बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती बोअर होतायेत वीकेन्डचे डाव, म.मां अगदीच सरळ सरळ सपोर्ट करतायेत रेशमला, फार ऑब्व्हियल्सी दिसतय !
स्मिता नेहेमी प्रमाणे टार्गेट आणि आउंचा थयथयाट, सगळं नेहेमीप्रमाणे.
शर्मिष्ठाला ममा म्हणे क्राउन काही प्राउड्ली घालायची गरज नाही आणि रेशम म्हणे मला हंटरवाली क्राउन आवडला त्याबद्दल अवाक्षर नाही, डोन्ट मेक इट सो ऑबव्हियस , म.मां !
एकदा कपाळावर फुल्या मारून व्हिलन टायटल टास्क नुकताच झालाय तरी आज पुन्हा खलनायक टाय्टलचा मुकुट होताच, केवळ नं.कि आलेत त्यांना द्यायला.
काही म्हणा त्या नं.कि ला पाठवणं, लग्गेच आल्यावर तो राडा काही टोटल लागत नाहीये, नक्की चॅनलचा काहीतरी हेतु आहे, शिवाय त्याच्या येण्याने गोंधळ होणारेत !
मेघा टिमचा रिअल मास्टरमाइंड व्हिलन रेशम - अस्ताद वरून फोकस हटून उगीच न.कि वर जाणार का त्याच्या गोंधळान ?
उद्या ओपन नॉमिनेशन टास्क आहे, त्यात रेशम ऐवजी नंकि वर नको निशाणे साधायला म्हणजे मिळवलं, कारण त्यांची टिम मात्र क्लिअरली मेघाला टार्गेट करतेय, ते तिलाच करणार नॉमिनेट !

ओपन नॉमिनेशन म्हणजे काय? परत बहुमत का ? प्रोमोत एकमेकाच्या तोंडाला काळे फासताना दिसले लोक.
रेशम कुठे जात नाही इतक्यात . त्याआधी किश्या, आऊ, शरा, मग कदाचित भूषण / स्मिता हे जाणार.

ओपन नॉमिनेशन म्हणजे पहिल्या एपिसोडला होतं तसं .
ज्याला जो नॉमिनेट व्हावा वाटतो त्याचं नाव सुचवायचं आणि परत मग मेजॉरीटी वाली ५-६ नावं फायनल नॉमिनेशनला.
वीकेन्डला श.रा ची साडी ब्लाउज छान होतं, पण हेअरस्टाइल पाहून वाटल हीच आउ बनलीये Happy
स्मिताला इन्स्टा वर फॉलो करते, तिचे स्टाइल लुकबुक पोस्ट्स बघायला आवडत.
मेघा सई स्मिता या तिघी सोडून इतर कोणीच वेल्म्ड्रेस्ड कॅटॅगरीत नसतं याचं फार नवल वाटत !
रेशम- जुई अगदीच जनरल काहीही ओल्ड फॅशन्ड घालतात.
पुरुषां मधे गबाळे लोक सगळे, पुष्करचं ते ग्रे जॅकेट बघून कंटाळा आलाय, कधी कधी बरा रहातो पण त्याला स्टायलिस्टची गरज आहे !
त्यताल्या त्यात सुशान्त निदान वीकेंडचा डाव मधे तरी चांगली मोदी जॅकेट्स सलवार कुर्ता घालायचा, इतर लोक
सिरियस्स्ली घेत नाहीत, कसेही येतात .
हिन्दी बिग बॉसमधे म्हणे प्रॉपर ड्रेसकोड /मेकप इ. गाइडलाइन्स फॉलो केले नसेल वीकेन्डला तर त्यासाठीही शिक्षा असायची हाउसमेट्सना
Happy

हो शराला नेहमी साड्यांमधेच पाहिलेय वीकेन्ड एपिसोड ना. साड्या छान असतात त्या. पण तिने थोडे इतर ग्लॅमरस ड्रेसही ट्राय करायला पाहिजेत इमेज जरा चेन्ज करायची असेल तर. सई, मेघा, स्मिता छान छान कपड्यात असतात नेहमी.
आऊ, आस्ताद अगदी म्हणजे अगदी उदासीन दिसतात कपड्यांबद्दल. भूषण तरी निदान काहीतरी इस्त्रीकेलेल फॉर्मल्स घालतो.
बायदवे एक नोटिस केले का? कोणी ब्रँडेड टी शर्ट वगैरे घातला तर त्या लोगो वर ब्लॅ़क टेप लावतात. Happy

कोणी ब्रँडेड टी शर्ट वगैरे घातला तर त्या लोगो वर ब्लॅ़क टेप लावतात. Happy
<<
हाहाहा,यस्स , पाहिल्यासारखं वाटल परवा पुष्कीचा मॅजेंटा टिशर्ट वर, मनात म्हंटलं असं काय डिझाइन हे !
आस्ताद अतिआजागळ केसाळ कॅटॅगरी माणुस आहे. आंघोळ न केलेला आळशी झोपाळु माणुस दिसतो कायम.
कोणीतरी युटूब रिव्ह्युअरने जोक मारला परवा कि इतक्या लहान वयात याचे केस पांढरे झालेले बघून काळे ऐवजी पांढरे नामकरण करणार म्हणे त्याचं बिग बॉस हाउस Happy
Btw, तो अस्ताद जुन्या काळातल्या चित्तरन्जन कोल्हटकर सारखा वाटतो का कोणाला ?
https://goo.gl/images/txGHCq

Biggrin कशाला उगाच त्या कोल्हटकरांच्या आत्म्याला क्लेश देतियेस डिजे?

चालबाज (?) मेघानी आता खरंच चाल खेळायची वेळ आलीय. नं कि च्या मागे लागण्यापेक्षा रे, आ, भू आणि स्मि यांना ठरवून टार्गेट केले पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीत नंकि तो त्यांचा प्रतिस्पर्धी नाहीच्चे. तेव्हा त्याला विश्वासात घेऊन त्याच्या मदतीनी एकेक करुन त्या चौघांना घालवायचे ठरवले पाहिजे.

ममां रेशमला फार फेवर करतात. संशय वाटावा एवढा! खरंतर आतल्या सदस्यांना हे नोटीस होत नसेल का? असेल तर ते काय करु शकतात? कोण जाणे.

>>आस्ताद अगदी म्हणजे अगदी उदासीन दिसतात कपड्यांबद्दल<<

साधी रहाणी, उच्च विचारसरणी हा आस्तादचा माटो आहे... Proud

आउला गेम आता झेपत नाहि, तिला नॉमिनेट करुन तिची घरी जायची सोय करावी असं वाटतंय....

व्हूटवरच्या एका क्लिपमधे अस्ताद, रेशम, आऊ, पुष्की, भूषण सदस्यांच्या कपड्यांबद्दल चर्चा करत आहेत. चर्चेला सुरूवात होते ती अस्तादच्या कमेंटने. वीकेंडला स्मितानं जो निळा गाऊन घातला होता त्यावर अस्ताद म्हणाला की "तुम्ही सजलेला मोर पाहिलात की नाही?" मग बाकीचे बोलले की स्मिता, मेघा , सई यांनी किती कपडे आणलेत. किती स्पेशल कपडे आणि रिपिट करत नाहीत. पुष्की म्हणाला की मेघानं 5 लाख रुपयांची शाॅपिंग केली.

अस्ताद म्हणाला की त्यानं जेमतेम वीस हजारांची शाॅपिंग केलीये. आऊ म्हणे 2 पलाझो आणि 2-3 टाॅप्स घेतले. रेशम म्हणाली की मी तर नेहमीचेच कपडे आणले. घरी पण मी हेच घालते.

स्मिता किती डन्ब आहे हे ति स्व्तःच सिद्ध करतेय तिला आस्तादने मुद्दे दिले की अस अस जाउन सईला सुनाव वाटल तर इथे प्रॅक्टिस कर की गेल्या
मॅडम विकतच पाठबळ घेवुन , सई ने ५ मिनिटात तिला गप्प केल.
अस्तादचे लबे चौडे डायलॉग एकुण रेशमला पण कन्टाळा आलाय आता , तिही आज विचार करत असेल आपण येडपट फॉलॉअर्स ग्रुपचे लिडर आहोत हा अ‍ॅड्व्हेटेन्ज की डिसअ‍ॅडव्हेन्टेज?

पुष्करला आता भीती वाटायला लागलीये कि या दोघीच आपल्याला मागे टाकणार. आऊ डोक्यात जात आहेत, उगा किती ती चिडचिड . स्मिताच्या प्रश्नाचं उत्तर सईने काय मस्त दिलं , जसं तुला वाटते मी मेघाच्या मागे खेळते तसंच मलाही वाटतंय तुझ्याबद्दल , बाकी ते माझ्या sponsors काय वाटेल तुम्ही मला confused म्हणालात तर ते खरंच जाम फनी होतं.

खरंय...पुष्कर आता खूप इनसिक्युअर वाटला.. मला वाटत जेव्हा सई,मेघा एकदा पुशकी-फुसकी असं काहीतरी म्हणताना त्याने ते ऐकलं तेव्हापासून त्याला तस वाटायला लागलेलं आहे बहुदा... इकडे आड तिकडे विहीर...म्हणजे रे आ ग्रुप वाले ही घेत नाही आणि इकडे पण स मे यांचा याच्यावर विश्वास नाही.. त्याला अस एकदम आपण एकटेच आहोत आपल्याला आता कोणाचाच सपोर्ट नाही असं वाटायला लागलंय बहुतेक...

स्मिता किती डन्ब आहे हे ति स्व्तःच सिद्ध करतेय तिला आस्तादने मुद्दे दिले की अस अस जाउन सईला सुनाव वाटल तर इथे प्रॅक्टिस कर की गेल्या
मॅडम विकतच पाठबळ घेवुन>>>> ++++१११११ रे ग्रुपला सुद्दा स्मिता जावी असेच वाटतेय. म्हणूनच तिच्या डम्बपणाचा फायदा घेऊन तिला पढवत होते.

बाकी ५ लाखाची शॉपिंग काही फार जास्त नाही. माझी एक ओळखीची डिझायनर आहे, फार फेमस वगैरे नाही पण तिने इतक्यात प्रिया वारियर साठी ड्रेस डिझाइन केलेत काही. तिच्या ड्रेसेस च्या किमती पण ३० हजाराच्य घरात आहेत. ही डीझायनर कपड्यांची लो एन्ड कॉस्ट असेल तर पूर्ण सीझन = १२ शनिवार चे पार्टीवेअर = ३-४ लाख इथेच झाले की. शिवाय रोजचे कपडे (सेमी पार्टी वेअर) , ज्वेलरी, मेक अप वगैरे धरून ५ लाख होतीलच आरामात.

मी अगदी तेच लिहिणार होते, ५ लाख फार कमी आहेत १०० दिवसाच्या ड्रेसेस/ अ‍ॅक्ससरीज साठी (सेलिब्रिटीज साठी तरी ) !

कर्रेक्ट मै आणि डिजे.

पण आपल्या म.म. सदस्यांना हे फार जास्त वाटलंय. शिवाय असे खर्च करण्यावर नाकं मुरडायची असतात तशी ती आऊ, अस्ताद, रे नी मुरडली.

मुळात शो करता खास अभ्यास करून, तयारी करून, रोज नॅशनल टीव्हीवर दिसणार याचं भान ठेऊन खास कपडे घालणं, ग्लॅमरस दिसणं, या संधीचा फायदा उठवणं यात गैर काय आहे?

मामी,
एग्झॅक्ट्ली !
रे. अस्ताद गृप तर कित्येक दिवस पिकनिकला आल्यासारखे लोळत पडायचे, टास्क् अर्ध्यावर टाकायचे, मुळात स्पर्धाच सिरीयसली घेतली नव्हती, मग ड्रेसिंग अप सिरीयसली घ्यायला हवं वगैरे दूरच राहिलं !
आत्ता कुठे गेम थोडा कळायला लागलाय त्यांना.

एकदम करेक्ट. सुरुवातीचे ३०-४० दिवस ह्या लोकांनी अक्षरशः 'फुंकून' टाकले. आपला ग्रुप मोठ्ठा आहे, सगळे सिनियर आहेत या ग्रुपमध्ये आणि ते पॉप्युलर आहेत, ह्या ३-४ पोरी आणि एक पोरगा, एक म्हातारी यांचा काय निभाव लागणार आहे, चुटकीसरशी ह्यांना गेममधून काढून टाकू वगैरे कायच्या काय कल्पना होत्या रेशम ग्रुपच्या. एकेक करून सगळा ग्रुप रिकामा होत आला यांचा, आता कुठे त्यांना अक्कल येऊ लागलीये. पण आतापर्यंत मेघा-सैने आपले स्थान, वेगळा, स्ट्राँग फॅन क्लब तयार केला आहे. त्यापुढे रेशम ग्रुपमधले रेशम व आस्ताद सोडले तर इतर कोणाचा निभाव लागणे अवघड वाटते.

दक्षे,
या आधीच्या भागाची लिन्क असं म्हणून याच धाग्याची लिंक दिली आहेस. https://www.maayboli.com/node/66162
पहिला धागा अर्चना सरकार यांचा होता ना? ती लिंक अपेक्षित आहे तिथे. एडिट करून हेडर मध्ये दे ना ती!
https://www.maayboli.com/node/65670
हीच ती लिंक

<त्यापुढे रेशम ग्रुपमधले रेशम व आस्ताद सोडले तर इतर कोणाचा निभाव लागणे अवघड वाटते.>
अरेच्चा! इथे स्मिताला कसं काय मिसलं मी!

Pages