बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो पुष्की आधी तर जस्मिन, फेलीशा करायचा. आता सतत सैड्या करतो. > +१०० सुरवातीला तो सतत सई समोर जस्मिन चे नाव घ्यायचा. अता तो जस्मिन चेच काय पण फेलिशाची सुद्धा आठवण काढताना दिसला / दाखवला तरी नाहीये.
आस्ताद दादानी परत कोर्ट रूम च्या टास्क मधे स्मिताला 'टपली' मारलीच. तुम्ही मधेच 'रूड' बोलून जाता आणि समोरच्याला दुखावता म्हणे. आणि स्मिताने देखिल काहीही स्पष्टीकरण / प्रतिवाद न करता लगेच, 'हो का, सॉरी सॉरी' म्हणुन्न्न टाक्ले आस्ताद दादाला. कीती दुबळी/ बावळट वाटली स्मिता :रागः
आस्ताद ने स्मिताला 'रूड' म्हणणे म्हण्जे खरेतर गल्ली क्रिकेट खेळणार्‍याने सचिन तेंडूलकरचा गेम कसा वाईट आहे म्हणण्यासारखे आहे.

आस्ताद दादानी परत कोर्ट रूम च्या टास्क मधे स्मिताला 'टपली' मारलीच. तुम्ही मधेच 'रूड' बोलून जाता आणि समोरच्याला दुखावता म्हणे. आणि स्मिताने देखिल काहीही स्पष्टीकरण / प्रतिवाद न करता लगेच, 'हो का, सॉरी सॉरी'

>>>> मी तर. स्मिताच्या हो का ? ला खुप हसलो.
आकाने प्रश्न विचारला तर ही बोलते होका? Lol

आस्तादच मग म्हणाला, हा प्रश्न आहे उत्तर द्या Proud

स्मिता खरंचं फार इनोसंट आहे. तो व्हिडीओ तिला दाखवला नसता तर ती मेघा विरुद्ध काही बोलली नसती. मेघाने पण चूक स्वीकारून लगेच माफी मागायची ना, श रा ला बोलावलं गेलं नसतं नाहीतर. तिने सांगितलं स्पष्ट खरं काय ते. मेघा स्वीकारत नव्हती मात्र. रात्री स्मिता आली ती एकटी असताना तेव्हा सॉरी म्हणाली आणि स्मिताने पण माफ केलं तिला. स्मिताला पण वाईट वाटलं बघून, ती एकटी रडत होती.

मेघा म मां ना म्हणाली त्या दिवशी की मी स्मिताला बोलले ते मलाच कसंतरी वाटलं, मी माफी मागितली पण ह्या प्रकारे बोलली हे स्मिताला तिने नक्कीच सांगितलं नव्हतं नाहीतर bb नी क्लीप दाखवली नसती आणि काल स्मिताने आरोप लावला नसता.

आ तर टपलेलाचं मेघाला कसं बोलता येईल आणि पु, स पण. स्मिता मात्र ज्येनुईन होती. मी तर म्हणते तिने सई वर पण आरोप करायचे होते, आ वर पण. अरे हो आ आणि पु वर करता येत नव्हते ना आरोप.

आ चं ऐकून न घेता स्मिताने दुर्लक्ष करून त्याला भाव दिला नाही कधीतरी, हे बरंचं झोंबलेलं दिसलं त्याला Lol

स्वरुप, मस्त पोस्ट आहे.
मेघाहेटर्स अजून पण खूप आहेत. पण ते फक्त त्यांना मेघा आवडत नाही इथपर्यंत बोलून थांबतात. इथे काही लोक असे आहेत जे मेघाचा तिरस्कार करतात असं सांगतात आणि पुढे इथे मेघाला सपोर्ट करणारे किंवा मेघा आवडते असं म्हणणारे लोक कसे आंधळे आहेत, भक्त आहेत आणि त्याहीपेक्षा 'पेड भक्त' आहेत हेच जास्त बोलतात. शोबद्दल बोलण्यात त्यांना फारसा इंटरेस्ट नसून इथल्याच लोकांवर पर्सनल टीका करण्याची हौस जास्त दिसते. एकूणच ज्या पोटतिडकीने ते असं सगळं करतात त्यावरून त्यांनाच हे करण्याचे पैसे मिळतात की काय अशी शंका यायला लागलीये.

काही नाही ग चिन्मयी एकूण माबो वरच्या काही पब्लिक ला चांगली चर्चा चांगले चाललेले धागे बघवत नाहीत. अश्या काड्या करायची सवयच आहे जणू. अनुल्लेखाने मारणे.

बि बॉ यांनी पुन्हा एकदा पुष्की नावाचा रबर स्टँप वापरून शेवटी स्वताच्या मनाचे केले. Wink हरकत नाही, शरा सोडता बाकी सर्व फिनाले मध्ये जाण्यास या ना त्या कारणाने पात्रच होते. (लोकुर पॉवर कं चा हात नाकारता येत नाही..)
श रा हा डबा मेघा ईंजीन ला जोडला गेलेला असल्याने ते क्रमप्राप्त होते.
काल कोर्ट रूम मध्ये मात्र पुन्हा एकदा आस्ताद च्या अंगात आले होते.. मेघा वि. एकंदर आविर्भाव, स्वर, देहबोली फारच आक्रमक होती. फिर्यादी पेक्षा त्याचा वकील सनी देओल मोड मध्ये होता. मेघा कितिही खोटे वा ईकडचे तिकडचे बोलत असली (ज्याची आता खरे तर सर्वांनाच सवय असायला हवी) तरिही आस्ताद चा आक्रमकपणा जरा ओव्हर द टॉप होता. 'आवाज खाली'... वगैरे पुन्हा त्याच अ‍ॅब्युझिव मोड मध्ये गेला तो. गरज नव्हती त्याची.
स्मिता ला कधि कुणावर रागवायला जमते का? असा फिर्यादी असेल तर आरोपी ला चिंता नाही. Wink
पुष्कर जज म्हणून बराच संयत व संतुलीत वाटला, जे दाखवले त्यावरून.
सई नेहेमी प्रमाणेच शरा व मेघा वि. तोफखाना ऊघडून बसली होती..
असो. शेवटी सई व नंतर प्रेक्षकांना धक्का देऊन बि बॉ ने या घरात खरा बॉस कोण आहे ते दाखवून दिले.
स.पु. ने काल रे. आ. मोमेंट अनुभवली असावी (राजेश ला अचानक व नंतर रीतसर बाहेर काढले तेव्हा!).. पु. बाळा ला ट्रॉफी, सई, आणि जास्मिन सगळच हवं आहे असं दिसतय.. मानबा-२?
सगळा कार्यक्रम आटोपल्यावर त्या आधी व नंतर मेघा ने पुन्हा एक्दा स्वताच्या बोलण्यातील कोंट्राडीक्शन दाखवून दिली. 'मै समय हूं...' च्या कालातीत घोषणेची आठवण झाली... काही गोष्टि कधिच बदलत नसतात.. Proud

पत्रकार मंडळी नक्कीच बि बॉ ने लिहीलेले (म्हणजे बि बॉ च्या टीं ने सोशय मिडीया वर वाचून कॉपीपेस्ट केलेले) प्रश्ण विचारणार.. त्यापेक्षा 'द ग्रेट' पत्रकार थत्ते यांच्या बरोबर प्रश्ण ऊत्तर चर्चा ठेवायला हवी होती.. मज्जा आली असती जरा. किंवा निदान बाहेर गेलेल्या प्रत्येक स्पर्धका कडून एक प्रश्ण मागवून घायला हवा होता.. तेव्हडेच जास्त रेलीवंट व ईंटरेस्टींग होऊ शकेल..

आता ऊरलेले तीन दिवस सर्वांची पि आर लढाई असेल.. भारता बाहेर वूट चालत नाही असा अनुभव आहे. (निदान युके मध्ये तरी नाही) व्यावहारीक अर्थाने विजेता कोण ठरेल या प्रश्णाला (माझ्या पुरता) विशेष अर्थ ऊरलेला नाही. तरिही कोण जिंकतो या मूळे एक ठराविक संदेश (समज किंवा गैरसमज) नक्कीच पसरतो/दिला जातो असे मला वाटते. पण स्पर्धेचा विजेता हा खरेच जनमानसाचा कौल आहे/ आरसा आहे का सगळेच मॅनिप्युलेटेड आहे हे नक्की माहित नसल्याने त्यावर भाष्य न केलेले बरे.
स्मिता ही माझ्यासाठी या स्पर्धेची विनर आहे.

(झी मराठी लिटील चँप मध्ये फेमस पंचरत्न होते तेव्हा कार्तिकी विजयी झाल्या नंतर जो काही गदारोळ व धुरळा उठला होता, दोन्ही बाजूने तो सर्वांच्या लक्षात असेलच. आज कार्तिकी व्यावसायिक जगात नेमकी 'कुठल्या' पातळीवर आहे तर आर्या, प्रथमेश हे कुठे आहेत हे जगजाहीर आहे. त्यामूळे अशा स्पर्धांचा विजेता आणि त्याचे पुढील व्यावसायीक यश, करीयर हे दर वेळी एकमेकास पुरक असतात असेही नाही. एक वेगळी ओळख निश्चीत प्राप्त होते. पण त्या साठी स्पर्धे बाहेरील पब्लिक ने (फॅन्स, हितचिंतक, प्रेक्षक, पेड सपोर्टर्स, ई....) किती व काय करावे वा कुठल्या थराला जावे हे ज्याचे त्याने ठरवावे.

असो. या निमित्ताने ईथे संबंधित चर्चा व पोस्ट्स वाचायला व लिहायला मजा आली. स्पर्धा आहे म्हटल्यावर चुरस असणारच. पण 'टास्क' सोडल्यास बि बॉ चा बराचसा खेळ भावनिक पातळीचा होता. त्यामूळे ईथे शाब्दिक मारामारी, कुरघोड्या, ई. सर्व अपेक्षितच होते. बि बॉ वरचे पहिले दोन्ही बाफ कुलूप बंद न होता आपले आयुष्य जगले हे ऊत्तम झाले. याही बाफ ला शुभेच्छा!

स्मिताला वोट दिले आहे.
मेघा एवढी रंग बदलणारे सरडे पण सापडत नाहीत.
तिने जी झाडे लावली त्याची फळे तिला मिळत आहेत

आजकाल मला प्रतिसादाच्या पहिल्या २-३ ओळी वाचल्या की तो कोणी लिहिलाय हे लक्षात येतं आणि माझा अंदाज बरोबर आला की मला खुप आनंद होतो Happy

बिबॉ सारखे कार्यक्रम जनमानसात कुठलेही संदेश देण्यासाठी बनत असतील असं वाटतं का खरच लोकांना ?
असो.

माझे अमूल्य मत मेघा लाच Happy

बिबॉ सारखे कार्यक्रम जनमानसात कुठलेही संदेश देण्यासाठी बनत असतील असं वाटतं का खरच लोकांना ? >> हो ना मग सनी लिओनीला आणुन कुठला संदेश दिला हिंदी बिबॉ मध्ये?

>>आजकाल मला प्रतिसादाच्या पहिल्या २-३ ओळी वाचल्या की तो कोणी लिहिलाय हे लक्षात येतं
मलाही!

>>बिबॉ सारखे कार्यक्रम जनमानसात कुठलेही संदेश देण्यासाठी बनत असतील असं वाटतं का खरच लोकांना ?
मेघा खोटारडी, मेघा फेक या प्रोपागंडाची पुढची स्टेप आहे ती.... आता मेघाला एकदा खोटे ठरवले की तिला सपोर्ट करणारे खोटे.... ती जिंकली तर चॅनेल खोटेपणा प्रमोट करतो असे होईल वगैरे म्हणून चॅनेलवर प्रेशर आणायच!
टॅक्टीज हो सगळ्या टॅक्टीज!

काल मेघा पण वैतागुन म्हणाली की यांना टास्कमधले लूपहोल्स शोधून केलेया युक्त्या आणि खोटपणा यातला फरक कळत नाही!
त्या "डिसीव्ह" शब्दावर पण वैतागलेली दिसली काल मेघा!

आस्ताद काहीतरी बोलला स्मिताला. म्हणून रडत होती. आणि तो पण त्यासाठीच तिला साॅरी म्हणत होता. 'तुला हर्ट करायचं नव्हतं, रडवायचं नव्हतं. तरीही झालं. म्हणून साॅरी' अशा तर्हेचा संवाद होता तो.
Smita said ' it's ok' n then gave him good night hug..which was cute. Not like हगाहगी.

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ?

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ? >>> स्मिताला सॉरी म्हणायला आला तेव्हा मला पिऊन आलाय की काय, असं वाटलं. नंतर जाताना अडखळत होता.

एनिवे एकंदरीत मेघा आणि स्मिता ह्या दोघी आवडतायेत प्रेक्षकांना असं दिसतंय, सगळीकडेच. अर्थात मेघा कमालीची लोकप्रिय आहे हे नक्की.

>> हो ना मग सनी लिओनीला आणुन कुठला संदेश दिला हिंदी बिबॉ मध्ये?
ते त्यांनाच विचारा... 'सनी येते आहे' हाच एक मोठ्ठा संदेश आहे.. बाकीचे डीटेल्स नगण्य ठरतात. Proud

आपले मत स्मितालाच

पुष्कर, सई भंगार आहेच पण मेघा फेक आहे आणि फेकच राहणार
जिंकली तरी Happy
आणि जराही आदर्श घेण्याची लायकी नसताना
एवढ्या लोकांना ती आवडती कशी ? असाच प्रश्न मला सतावतोय ..
असो आवड आपली आपली

>>आणि जराही आदर्श घेण्याची लायकी नसताना
>>एवढ्या लोकांना ती आवडती कशी ? असाच प्रश्न मला सतावतोय

आगागा.. एकदम काळजाला हात घातलाय... Proud
रच्याकने: काहींना स्मिता व मेघा दोघीही आवडतात म्हणे.. Proud

>>पण मेघा फेक आहे आणि फेकच राहणार
फेक वरून आठवलं.. काल कोर्ट सेशन मध्ये स्मिता च्या फिर्यादी वर 'बि बॉ ने माझा स्मिता ला दाखवलेला व्हिडीयो पण फेक आहे' एव्हडेच मेघाने बोलायचे शिल्लक ठेवले होते. सगळी फेका फेक झाल्यावर साक्ष म्हणून श रा ने खरे सांगितल्यावर मेघा ने तिच्याकडे एक कटाक्ष फेकला. अन्यथा, आस्ताद ने तो ऑर्डर ऑर्डर जा दांडा तिला फेकून मारला असता असे वाटले.. Proud
आता ईतकी फेका फेक करणार्‍या व्यक्ती ला जर बि बॉ फिनाले मध्ये पाठवत असतील तर वेगळा संदेश द्यायची गरज नाही.. Lol

रच्याकने: काहींना स्मिता व मेघा दोघीही आवडतात म्हणे.. >>> मला आवडतात हो. Lol

मला आधी पुष्कर स्मिता आवडायचे, मी लिहिलं होतं आधीही. मेघा अजिबात आवडत नव्हती. हळूहळू आवडायला लागली. पुष्कर त्या सैड्या सैड्या अति करण्यामुळे थोडा नावडता झाला.

पहिल्यापासून शेवटपर्यंत स्मिता मात्र आवडतीचं राहिली.

Pages