बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो जोडे मारणारच ना किती ते रडगाणं... अणि महत्त्वाचं असं की तिच्यात काही guts पण नाहियेत... Surprisingly राहिली म्हणे 50 दिवस... 1 week ही राहील की नाही असं वाटल होत म्हणे... अणि कॅप्टन बनण्यातही स्वारस्य नव्हतं म्हणे.... किती negativity..... उगाच ठेवलं तिला 50 दिवस...

मजा आली काल. टास्क इंटरेस्टिंग होता पण डेड लॉक सिचुएशन वर त्यांच्याकडे काही तरी उपाय हवा होता. एकमत झाले नाही तर सगळ्यांनी उठावे लागेल असा काहीतरी ट्विस्ट. आता म्हणजे प्रेडिक्टेबल झाले बर्‍यापैकी. कधी नव्हे ते सई मेघा ग्रुप ला अ‍ॅडव्हन्टेज च्या पोजिशन मधे पहायला मिळाले. त्यांनीही स्टेडी राहून (सो फार) त्याची माती केली नाही. मेघाने बाहेर गेल्यावर आस्ताद आणि भूषणशी प्रतिवाद करत त्यांचे तोंड बंद करण्याचे महत्त्वाचे काम चोख बजावले. आस्तादला पण नाही म्हटले तरी बॅलन्स्ड रहायचे प्रेशर आले असावे. त्यांचा सगळा ग्रुप जुईच्या एलिमिनेशन नंतर जरा जमिनीवर आला असे वाटले. त्यांना स्पर्धेपूर्वीचे फॅन फॉलोविंग, सिनिऑरिटी आणि स्पर्धा सुरु झाल्यवर तयार झालेले फॅन फॉलोविंग यात फार मोठा फरक आहे हे आता कुठे कळलेय बहुधा, सुशांत, रेशम, आस्ताद सगळ्यांकडून त्या अर्थाची वाक्ये ऐकायला मिळाली काल. पुष्की आणि सईच्या लोकप्रियतेचा आता अंदाज आलाय त्यंना, त्यामुळेच की काय आस्ताद आणि रेशमचा खेळ अगदी पॉझिटिव्ह होता काल. भूषण मात्र जुईच्या जागी व्हाइनर ची जागा घेईल असे वाटले. कसले फडतूस आणि सोयिस्कर अर्ग्युमेन्ट्स होते त्याचे. त्याखा ने लेम ऑफर्स दिल्या दोन्ही ग्रुप्स ना की मला सेफ केले तर त्या ग्रुप ला समर्थन देईल इ. पण नो वन इव्हन कन्सिडर्ड. नंदकिशोर आहे हेच विसरायला होतेय इतका लांब लांब रहातोय तो. पण त्याला जर सूर सापडला, संधी मिळाली तर त्याच्यात एक न्यूसन्स व्हॅल्यू आहे हे जाणवते. पण त्या कुणाच्याही आधी आऊ ला घालवा ब्वा. फार अनॉयिंग वाटतेय ती आता.

सुशांत अगदी खेळ सुरु होईपर्यन्त हिंडत फिरत होता. पण कन्फेशम रूम मधे आडवा पडला होता तेव्हा ठीक नाही वाटला. अचानक काहीतरी सिरियस सिंप्टम्स आली असावेत असे वाटले. उदा. ( गॉड फर्बिड ) हार्ट अटॅक सदृश लक्षणे असतील तर चॅनल रिस्क घेणार नाही अजिबात. तिथे त्यांनी काहीही डिस्कशन न करता ताबडतोब हलवले त्याला. कदाचित अशी लक्षणे काहीतरी एकदम झाली असतील तर त्यामुळे सह स्पर्धकांनी पण त्याला ताबडतोब चेक अप करायलाच एन्करेज केले असावे. कारण ती बातमी दिल्यावर आस्ताद शॉक्ड वगैरे झाल्यासारखे वाटले नाही. सो त्यांना कल्पना असणार. असा आपला माझा अंदाज.

जुईने बाहेर पडल्यावरही माती खाल्ली. अजूनच रडकी वाटली. मेघा-सै ला कधीच भेटणार नाही म्हणे. अग बाई हा गेम आहे हे विसरली का? त्या काय तिकडे मैत्री-मैत्री खेळायला आल्यात का? आस्तादही तुला ओरडायचा-बोलायचा तर त्याला काही बोलली नाही तसे इतरांच्या बाबतीतही करायचे होते.
तिचे समोरच्याचे वाक्य तोडत रडक्या आणि त्रासलेल्या चेहर्याने बोलणेच डोक्यात जाते.

आऊचा बकरा झाला हे तिला पहिल्यांदा वयपरत्वे समजलं नाही . पुढचा धोका ओळखून तिला पढवून पाठवायला हवं होतं की आता काही झालं तरी परत आत येऊ नको. आम्ही कोणी उठणार नाही. पुन्हा एकदा आऊला पाठवताना मेघानी लक्ष का नाही घातलं?

Hope nothing serious with Sushant.. a good guy at heart.. hope he gets back soon. Best Wishes!
पुढचा नंबर बहुतेक भूषण किंवा त्यागी. चौघुले असेही फक्त केबिन बॅगच घेऊन आलेत म्हणे.
आ ऊ ना प्रत्येक वेळी वाचवायचा प्रयत्न असेल म मां चा.. she has bigger safety net.

हा शो सुरु झाल्या पासुन प्रथमच आस्तादचा खेळ आवडला... त्याची भुमीका योग्या वाटली.
आस्तादचा आजुन एक उत्तम गुण म्हणजे त्याचा शब्द संग्रह उत्तम/चपखल आहे ( बहुतेक खुप वाचन असाव त्याच ).

आस्ताद, मेघा, सई व शरा असा जर ग्रुप झाला ( पुष्कर बाहेर पडल्यास ) तर हे बाकीचे सगळ्याना आरामात घरी पाठवतील..

कालच मेघाच खेळन मस्तच...
- तिला जेव्हा हे कळल की ती सहज वाचु शकते ( शराने विश्वास दिल्यावर कि तिला चांगला सपोर्ट आहे ) तिने जास्त आढेवेढे न घेता बाहेर पडली.
- ज्या पध्दतिने तिने बाकी तिघाना दम भरला की तुम्ही या खुर्चीतुन उठाल तर बघा... म्हणजे मैत्री पण सेफ व प्रेक्षक पण खुष...
- बाहेर पडुन ती शांत बसेल तर मेघा कशी, तिने मग या तिघांची बाजु लावुन धरली बाहेर की, बहुमत हेच एकमत..

जर आज तिने काहीकरुन बाहेर च्या ग्रुपला समजावल की तिला आता बसु द्याव कारण , त्या ग्रुप मधले जवळ पास सगळे बसले आहेत ( रेशम, आस्ताद, त्याखा, आऊ (आऊ ही दलबदलु च कारण पुढे करुन) ) मग आत तिला आत बसु द्याव, तर आजुन मजा येईल.

आस्ताद च्या वागण्यातील बदल हा त्याच्या कालच्या वक् व्या वरुन सुचीत होतो.
जेव्हा त्याला याची जाणीव झाली की मेघा / सई ग्रुप ची पॉप्युलॅरिटी ही त्याच्या व सई पेक्षा जास्त आहे तेव्हा त्याने बहुतेक व्यवस्थीत खेळायच ठरवल आहे.. आणि काही गोष्टीना लगाम लावणे उ. दा टिमला फसवणे, जोरात ओरडणे, खोटे बोलणे ही स्ट्रॅट्रजी आहे असे बोलणे इ. इ..

भूषण जात नै, त्यागराज जातोय. आऊसुद्धा आता जाईल असे वाटत नाही, खरे तर जाण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार तीच आहे सध्या.

उनाला आता 'मी एकदा बाहेर गेले आहे आता पुन्हा जाणार नाही' असे पढवून पाठविले आहे. मेघाने तिच्यावर लक्ष्या ठेवायला हवे होते किंवा आता तिला बाहेर यायला पटवायला हवे.

काल आस्ताद खूप आवडला! ( दक्षिणा, वाचतीयेस ना? Bw ) त्याचा आपल्या सोयीप्रमाणे नियम बदलू शकत नाही हा स्टान्स खरा होता की डॅमॅज कंट्रोल , कोण जाणे! पण येस! डॅमॅज कंट्रोल झाला आहे.
आऊ खरंच यडपट आहे. कुणावरच विश्वास ठेवला नाही की असा बकरा होतो हे तिला कधी समजणार? मेघा जीव तोडून सांगत होती की पहिल्या नंबरवर न येता ४ वर ये. पण नाही. आता त्यांनी परत आत पाठवलं तेव्हा तरी नाही म्हणायचं!
असो! आता ६व्या नंबरवर कोण जातं ते महत्वाचं! मला आस्ताद गेलेला आवडेल. कारण तो डेंजर झोनमधे आहे. तो सेफ होणं खेळाच्या दृष्टीनी गरजेचं आहे.
मेघा काल छानच खेळली. थोडी रिस्क घेऊन बाहेर गेली, गृपच्या सोयीकरता! त्यांनी हे विसरता कामा नये. बाहेर येऊनही बहुमत हा आपण मान्य केलेला गेम प्लान आहे तोच वापरला पाहिजे याची भलामण करत राहिली. खरंच खूप छान खेळतीय ती!

या आठवड्यात बहुधा कुणी बाहेर जाणार नाही कारण सुशांत गेला आहे. काल युट्युबवर एक व्हिडीओ पाहिला. त्यात असे सांगितले गेले की त्याला बाहेर बोलावले गेले आहे. कारण त्यानी पुष्करला दिलेली धमकी. -- तू इथे आहेस पण तुझी फॅमिली बाहेर आहे हे विसरु नकोस.
तसंच चौगुल्यांनी माफिया वगैरे उल्लेख करुन आग भडकवली आहेच.
यावरुन तो ज्पा पार्टीत आहे ते काहीतरी हस्तक्षेप करत आहेत असा काहीतरी मामला आहे. ख. खो. दे. जा.

तो बाहेर गेला तर बरंच होईल. एक भड्कू गेला. आस्ताद फेअर गेम खेळू लागलाय. रेशमही खूप सुधारल्यासारखी वाटते. किरकिरी जळूबाई गेली. घर बर्‍यापैकी स्वच्छ होईल.

कालचा टास्क अतिशय रटाळ वाटला. एकाऐवजी दोन सदस्य बाहेर काढ्णं बंधनकारक केलं अस्तं तर मजा आली असती. तिघांनी खुर्ची न सोडणं आणि तेच बहुमत मानलं जाणं हे अन्फेअर होतं. एनिवे, या स्टेजला फेअर गेमची अपेक्षा ठेवणं हेच अन्फेअर आहे... Happy

तसेही bb स्वतः सुद्धा कुठे फेअर असतात. अंड task वेळी नंतर जागे होऊन नियम परत नीट सांगितले, दोन सेफ झाली ती झाली. मुळात टी शर्ट मध्ये अंड लपवलं आस्तादने तेव्हाच बोलायला हवं होतं मग मेघाने टोपली blanket आणले तेव्हाही नाही बोलते मग आस्तादने अजून वस्तादपणा केला तेव्हाही गप्प Lol

तसेही सर्वच अति हुशार आहेत, नियमाचा कसा आपल्यापरीने अर्थ लावायचा ते करतात.

मुद्दम तसे नियम असतात. आठवा पाणी वाचवा वाले कार्य. गपगुमान तुझा टर्न माझा टर्न चालू होते तर बिबॉना ते बघवले नाही.

>>आऊ खरंच यडपट आहे.<<

दोन्ही टिम्स ठरवुन आउचा गेम करत आहेत. सुरुवातीला आउ सेफ झोनमध्ये पहिल्या पाचांत होती. मेघाने तिला चलाखीने त्या खुर्चित बसायला सांगितलं ज्यावर पुष्करने कबजा ऑलरेडी केला होता. इथे जाउ कि तिथे जाउ या गडबडीत्त खुर्ची तिच्या हातुन निसटली. आणि तिला ४ नंबरवर ये सांगण्यात अशी काय हुशारी होती कि जेणे करुन ती सहाव्या बझरनंतर सेफ झाली असती? रेशम टीम ने तसं होउ दिलं असतं? आउला या कांस्पिरसीची कल्पना हळुहळु येत आहे असं दिसतंय पण ती अजुनहि तिच्या स्वभावानुसार अ‍ॅक्शन घेत नाहि. एका महिन्यातंच आउ रस्टी झालेली आहे... Happy

तिला ४ नंबरवर ये सांगण्यात अशी काय हुशारी होती कि जेणे करुन ती सहाव्या बझरनंतर सेफ झाली असती? रेशम टीम ने तसं होउ दिलं असतं? >>> मेघाची हुशारी एव्हढीच की असं सागून पहिले तीन कोण येतात, त्यांना हुसकवण्यात जर स, पु, आणि श यशस्वी झाले तर पुढे आउ आणि एक जण हँडल करायला सोपं जाईल आणि सहाव्या नंबरावर ती स्वतः यायचा प्रयत्न करेल. हा मी लावलेला अर्थ आहे.

आउचा गेम करण्यात दोन्ही पार्टींना रस आहे हे खरेच आहे. अर्थात ही आफत स्वतःवर आउनेच ओढवून घेतली आहे. ती संशयी आणि हलक्या कानाची आहे असं मला वाटतं.

या वीकमध्ये आउंनीच जावे. रेशम ममांसमोर म्हणाली होती की त्या अपात्र आहेत मग आता त्यांना खोटी फुस का लावतेय, आउ डिझर्व्स नॉमिनेशन.

बिबॉ मुद्दाम असे नियम करत असावेत असं वाटतं. एकमत होणे शक्य नाही हे माहित असून सुद्धा तो नियम करायचा आणि कंटेस्टंट्नी
आपापसात बहुमत मान्य केलं की ते चालू द्यायचं. ते वर्क होतंय. आता कसे सगळे प्रत्येक वेळी बहुमत मान्य करतात!

काल आस्तादला देखील त्यांनी आधी पावर दिली नाही, पण जेव्हा तो बहुमताची फेअर गेम खेळू पहात आहे हे क्लीअर झाले तेव्हा त्यांनी त्याला त्याच्या पावरची जाणीव दिली. आवडले मला हे.

>>त्यांना हुसकवण्यात जर स, पु, आणि श यशस्वी झाले<<

ते तिघं अगदि सुरुवाती पासुनच तंबु गाडुन बसले होते. परत मेघा येवो वा मांजरेकर, ते खुर्चीतुन उठलेच नसते... Lol

तिघं अगदि सुरुवाती पासुनच तंबु गाडुन बसले होते. >>> Biggrin

अगदी खरं आहे. तीच बिबॉची स्ट्रॅटीजी ( का स्टॅटर्जी ? Lol )असेल. त्यातल्या तिघांनी राज म्हणतात तसं बसून रहायचं आणि चौथ्या खुर्चीची संगीत खुर्ची करुन प्रत्येकाला आतमध्ये फक्त पेस्ट्रीज खाण्यापुरतंच ठेवायचं.

स्मिताला रेशम टीमशी loyal राहण्याचं बक्षीस मिळाले.

कुशन्स task मध्ये प्रामाणिकपणे जो चांगलं बिझनेस डील करून चांगलं production करेल आणि कमवेल जास्त तो जिंकेल हे अपेक्षित असावं इथे चोऱ्या व्हायला लागल्यात.

चोरी वस्तूची किंवा पैशाची दोन्ही चूक.

स्मिता task मात्र नेहेमी मस्त करते. आज पण तिच्या आणि चौगुले च्या उशा छान शिवलेल्या होत्या.

ह्यावेळी आस्ताद आणि मेघा ला वोट देऊ का, विचार करतेय. मी फक्त पुष्करला दोनदा दिलंय. अजून कोणालाच नाही. आस्तादने काल प्रामाणिकपणे कॅप्टनशीप निभावली.

आपल तर मेघाला.... एवढ सगळ होउन पण ति मैत्रीला जागली... वर परत शांत नाही बसली तर त्या ३ ना सेफ करायचा प्रयन्त करत होती शेवट पर्यन्त...

Pages