Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे कोणाला bb दिसत नसेल
अरे कोणाला bb दिसत नसेल परदेशात तर gilli tv वर try करा.
धन्यवाद अन्जू!
धन्यवाद अन्जू!
सई साठी डोळ्यात बदाम...काय
सई साठी डोळ्यात बदाम...काय मस्त दिसत होती काल... खुपच सुंदर..
काही असो आपल्याला तर सई खुपच आवडते...
ब्युटी विथ ब्रेन... कसली हुशार आहे ती...
Bb नी चौगुलेला आऊला उचकवायला
Bb नी चौगुलेला आऊला उचकवायला पाठवलं आहे बहुतेक कारण परवा म मा जीभ चालव सांगत होते, गप्प का आणि आज असं.
अति करतोय चौगुले आणि जोडीला भूषण, सुशांत सारखी दादागिरी करतोय चौगुले.
सई फार दादागिरी करत होती,
सई फार दादागिरी करत होती, रेशमला पकडून मटेरियल घेत होती.
सुरुवातीला काम करते आणि सुया आधीच्या पडलेल्या वापरल्या म्हणून सईला ताकीद दिली bb ने. डोक्यात गेली आज पण सई माझ्या.
फॉर अ चेन्ज सई दादागिरी करतेय
फॉर अ चेन्ज सई दादागिरी करतेय वाचून आनंद झाला मला , नाही तर दर वेळी समोरची गँग दादागिरी करते आणि ही मार खाते !
रेशमने पैसे चोरले नाहित ,
रेशमने पैसे चोरले नाहित , स्वतःचे पैसे लपवून ठेवले . पहाटे उठून सई आणि मेघा ते शोधत होत्या
रेशमने पैसे चोरले नाहित ,
रेशमने पैसे चोरले नाहित , स्वतःचे पैसे लपवून ठेवले . पहाटे उठून सई आणि मेघा ते शोधत होत्या >> नाही. रेशम ने सई च्या तिजोरीतून पैसे चोरले, आणि स्वतःचे सर्व पैसे कुठेतरी लपवून ठेवलेत (दुसरीकडेच)
मध्यरात्री मेघा आणि सई ने पण आपले पैसे तिजोरीतून उचलून आणले. आणि सई ने स्मिताचे पैसे चोरले सकाळी.
(स्मिताच्या पॅन्ट मधून)
बघा, डंब म्हणवणार्या
बघा, डंब म्हणवणार्या स्मितानं कशी हिकमत काढली. लै भारी डोकं लावलंन पोरीनं.
खरंतर बिन सुयांच्यादेखिल उशा शिवता आल्या असत्या. उशीचं कव्हर सोडवून धागा काढण्यापेक्षा सोपं आहे ते. कव्हरमध्ये कापूस भरून कडेपासून जरा आत (साधारण दोन इंच आत. म्हणजे कव्हर फाटणार नाही) जरा मोठी मोठी भोकं करायची सेफ्टी पिननं आणि मग ती कड गुंडाळत ती वळकटी भोकांपर्यंत आणायची आणि वळकटी वरून दोरा घेत घेत उशी शिवून टाकायची.
आउ उगंच शब्दाला शब्द करते. रेशम, चौघुले, भूषण उगंच उकसवात आणि मेघा, आउ, सई उसकतात. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायलाच पाहिजे असं थोडीच आहे. कोणी मुद्दाम उकसवतंय तर उलट चुप्प बसावं. बोलणारा बडबड करेना का? आपल्या त्या ह्यांचं काय जातंय? उलट मस्तपैकी अनुल्लेख करायचा.
दोन दिवस taskचे बघितलं तर असं
दोन दिवस taskचे बघितलं तर असं खेदाने नमूद करावंसं वाटतंय की रेशम जरा सुसह्य होती आणि सई असह्य. तिने फिजिकली पण धरून ठेवलं रेशमला आणि मटेरियल हिसकावून घेत होती. मला दोघीही आवडत नाहीत अजिबात.
स्मिताला डंब म्हणता म्हणता ती उलट smartly डोकं चालवून task पुढे नेण्यात तरबेज आहे. आणि तिला डंब सतत म्हणणारी सई मागे पडतेय task मध्ये. भले त्या कुशन्स चालल्या नाहीत किंवा order पूर्ण नाही झाली तरी स्मिताने मार्ग काढला हे नक्की. नंतर उशिरा शर्मिष्ठाला सुचलं पण तिने बाहेरची वस्तू वापरली जी बिग बॉस ला पटणार नाही.
मस्त यही गेम है.
रेशम आणि टीम जरा काही झालं
रेशम आणि टीम जरा काही झालं की अति बोंबाबोंब करतात. आज रेशम पुन्हा एकदा डोक्यात गेली. उद्धटासारखी बोलते ती.
तो चुगले नावाचा नवा इसम अतिच पकाउ आहे.
उशिरा शर्मिष्ठाला सुचलं पण
उशिरा शर्मिष्ठाला सुचलं पण तिने बाहेरची वस्तू वापरली जी बिग बॉस ला पटणार नाही. >> त्यांनी बाहेरची वस्तू नाही वापरली. बिल्ल्याची सेफ्टी पीन घेतलीये.
मामी सेफ्टी पिन वापरणे चूक
मामी बिल्यांची घेतली का आऊने दिली.
बिल्ला पिन असेल तर यु आर राईट मामी.
अन्जूनी दिलेली लिंक ट्राय
अन्जूनी दिलेली लिंक ट्राय केली. त्यावर कलर्स टीव्हीचे कार्यक्रम दिसले नाहीत. त्यामुळे बिबॉ दिसत नाही.
https://www.gillitv.net
https://www.gillitv.net/playlist/bigg-boss-marathi-season-1/
शुगोल हि लिंक बघा...
धन्यवाद अन्जू लिंकसाठी
इथे दिसतोय gilli वर कालचा.
इथे दिसतोय gilli वर कालचा. मीन्स इथे कलर्स मराठी दिसतंय.
>>>फॉर अ चेन्ज सई दादागिरी
>>>फॉर अ चेन्ज सई दादागिरी करतेय वाचून आनंद झाला मला , नाही तर दर वेळी समोरची गँग दादागिरी करते आणि ही मार खाते !>>>>>
दिपांजली...खरंच... सई चुकली तिथे थोडी पण आता सुचलं का रे टीम ला की दादागिरी,हिंसा नाही चालणार.. जेव्हा सई ची पाठ तोडली,ऋतुजाचा हात तुटला,अंड्या च्या टास्क ला काय केलं होतं रे टीम ने?, श रा ला लागलं,पुष्कर ला पण चक्कर आली,आऊ ला वीट फेकून मारली...ते काय सगळ शांत,गुण्या गोविंदाने केलं का काय... तेव्हा म्हणाले का तरी की सॉरी हा आम्ही दादागिरी केली हिंसा केली...उलट मी तो न्हवेच आणि गिरे तो भी टांग उपर.. बहुमत च्या वेळेस पण तेच...पंचायत टास्क ला बहुमत मेजोरीटी .नो प्रॉब्लेम.आणि खुर्ची सेफ झोन टास्क ला बहुमत नाही चालणार??? म्हणजे स्वतः केलं की सोयीस्करपणे कानाडोळा करायचा आणि सई मेघा ने केलं की बास आता बघतोच तुला......
आधी आउची सेफ्टीपिन घेतली मग
आधी आउची सेफ्टीपिन घेतली मग बिग बॉसला चालणार नाही म्हणून बिल्ल्याची घेतली.
आस्ताद का कुरकुर करतोय
आस्ताद का कुरकुर करतोय व्होट्स मिळत नाहीत म्हणून बिग बॉसकडे ?
तो सध्या फेअर खेळतोय आता तेवढेच पुरेसे आहे, मिळतील त्याला व्होट्स !
कुरकुर केली कि मात्रं म.मां झापणार आणि पब्लिकही कंटाळणार !
इतके दिवस व्हिलन /बॅक्स्स्टॅबर / डिसलॉयल प्लेअर / सतत खेकसणारा अशी इमेज दिसली होती, तर तसाच रिस्पॉन्स मिळणार !
मुळात मेघा - स्मिता सोडून कोणी शो चा अभ्यास करून आलं नाहीये, आधीच्या पॉप्युलॅरीटीला कोणी विचारत नाही, इथे फक्तं घरातलं वर्तन दिसतं आणि निगेटीव वागलं कि तो मसाला चॅनलला दाखवण्यात जास्तं इंटरेस्ट हे बेसिकच माहित नव्हते सिनियर /पॉप्युलर लोकांना !
उकट जितके तुम्ही पॉप्युलर तितके भान ठेऊन वागण्याची रिस्पॉन्सिबिलिटी अस्स्ते, ‘ विथ बिग पॉवर कम्स बिग रिस्पॉसिबिलिटी ‘ हा कोट उलट सगळ्याच मोठ्या स्टार्सनी लक्षात ठेवायला पाहिजे.
वैयक्तीक आयुष्यातला वादग्रस्त गोष्टी दिसल्या कि पब्लिक अमिताभलाही शिव्या घालायला कमी करत नाही, हे तर त्यामानने छोटे सितारे आहेत !
तरी मला उगीच बेनिफिट ऑफ डाउट देऊन असं वाटतं कि आस्ताद मुळात असभ्य कॅटॅगरी नाहीये भुषण सुशान्त राजेश सारखा, पण त्यांच्या इन्फ्लुअन्स मधे येऊन काहीतरी भयंकर वागत होता इतके दिवस !
पण ऋतुजा जेंव्हा रडली, सर्वात आधी तो सांत्त्वनाला गेला होता , बुलीजना जाऊन समजावायलाही गेला.
सई मेघा त्याला आवडत नाहीत, त्यांना शिव्या दिल्या तरी त्या दोघी जखमी झाल्यावर तोच त्यांना सपोर्ट देत आत घेऊन गेला.
चॅनलने प्रयत्न केला जुई बरोबर पेअर करायचा , त्याने (आणि जुईनेही) अजिबात रिस्पॉन्स दिला नाही, रेशमच्या फेक अफेअर ऑफरलाही उडवून लावलं .
व्हिलन इमेज म्हणून त्याला दाखवत अस्स्ले मुळात तो एक माणुस म्ह्स्णून इन्सेन्सिटिव नसावा असं वाटतं खरं , कुठे तरी सॉफ्ट कॉर्नर आहे त्याव्ह्या बद्दल कि इतकं चांगलं वाचन करणारा, सुंदर वक्तृत्त्व असणारा, उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गाणारा माणुस अगदीच एक व्हिलन म्हणून लक्षात नको रहायला !
अॅटीट्युड, इगो आहे त्याच्या वागण्यात जो त्याला शोभतो, पण इथून पुढे व्हिलन दिसु नये एवढी काळजी घ्यावी त्यानी.
सुशान्तही नापसंती व्यक्तं करत होता स्मिताकडे सईला जास्तं व्होट्स मिळण्याबद्दल पण स्मिता खूप हुषार आहे, तिने स्पोर्टींग्ली दिलं उत्तर, आता झाले असतील सईचे फॅन्स जुई आधी पॉप्युलर असली तरी !
राजेश जाताच रेशम ट्रॅकवर आली , अस्तादही येतोय हळुहळु पॉझिटिव ट्रॅकवर, तसाच राहिला तर शो मधेही राहिल !
स्मिता खूप हुषार आहे, तिने
स्मिता खूप हुषार आहे, तिने स्पोर्टींग्ली दिलं उत्तर, आता झाले असतील सईचे फॅन्स >>> स्मिता खरंच गोड आणि smart आहे.
आधी आउची सेफ्टीपिन घेतली मग बिग बॉसला चालणार नाही म्हणून बिल्ल्याची घेतली. >>> असं झालं काय, thank u मामी.
चौगुलेला आस्तादने शांत करायला
चौगुलेला आस्तादने शांत करायला हवाय, तो कॅप्टन आहे ना.
मला तर ह खा सारखा हा थोडे दिवस आलाय असं वाटतंय म्हणून असा टोकाचा वागतोय.
सई फार दादागिरी करत होती,
सई फार दादागिरी करत होती, रेशमला पकडून मटेरियल घेत होती.
नवीन Submitted by अन्जू on 6 June, 2018
>>>>>>>>>>>>>>>>>>
करु द्या हो.... एक तर ५० दिवसांनी त्याना थोडीफार संधी मिळाली असेल...
अजुन तरी हा एपिसोड पाहिला नाहि..
पण आता तो negative point
पण आता तो negative point दिसणार ना.
एनीवे मला दोघी आवडत नाहीत.
माझी स्मिता rocked today. बिचारीचे पैसे चोरले सईने, तिने पण नीट ठेवायचे ना.
नाही हो... ते म्हणजे अस की
नाही हो... ते म्हणजे अस की अत्ता पर्यन्त रे ग्रुप हा खलनायक म्हणुन समोर आलाय.. आणि सई / मेघा ग्रुप नायक म्हणुन.
प्रेक्षक म्हणुन पाहताना, नायक जेव्हा सुरवातीला खलनायकच्या हातुन मार खातो तेव्हा अस अपेक्षीत असत की नायक केव्हा तरी उभा राहील.
व नायक जेव्हा उभा राहील व संधी मिळताच खलनायकावर उलटचाल करेल तेव्हा सर्वसाधारनपणे नायक ची क्रिया ही सकारात्म्क रितीने पाहिली जाते.
नाही हो... ते म्हणजे अस की
नाही हो... ते म्हणजे अस की अत्ता पर्यन्त रे ग्रुप हा खलनायक म्हणुन समोर आलाय.. आणि सई / मेघा ग्रुप नायक म्हणुन.
प्रेक्षक म्हणुन पाहताना, नायक जेव्हा सुरवातीला खलनायकच्या हातुन मार खातो तेव्हा अस अपेक्षीत असत की नायक केव्हा तरी उभा राहील.
व नायक जेव्हा उभा राहील व संधी मिळताच खलनायकावर उलटचाल करेल तेव्हा सर्वसाधारनपणे नायक ची क्रिया ही सकारात्म्क रितीने पाहिली जाते.
<<<
+१११
सई आवडते म्हणून लगेच असं
सई आवडते म्हणून लगेच असं उदाहरण
तिकडे 'फर्जंद' संदर्भात
तिकडे 'फर्जंद' संदर्भात च्रप्स ची आस्तादबद्दलची कमेन्ट वाचून फार हसलेय
मी पण हहपुवा
मी पण हहपुवा
आस्तादचा positive रोल आहे
आस्तादचा positive रोल आहे बहुतेक त्यात.
तिकडे 'फर्जंद' संदर्भात
तिकडे 'फर्जंद' संदर्भात च्रप्स ची आस्तादबद्दलची कमेन्ट वाचून फार हसलेय >> कोणती कमेंट?
Pages