बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने: मेघा आता दिसेल त्याच्याकडे गुड विल मागत फिरते आहे.. माझी मैत्रीण कसे राहील या आस्ताद बरोबर? ईथ पासून ते आता लवकर लग्न करा, मला तुमच्या लग्नात नाचायचे आहे (पाय मोडलाय ना?) असा गूळ लावते आहे. जमेल तसे शरा ला एमोशनल ब्लॅक मेलींग सुरूच आहे. स्मिता या घरातील सर्वात छान मुलगी आहे चा साक्षात्कार तिला अलिकडे झाला आहे. आधी स्मिता तीच्या गृप मध्ये जायला बघत होती तेव्हा मेघा च्या नाकावरची माशी देखिल हलली नाही. रेशम जाईल तेव्हा मी पेढे वाटीन. आपल्यापै़की (स.पु.मे) कुणिही जिंकले तरी मला चालणारे... वगैरे वगैरे च्या वल्गना करणारी मेघा, आता रेशमताई एकदाची गेली, तरी सर्वांच्या हाता पाया पडत फिरते आहे. हे असे आहे. मेघा ची ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट, सगळ्यात गेम मध्ये हुश्शार, वगैरे ईमेज आता अचानक निव्वळ संधीसाधू ईथवर घसरली आहे. तो 'बडा जिगरा' वगैरे अचानक ईतका घाबरा जिगरा कसा काय झाला बा? Proud स्वतःला ईतके काँट्राडीक्ट करणारा दुसरा स्पर्धक या घरात नसेल, अगदी थत्ते देखिल नाहीत.
सरडा पण ईतक्या झटपट रंग बदलत नसावा. मान गये!
एव्हडं करूनही मेघा जिंकली तर नक्की आनंद कुणाला होणारे- ना तीच्या मित्रांना ना तीच्या शत्रूंना.. She will probably find herself alone celebrating her victory..! sad indeed..!

Uhoh सई गुलाबी ड्रेस मधे तंबू दिसत होती नुस्ता! अर्थात पुष्कीच्या आंधळ्या प्रेमाला मात्र ती परी, सिडक्टिव वगैरे दिसत होती Lol>>>>>>अगदी अगदी.

<स्मिता या घरातील सर्वात छान मुलगी आहे चा साक्षात्कार तिला अलिकडे झाला आहे>
तुम्ही कदाचित पाहिले नसेल, ती खुप आधीपासून स्मिताचं कौतूक करत फिरतेय. स्मिता जवळजवळ मेघा ग्रुपमध्ये आली पण होती, सईच्या नालायकपणामुळे स्मिता दुरावली. मेघा व स्मिता नेहमीच एकमेकींच्या छुप्या समर्थक राहिल्या आहेत.

मेघा एकटीच घरात डिसलॉयल Happy
बाकी सगळे लॉयल आहेत का मग ? कोणासोबत ?
आस्ताद आणि लॉयल..काहीही...तो किती डबल ढोलकी खेळलाय हे सगळ्यानी बघितलेत..सुरवातीचे सगळे टास्क तो मेघा च्या टीम मधुन रा रे साठी खेळलाय..आणि हे वेळोवेळी समोर पण आलं आहे.
सई न पुस्की च्या लॉयल्टीज फक्त एकमेकांसाठीच आहेत..त्यातही सई च्या जास्त..वेळ आली की पुष्की सई ला लगेच बाजुला करेल..आणि "सॉरी ग सयड्या..मी गेम खेळत आहे..मला माहिती आहे तु समजुन घेशील" वगैरे बोलुन मोकळा होईल...सई पण बावळट लगेच "आय नो पुष्की..आय लव्ह यु..तु जिंकला काय न मी सेम च " ई ई बोलेल...असो..
बाकी आता मेघा चा सध्याचा स पु साठीचा चांगुलपणा फक्त घरातल्यांकडुन वोटींग मार्गे बाहेर पडु नये या साठी असावा...कारण ईथपर्यंत येउन हाउसमेट्स कडुन बाहेर पडणं कोणालाच आवडणार नाही...आणि स पु तिच्या विरुद्ध कधीही जाउ शकतात हे तिला चांगलचं कळलयं बिबॉ बड्डे च्या वेळेस..त्यामुळे काल पण फोटो फाडणे प्रकारात स पु चिडले तेव्हा तिने जास्त न बोलता शांत बसणं पसंत केलं असावं. घराबाहेर गेले की मी त्याना समजावेन असं म्हणाली पण ती शरा ला....सो आता उगीच जास्त आक्रमक होउन भांडण ओढवुन घेण्यापेक्षा हातापाया पडलेलं बरं ना..

सई-पुष्कर आता जे करतायत त्याला बॅकबिचिंग न म्हणावे तर काय म्हणावे. सई कधीकधीची अंडीपिल्ली काढतेय बाहेर. खरी आहेत कशावरून. आणि तेव्हा चुकीचं वाटलंच होतं तर मेघाला विरोध करायचा होता ना आणि करायचं होतं काय योग्य होतं ते. नुसते एकमेकांच्या गळ्यात पडून गळे काढायचे असतात या दोघांना. मेघाबॅशिंग जोरात करतायत. खरं तर मेघाला जास्त फाॅलोवर्स हेच लोक मिळवून देतायत. सतत तिच्याच बद्दल बिचिंग करायचं. त्यांना वाटत असेल मेघाचे दुर्गुण सांगत बसलो तर ती निगेटिव दिसेल आणि लोक तिला बाहेर काढतील. अरे चम्यांनो, लोक तुम्हालाच कंटाळलेयत.
ह्यांचं म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसर्याचं (मेघाचं) ते कार्टं.
स्वतः तिला कधीच सेव्ह करायचं नाही आणि तिने दुसर्या कुणाला सेव्ह केलं तर गळे काढायचे.

Jasmine फार हुशार आहे... ती मागे आली तेव्हा तिने saila चांगली समज दिली होती पण आता पुष्कर ch सैराटल्यासारखा वागतोय तर तिने केक वर मेसेज लिहिलाय Remember you are fighting for... थोडक्यात बाबा re फक्त fight कर लफडी नको...

छान होता कालचा टास्क. Happy आवडला मला. धम्माल होती नुसती.

पुर्ण सिझनची एन्टरटेनमेन्ट अख्खया हयाच एक टास्कमध्ये केली सर्वान्नी. आस्ताद तर सरप्राईज package होता टास्कमध्ये. कधी नव्हे तो इतका खोडकर वागला.

मेघा तर क्यूट स्कूल गर्ल वाटत होती. हि लहानपणी अशीच दिसत असावी.

शरा सुद्दा बेस्ट. पुष्कर सतत सई टिचरची मस्करी करत होता. मेघाला जेव्हा शिक्षा दिली तेव्हा तो गालातल्या गालात हसत होता. Angry

सईने मुद्दामहूनच मेघाला जास्त शिक्षा दिली अस वाटतय. Sad

टिचरचा निषेध करणारा, तत्वान्ना पाळणारा विद्यार्थी पहिल्यान्न्दाच बघितला मी. (आस्ताद)

मेघा तर भन्नाट. टि पी काय, आई उशिरा उठली काय. Biggrin

सईने उलटी शिकवणी दिली कदम तालमध्ये, राईट लेफ्ट करत. Rofl लेफ्ट पाय कुठला असा भन्नाट प्रश्न स्मिता किव्वा शरा विचारत होती. ती स्मिताच असावी बहुधा.

आस्तादचा निबन्ध. Rofl

होप की आजचा टास्क सुद्दा असाच फनी असेल.

एक निरिक्षण:
मेघाबॅशिंगची एक पोस्ट आली की तिच्या (मेघाच्या) सपोर्टला आठ दहा पोस्ट पडतात लगेच..... मरगळलेल्या धाग्याला अचानक टवटवी येते..... टीआर्पी टीआर्पी म्हणतात तो हाच तर नव्हे Wink

>> टीआर्पी टीआर्पी म्हणतात तो हाच तर नव्हे Wink
खरे आहे... बहुतांशी कुणिही जिंकले तरी ईथल्या सदस्यांना काहीच मिळणार नाहीये.. (आत कुणी कमिशन तत्वावर काम करत असेल तर माहित नाही) तरिही गेले तीन महिने ईथे मस्त धुमाकूळ सुरू आहे. Proud
ममा म्हणले, मेघा ने या शो मध्ये जान आणली. मला तर वाटले ईथल्या पोस्टी पाहता खरे तर आ, रे, रा, जु, सु, थ, स्मि या कं ने जास्त मसालेदार कंटेंट दिला, कायम चर्चा करण्या साठी. पांघरूणात लोळत रे रा वर केलेल्या टीकांचे कर्मफळ आता सई च्या वाट्याला येत आहे Wink poetic justice!
ऋतूजा तर कधीच विस्मृतीत गेली... she has understood the lesson- you have to be 'in' the game to win the game. बाहेरून ट्विटर वरून पोस्टी टाकून काहिही होत नसते. बाकी पुष्कर ला पुष्कळ मिळाले. असेही आणि तसेही.
मला वाटते, बि बॉ ची ट्रॉफी आपण जिंकलो तर सई ऑन स्क्रीन नेमकी कशी रीयॅक्ट होईल या भितीने पुष्की ची झोप ऊडालेली आहे. Wink

Uhoh सई गुलाबी ड्रेस मधे तंबू दिसत होती नुस्ता! अर्थात पुष्कीच्या आंधळ्या प्रेमाला मात्र ती परी, सिडक्टिव वगैरे दिसत होती Lol>>>>>> 2 4 दिवस अगोदर unseen मध्ये दाखवल होत,त्या सई ने पु ला विचारल होत की तुझ्या bday ला मी काय घालू ethenic की western? पु नेहेमी प्रमाणे एकडे तिकडे बघत काही पण घाल तर सै म्हणे अस कस तुझा bday आहे तुला छानं वाटल पहिजे मझ्याकडे बघुन !!! याड लागल याड लागल रं , Lol

>>मेघाबॅशिंगची एक पोस्ट आली की तिच्या (मेघाच्या) सपोर्टला आठ दहा पोस्ट पडतात लगेच.....
राजधानी येऊन गेली की मग सगळ्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर सोडतात, तसे आहे ते... Lol

मेघा ला ममां म्हणाले "तू या शो मधे जान आणलीस" एवढ्यानेही सई आणि पुष्की ची जळजळ झाली होती. अरे त्याने कशात काही फरक तरी पडणार आहे का?
पु नेहेमी प्रमाणे एकडे तिकडे बघत >> Lol एकदा नोटिस केल्यापासून आता त्याचे ते नजरेला नजर न देता इकडे तिकडे बघणे फारच विवित्र वाटते दर वेळी Happy
मिडवीक एलिमिनेशन मधे सई गेली तर उत्तमच. तेवढाच त्या लवी डवी बाष्कळ बडबडीतून सुटका मिळेल प्रेक्षकांना.

हो पुष्करचं अस बघणं आधी लक्षात आलं नव्हतं पण म मां म्हणाले त्यानंतर मी जास्त लक्ष दिलं, फार विचित्र वाटतेय आता अशी नजर.

मिडविक एलिमिनेशन मधे सै गेल्याच सांगतायत ट्विटर वर >>> तसच होऊ दे. बोर झाल एक घास तुला एक घास मला बघुन. सई ने 80 दिवसात जे कमवल ते 15 दिवसात गमवल .ही मुलगी ऑन screen एवढी चिड़चीडी, lazy ,मारकी आहे तर real life मध्ये किती असेल.. किती तरी वीडियो मध्ये एकतर गप्पा मारताना दिसते,नहितर खाताना else झोपतांंना दिसते. शरा मेघा ला जरा सुद्दा मदत करताना दिसत नाही .तिकडेच डाइनिंग area मध्ये बसलेली असते पण काही करताना दिसत नाही.जा बाई घरी जा. तिकडे जूई खूप खुश असेल सई ला पडत असलेल्या शिव्या बघुन Lol

मेघा सगळं समजून आहे पण पब्लिक वोटिंगऐवजी आतल्यांच्या हातात नाड्या दिल्यास आपल्याला बाहेर काढतील हे तिला माहिती आहे. केवळ त्याच कारणासाठी सई-पुष्करची मनधरणी करत आहे. अत्यंत सावध आणि हुशार खेळी ! रेशमची माफीही तिने ह्याच कारणाने मागितली असावी पण ती ज्या शब्दांत मागितली ते बघून मेघा परत नव्याने आवडली.

बाकी सई-पुष्कर कधीच मेघाशी १०० % लॉयल नव्हते. सईचा पहिला प्रेफरन्स पुष्कर आणि त्याची ती, तर मेघाने ह्यांचंच नाव घ्यावं ही अपेक्षाही कशी करु शकतात ?! स्वार्थीपणाचा कळस...

पण असं कसं सई जाणार? जर फक्त नॉमिनेटेड ४ जणींचं वोट घेतलं तरच चांसेस आहेत तिचे जाण्याचे. नाहीतर मेघाचाच नंबर वाटतोय. शिवाय आजकाल २०-२५ मिनिटं तरी सई-पुष्कर मशी टॉक दाखवतात, त्यांना वाटतं प्रेक्षकांना आवडतं ते. जर राजेश रेशमचा नाही आवडलं तर हे का आवडेल ? इथून पुढे सगळं पब्लिक वोटींगवरच ठरवावं. चॅनेलने ऑलरेडी २ जणांना टाकलंय फिनालेमध्ये , आता बाकीचे तरी लोकांना ठरवू दे. सगळंच चॅनेल ठरवणार असेल , तर काय उपयोग.

आमची खरी शाळा यापेक्षा कमी बोर व्हायची. निदान इतर टिचर्सचे तरी वर्ग दाखवायचे. की ते पिटी आणि मराठी पेक्षा बोर होते?

आता पु-सै चा हेल्दी रोमान्स आवरा बाबा.

चॅनेलने ऑलरेडी २ जणांना टाकलंय फिनालेमध्ये , आता बाकीचे तरी लोकांना ठरवू दे. सगळंच चॅनेल ठरवणार असेल , तर काय उपयोग >>>>> नाही तर काय ,आम्ही voot काय छोटा भीम की नागिन बघायला डाउनलोड केलय का !!!

(सा-दा-दं-भे) हे use करतेय मेघा.शराने काही backstabbing केलं नाही,कारण स्मिताचा शरा हा नाईलाज होता तर शरासाठी स्मि option होती.जर आ रे पैकी तिथे कोणीतरी असतं तर तिने शराचं नाव नसतं घेतलं.

ही मुलगी ऑन screen एवढी चिड़चीडी, lazy ,मारकी आहे तर real life मध्ये किती असेल.. किती तरी वीडियो मध्ये एकतर गप्पा मारताना दिसते,नहितर खाताना else झोपतांंना दिसते. शरा मेघा ला जरा सुद्दा मदत करताना दिसत नाही .तिकडेच डाइनिंग area मध्ये बसलेली असते पण काही करताना दिसत नाही.जा बाई घरी जा. >>>
हे पहिल्या मतांशी काँट्रॅडिक्ट केल्या सारखं आहे का?? कारण आ रे वगैरे अगोदर हेच म्हणायचे तर इथे तिच्या सपोर्ट मध्ये मते होतीत.

हे पहिल्या मतांशी काँट्रॅडिक्ट केल्या सारखं आहे का?? कारण आ रे वगैरे अगोदर हेच म्हणायचे तर इथे तिच्या सपोर्ट मध्ये मते होतीत. >>> तेव्हा सई पेक्षा जास्त काण्ड करणारे दादा लोक होते so तिचे अवगूण झाकले गेले . आणि आता बिग बॉस वाल्यांंकड़े जास्त काही नाही दाखवायला तस सारख सारख सईच तोन्ड दाखवतात त्याने ती अजून डोक्यात जातेय.

सई बद्दल प्रेक्षकांचे मत बदलले तर त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? तेव्हा आवडत होती हे खरेच होते आणि आता तिचे बिहेवियर नाही आवडत आहे, इरिटेट करतेय हेही खरेच आहे.

Submitted by तुरू on 17 July, 2018 - 11:59
सई बद्दल प्रेक्षकांचे मत बदलले तर त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? तेव्हा आवडत होती हे खरेच होते आणि आता तिचे बिहेवियर नाही आवडत आहे, इरिटेट करतेय हेही खरेच आहे. >> +१००
बरोबर , प्रेक्षक जे बघतात त्यावरूनच मत बनवणार. उगीचच आधी तुम्ही हीची बाजू घेत होता अता का तिला शिव्या घालताय असे हिणवायची गरज नाही. सई , पुष्कर काही इथे कोणाचे नातेवाईक नाहीत.

योग,
बर्याच पोस्ट्स इग्नोअर केल्या , मेघा आवडणे न आवडणे तुमचा चॉइस, पण तिला आयुष्यभराची किंमत मोजावी लागेल/ she’ll be alone इ. हस्यास्पद आहे, कधीतरी जाऊन सोशल मिडीया चेक करा, माबो नाही ट्विटर्/युट्युब्/फेसबुक सगळिकडे अतिप्रचंड सपोर्ट /फॅनफॉलॉइंग आहे मेघाला.
मेघाची एखादी गोष्ट नाही आवडली तर फॅन फॉलॉइंग ते बोलून दाखवेल फार तर, करणारच चर्चा कारण ती चर्चेत असतेच प्रत्येक एपिसोड नंतर, मेघा नाही तर बिबॉ नाही, इन फॅक्ट सिझन १ विनर कोणी बनो, तो मेघा धाडे शो आहे ज्यात बाकी सगळे साइड अ‍ॅक्टर्स हे एव्हाना तिच्या हेटर्सनाही मान्य झालय.
ती एकटी पडायला बाहेरच विश्व म्हणजे बिबॉ हाउस नाही, उलट चिंता आहे सई -पुष्करची !
या दोघांपैकी कोणीही जिंको ना जिंको, मेघाला बॅकस्टॅब केल्याने इतके अतिप्रचंड हेट्रेड आहे, जर unfortunately जुईला अजुनही कोणी चप्पल मारेल कि काय भिती वाटते तर यांचं काय होईल बाहेर पडल्यावर कल्पना करवत नाही.
मेघाचं अगदी या उलट आहे, तिला कल्पना असावी तिचे फॅन्स आहेत पण बाहेर आल्यावर ते इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत, पब्लिक इतक येडं झालय , बिबॉ सिझन १ =मेघा धाडे शो इ. बघून नक्कीच प्लेझंट सरप्राइझेस मिळणार आहेत तिला.
असो
बाकी तुमचं वोटींग अ‍ॅनॅलिसिस पोस्ट इंटरेस्टींग आहे फक्त त्यात आस्तस्द फॅक्टर नाही लक्षात घेतलाय ? त्याला किंग मेकर बनायला आवडत आणि पुष्कि-स्मिता इ. त्याच्या डोक्याने नक्कीच चालु शकतात !

सई बद्दल प्रेक्षकांचे मत बदलले तर त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? तेव्हा आवडत होती हे खरेच होते आणि आता तिचे बिहेवियर नाही आवडत आहे, इरिटेट करतेय हेही खरेच आहे. >> +१००
बरोबर , प्रेक्षक जे बघतात त्यावरूनच मत बनवणार. उगीचच आधी तुम्ही हीची बाजू घेत होता अता का तिला शिव्या घालताय असे हिणवायची गरज नाही. सई , पुष्कर काही इथे कोणाचे नातेवाईक नाहीत.
<
+१००००
स्पर्धकांविषयी आपली मतं बदलली तर त्यात काय एवढं पर्सनल होताय ?
हाच तर शो चा फॉरमॅट आहे , दररोज इकेशन्स बदलतात !
प्रत्येक सिच्युएशनला नुसार लोक बदलु शकतात, कुठल्या गोष्टीवर काय स्टँड घेतात / किती दिवस ओरिजनल कॅरॅक्टरचं बेअरिंग पकडून ठेउ शकतात यावर ऑडियन्सचही मत बदलतच !

Pages