निखळ - निरागस खरंच कोणी असेल असं वाटत नाही मला हे ही खरंच!

फक्त तिने आता जास्त पैसे वगैरे ऑफर झाले तरी फिनालेतुन बाहेर पडू नये.
<
पैसे ऑफर करतत? म्हणजे ??
पब्लिक सपोर्ट /वोटींग नुसार ती नक्की टॉप २ मधे असणार आहे.

ते हिंदी bb मध्ये करतात ना, एकदा बघितलेलं अमुक रक्कम स्वीकारून तुम्ही फिनालेतुन बाहेर पडा etc, अशी ऑफर स्वीकारू नये. एकत्र बसवून विचारतात ना, तसं काही करतील की काय असं वाटतं, सर्वांनाच विचारतात.

डीजे मला ती पहिल्या तिघांत असेल का याची शंका वाटतेय. मनात मात्र मेघा पहिली, स्मिता दुसरी यावी असं वाटतंय.

बाहेर काय असेल ही कल्पना तिलाही नाहीये एवढी, confidence नाहीये, हल्ली आ समजवताना दिसतो तिला, फार down to earth वाटते तशी. काल आ म्हणाला अग पत्रकार म्हणाले ना तुझं फॅन following वाढत चाललंय तेव्हा तिने मनापासून नमस्कार केला.

मला समहाऊ वाटतंय रक्कम घेउन बाहेर पडणार्‍यांमधे पहिली स्मिता असेल , दुसरी शरा असेल
तिसरा अस्ताद असला तर असेल.

मेघा , सई पुष्की असतील फायनलिस्ट Happy

Pages