बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सईबाबत न्युट्रल ते प्रचंड डोक्यात जाणारी असं मी म्हणेन.

आ, रा आधी आवडायचे, इथे मनातून उतरले. रे कधीच आवडली नाही. सुशांत, जुई ही नाही आवडले कधी. ऋतुजा आवडायला लागली आणि बाहेर पडायला लागलं तिला.

>>पुष्कर, सई भंगार आहेच पण मेघा फेक आहे आणि फेकच राहणार जिंकली तरी
बि बॉ ची टेग लाईनच आहे:' इथे दिसतं तसच असतं ' Proud

आणि जराही आदर्श घेण्याची लायकी नसताना
एवढ्या लोकांना ती आवडती कशी ? असाच प्रश्न मला सतावतोय .. >>

आदर्श, जनमानसात संदेश ई ई ई...आता बोलुन बोलुन पण कंटाळा आला....किती वेळा तेच तेच...
असे कार्यक्रम आदर्श घेण्यासाठी कोण बघतो....आम्ही शाम ची आई वाचु की त्यासाठी Happy
एक कार्यक्रम आहे..त्यात १५-१६ अशा व्यक्ती आहेत ज्याना मुद्दाम भांडणे करण्यासाठी बोलवलय पैसे देउन..अशा कार्यक्रमातून कोण आदर्श घेईल ?
जाउदेत...

मेघाची काल बेणारे बाई केली सगळयान्नी (शरा सोडून). शराने दिलेली साक्ष योग्य होती. मेघाने दिलेली 'फेक' कमेन्ट त्या 'context' मध्ये दिली नव्हतीच. उलट आरती, आऊ. रेशम सगळयात पुढे होते स्मिताच body shaming करण्यासाठी.

अस कुठल कोर्ट आहे जिकडे लोक खाण्याचे पदार्थ घेऊन बसतात. Biggrin

आज मला आस्तादची दोन रुप दिसली. मेघावर ओरडणे हे एक नेहमीचेच रुप. पण शराला मिठीत घेऊन गाण (खुप क्यूट दिसत होत ते. Not हगाहगी) , नन्तर स्मिताला समजावण, सईला मायेन समजावण वगैरे वगैरे हे त्याचे दुसरे रुप. बायकान्वर डाफरणे आणि त्यान्ची काळजी घेणे दोन्ही एकाच वेळी करतो हा माणूस! Lol

सई काल स्विमिन्ग पूलमध्ये डोक बुडवत होती तेव्हा मला हिन्दी सिनेमातल्या खलनायकान्ची आठवण आली. जनरली खलनायक असले विक्षिप्त प्रकार करतात. big boss ने wash room च्या वापरावर बन्दी आणलीय का?

सई पु ला म्हणत होती, "मला तुझ्याशी खुप बोलायच, ते मी इथे नाही बोलू शकत.' Uhoh

मेघातैनी सर्व चीटिंग करून पुढे आल्या असतील समजा तरी सैबाईपण त्यात सहभागी होत्या आणि त्याही इथपर्यंत आल्यावर आता सर्व मेघावर ढकलून आपण हरिश्चंद्राचा अवतार आहोत असं दाखवतायेत Lol

ज्यांना 'फेक' ओठ, 'फेक' दात यासंदर्भात वापरलेला 'फेक' हा शब्द आणि एखाद्या माणसाला 'फेक' म्हणण यातला फरक कळत नाही त्यांच्याबद्दल अधिक काय बोलावे?
खर म्हणजे कळतय सगळ्यांनाच पण वेड पांघरुन पेडगावला निघालेल्यांना कोण समजावणार?
आतल्या स्पर्धकांचा एक स्वार्थ आहे मेघाला बदनाम करण्यात पण बाहेरुन बघणाऱ्यांनी पण 'वाक्य काय? संदर्भ काय?' याचा सारासार विचार करु नये म्हणजे hatred ची कमाल आहे!

मेघा आणि शर्मिष्ठा विरुद्ध पकडून पकडून आणत होते फिर्यादी आणि उकरुन उकरुन तेच जुनेपाने उगाळत होते....
आणि बाकीच्यांना नुसते दोषी किंवा निर्दोष सांगून सोडत होते पण शराला एकदम ठासून "अप्रामाणिक" म्हणाले न्यायाधीश!

हे असे करुन बाहेर आपली काय इमेज जात असेल कळत नाहीये का या पब्लीकला?

जराही आदर्श घेण्याची लायकी नसताना > परत एकदा Rofl सिरियसली? Happy
समाजसुधारणेचा संदेश , आदर्श घालून देणे, मतदानाचे पवित्र कर्तव्य वगैरे वाचून आता पुढच्या बिबॉ मध्ये हजारे, आमटे, अवचट या प्रभृतींव्यतिरिक्त मला कोणी इमॅजिन च करता येत नाही आहे Lol
कोर्ट टास्क फालतू होता. मेघाचे एकूण टास्क मधे भरपूर डोके चालते पण वाद घालण्याच्या आणि शाब्दिक वार परतवण्याच्या कलेचा अभ्यास करण्यासाठी तिने माबो वर यायला हवे होते काही महिने! Happy कितीतरी आरोप असे होते की सहज काउंटर अटॅक करून लोकांना गप्प करता आलं असतं असं वाटलं. त्या फडतूस गेम मधे ज्यावरून काहीच ठरणार नव्हतं , त्यात शर्मिष्ठा ऐवजी सईचा फोटो का नाही सिलेक्ट केला हे तर अर्गुय्मेन्ट बालिश होतं अगदीच.

हे असे करुन बाहेर आपली काय इमेज जात असेल कळत नाहीये का या पब्लीकला?>>>> सई-पुष्कर निव्वळ एका बुडबुड्यात जगत आहेत. बाहेर आल्यावरच पायाखालून किती जमीन सरकलेय त्याची कल्पना येईल आता त्यांना. सोमिवर चक्क आस्तादवरची टीका सौम्य वाटायला लागलेय यांच्यापुढे. स्मिता सोडल्यास बाकी कुणाचीही इमेज उंचावलेली नाही. मेघावर टीका झाली तरीही तिचे फॅन्स खूप आहेत. शरासाठी काही बदलेल असं वाटत नाही.

मैत्रेयी!! Lol
बिग बॉस खेळाचा फॉर्मॅट्च तसला आहे. आठवा: सामंजस्याने चाललेले नळाच्या टास्कला बिबॉने सांगितले की सामंजस्याने नाही खेळायचे.
मेघा ही निर्विवाद विनर आहे. आणि स्मिता रनर अप.

>>ज्यांना 'फेक' ओठ, 'फेक' दात यासंदर्भात वापरलेला 'फेक' हा शब्द आणि एखाद्या माणसाला 'फेक' म्हणण यातला फरक कळत नाही त्यांच्याबद्दल अधिक काय बोलावे?<<

आता हे काय नविन? अहो, फेक हे, फेक हे, फेकंच असतं. तुमचं, आमचं सेम नसलं तरीहि नेक नसतं... Proud

करून करून भागले अन देवपुजेला लागले ही म्हण आठवली.

बिबाॅ म्हणजे काय हरिदासबोवांचं कीर्तन वाटलं की काय? गेले तीन महिने शेवटी काहीतरी संदेश ऐकायला मिळेल म्हणून बिबाॅ पाहिलं की काय? Rofl

रामायण वाचायचं होतं ना.

>>पुढच्या बिबॉ मध्ये हजारे, आमटे, अवचट या प्रभृतींव्यतिरिक्त मला कोणी इमॅजिन च करता येत नाही आहे<<

अहो हजारे, आमटे तर खुप दूर राहिले, ट्रॉफि हुक ऑर क्रुक ने जिंकु द्यायची हा बिग्बॉसचा हेतु असता तर स्वामी ओम, डॉली बिंद्रा ट्रॉफि घेउन घरी गेले असते... Lol

<काहींना स्मिता व मेघा दोघीही आवडतात म्हणे..>
मला आवडतात योग. काय प्रॉब्लेम आहे. दोघीही वेगवेगळ्या कारणांसाठी आवडू शकतातच.
स्मिता पहिल्या दिवसापासूण आवडलेल्या स्पर्धकाच्या लिस्टमध्ये आहे. सगळ्यात पहिल्या धाग्यात मी म्हटलेलं, माझे आवडते स्पर्धक आहेत स्मिता, भूषण, ऋतुजा आणि पुष्कर. मेघा खिजगणीतही नव्हती. यातल्या भूषण, पुष्कीने जाम निराशा केली माझी. आणी ऋतुजा निघूण गेली. मेघाने ज्या जिगरीने संपूर्ण खेळ खेळलाय, एकेकाची मस्ती उतरवलीये त्याला तोड नाही. लक्षात ठेवा, राजेश, रेशम, सुशांत यांच्यासारख्या दबंगगिरी करणार्‍या लोकांना सामोरं जाणं सोपं नाही, ते पण मायनॉरिटीत असताना. मेघाने अपोझीट ग्रुप अक्षरशः पोखरला. स्मिता आवडते ती टास्कमास्टर असल्याने तर आहेच पण मनाने अतिशय ऋजू असल्याने, तिच्या मार्दवामुळे, परत एकदा तीच खंत व्यक्त करतो, स्मिता-मेघा जोडी कमाल ठरली असती.

बिबाॅ म्हणजे काय हरिदासबोवांचं कीर्तन वाटलं की काय? गेले तीन महिने शेवटी काहीतरी संदेश ऐकायला मिळेल म्हणून बिबाॅ पाहिलं की काय?
Lol

>>कितीतरी आरोप असे होते की सहज काउंटर अटॅक करून लोकांना गप्प करता आलं असतं असं वाटलं.
सापडली... बि बॉ चा भयंकर अभ्यास असणारी मेघा व्यतिरीक्त एक व्यक्ती सापडली. Proud
आस्ताद मोडः
हे तर काहीच नाही.

आता सई पुष्की मेघा आणि शरा य़ांना मिळणारी मते ही नक्कीच विभागली जाणार आणि याचा सर्वात जास्त फटका हा सई आणि शरा ला बसणार. आणि फायदा स्मिता किंवा आस्ताद ला होणार.
पुष्की ला मी तरी ग्राह्य धरत नाही कारण मेघा सई मुळे टिकला इतके दिवस आणि मं मा आले तेव्हा एेनवेळी शरा ने वेडेपणा केला नी फायनल ला पोहचला. नशिबा ने त्याला नेहमी च साथ दिली आहे असं मला वाटतं.

<नशिबा ने त्याला नेहमी च साथ दिली आहे असं मला वाटतं.> नेहमी नाही म्हणणार पण जेव्हापासून मेघाशी गद्दारी केली आहे तेव्हापासूण त्याचे ग्रह अचानक उच्चीचे झालेयत. Happy
पुर्वी बिचारा कप्तान व्हायला पण किती कुंथायचा.

पुर्वी बिचारा कप्तान व्हायला पण किती कुंथायचा.

त्याने मेघा सोबत गद्दारी च वेळ पाहुन केली.... स्पर्धक कमी झाल्यावर कप्तान झाला ना..... रे टीम कमी झाली नी त्याने व्यवस्थित पणे सईचं माकड करुन स्वता चा फायदा करुन घेतला.

चला माझ मत मी मेघाला देऊन आली Happy ..
स्मिता आवडत असली तरी मेघावरच प्रेम जास्त आहे..
प्रेस कॉन्फरन्स इंटरेस्टिंग वाटतेय जर्राशी..

मेघाने पण सई च्या आंधळ्या प्रेमात साथ दिली ना त्याला...
मेघा सई आणि आत्ता आस्ताद..... बरोबर माणसं निवडुन तो पुढे येत गेला....

आपल मत मेघाला...
स्मिताच्या बाबतीत थोडा विचार केलेला पण तिच वागण ही एवढ काही निखाळ होत अस नाही.
- स्मिता स्व :ता बाबतीत बोलताना बोलुन गेली कि मी वेडा बनुन पेढा खाते. म्हणजे ति इथे म्हणतात तशी निरागस वैगेरे असण्या बाबतीत शंका आहे..
- ति कोणा बाबतीत काही बोलत नाही अस नाही.. ति पुष्करला " तुला अशी लाथ घालीन" अस काही तरी म्हणाली, नेमके शब्द नाही आठवत..
- व्हिलन ग्रुप मध्ये बॅक बिचींग सुरु असताना हिने सुध्दा हिरीरिने सहभाग घेतला आहे.. त्यामुळे ति मागे बोलत नाही वगैरे राहुच द्या...
- फुलाच्या टास्क मध्ये पुष्कर चा एक हात उलटा कारुन ( पिरगाळुन ) ओढनारी हि स्मीताच होती बर का... ( जेव्हा त्याच्यावर दोघ बसलेले ) ज्या वरुन आऊ व सुशांत मध्ये नंतर वाद झाला..
- त्या मेघाच्या फेक म्हणण्या बाबतीत.. तेव्हा स्मिता किती नाटकी आहे ते कळते..
आऊ ने मेघाला विचारल की हेअर हायलाईटला किती खर्च येतो.
मेघा ने थोडे हेअर हायलाईटला करायला किती खर्च ते सांगीतल, पण सगळे करायल किती येतात ते माहीत नसाव.
मग मेघा ने स्मिताला विचारल कि तुला माहीत आहे ना किती खर्च येतो.
तेव्हा आपली स्मिता ताई मेघाला ( हो मेघाला) घोळात घ्यायला गेली कि कशाला एवढा खर्च करायचा वगैरे.. Happy
अरे तिने विचारल काय तु बोलतेस काय.. !!! आणि मग शांत बसेल ती मेघा कशी... Lol
- व शेवटी म्हणजे आपल मत स्पष्ट न मांडता येणे... बोटचेपे धोरण..

Morpankhis
शरा ला सोळा सोमवार करून काय फायदा झाला, (डिव्होर्सच झाला ना )असा पर्सनल रिमार्कही मारला होता स्मितानी, ज्यावर कधी नव्हे ते अस्ताद एम्सीपी काळेही रिअ‍ॅक्ट झाले Happy

मै smiley2.gif
भारताबाहेरुन वोट करता येते का? नसेल तर मेघा फॅननी माझ्यातर्फे मेघाला वोट करा प्लिज!
स्मिता मला दिसायला आवडते( लिप जॉब सोडुन) , फॅशन सेन्स, मेन्टेन आणि एथलेटिक बॉडि आहे पण बिग बॉस विनर??? बिग नो नो !

Pages