Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी - आता मला खरोखर वाटायला
मामी - आता मला खरोखर वाटायला लागले आहे की तुम्ही मेघाच्या कोणीतरी आहात....(ह... घ्या..)>>>
हायला..जळणाऱ्यांच्या मनातला बोललात..
मेघा काल आरोप करत असताना पण शब्द फिरवत होती..पहिला म्हणाली मी fake नाहीच म्हणाले..शरा ने साक्ष दिल्यावर म्हणे context वेगळा होता..तरीपण ते भक्तांना दिसणार नाहीच..अन आता हे काय लावलाय भक्तांनी बाकीच्यांनी पण हे केलंय अन ते केलंय.."अतिप्रचंड" फॅन्स असणाऱ्या सेलेब्रिटी ने जरा चांगला विचार करून बोलला पाहिजे..
बाकी आमचा बहुमोल मत स्मिताला..
आपलेहि मत मेघालाच..
आपलेहि मत मेघालाच..
राया सहि पोष्ट...
डेलिया ची मागची पोष्ट.. पुर्ण अनुमोदन..स्मि डंब होती अन राहणारच.. हे एक वाक्य स्मि साठीचं योग्यच आहे..
चला लोकुर बाईंच्या दबावामुळे
चला लोकुर बाईंच्या दबावामुळे त्यांची लेक आली एकदाची फिनाले ला..
मेघा ला त्रास द्यायची एक संधी सोडत नाहित पु आणि सै ...काल कोर्ट रुम टास्क मधे स पु आणी आ ने परत सगळं उट्टं काढलं
पु ने मारे मेघा ला "मी सगळं विसरलो आहे.तु पण विसर " वगैरे बोलुन मिठ्या वगैरे मारल्या होत्या पण परत परत संधी मिळाली की जुन्या गोष्टी काढुन तिची प्रतिमा खराब करण्यासाठी प्रयत्न चालुच आहेत...मेघा ला काल बोलु पण देत नव्हते तिघे मिळुन...
मेघा ने प्लीजच आता त्याना भीक पण घालु नये
काल परत पुष्की आणि सई मेघा बद्दल बोलत होते खुप वेळ...फेक आहे याव नी त्याव...मी संधी मिळाली की बोलणार आहे म्हणे ममां समोर हे वगैरे वगैरे....तिला म्हणतात मागे बोलतेस न स्वतः पण तेच करतात...
पुष्कर तर अज्जिबात जिंकायच्या लायकीचा नाहिये हा सिझन....
मी कधी माझ्या मुलीचा फोटो घेउन रडतो का असं म्हणाला काल पुष्कर..सुरवतीचे त्याचे सगळे रडके एपिसोड विसरला वाटतं तो....सारखं मुळुमुळु रडत बसायचा ...असो...
आज काय होतय बघु पत्रकारांसमोर...मेघा ने आता १ घाव २ तुकडे करावं....जे होईल ते होईल....हे पत्रकार बिबॉ ने मॅनेज केलेले नसावेत म्हणजे मिळवलं....सगळ्याना एक रीअॅलिटी चेक मिळण्याची खुप गरज आहे...
मला मेघा मनापासुन आवडते कारण तिच्या स्वभावाची माणसं मला तरी फेक वाटत नाहित. हा जनरल मानवी स्वभाव आहे. आपल्या जिवलग मैत्रीणीचा राग आला की आपणही तिच्या मागे तिला ४ शिव्या घालतो आणि म्हणून आपण लगेच फेक नसतो..त्या मैत्रीणीबद्दल्च आपलं प्रेम्म कमी होत नसतं.माझ्या आज्जुबाजुला रहाणारे अनेक लोक मला मेघासारखे आहेत. ते खोटं बोलत नसतात तर ते फ्लो मद्धे काही गोष्टी बोलुन जातात जे त्यांच्या सुद्ध लक्षात येत नाही. अशा बोलण्याला मी तर खोटं म्हणणार नाही.हा एक प्रकारचा पर्सनॅलिटी टाईप आहे.या लोकांना त्यांची स्तुती केलेली आवडते. त्यांना सगळ्यांनी चांगलं म्हणावं आणि त्यांचं कौतुक करावं असं त्यांना वाटत असतं. मानसोपचार तज्ञ अजुन नीट सांम्गु शकतील मला काय म्हणायचय ते.
मामी मोड --

मी माझे बहुमूल्य मत मेघा ला दिले आहे
तुम्हीपण द्या
ताकः मी मेघाची कोणत्याही प्रकारे नातेवाईक नाही...
मेघा फेक आहे, मेघा खोटारडी
मेघा फेक आहे, मेघा खोटारडी आहे, माघारी बोलते, ती शब्द फिरवते.. यंव नि त्यंव !
तरीही आता या घडीला आपले मत मेघालाच. कारण ती इतरांसारखी खुनशी, कपटी नाही.
कालचा कोर्टरुमचा टास्क परत मेघा आणी मेघासाठीच होता. सगळीकडुन तिला खाली खेचायचे सुरु आहे.
काल सई एव्हिक्ट झाल्यावर, रेशम गेली तेव्हा झाला नाही इतका आनन्द झाला होता. पण विणाबाईनी काहीतरी साटेलोटे केले असणार असा दाट संशय येतोय. कारण किरकीरी सई स्वतः न रडता पुष्कीला समजावत होती की ," इट्स ओके, तु विनर झालेला आवडेल मला... वै वै" . आणी नन्तर हा ड्रामा फेक आहे हे कळल्यानन्तर झालेला आसुरी आनन्द! आ पु चा जल्लोष!
मी मेघाला वोट केलं आहे...
मी मेघाला वोट केलं आहे...
कालच्या सईच्या फेक इलिमिनेशन नंतर सई ने पुष्करच विजयी झालेला आवडेल असं म्हटलं.. पुष्कर खूपच रडंत होता ती फायनल
मध्ये नाही म्हणून आणि सईला वाटत होतं कि तो तिच्या विरहाने रडत आहे..ती बोलत होती..चारच दिवस राहिले आहे ..आपण नंतर परत भेटनारच आहे....आणि आस्तादची मज्जा..कायतरीच पुष्करचं सांत्वन करत होता..
मेघाला आत्ता कुठे उमजलंय की स
मेघाला आत्ता कुठे उमजलंय की स-पुने तिचा वापर केलाय फक्त. ती इतरांना वापरत होती, पण स-पुला तिने कधीच वापरलं नाही. त्यामुळे माझा मेघालाच पाठिंबा. स्मिता आवडते, पण विनर म्हणून कमी पडते. तिच्यात टेनॅसिटी आहे, सर्व्हायव्हर आहे, पण ती स्वयंभू आहे, तिला लोक असले-नसले तरी फरक पडत नाही. बिग बॉसच्या विनरला दुसर्यांना सुनावताही यायला हवं, प्रसंगी आपली बाजू मांडता यायला हवी.
बाकी काल मला शमाकरता वाईट वाटलं. पाचवा फायनलिस्ट शर्मिष्ठा असं डिक्लेअर झालं म्हणजेच सई एलिमिनेट असं कळलं त्यानंतर आख्खा फोकस सईवर गेला. शमाचं साधं अभिनंदनही केलं नाही कोणी
लेट एन्ट्री म्हणून तिला सतत हिणवलं, याचं मलाच वाईट वाटलं.
खुद्द शमालाही स्वतःचं नाव ऐकल्यावर धक्का बसला होता!
स्मिता रॉक्स! प्रत्येक वेळी
स्मिता रॉक्स! प्रत्येक वेळी निखळ करमणूक व मनोरंजन.. काय मस्त बॅलंस जपलाय. ग्रेट!
बि बॉ च्या संपूर्ण सिझन मध्ये स्मिता ने स्वताच्या बळावर बॅटींग केली आहे. पेड मिडीया नाही, मॅनिपुलेशन्स, गॉसिपिंग चा वापर नाही
<<
बाकी सगळं ठिक आहे पण जर तुम्हाला वेळ , माहिती आणि इंटरेस्ट नाही सोशल मिडीया मार्केटींगची तर निदान ‘पेड मिडीया‘ नाही सारखं विधान करु नका !
उलट या शो मधे डे १ पासून पीआर सिरियसली घेणारी, एक्स्पेन्सिव्ह पीआर हायर करणारी स्मिता एकटीच आहे आणि नथिंग राँग , उलट असायलाच हवा पीआर प्रत्येकाकडे जर परवडत असेल तर आणि शो बद्दल सिरियसनेस असेल तर !
स्मिता सारखी प्रोफेशनल मुलगी जी एम्टीव्ही स्टंट मॅनिया सारख्या रिअॅलिटी शो मधे जाऊन आली आहे ती विदाउट पीआर बिग बॉस मधे जाण्या इतकी केअरलेस नक्कीच नसणार.
स्मिता एलिमिनेशन मधे आली कि दर वेळी तिच्या सोशल मिडीयावर सेलिब्रिटी शाउटाउट पोस्ट केले जातात , सेलिब्रिटी व्होट अपिलची प्रत्येक पोस्ट ही बर्यापैकी हँडसम अमाउंटच्या बदल्यात केली जाते.
तिच्या आई आणि स्टायलिस्टचे इंटरव्युजही पब्लिश झालेत.
स्मिताचं पीआर सर्वात बेस्ट आहे म्हणून अन्जुला दर वेळी सांगते मी ती नाही जाणार !
मेघा सईचे सोशल मिडीया अपडेट्स उलट स्मिताच्या पीआर इतके प्रो नसतात.
मेघानी ५ व्या आठवड्यापासून तर अस्तादने अगदीच अत्ताअत्ता पासून अॅक्टिव्ह केलय पीआर.
स्मिताला केलं voting.
स्मिताला केलं voting.
सईबाईना वाचवायला voting बंद होतं, नक्की त्या ताईचं बाहेर गेल्या असत्या, जबरदस्त विरोध सगळीकडे.
मेघासाठी तर सेलेब्रिटी
मेघासाठी तर सेलेब्रिटी शाऊटाऊट्स खूप कमी आलेत, सै, शमा यांच्यासाठी तर नाहीच आले.
पब्लिक मतांना महत्व देऊन इतर
पब्लिक मतांना महत्व देऊन इतर काही खेळी केली नाही channel ने तर मेघाच विनर व्हायला हवी. तिला एकंदरीत प्रचंड सपोर्ट दिसतोय सामान्य लोकांचा, तिच्यात आणि दोन नं मध्येही खूप फरक असेल.
मी मेघाला मत दिलं नसलं तरी ती मला आवडते. अजिबात न आवडणारी ते आवडायला लागली अशी मेघा.
बरेच जण सो मि वर लिहायचे की
बरेच जण सो मि वर लिहायचे की स्मिताला मराठी येत नाही तर ती इथे कशाला आली पण सईची मातृभाषा असून तिचे मराठी आहे तेवढं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं स्मिताचे आहे. ती पुण्यात वाढली त्यामुळे असणार.
तिला बिग बॉस ने सन्मानाने बोलावलं म्हणून आली ती. काल bb चं म्हणाले काहीजण हातातली कामे सोडून ह्या शो साठी आले आणि स्मितावर camera होता तेव्हा.
हिंदीमध्ये तिला बरेच जण ओळखतात आणि फ्रेंड्स आहेत. ती कर्तृत्ववान असून स्वतः बद्दल बोलत नाही कधी हा तिचा दोष.
मेघासाठी तर सेलेब्रिटी
मेघासाठी तर सेलेब्रिटी शाऊटाऊट्स खूप कमी आलेत>> तिला आवश्यकता पन पडेल असं वाटत नाही... घरात असलेले अन घराबाहेर गेलेले सगळेच सो कॉल्ड सिलिब्रिटी तिच्यासाठू शाऊटाऊट्स करत असतात अन ते ही फुकट.. हाहाहा
स्मिताचं पीआर सर्वात बेस्ट
स्मिताचं पीआर सर्वात बेस्ट आहे म्हणून अन्जुला दर वेळी सांगते मी ती नाही जाणार >>> हो, तू नेहेमी सांगतेस डीजे. तिचे फ्रेंड्सपण बरेच आहेत तिथे जे वोट अपील करतात.
थत्ते गगनभेदी स्टाईल बोलताहेत
थत्ते गगनभेदी स्टाईल बोलताहेत बहुतेक जस्ट बातम्यांमध्ये रहावं म्हणुन >>>
अगदी अगदी.
मला एक कळत नाही पूर्ण सिझन संपेपर्यंत eliminate झालेल्यांनी काहीही वक्तव्य करायची नाहीत असं का नाही bb ने लिहून घेतलं.
ऑर्किड एका आयडीने दिलेलं एक वोट स्वीकारतात फक्त. तू फार कामाला लावलं त्यांना
मेघाला दिलं वोट.
मेघाला दिलं वोट.
ऑर्किड एका आयडीने दिलेलं एक
ऑर्किड एका आयडीने दिलेलं एक वोट स्वीकारतात फक्त. >>>>
हो. एका एपिसोड साठी एका आयडी चे एकच मत ग्राह्य धरले जाणार.
नियमावली बरीच मोठी आहे.
नाही एपिसोडवाईज नाही, पूर्ण
नाही एपिसोडवाईज नाही, पूर्ण विक एकचं स्वीकारतात असं मला समजलं.
vote स्मिता
vote स्मिता
ओह, असू दे तेवढीच एका मताने
ओह, असू दे तेवढीच एका मताने स्मिता बाईंच्या मतांमध्ये भर घातली.
बाय द वे, बॉडीशॅम /
बाय द वे, बॉडीशॅम / बॉडीशॅमिंग असं का म्हणत होते सगळे ? शेम आणि शेमिंग ही तर फारच रुळलेली क्रियापदं आहेत. की मला अद्ययावत माहिती नाही ?
त. टी. : माझं अमूल्य मत मेघालाच !
तोच तर प्रश्न पडलाय.
तोच तर प्रश्न पडलाय.
शॅम म्हणजे फसवं बोगस ना?? अगदी बहुभाषाकोविद आस्ताद सुद्धा शॅमच म्हणतोय. कटघरासुद्धा म्हटला काल तो.
होना, बॉडीशेमिंग ला शॅमिंग का
होना, बॉडीशेमिंग ला शॅमिंग का म्हणतात ?
नाही एपिसोडवाईज नाही, पूर्ण
नाही एपिसोडवाईज नाही, पूर्ण विक एकचं स्वीकारतात असं मला समजलं.>>>
नाही. एका एपिसोड साठी एक मत.
हे बघा.
हे बघा.
याचा अर्थ काय आहे नक्की?
याचा अर्थ काय आहे नक्की?

ओहह असं आहे का, thank u.
ओहह असं आहे का, thank u.
मेघा सईशी बेडरूममध्ये बोलत
मेघा सईशी बेडरूममध्ये बोलत होती तेव्हाची सईची नजर भीतीदायक होती.
सई काही tasks छान खेळली एवढंच
सई काही tasks छान खेळली एवढंच. बाकी ती आळशी, चुगलखोर, गर्विष्ठ, अतिशहाणी, पुष्कीशी flirting करणारी आणि आधी स्मिताला सतत पाण्यात बघणारी आणि आता मेघाला सतत पाण्यात बघणारी खुनशी नजरेने बघणारी अशी प्रतिमा आहे. ती जे वागली त्याबद्दल म मां पण फार तिला कधी बोलत नाहीत क्वचित बोलतात त्यामुळे चढून गेलेली. तो पुष्की आधी तर जस्मिन, फेलीशा करायचा. आता सतत सैड्या करतो.
काही लोकांना मेघा सोडून
काही लोकांना मेघा सोडून कोणीही जिंकलेले चालणार आहे.... काही लोकांनी अचानक पुष्कीचे नाव लावून धरले आहे (कारण बाहेर त्याच्या नावाची अफवा/चर्चा आहे) तर काही लोक अचानक स्मिताचे फॅन झालेले आहेत (कारण तिला टोकाचा विरोध कुणी करणार नाही हे त्यांना माहित आहे).....ह्यातले बरेचसे लोक आधी राजेश रेशमचे फॅन होते.... काही काही लोकांनी तर दोन्ही डगरींवर पाय ठेवला आहे..... ते आत्ता कुणाच्या बाजूने कितीही युक्तिवाद करत असले तरी मुख्य चिडचिड काय आहे ते लपून रहात नाही!..... हे असे लोक कुणाचेही समर्थक नाहीत.... ते फक्त आणि फक्त मेघाविरोधक आहेत
उद्या अगदी शरा जरी मेघाच्या विरोधात गेली (त्यासाठी खुप प्रयत्न करुन झाले पण ती निघाली खमकी) तर शरालाही आपली म्हणायला लागतील हे लोक!
असो.... सांगायचा मुद्दा काय तर ताकाला जाउन भांडे लपवू नका!
आता फिनाले वीक आला आहे.....तरी आपला पाठिंबा कुणाला आहे ते ठरवा एकदाचे!
मेघाला वोट दिले .
मेघाला वोट दिले .
Pages