बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,
यु.एस मधे व्हुट ब्लॉक्ड आहे, लिंक देताना प्लिज थोडक्यात सांगत जाल का त्या व्हिडीओ क्लिप बद्दल ?
काय झालय सुशान्तला ?

>>>>>> अति तिखट खाल्यानं त्याला खूप अ‍ॅसिडिटी झाली आणि तो सतत उलट्या करत होता.

बाकी सगळ्यांनी त्याला तिखट / मिरच्या खायला द्यायच्याच नाहीत असं ठरवलं आहे. सुशांत दूधही पीत नाही अशी अस्तादची तक्रार आहे. अस्ताद बोलता बोलता म्हणाला की घरात साधारण २५ लिटर दूध आहे.

लिंक देताना प्लिज थोडक्यात सांगत जाल का त्या व्हिडीओ क्लिप बद्दल ? +१

सुशांत चा बहुतेक वकार युनुस झाला होता, ज्या पद्धतीने त्याने त्याच्या समोरच्या काळ्या पिशवीला काळजीपूर्वक गाठ मारली (! की तसा अभिनय केला) त्यावरुन जाणवले किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्याचा राजेश होऊ नये म्हणून कानपिचक्या देण्यासाठी 'वरुन' 'आदेश' आला असावा Wink
>>> सुशांत बाहेर गेला त्या दिवशीची माझीच पोस्ट पुन्हा एकदा. मला अजूनही दुसरी शक्यता जास्त बरोबर वाटते.

कुछ तो गडबड है दया...
त्याला तसही नेक्स्ट वीक नो नॉमिनेशन इम्युनिटी आहे तोवर पाठ्वला बाहेर !

काहीही कारण असो, पण सुशांत नसल्याने खुर्ची टास्क आणि उशी टास्क यात 'राडे' झाले नाहीत. सगळे जमेल तसे खेळत होते फक्त. कोणी मिस केलं का सुशांतला? Happy
उनाचा सगळ्यांनी ठरवून कात्रज केला खुर्ची टास्कमध्ये. आस्ताद आणि रेशमने तर खतरनाक गुंडाळलं तिला. तिने आता बाहेर पडायला हवं. भूषणही न बोलून शहाणा आहे. एकदम डेन्जरस खिलाडी.

गेममध्ये बिबॉ नीट रूल्स करत नाहीत, तीन-तीन पानी पाल्हाळ लिहिलेलं असतं, पण टू द पॉइंट फार कमी अस्तं, त्यामुळे प्लेयर्सचं कन्फ्युजन होतं. बिबॉला डायनमिक व्हायचं असेल, पण त्यामुळे नक्की नियम काय आहेत आणि काय नाहीत हे समजतच नाही. ऑन द गो प्लेयर रूल तयार करतात आणि मग भांडत बसतात. कदाचित हेच अपेक्षित असावं!

या विकसाठी कोण नॉमिनेटेड आहे? त्याखा,चौघुले नॉमिनेटेड असतील तर दोघांपैकी एकाला हाकला.
चौघुले तर असुन नसुन सारखाच आहे.

चौघुलेला खरंच हाकलला पाहिजे.
सुशांत गेल्या मुळे अस्तादला आपण सेफ होण्याची शक्यता जास्त वाटत असेल म्हणून बिचारा जास्तीत जास्त फेअर खेळायचा प्रयत्न करतो आहे.

गेममध्ये बिबॉ नीट रूल्स करत नाहीत, तीन-तीन पानी पाल्हाळ लिहिलेलं असतं, पण टू द पॉइंट फार कमी अस्तं, त्यामुळे प्लेयर्सचं कन्फ्युजन होतं. बिबॉला डायनमिक व्हायचं असेल, पण त्यामुळे नक्की नियम काय आहेत आणि काय नाहीत हे समजतच नाही. ऑन द गो प्लेयर रूल तयार करतात आणि मग भांडत बसतात. कदाचित हेच अपेक्षित असावं! >>> हो असेच असते असे मला वाटते. मुद्दाम असे नियम करायचे वाद , भांडणे व्हायलाच हवित. हिंदी मधे पण असेच सगळे टास्क होते, फक्त तीथे मारामार्या होत नव्ह्त्या, जश्या इथे झाल्या.

आस्ताद खरेच चांगला वाटतोय अन रेशम सुद्दा. त्या रडक्या सईपेक्षा खुप छान खेळली काल ती.

सुशांतला उलट्या जास्त झाल्या असतील कदाचित, रिस्क घेणार नाही बिग बॉस. सलाईनची वगैरे गरज असेल. स्मोकींगपण कमी करायला हवं, सोडायला हवं तिखटाबरोबर असं कोणीच नाही म्हणालं Sad .

ओह फक्त उलट्याच झाल्या असतील तर येईल मग परत लगेच. खरं आहे या दोन्भी टास्क्स मधे आरडा ओरडा झाला नाही तो नसल्यामुळे. सुया लपवल्यावर तमाशा केला असता त्याने.
कालचा टास्क सुरुवातीला इन्टरेस्टिंग होता. निगोसिएशन्स असते, स्मार्ट खेळ असता तर अजून इन्टरेस्टिंग होऊ शकला असता पण चोर्‍या , इमोशनल ब्लॅकमेल, लपवालपवी असे झाले तर काही मजा नाही. अ‍ॅक्चुअल उश्या शिवताना बघणे पण फार बोर झाले.
सई ची कुणा एकालाच जास्त पे देऊन जिंकू देण्याची कल्पना स्मार्ट होती पण त्यामुळे इतर कामगारांना आपल्याकडे घेताच आले नाही तिला. रेशम ने चांगली निगोसिएशन्स करून सगळे प्लेयर आपल्याकडे केले. त्या खा तर सई ला कबूल करुन रेशम कडे गेला Happy रेशम एकूणच स्ट्राँग प्लेयर आहे सर्वच बाबतीत. सई -मेघाची टीम ये रे माझ्या मागल्या - फार च वीक आणि मायनॉरिटी वाटत आहे पुन्हा एकदा.
भूषण किती इव्हिल आहे. स्वतःच्या सोयीचे काहीही जस्टिफाय करतो. रेशम ची चोरी बघून पण वा वा करत होता आजच्या प्रिव्ह्यू मधे. मेघाने ठेवलेल्या सुया सापडल्यावर स्वतः एक शब्द बोलला नाही. रेशम ला पिन मारली फक्त. त्याखा मूर्ख आणि किशोर बेरकी.
गंमत आहे, माझा नवर्‍याने सुरुवातीपासून पाहिलेच नाहिये बिबॉ. आता गेले ४-५ च भाग पाहिलेत फक्त, त्याला रेशम ऑनेस्टली खेळणारी आणि सई-मेघा चीटिंग करणारे आहेत असे इंप्रेशन झाले आहे Happy

मेघा म्हणाली. तिच्या नवर्‍याची सिगारेट तिने कशी सोडवली यावर मोठं आख्यान झालं. >>> हो का अरे वा, पण कधी झालं हे. बघते परत तो शॉट.

त्याला उलट्या होत होत्या. >>>> त्याच्या हातात काळी पिशवी दिसली तेव्हाच डाउट आला होता, ह्याने उलटी केली असेल.

आता सुशांतला तिखट खायला द्यायचे नाही यावर जुनी मैत्रीण मेघा व रे गँग यांचे एक्मत झाले. >>> हयाचा अर्थ सुशान्त परत येईल वाटत.

गंमत आहे, माझा नवर्‍याने सुरुवातीपासून पाहिलेच नाहिये बिबॉ. आता गेले ४-५ च भाग पाहिलेत फक्त, त्याला रेशम ऑनेस्टली खेळणारी आणि सई-मेघा चीटिंग करणारे आहेत असे इंप्रेशन झाले आहे >> Lol
रेशम खरेच छान खेळली. २००-३०० ला एक उशी ऐकता ऐकता आस्तादचे एका दिवसाचे ४००-५०० रु. वेतन (कि मी ऐकण्यात चूक केली?) ऐकून आश्चर्य वाटले. रु १००००० आहेत आणि ३०-४० उशा बनवायच्या आहेत तर सगळ्या कामगारांना मिळून ५०००० पर्यंत तरी वेतन जायला हवे होते. महागाई किती आहे सद्ध्या!!! Happy
आतापर्यंत मे सओ पु छान खेळत होते. रे गटाच्या आरडाओरडा करणे, शक्ती वापरणे याप्रकारामुळे मे गटाचा फायदा व्हायचा. पण चिटींग करणे + रे गटाचे चांगले खेळणे मे गटासाठी धोक्याचे आहे.

हो कालच्या भागात सुद्धा आस्ताद म्हणत होता कि सतत राजकारण करण्यात माझा मेंदू मला वाया घालवायचा नाही.
तो गातो ते नाही दाखवत बिबॉ मधे Sad

<हो कालच्या भागात सुद्धा आस्ताद म्हणत होता कि सतत राजकारण करण्यात माझा मेंदू मला वाया घालवायचा नाही.>
हे इतकं राजकारण केल्यानंतर ध्यानात आलं त्याच्या..

ओह आस्ताद ने जायला नको!! आता कुठे पुन्हा आवडत आहे तो Happy त्याचे गाणे एक दोनदाच दाखवले. नेहमी गात असेल तर नेहमी दाखवायला हवे!!
सध्याचा लूक छान दिसतोय त्याला. आणि कालच्या ब्लॅक टीशर्ट मधे खरंच मस्त दिसत होता Happy

हा हा... पण तो गातो तेव्हाच छान वाटतो. रे च्या गटात आहे ते ठीक पण आपण नामांकनातून कसे वाचायला हवे याचा तो विचार करत नाही. कित्येकदा त्याच्या गटातल्या लोकांकडून तो डालवला जातो ते तो स्पोर्टींगली घेतो पण ते लोक त्याच्यावर विश्वासही ठेवत नाहीत हे त्याला कळत नाही. तो जर म गटाला जाऊन मिळाला तर ते मनापासून सपोर्ट करतील पण आता त्यांचाही विश्वास उडाला आहे + त्याला पर्सनली मे सै चा खूप राग येतो त्यामुळे त्यांच्यात जाणे त्याला जमणार/पटणार नाही.

>>स्मोकींगपण कमी करायला हवं, सोडायला हवं तिखटाबरोबर असं कोणीच नाही म्हणालं

अहो असे काहीतरी सल्ले देउ नका नाहीतर (सिंव्ह) गडावरुन कडेलोट करतील!
कुणी काय खावं/प्यावं/ओढावं हे सांगणारे तुम्ही कोण? Light 1

मला बिबॉचीच स्टॅटर्जी (;-)) वाटतेय आता.. जे eliminate होणार आहे त्यांनाच बोलायला लावायचं.. मी misfit आहे, मला कंटाळा आलाय वगैरे.. जुई पण अशीच बोलत होती

आस्ताद आजिबात एलिमिनेट होत नसतो एवढ्या लवकर.. तो म्हणतो पण खुप कंटेंट देत असतो..
त्याखा नाही तर आऊ, दोघांपैकी एक जाईल. त्यात आणखी सुशांत रिटायर्ड हर्ट झाला असेल तर आहेच परत नो नॉमिनेशन वीक..

लोकहो, मेघा बरोबरच आउलाही मतं द्या. सध्या मेघाच्या टीममधले कमी नको व्हायला. चौघुले आणि त्याखा रेशमच्या टीममध्ये गेले आहेत. त्याखा मेघाच्या टीममधे येऊन मुंडी हलवून जातो पण खेळतो रेशम बरोबर. त्यामुळे सध्या भूषणवर फोकस करा.

वोटिंग लाईन्स सुरू आहेत. मेघा आणि आउला भरघोस मतं द्या.

Submitted by मामी on 6 June, 2018

>>>>>>>>>>>>>>>>>>>>

सहमत मामी...

१. कामगारांना घेण्यात, वापरण्यात, बक्षिसी देऊन टिकवून ठेवण्यात रेशमचे मॅनेजमेंट स्किल्स दिसले. वैयक्तिक आयुष्यात घरात ती हेल्पर बायकांना वगैरे मॅनेज करत असेल ते स्किल्स उपयोगी पडले. सईकडे अजून तिची आईच हे सगळं बघत असेल त्यामुळे तिला ते कळलं सुचलं जमलं नाही असं मला वाटतं. (हे जस्टीफिकेशन नाहीये जस्ट रिझनिंग आहे).

२. रेशम काल खऱ्या व्यापाऱ्यासारखी वागली. जास्तीत जास्त मॅनपॉवर स्वतःच्या हातात ठेवून चोख काम केले. आता बिबॉ ने त्या ऑर्डरचे बक्कळ पैसे दिले तर ही रिस्क अगदीच वर्थ ठरेल. सगळ्यांना धरून ठेवून चेअर अप करणे आणि स्वतः सोबत इतरांचेही टार्गेट पूर्ण करायला मदत करणे. अशी माणसं चांगला बिझनेस करतात.

३. सईचा बिझनेस रेशमशी तुलना करता लुटुपुटूचा/ खेळण्यातला वाटत होता. मेघा, आऊ, शमा ज्याप्रकारे सई जिंकावी म्हणून पैसे न घेता खेळत होते ते बघून राधिका मसालेची आठवण झाली. तिकडे तिचा उत्कर्ष व्हावा म्हणून सगळे पगार न घेता तिच्यासाठी काम करत आहेत तसं. ती अगदी लहान मुलीसारखी पिग्गी बँक सांभाळत बसली होती फार पैसे न देता. अश्याने सगळेच हारतील.

४. रेशमने सगळ्यांना मस्त हँडल केले. तिकडे सईला गंडवून चौघुले दहा हजार वगैरे सांगत होते. तर सईला ते खरंच वाटलं. इकडे रेशमलाही त्यांनी ते सांगायचा प्रयत्न केल्यावर तिने गप त्यांना आधीच्यापेक्षा थोडे जास्त आणि जिंकले तर इंसेंटिव्ह वगैरे सांगून धरून ठेवले.

५. रेशमच्या टीम मध्ये जास्त लोक असल्याने आपोआपच त्यांचा हुरूप वाढला आणि थोडीफार एंटरटेनमेंट करत करत त्यांनी काम केले. याउलट सईच्या कंपूत नुसता शुकशुकाट होता. एक मेघाने बोलायचा प्रयत्न केला तर तिलाही आऊंनी थोबाड बंद कर वगैरे बोलून गप्प केले. (समहाऊ आऊंची भाषा आता डोक्यात जायला लागलेली आहे). मेघा, शमा आणि आऊ अत्यंत हलाखीच्या परिस्थिती असल्यासारखं काम करत होत्या.

६. त्यागराज सईकडे येतो म्हणाला असला तरी रेशमने त्याची डळमळीत अवस्था बघून स्वतःच त्याला त्याची अपेक्षा विचारली नी तेवढे देऊ करून त्याला धरून ठेवले. तो तरी काय करणार? (त्याला खरंच सई टीममध्ये जायचे होते की नाही देव जाणे).

७. पहिले सुयांचे पाकीट मेघाने मुद्दाम लपवले होते की नाही माहीत नाही त्यामुळे तिला बेनिफिट ऑफ डाऊट देईन मी. पण रेशमचे पैसे चोरणे अजिबात पटले नाही.

८. भूषण जुई ची गादी चालवतो आहे असं काल बघताना वाटलं. सुशांत कायमचा गेममधून निघून गेला तर जरा बरं होईल. पुष्करची काल फार काही मदत झाली असे वाटलं नाही. की तो स्वतः नॉमिनेशन मध्ये सेफ झाल्याने त्याला फार इंटरेस्ट नव्हता माहीत नाही. त्याने सई सांगत होती त्याप्रमाणे रेशमकडे जाऊन तिथून खेळून तिचे पैसे संपवायला हवे होते कदाचित.

Pages