बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेशम गोळयान्चा उल्लेख करत होती तेव्हा खाली तन्वीच्या गोळयान्च्ची जाहिरात झळकली. शक्तीपेक्षा युक्ती वापरा अशी काहीतरी Tagline होती. Lol

स्मिता जेव्हा चोरीबद्दल मे-स ला जाब विचारत होती तेव्हा मेघा किव्वा सई स्मिताची खोटी शपथ घेऊन चोरी केली नसल्याचे प्रुव्ह करत होती. Uhoh

बाकी सई ने स्मितासमोर आपण इनोसन्ट असल्याचा अभिनय छान केला. Happy

डॉली बिंद्रा वगैरे कॅटॅगरीमधला वाटतोय. जरा चटपटीत मसाला टाकण्यासाठी आणलाय, जाईल एखाद्या आठ॑वड्यात.. >>> तस जर असेल तर राहू दया किशोरला दोन तीन आठवडे. मस्त मजा येईल. Happy तसही अन्डा टास्कनन्तर शो बोर झाला होता.

Kuchh tum kaho kuchh ham kahe nawaacha juna movie aaj baghitla suttiwar asalyamule.. tyaat fardin khan aani richa pallod etc lok aahet.. tyaat fardin chya lahaan bahinich kam keleli same sai sarkhi watat hoti.. mhanun search kel tar saich aahe.. chhan watali tyaat >>>> चित्रपट पाहिला होता, पण हे माहित नव्हत.

कपिल शर्माच्या पहिल्या चित्रपटात 'किस किस को प्यार करु' त्याच्या तीन नायिका होत्या. सई त्यातलीच एक. मन्जिरी फडणीस सुद्दा होती.

तर त्या चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त एका युटयूब channel ने कपिलला तुम्ही किती ओळखता अशी स्पर्धा घेतली होती तिघीन्मध्ये. त्यात सई जिन्कली होती. त्यात तिने घातलेला पोपटी का पिवळा कोट big boss मध्ये सुद्दा घातलाय.

https://www.youtube.com/watch?v=UCeKNoidkMc

भारताबाहेरून मतं देता येतात का? कोणीतरी माझ्यावतीने मेघा आऊला द्या बरं! >>> मी टाकते तुझी मतं ट्युलिप. धाडेपरिवारातर्फे तुझे आभार.

<स्मिता जेव्हा चोरीबद्दल मे-स ला जाब विचारत होती तेव्हा मेघा किव्वा सई स्मिताची खोटी शपथ घेऊन चोरी केली नसल्याचे प्रुव्ह करत होती. Uhoh>
नाही, मेघाने स्वत।ची शपथ घेतली. तीने चोरी केलीच नसल्यामुळे घेतली शपथ. सईने नाही घेतली कारण तिने चोरले होते.

रेशम फार दुष्टपणे खेळते. सईशी बोलताना तर जरब वापरते आणि मेघाशी भांडणाचा सुर लावते. सई, मेघा प्लॅनिंग दुष्ट वाटत नाही कारण त्या हसुनखेळुन करतात. रेशम मात्र फार हिंस्त्र चेहर्‍याने फिरत असते. तिचे दोन आठवड्याचे नाटक फार टिकणार नाही. खरा चेहरा दिसतोच आहे.

>>परवा त्यागी ने बि बॉ कॅमेरा समोर अगदीच वाईट्ट पर्दा फाश केलाय सगळ्यांचा<<
हो हो. त्यागराजचं रीड पर्फेक्ट होतं. घरात सगळ्यात जास्त विध्वंसक वृत्ती कोणाची असेल तर ती सई-मेघाची. खुर्चीसम्राटच्या पहिल्या टास्क पासुन या दोघींनी घाणेरडापणा करुन त्याचं प्रदर्शन केलेलं आहे. नाहि टिकणार दोघीहि जास्त वेळ. याउलट आस्तादला खरा गेम कळलेला आहे. टास्क स्पोर्टिंगली खेळुन, चिटींग न करता जिकण्या-हरण्याची तो पर्वा करत नाहि. अशीच सच्चाई/प्रामाणिकपणा त्याने पुढेहि जपला तर खूप पुढे जाइल. मेघा/सई यांना बिग्बॉस संपल्यावर बहुतेक स्वतःच्याच प्रॉडक्शन हाउस मधे काम करावं लागणार आहे... Happy

कपिल शर्माच्या पहिल्या चित्रपटात 'किस किस को प्यार करु' त्याच्या तीन नायिका होत्या. सई त्यातलीच एक. मन्जिरी फडणीस सुद्दा होती.>>>> 'नो एन्ट्री- पुढे धोका आहे' मध्ये पण होती सई.

परवा त्यागी ने बि बॉ कॅमेरा समोर अगदीच वाईट्ट पर्दा फाश केलाय सगळ्यांचा >>>> ओह पर्दा फाश वगैरे म्हणण्यासारखे काय होते त्यात? काहीच विशेष रहस्यभेद वगैरे वाटले नाही त्यात. त्याचे कुणाशी पटतेय कोण त्याला आवडले नाही इतकेच होते की. तसेही त्याखा सध्या तरी इतका नगण्य आहे की त्याने काहीही बोलले तरी त्याला कोणी किंमत देईल असे वाटत नाही.

नाहि टिकणार दोघीहि जास्त वेळ. >>
मेघा/सई यांना बिग्बॉस संपल्यावर बहुतेक स्वतःच्याच प्रॉडक्शन हाउस मधे काम करावं लागणार आहे >>>> अरेच्या ? पह्यले ये नक्की करो, त्या टिकणार आहेत की नाही ? Happy

आस्ताद रेशम भुषण ने तर कॕप्टनसी टास्कवेळी मेघा उभी राहिलेली चौकट  ढकलून  दिली होती हा त्यांनी  केलेला विध्वंसक पणाच होता.

>>अरेच्या ? <<
नाहि टिकल्या तर बिग्बॉस संपायच्या आधीच प्रोड्युसर्सची रांग लागेल त्यांच्या घरासमोर असं म्हणतांय? बरं... Lol

मे सै कोणाला कसे बाहेर काढायचे याचे खूप प्लॅनींग करत असतील, त्यांना करावे लागणारच आहे कारण समोरच्या गटाकडे मेजॉरिटी आहे, शक्ती आहे आणि जरा डोकेही आहे. त्या किर्किर-पिर्पिर करतात, समोरचा इरिटेट होईल अश्याही वागतात-बोलतात. पण सुशांत, आस्ताद, राजेश, उना सारख्या हिणकसपणे, खेकसत, ओरडत नाही. रेशमचा ट्रॅक राजेशमुळे चुकला होता, आता ती कशी खेळते ते बघावेसे तरी वाटते. आस्तादही सुरुवातीला गद्दारी केल्यामुळे पसंतीस उतरला नाही. आता तो फेअर खेळतोय ही त्याची जमेची बाजू. मेसै अश्याच चोरी-जोराजोरी करायला लागल्या तर सगळे एका पातळीवर येतील मग त्या नाही टिकणार इथे.
त्यागराज गेला असता म गटात पण त्याला गप्पा मारायला, ऐकायला मिळणारे पब्लीक रे गटात आहेत असे दिसते. तो आल्यापासून सै त्याच्याशी एकदाही बोलायला गेली नाही असे त्याचे मागच्या शनीवारी बोलणे होते. त्यातून ते बाकिचे सईच्या ताटाखालचे मांजर असे त्याचे म्हणणे आहे. बेड्वर बसून या बायका सतत प्लॅनींग करत असतात (त्या काय बोलतात ते आपल्याला कळते पण त्याला फक्त दिसते )त्यामुळे तो बोअर होत असेल म्हणून तो रे गटात गेला Happy

स्मिता जेव्हा चोरीबद्दल मे-स ला जाब विचारत होती तेव्हा मेघा किव्वा सई स्मिताची खोटी शपथ घेऊन चोरी केली नसल्याचे प्रुव्ह करत होती.
Submitted by सूलू_८२ on 7 June, 2018
>>>>>>>>>>>

मला ही तस वाटल, पण लक्षात आल की, मेघा ने स्वःताच्या शपथेवर सांगीतल कि फक्त तिने नाही चोरले ( जे बरोबर होत)....

लगा के नहीं लगा..
पण प्रामाणिक मत, इथल्या विश्लेषणामुळे मी ते 'बिगबॉस बघायला लागलो. मजेदार असतं विश्लेषण. आधीचा प्रतिसाद हलकेच घ्या!

त्यागराज ने फक्त तो रेशम टीम मध्ये जाण्याचे justification दिले कारण  तो नोमिनेशन आला म्हणून तो घाबरला  आहे . आणि त्याच्या  साठी कोणीच खुर्चीवरुन उठले  नाही म्हणून  त्याला सई पु group चा राग आला.

मला त्याने स्वतःच्या मेंदूचं केलेलं अनॅलिसिस तर फारच आवडले. >> ते केवळ महान होतं. Biggrin
अस्तादनं स्वतःचाच फॅनक्लब काढलाय आणि त्या फॅक्लचा तो एकमेव आजीव सभासद आहे.
Submitted by मामी on 7 June, 2018

>>>>>>>>>>>>>>>>

मामी Happy
मी हे आज पाहिल...

काल परवा अस्ताद थोडा चांगला वागत होता म्हणायचा अवकाश...
त्याला आपण शक्तिमान असल्याचा भास होतो अस दिसतय आजकाल ( अदभुत अदम्य साहस कि परिभाषा है, शssक्तिssमाssन.. शक्तिमान).
प्रेक्षका बद्द्ल बोलुन नकळत अशा व्हिवर्सना दुर केल जे थोडफार त्याला सपोर्ट द्यायला पाहत होते..
कोणी तरी समजवायला हव की फक्त ऊत्तम गायक वा कला असने म्हणजे झाल नव्हे.. नाहीतर तहलका मध्ये आमरिश पुरी हा उत्तम सतार वादक तर विश्वात्मा मध्ये गुलशन ग्रोव्हर बासरी वादक होतेच की... !!!

तो गंदकिशोर जर असाच वागत राहिला तर त्याचा मेघा आणि टीमला चिक्कार फायदा आहे.
तसाही तो कदाचित एका आठवड्यापुरताच आला असेल बहुतेक.

सुशा गेला रे. लय भारी.
अ‍ॅसिडिटी मुळे डॉक्टरांनी त्याला आराम करायचा सल्ला दिला आहे. सो त्याने स्वत:हून हा कार्यक्रम सोडला आहे.
याला म्हणतात सुंठीवाचून खोकला.....

हा गेम एका स्टेजला पोचल्यावर विकेंडच्या वारमध्ये बाहेरचे लोक त्यांची मतं मांडायला बोलावतात.

मेघा-सई गँगच्या वतीने मामी आणि स्मिता/रेशम गँगच्या वतीने राव पाटील यांची माबोतर्फे निवड व्हावी हा प्रस्ताव मी मांडतो... Proud

काही म्हणा पण मेघा सईचा वावर खूप प्लेझंट असतो. त्यांच्यात खुनशीपणा नाहीये.

आज पैसे चोरायचं प्लॅनिंग करताना त्या खूप मस्त वाटत होत्या.

गंदकिशोर आणि कडू एकदम छपरी आहेत. आणि तो काळेपण. काळे थोडा जास्तच. एकतर स्वतःचे काही मत नाही, डबलढोलकी. आणि आवाज चढवायचा असेल तर फक्त बायांवर चढवतो.

अ‍ॅसिडिटी ? हे कारण आराम करायला आणि शो सोडून द्यायला ? असेलही पण ऐकायला विचित्र वाटत आहे खरे.
कुठे आली आहे ही न्यूज?

Pages