मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते कलियो का चमन गाणं म्हणजे 'मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ बड गार्डन' चं डॉक्युमेन्टेशन वाटतं.

"A buds garden consists of
20% bumblebees, 20% of messing around,20% of Perls,20% of gold."

"तू ही रे, तू ही रे तेरे बिना मैं कैसे जियूँ" या गाण्यात "या फिर ऐसा कर" असे शब्द आहेत. अगदीच गद्य अणि रुक्ष वाटते. सुरवातीला वाटले चुकीचे ऐकतोय का काय. "नाहीतर असं कर" हे एखाद्याला काम सांगताना ठीक वाटते, "नाहीतर असं कर, हे बघ ऐक जरा..." वगैरे. पण गाण्यात? Lol

>> कलियो का चमन गाणं म्हणजे 'मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ बड गार्डन'
Biggrin मला असे फिलिंग "शोखियों में घोला जाये" गाणे ऐकताना येते. 'मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ लव्ह'

>> सोन्याचा पाईप-रंग
Lol Biggrin पुढचे शब्द असेच काहीबाही ऐकायला येतात त्यात. फारच गुळगुळीत झालंय रेकोर्डिंग.

हो ना...
या फिर ऐसा कर काय?

"हे बघ, मला येऊन भेट्,नाहीतर थांब सांगतो.असंच कर, मला जमिनीतच गाडून टाक" (याला काय अर्थ? हे दुसरं वालं काम करायला पण माणसापाशी यावं लागेलच ना :))

राजाच्या रंगम्हाली (रंगमहाली ) , सोन्याचा बाई पलंग
रूप्याचा खांब त्येला, मोत्याची झालर

राजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादी
जरीचा चांदवा, रेशमी शिणगार

गडनी, सजनी, गडनी सजनी ग...

राजा अत्यंत कंजूस दिसतो.
पलंग, खांब्,झालर्,चांदवा सगळं ओ एल एक्स वर सेकंड हँड घेतलंय सोन्या, रुप्या,मोत्या, जरी वगैरे ओनर्स कडून Happy

मंडळी हे गाणं ऐका
मला असं ऐकू येतंय
कुमार गंधर्व - भेटीत तृ/तुष्टता मोठी
वाणी जयराम - भेठीत तुष्टता मोठी
शेवटच्या अंतर्‍यानंतर वाणी जयराम तृष्टता म्हणताहेत.

कुमार गंधर्व - भेटीत तृ/तुष्टता मोठी
वाणी जयराम - भेठीत तुष्टता मोठी
शेवटच्या अंतर्‍यानंतर वाणी जयराम तृष्टता म्हणताहेत. > +१

खलीबली गाणं पाहिलं.मधला कोरस काय आहे? मला तो 'खलीबली हा डान्स बघा..(कोरस)..डान्स बघा..डान्स बघा' ऐकू आला. व्हिडीओ खालच्या कमेंट मध्ये काही जणांना पल्पी या गॅसवाला ऐकू आला. (म्हणजे बाबा तुला पल्प असलेले ऑरेंज ज्युस हवे का गॅस वाले एखादे एरिएटेड ड्रिंक Happy )

मला जे गाणे नाक बघा नाक बघा ऐकू यायचे ते नाका मुक्का आहे असा शोधही नुकसाच लागलाय.
आणि एक चिन्नमा छिडगम्मा गाणं ऐकायला आवडतंय.पुण्याच्या एका बालालिका बँड ने त्याचा रिमेक बनवलाय.तो पण छान गायलाय.

खामोशी मधले माझे अत्यन्त आवडते गाणे... "बाहो के दरमिया..." त्यातील पहिल्या अंतर्याच्या ओळी आहेत "... खुलते बंद होते लबों कि ये अनकही..." मी कैक वर्ष ते "... खुलते बंद होते लबों कि ये पंखुडी..." ऐकायचो. Lol मग एकदा फारच नीट ऐकल्यावर माझी मिष्टेक कळली.

तसं ही लबों कि ये पंखुडी... ऐकताना फारसं वावगं वाटत नाही, आपल्या प्रेयसी च्या नाजुक ओठाला प्रियकर नाजुक कळी
ची उपमा देउच शकतो, तसे ही सिनेमा-सॄष्टी मधे एक सुनील शेट्टी वगळता हे नाजुक ओठ प्रकरण कॉमन आहे. शेट्टी काकांचे ओठ संत्र्यांच्या फोडी आहेत... Lol Lol

एक बरेच जुने मराठी गाणे आहे. तेंव्हा शब्द ऐकायला यायचे: पतंग मिटं डोळा, सोडूनी ये.
काहीच अर्थबोध होत नव्हता.
काल अनेक वर्षांनी ऐकायला मिळाले. शब्द आहेत: पंतग मी तू दोरा, ओढूनी घे
Lol

Habibi.habibi.habibi.
Jabse pehna hai maine yeh ishq-e-sehra
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera khalibali ho gaya hai dil
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera
Khalibali ho gaya hai dil
Jabse pehna hai maine yeh ishq-e-sehra
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera khalibali ho gaya hai dil
Taar vaar dil ke sab toot se gaye
Neendon waale jugnu rooth raaton se gaye
Taar vaar dil ke sab toot se gaye
Neendon waale jugnu rooth raaton se gaye
Taar vaar dil ke sab toot se gaye
Neendon waale jugnu rooth raaton se gaye
Lag sa gaya hai khwabon ka aankhon mein dera
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera khalibali ho gaya hai dil
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera khalibali ho gaya hai dil
Saara jahan ghoom ke hum
Tujhpe aake ruk gaye
Tere jaise aasmaan bhi
Tere aage aake jhuk gaye
Padh loon kalma teri chahat ka
Kehta hai ishq ka yehi mazhab
Dil pe laga hai ab mere tera pehra
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera
Khalibali ho gaya hai dil
Khalibali ho gaya hai dil
Duniya se mera
Khalibali ho gaya hai dil
khalibali khalibali.
Habibi.

हे सापडल पण कोरस नाही गावल

Pages