बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई आणि पु चे कालचे चाळे अतिशयच भंगार..
कोणत्या शाळेत असं असतं.....मस्ती करायची पण एक लेव्हल असते...ती फक्त शरा, स्मिता न मेघा लाच नीट कळली होती...मस्त धमाल केली त्यांनी काल...
सई एकदम प्रेमात आंधळी, मुकी, बहीरी ई ई झाली आहे..आणि बाहेर आल्यावर बेक्कार आपटणार तोंडावर...
मेघा न शरा पण मस्त दिसत होत्या स्टुडंट्स...काल चक्क आ बरा वाटला...तरी मेघा च्या वेळी परत त्याची मेघा हेट उफाळुन आलेली दिसलीच...तिला ईतका त्रास दिला आणी वर परत ती हे स्पोर्टींगली घेणार नाही असं बोललाच...जळकं लाकुड आहे आ म्हणजे...

आस्ताद -स्मिता सै- पबद्दल बोलत होते ते किती खरं होतं. पब्लिकप्रमाणेच घरातले सुद्धा सै-पुच्या चाळ्यांना बोअर झालेत हे कळलं काल.

>>योग, स्मिताबद्दल भारी मस्त लिहिलंय तुम्ही Happy .
धन्स!
जे चांगले आहे ते आपण ऊचलून धरायलाच हवे आणि आपले 'बहूमूल्य' मत अशा चांगल्या गोष्टीं साठीच खर्च करावे असे मला वाटते. एकीकडे आपण स्पर्धक वा स्पर्धा यातील घाण, राडा, वाईट्ट पातळी, हीन दर्जा वगैरे अशा गोष्टि करत असतो तर त्यावर मात करण्यासाठी व अपाल्याला खरेच चांगल्या गोष्टींचे कौतूक व किंमत आहे हे आपल्याच कृतीतून दाखवण्याची हीच संधी असते. नाही का?
जसे, आपल्याकडे निवडणुकीत मतदान नाही केले तर तो गुन्हा आहे अशी मानसिकता रूजणे भाग होते (कारण जे खरेच चांगले ऊमेदवार होते ते अन्यथा मागे पडत होते) तसेच ईथे आहे. बि बॉ च्या स्पर्धेत तशी मतदानाची संधी जर प्रेक्षकांना मिळणार असेल, तर चांगल्या, लायक व फेयर प्ले करणार्‍या स्पर्धकाला आपण निवडून नाही दिले तर एक प्रकारे गुन्हा च आहे.

स्मिता खूप चांगली , छान आहे . अता ती थोडे थोडे स्वतःचे मत मांडायला पण शिकते आहे. आस्तादला काल उत्तर दिल्याने ते दिसून आले. स्मिता जर चांगली असण्याबरोबरच पहिल्यापसून अ‍ॅसर्टीव्ह / खमकी असती तर तिचे जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त होते.
शरा सुद्धा मस्त आहे. खरेतर स्मिता , शरा आणि मेघा असा तिघींचा गृप हवा होता सुरवातीपासून.

स्मिता ज्या गृपमधे राहिली तिथे कधी स्वतःहून तोंड उघडायला मिळालंच नाही. आणि कुणी तिला कधी encourage पण केलं नाही. विचारांमधे clearity आहे तिच्या, पण मांडायला जमत नाही. तरी आता बराच फरक पडलाय. काल sex educationबद्दल चर्चा बघितली vootवर. छान बोलत होती ती. आस्ताद आणि पुष्करसोबत तिने तिचाही point मांडलाच.

शरा समजूतदार आहे पण अधेमधे तीच वागणं नाटकी वाटतं. शिवाय तीने स्मिताला दिलेलं प्रॉमिस मोडून ममाना पुष्करच नाव सांगितले. स्मिता शांत, प्रामाणिक आहे. टास्क, घरातील कामे सगळं मन लावून कळते.
काल आणि परवाच्या कंटाळवाण्या भागात चक्क आस्तादने चांगल्या प्रकारे एन्टरटेन केले. आधीपासूनच जरा मनावर घ्यायचे की.

हो...टीव्ही वर पण प्रोमो दाखवलं...पण असं डायरेक्ट कसं काय दाखवलं ? काहीतरी झोल आहे नक्की..

बॉलिवुड स्पाय चा व्हिडिओ दिसला, त्यात कन्फर्म्ड सांगितले गेले आहे की सई एलिमिनेट झाली. बहुधा त्यांच्या बातम्या खर्या असतात.
पण हे टिव्ही वर दाखवले? मला तरी दिसला नाही तसा प्रोमो. कलर्स ने दाखवला असेल प्रोमो तर मग जास्त शक्यता फेक ड्रामा असण्याची आहे. जसे मेघाच्या बाबतीत केले होते मागे. इन दॅट केस फालतू ड्रामा करून मग इव्हेन्चुअली ६ ही लोकांना फिनालेत घेऊन जाण्याचा पुचाट प्लॅन असू शकेल चॅनल चा Angry

Tv वर दाखवत नाहीत कधी एलिमिनेशन प्रोमो. मी पण बाॅलिवुड स्पाय वर बघितला. नसेल झाली तर ही वेळ नव्हे असे फालतू स्टंट करायची.

सई खरच गेली असेल तर रेशमाच्या eviction च्या वेळी झाला नाही तेवढा आनंद मला आज होईल... Specially शर्मिष्ठा साठी छान वाटेल कारण स पु आ तिला पाण्यात पाहत असताना सईच्या नाकावर टिच्चून ती पुढे गेली तर मस्त वाटेल.. कारण सुरुवातीला सई चांगली खेळत होती म्हणून प्रेक्षकांनी तिचे flaws ही खपवून घेतले... पण आता ती फक्त negative वाटतेय... काल फळ्यावर मेघा बद्दल लिहिताना तिच्या चेहर्‍यावर गमतीचे नाही तर वाईट भाव होते...बाकी सगळ्यांची personal taunting तर होतीच.. जस पुष्कर म्हणाला मेघा sportingly घेत नाही... हा अणि sai किती sporting spirit दाखवतात ते सगळ्यांनी पाहिलाय... सईवर negative लिहायच म्हटल तर भरपूर आहे... पण सध्याचा तिचा घरातला वावर irritating आहे... So प्रेक्षकांना खूष करण्यासाठी हा निर्णय घेतला असेल तर तो स्तुत्य आहे....

सई खरच गेली असेल तर रेशमाच्या eviction च्या वेळी झाला नाही तेवढा आनंद मला आज होईल... >> +१००
खूपच बरे वाटेल सई गेली असेल तर. पण कारण काय दिले होते ? टास्क होता का काही?

स्मिता बद्दलः
बि बॉ मधील काही स्पर्धकांनी ८० दिवसात जे कमावले त्यातील बरेचसे गेल्या काही दिवसात /आठवड्यात गमावले. तर काही स्पर्धक गेल्या काही आठवड्यात जोमाने पुढे आले. स्मिता मात्र बहुदा एकटीच अशी स्पर्धक असावी जी खरे तर पहिल्या दिवसापासून सातत्याने खेळ खेळते आहे व तितक्याच सातत्याने तिचा संतुलीत वावर व टीम स्पिरीट होते. आधी गर्दीत ती ऊठून दिसली नाही याची तीन प्रमुख कारणे:
१. ईतर मसालेदार गोष्टि सुरू असल्याने त्याची चर्चा जास्ती होती
२. एक गँग विरुध्द दुसरी असाच लढा सुरू होतजवल्वळ जवळ ५० + दिवस. वैयक्तीक खेळ फार कमी दिसत होता.. सर्वांचाच.
३. ममां नी ऊगाच दर वेळी तिची कन्फ्युज्ड म्हणून प्रतिमा ऊभी केली, जोपासली, व स्मिता ला 'गर्दी' मध्ये बोलायला विशेष वाव नसल्याने ती प्रतिमा प्रेक्षकांच्याही मनात कायम झाली. (खर तर एका अर्थी याचा तीला फायदाच झाला कारण until last few weeks she was considered harmless by all and opponents combined.. (हे म्हणजे दिनेश कार्तिक हा धोनी, कोहली कं च्या गर्दीत राहून अचानक शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्याला विजय मिळवून देतो तसे झाले. एरवी कुणिही त्याच्या खेळा बद्दल बोलतच नाहीत. किंवा अगदी वि. टिम सुध्धा खास दिनेश कार्तिक साठी डावपेच वगैरे आखत नाहीत. पण तो ईमाने ईतबारे घाम गाळतच असतो.)

एकूणात, बी बॉ च्या घरात पहिल्या दिवसापासून आवाज चढवून भांडणारे, हात पाय मोडून घेऊन सहानुभूती घेणारे, रोज कॅमेरा समोर भाष्य करुन फुटेज घेणारे, अगदीच काही नाही तर निव्वळ टवाळ्या, कागाळया वा कांगावे करून प्रसिध्दीत राहणारे या 'ईतर' सर्व गर्दीत स्मिता कधीच पडली/दिसली नाही. त्यामूळे आता जेव्हा निम्मेच सदस्य शिल्लक आहेत तेव्हा स्मिता चे चांगले गुण अधिक वाखाणले जाऊ लागले आहेत. ईतर काही सदस्यां प्रमाणे स्मिता ला काही ओव्हरनाईट व सोयीस्कर साक्षात्कार झालेला नाहीये वागण्या बोलण्याचा.. ते (चांगले) गुण आधीपासूनच होते, फक्त आता ठळकपणे समोर येत आहेत. चांगले संस्कार, चांगले गुण, चांगली भाषा, चांगली वागणूक हे गुण कधीच वाया जात नाहीत. आता बि बॉ सारख्या धंदेवाईक खेळात त्या आधारे तुम्ही विजय प्राप्त करू शकता का नाही ते माहीत नाही. ते फक्त मेघा ला च माहित..! Proud

अजून काही स्मिता बद्दल लिहायचे राहिले असेल तर ईतरांनी हातभार लावावा.. Wink

हो ना,काल शाळा टास्क मध्ये ही पुष्की म्हणालाच ही वाईल्ड कार्डने आलेली विद्यार्थीनी आहे.
काल सई म्हणे मी मेघासाठी नाही टाळ्या वाजवणार. लगेच शरा ने वाजवल्या..माझी मैत्रीण माझी मैत्रीण म्हणून.
सै किती लो लेव्हलला उतरणार अजुन.

>>सै किती लो लेव्हलला उतरणार अजुन.
का बरे? ही तीची स्टॅटर्जी नाही का असू शकत..? जसे मेघा जे जे काही करते त्या मागे प्रचंड स्टॅटर्जी वगैरे असते तसे?

>>लगेच शरा ने वाजवल्या..माझी मैत्रीण माझी मैत्रीण म्हणून.
ही तर नक्कीच स्टॅटर्जीच दिसते...! Happy

आता बि बॉ सारख्या धंदेवाईक खेळात त्या आधारे तुम्ही विजय प्राप करू शकता का नाही ते माहीत नाही. ते फक्त मेघा ला च माहित..! >>>>१००%

काल पुष्कर आणि सई ने कहर केला, पु चक्क कपाळ चोळून घेत होता सईकडून. अतीच झालय आता हे! हे असले मसाज चाळे हिन्दी big boss मध्ये सुद्दा झालेत.

कालच्या टास्क मध्ये आस्ताद, शरा बेस्ट होते as teachers. पुष्कर ओके.

पुष्कर काल Handsome दिसत होता टिचरच्या रोलमध्ये. Wink

सई स्मिताला डम्ब म्हणते, स्वतः मात्र कहरच केला डम्बनेसचा काल. ८ नन्नतर ६ लिहून. Rofl तिच्यापेक्षा स्मिताची मराठी चान्गली आहे मग. परवा फळयावर छान निबन्ध लिहिला तिने.

मेघा, स्मिता गोड होत्या as students. मेघाने गाण छान म्हटल काल.

मेघाला आणि स्मिताला मुद्दामहून टारगेट करत होते पु आणि स. Angry पण मेघा टिचर म्हणून फारसा प्रभाव पाडू शकली नाही. मध्ये मध्ये हसत होती. तिने काहीही झाल तरीही शिक्षकाच कडक बेअरिन्ग घ्यायला हव होत किशोरसारख.

Honestly, सईने चान्गला केला होता टिचरचा टास्क. नशीब , तिने विदयार्थ्याला मिठी नाही मारली. तशी ती टास्क्स छान करते, पण सध्या ती निगेटिव वागायला लागलीय.

पाडाला पिकाला आम्बा, चार दुणे पाच Rofl

शरा चित्रे छान काढते. पु चा छोटा हत्ती, सईचा शो-पिस, आ चे क्रि़केटचे मैदान मस्त. आस्तादने क्रिकेटचे मैदान दाखवल्यानन्नतर एक मस्त गोड स्माईल दिली. Happy
Lol
तत्वान्ना घातली मुरड, म्हणून खाल्ली ओरड हे बहुधा आस्तादने लिहिल असाव फळयावर. Lol

खूपच बरे वाटेल सई गेली असेल तर. पण कारण काय दिले होते ? टास्क होता का काही? >>>> मिड वीक इविक्शन असाव बहुधा.

योग, स्मिताची पोस्ट छान. Bw

सई कसली बिघडली आहे Sad दिग्निटि सोडून वागतेय येता जाता त्या पुष्क्याला मिठ्या Angry >>>>> +++++१११११११

>>सई कसली बिघडली आहे Sad दिग्निटि सोडून वागतेय येता जाता त्या पुष्क्याला मिठ्या
पण पुष्की ला 'चालतय की'.. Proud
रे-रा म्हणत असतीलः
हमने एक ही चद्दर क्या लपेटी हंगामा खडा हुवा..
यहां तो पुरां घुंघठ ही खुला हुवा है लेकीन ऊफ्फ तक नही ऊठी..

स.पु. बहुतेक सैराट चा रेकॉर्ड मोडायचे बघताहेत..! बरं आहे नविन जोडी हवीच होती.. पर्शा आणि आर्ची ने वीट आणला होता गेले वर्षभर. Happy

महेश भट्ट कं ने रे-रा, स.पु. यांना घेऊन एखादा खमंग चित्रपट काढावा. अर्धवट मुरलेले मुरांबे पेक्षा मुरलेली लोणची अधिक रूचकर. Proud

कलर्स मराठीला पुढच्या बिग बॉसच्या सीझन्सची काळजी असेल तर सलामीच्या सिझनमध्ये सई किंवा पुष्करपैकी कुणालाही न जिंकवलेलंच बरं ( फाऊल प्ले न करता पब्लिक वोटच ग्राह्य धरलं तर हे दोघं जिंकू शकणार नाहीत हे तर नक्की आहे. ) ! पुष्कर कमाल संधीसाधू आणि सईनेही भरपूर जेलसी दाखवलेली आहे शिवाय पुष्कीच्या प्रेमात आंधळी.

तसं म्हटलं तर हे दोघं सोडून बाकी सगळ्यांनी लॉयल्टी दाखवलेली आहे. आस्तादच्या लॉयल्टीज कुणाबरोबर आहेत हे माहीत असून बिगबॉस त्याला मुद्दाम दुसर्‍या ग्रूपमध्ये घालत आले. काही आठवड्यांनी त्याला चूक उमगली. टास्क्स आणि बाकी वावर हे कंपार्ट्मेंट्स वेगळे ठेवले पाहिजेत हे समजलं पण पुष्करने जे केलं ते अत्यंत नीच होतं ! सहवास होऊन माणूस कळून ग्रूप बदलला तर गोष्ट वेगळी ( उदा. स्मिताने मेघा ग्रूप जॉईन केला असता तर )पण सई पुष्कर कायम मेघाच्या मागून बोलत राहिले, फक्त दोघांत नाही तर इतरांसमोरही आणि संधी मिळाल्यावर तर मांजरेकरांसमोर तिची नाचक्की केली. चांगली व्यक्ती बनणं जाऊदे पण एखाद्या खेळातही जो रडीचा डाव खेळू नये तो खेळलेत दोघं. अर्थात स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. स्वतःला चांगलं दाखवण्याच्या ईर्षेपायी सगळ्यांसमोर मेघाची पोलखोल करण्यापेक्षा टास्कच्या वेळीच मेघाला फेअर खेळण्याचा सल्ला दिला असता किंवा निदान नंतर तिच्याशी समोरासमोर हे बोलले असते तर कदाचित आज जनमत वेगळं असतं. पण माणूस स्वतःचा खरा चेहेरा लपवू शकत नाही हेच खरं Happy

<१. ईतर मसालेदार गोष्टि सुरू असल्याने त्याची चर्चा जास्ती होती
२. एक गँग विरुध्द दुसरी असाच लढा सुरू होतजवल्वळ जवळ ५० + दिवस. वैयक्तीक खेळ फार कमी दिसत होता.. सर्वांचाच.
३. ममां नी ऊगाच दर वेळी तिची कन्फ्युज्ड म्हणून प्रतिमा ऊभी केली, जोपासली,>
अगदी, अगदी. आणखी त्या आऊने पन तिला उगाच पिडलं.
स्मिता मागे मागे राहिली त्याचं आणखी के कारण आस्ताद वगैरे मंडळींनी निर्माण केलेली 'तिचा मराठीचा प्रॉब्लेम आहे' प्रतिमा सुद्धा. शिवाय खुर्चीसम्राट टास्कमध्ये ती स्वतः टॉर्चर सहन करायला तयार होती पण सु-रे-रा वगैरेंनी तमाशा केला आणी फुकटात फुटेज खाल्लं मेघानं..
ती स्टँड घेत नाही हा आरोप देखिल खराच आहे. पुष्कर -नंदकिशोर, नंदकिशोरच्या डोक्यावर अंडी- पिठ टाकणं या केसेसमध्ये तिने स्टँड घेणं आवश्यक होतं..
पन तरीही मेघाइतकीच आवडणारी स्मिता आहे. खुप खरी आहे ती. परत एकदा, मेघा व स्मिता या दोघींत कुणीही जिंकल तरी तितकंच आवडेल.

>>परत एकदा, मेघा व स्मिता या दोघींत कुणीही जिंकल तरी तितकंच आवडेल.
असं कसं..? एक पे रेहना.. Happy
>>पन तरीही मेघाइतकीच आवडणारी स्मिता आहे. खुप खरी आहे ती.
Oxymormonic नाही पण Paraprosdokian वाटतय.. Proud
(हलके घ्या!)

दोघी वेगेवेगळ्या कारणांसाठी आवडतात. मेघा तिच्या फाईटिंग स्पिरिटसाठी, स्मिता तिच्या चांगल्या, स्वभावासाठी, मार्दवासाठी.
स्मिता- मेघा जबरदस्त जोडी ठरली असती, दुर्दैवाने मेघा सैच्या मागे लागली. Sad
मेघाचा घाऊक द्वेष करणं सोडलं तर तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं कौतुक तुम्हाला पण नक्कीच वाटेल बघा!

>>दोघी वेगेवेगळ्या कारणांसाठी आवडतात.
>>मेघाचा घाऊक द्वेष करणं सोडलं तर तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं कौतुक तुम्हाला पण नक्कीच वाटेल बघा!
ok i respect your opinion.. but in this case, no chance! किंबहुना तीचा आजवरचा प्रवासाचा आलेख ऊंचावण्या ऐवेजी घसरला असे खेदाने नमूद करावेसे वाटते. असो. वै. म. From being influencial and driven to being highly insecure and desperate.. is not exactly a graph to be appreciated.
ईथल्याच बर्‍याचश्या मेघा प्रो सदस्यांनी अलिकडे स्मिता चे नाव ऊचलून धरले आहे हे बघून बरे वाटले. आणि हे चित्रं फार बोलके आहे, त्यामूळे वेगळे काही बोलायची गरज नाही.. बाकी सोशल मि, तुनळी, फेबु वगैरे मायाजालावर जाऊन चेक करण्या एव्हडा वेळ नाही व ईच्छा नाही. ज्यांचेकडे तेव्हडा वेळ व क्रयशक्ती आहे त्यांचा हेवा वाटतो. पण मायबोली वरील पोस्टि, प्रतिक्रीया, चर्चा याला continuity context असल्याने ईथे येणे, वाचणे, व लिहीणे हे आवडते. त्यामूळे याला कुणि शिता वरून भाताची परीक्षा वगैरे म्हटले तरी मला मान्य आहे.

रच्याकने: मेघा चा घाऊक (?) द्वेष करून मला काही मिळणार नाहीये.. द्वेष 'प्रवृत्तीचा' आहे असलाच तर. आणि जिंकण्यासाठी मेघा (कं) ने काहीही केले तरी ती स्टॅटर्जी, ईतरांनी केले तर मात्र 'अ‍ॅलर्जी' या या दुटप्पी पणा बद्दल आक्षेप आहे. ममा देखिल हे बोलले होते तिला काही आठवड्यांपूर्वी.

Pages