Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाब लोटल >>>>> म्हणजे
लाब लोटल >>>>> म्हणजे नक्की काय यावर दीड मिनिट घालवलं.
आऊला घोळात घेतायत व्हिमं.
आऊला घोळात घेतायत व्हिमं.
काल म मा ने मस्त झापल जुई ला.
काल म मा ने मस्त झापल जुई ला... किती ती किरकीर.
मेघा आणि सई वर ती डोळे झाकुन जळते म्हणजे ....
फॉर सम रिजन.. तीला सई विषयी काही तरी भयंकर न्युनगंड आहे. पण ति तो मान्य करायला तयार नाही. असो, तिच वागण तिला लखलाभ.
पुष्कर चा प्रकार मेघाला कळाला ते खुप बर झाल..
तो सारखा भिरभिरल्या सारखा वागतो, तो बोलताना पण दोन शब्दा मध्ये इतक अंतर ठेवतो कि वाटत याला सुचत नाही की आजुन काही.
सईशी बोलताना किती तरी वेळ सई त्याच पुढच वाक्य पुर्ण करते.. जाम हसायला येत ते पाहुन...
मेघा ने आता शरा व त्याखा ला जवळ करुन नीट खेळी करायला हवी.
इकडे भुषन खुप चालाख व स्ट्राँग खेळाडु वाटतोय...
रविवारचा सईचा ड्रेस व सई दोन्ही मस्तच.... तो ड्रेस मोरपंखी रंगाचा होता ना... खुपच मस्त दिसली ति त्यात..
सईचा -मेघाचा ड्रेस, रेशमची
सईचा -मेघाचा ड्रेस, रेशमची आणि स्मिताची साडी मस्त ! जुई सत्यनारायणाच्या पुजेला किवा रिस्पेशनला आल्यासारखी ( तिची पैठणि आवडली पण! )
जुई चा व्हिडिओ पाहिला. किती
जुई चा व्हिडिओ पाहिला. किती मी मी करतेय अजुनी.
तु मला मिस करशील, आज रात्री रड फक्त उद्या नको.
काय आहे हे?
हो ना जुई लग्ना मुंजीला
हो ना जुई लग्ना मुंजीला आल्यासारखी नटली होती. मला सईचे कपडे, अॅक्सेसरीज आवडतात नेहमी. मेघाचे पण चांगले असतात. रेशम चे काही काही ड्रेस जरा जुन्या फॅशन चे वाटतात मला , पण तिला चांगले दिसतात. स्मिताला ते ट्रॅडिशनल कपडे, साड्या सूट नाही होत. वेस्टर्न चांगले दिसतात. पुरुषांमधे मग त्यातल्य त्यात सुशांतच वेल ड्रेस्ड म्हणावे का
बाकीचे अगदीच कॅज्युअल वेअर मधे असतात. आऊंनी हल्ली विशेष तयार होणे सोडूनच दिले आहे. एकदाच ती जरीची साडी वगैरे नेसली होती. तीही एंट्रीच्या एपिसोड मधे होती तीच. एकूण कसली केअर च करत नाहीत त्या बहुतेक. घरी पाठवा त्यांना आता 
सई, शर्मिष्ठा आणि पुष्कर ने
सई, शर्मिष्ठा आणि पुष्कर ने मेघाला नॉमिनेशन मध्ये टाकलं. मेघाला बाहेर सपोर्ट खूप आहे त्यामुळे ती सेफ होईल.
आऊ काय करतायेत बघूया उद्या. शेवटी बाहेरच्या grp मधून सेफ कोण होतंय, उद्या कळेल.
आस्ताद खूप loyal आणि clear होता, त्याला कॅप्टनशिप दिली थोडा वेळ, त्याच्याशी प्रामाणिक राहिला.
सुशांत ला एकदम काय झालं, कळलं नाही. बरा तर होता.
होना पण फार सिरियस नसावे अस
होना पण फार सिरियस नसावे अस वाटतय, आस्ताद ने व्यवस्थित केल सन्चालन!
गॉसिप न्युज म्हणतात
गॉसिप न्युज म्हणतात सुशान्तच्या या टेंपररी एग्झिटमधेही कुछ तो स्ट्रॅटेजी आहे दया !
बेसिकली परत येणार नक्की, ही मधली वेळ आत्मपरिक्षण किंवा चॅनलच्या गायडन्स साठी दिलाय असही ऐकायला मिळतय कारण तसेही आत्ता इक्वेशन्स बदालायच्या मुड मधे होते मांजरेकर !
सुशान्त ऋतुजा दोघेही आले कि अजुन बदलणार परत सगळे !
मलाही सई मेघाचे कपडे अ
मलाही सई मेघाचे कपडे अॅक्सेसरीज आवडतात, सईचे ऑक्सिडाइज्ड झुमके , बँगल्स मस्तं असतात, तिचे अगदी नॉर्मल सल्वार कमीझही आवडतात, हेवियर साइड बॉडी स्ट्रक्चर असून फ्रॉक वगैरे शॉर्ट ड्रेसही सईला मस्तं दिसतात !
मेघाचे कपडे खूप ग्लॅमरस्/एक्स्पेन्सिव्ह कॅटॅगरी, या गेम मधे टॉपला असायला हवं हे तिच्या वागण्यातून तर दिसतच पण इतरांपेक्षा काही लेव्हल्स अप हे तिच्या कपड्यांमधूनही दिसतं.
स्मिता आणि रेशमबद्दल मै ला अगदी +११११
रेशम बाकी एफर्टलेस आउटफिट्स मधेही छान दिसते.
सध्या तरी टॉप ५ मधे मेघा-रेशम -आस्ताद -पुष्कर-स्मिता अस्स्तील असं वाटतय.
मेघाला बाहेर सपोर्ट खूप आहे
मेघाला बाहेर सपोर्ट खूप आहे त्यामुळे ती सेफ होईल.>>+१
जो या तिघांना पैकी एकाला उठवेल तो खरेच भारी.
आजचे नामांकनाचे कार्य छान होते. आता त्या तिघांपैकी कोणीही खुर्चीतून हलायला नको. बाहेरच्या लोकांशी सल्लामसलत करण्याची परवाणगी देऊन बिबॉने भांडणे लावली
बाहेरुन लोकं खूप manipulate करु बघत होती. उनाला तर जास्तच....बघ तुझ्यासाठी कोण खुर्ची सोडतय का? वेल प्लेड!!! एकतर ती त्यांच्यापासून दुरावेल किंवा नामांकनामधे येईल जे यांच्या सोईचे होईल. भुषन बोलत होता कि बझर झाला कि याच खुर्चीतला माणूस जर बाहेर पडणार तर कायम तुम्ही(पुसैश) सेफ होणार तर या बझरला काहीच किंमत राहणार नाही. त्याला कोणीतरी सांगायला हवे होते कि बाहेर कोण पडणार ते आतलेच ठरवणार आहेत तर ते आम्हाला ठरवू दे.
रेशम आल्यावर मला वाटले कि ती हलणारच नाही पण ती शेवटी उठली. असेच खेळले तर हा गट सेफ होईल. शर्मिष्ठा त्यांच्यात सामिल आहेच, तिला बाहेर जाउ दिले नाही ते बरे झाले. उनाला परत भडकवून पाठविले आहे.
गॉसिप न्युज म्हणतात
गॉसिप न्युज म्हणतात सुशान्तच्या या टेंपररी एग्झिटमधेही कुछ तो स्ट्रॅटेजी आहे दया >>> मलाही वाटतय. त्याचा राजेश होऊ नये म्हणून प्रयत्न करतील असं. वाच कमेंट्स. सुधार नाही तर खरं नाही. एकदम काय झालं. चांगला होता. आधी काही आजार असेल आणि उफाळला असेल अचानक तर माहिती नाही पण दाल मे कुछ काला वाटतंय.
सुशांत चे काय गौडबंगाल आहे?
सुशांत चे काय गौडबंगाल आहे? असं वाटत तरी नाही की असे कुणाला शॉर्ट लीव्ह वर जाऊ देतील काही सिरियस कारण असल्याशिवाय. राजेश चा अज्ञातवास वेगळा, तो खेळाचा भाग होता. असे तर मग सई ने पण जाऊन यावे मग ट्रीटमेन्ट ला
तसेही आओ जाओ घर तुम्हारा आहे तिथे.
https://youtu.be/uSBu-1kXxio
https://youtu.be/uSBu-1kXxio
फक्त कंमेंट्स वाचा खालच्या.
आउनं माती खाल्ली की काय ते आज
आउनं माती खाल्ली की काय ते आज कळेल. आउ अजिबातच लॉयल नाहीये आणि लगेच प्रभावित होते.
रेशम ठाम बसली होती पण अस्तादनंच निर्णय घ्यायचा आहे हे कळल्यावर चटकन उठली देखिल. फेअर गेम!
अस्ताद देखिल एकदम 'कर्तव्य दोस्ती से भी बढकर होता है' मोडात होता त्यामुळे तिढा सुटला. नशीब! अस्तादला दाढी होती तेच बरं होतं. डोळ्यांवरून लक्ष जरा डायव्हर्ट व्ह्यायचं.
सुशांत ( किंवा स्मिताच्या भाषेत बोलायचं तर शुशांत) ची टेंपरवारी एक्झिट ही बहुधा चौघुल्यांच्या कृपेनं असावी. चौघुल्यांनी सुशांतवर जो वार केला त्यावरून तो अति खवळला असणार. माफिया वगैरे ऐकून त्याचा राग आउट ऑफ कंट्रोल झाला असेल. त्याला पॅसिफाय करून पाठवतील.
आज उशांची फॅक्टरी असणार आहे. त्यात रेशमकडे दोन रिळं आणि सईकडे दोन सुया आहेत वाटतं. त्यांना समजूतीनं अदलाबदली करायला लागणार आहे. बघूया काय होतंय....
जुई, आता बाहेर गेली आहेस तर कळकटपणा सोड की! अजूनही सई - मेघावर जळतीये ती. जरा ग्रेसफुल रहा.
मीही जुई ला या विडिओ मध्ये
मीही जुई ला या विडिओ मध्ये कंमेंट्स केल्या आहेत
एकदम डोक्यातच गेली जुई !
BB च्या घरा मध्ये टास्क किंवा इतर ग्रुपबाजी इतकं ठीक आहे , पण बाहेर येऊनही तीच किरकिर
तिचा आवाज ऐकून कानच किटले एकदम .
चांगली करिअर चालली होती तिची , स्वतःच्या हातानेच त्यावर धोंडा मारला तिने !
तिला नायिकेचं काय खलनायिकेचं काम मिळणं हि कठीण आहे .
People will not forget Her (Real HER) for long time.
आस्ताद बहुश्रुत, व्यासंगी आहे
आस्ताद बहुश्रुत, व्यासंगी आहे अगदी. बोलतो ते अगदी चपखल शब्द निवडून. बोलण्याचे विषयदेखिल इतरांपेक्षा वेगळे असतात. शिवाय आताशा इतरांप्रती असणारा माजुर्डा, तुच्छतेचा टोनदेखिल कमी झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे तो आवडायला लागला आहे.
त्याखाची सपोर्टच्या बदल्यात नॉमिनेशन टाळण्याची क्लृप्ती दोन्ही ग्रुप्सनी व्यवस्थित फाट्यावर मारली आहे. अक्कल असेल तर असले बार्गेन्स करायला तो बघणार नाही यापुढे.
आऊ जायलाच हवी आहे आता. पण त्याखा असेल नॉमिनेशनमध्ये तर तो जाणारसे वाटते.
मला नाही वाटत, इतका परिणाम
मला नाही वाटत, इतका परिणाम होईल बिबॉमधिल प्रतिमेचा तिच्या करीअरवर. मेघा म्हणाली ते खरंय, शेवटचे उरलेले ५ जणच लक्ष्यात राहणार लोकांच्या. सुरूवातीच्या आठवड्यात बाहेर पडलेले लोकांच्या डोक्यातून अलगद निघून जातात. आज विनीत, थत्ते, राजेश आठवत पण नाहीत.
कालचा भाग आवडला.
कालचा भाग आवडला.
तो नव्हता म्हणूनच काल भांडणं नाही झाली असं म्हणणं अतिशयोक्ती ठरु नये.
>मे-स-पु-श चौघांचं नशीब काल चांगलं होतं, त्यामुळे पटकन जाऊन त्या ४ खुर्च्यांमध्ये जाऊन बसू शकले. शरा चांगलीच स्मार्ट निघाली, मेघाला पहिल्याच राउंड मध्ये बाहेर पडण्यासाठी तिने पटवलं. सई-पुष्की दोघेही ठामपणे हलणार नाही म्हणत राहिले.
>सुशांत चा बहुतेक वकार युनुस झाला होता, ज्या पद्धतीने त्याने त्याच्या समोरच्या काळ्या पिशवीला काळजीपूर्वक गाठ मारली (! की तसा अभिनय केला) त्यावरुन जाणवले किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्याचा राजेश होऊ नये म्हणून कानपिचक्या देण्यासाठी 'वरुन' 'आदेश' आला असावा
>आस्ताद काल जाम आवडला. स्पर्धक म्हणून जेव्हा आत येऊन बसला, तेव्हा त्याला बाहेर का काढू नये हे व्यवस्थित तर सांगितलेच, पण पुन्हा पंचायचतीच्या टास्क प्रमाणे कालही बहुमत- एकमत परिस्थिती आली, तेव्हा निमुटपणे खुर्ची सोडली. पर्यायी संचालक म्हणून एकदम योग्य भूमिका होती त्याची.
>रेशम सुद्धा काल कधी नव्हे ती आवडली, पटली. बिबॉ ने निर्णय आस्ताद वर सोडल्यावर खुर्ची सोडली.
>आउंनी काल परत सिद्ध केलं की त्या आपल्या मतावर ठाम राहू शकत नाहीत .
>कडू साहेब ५-५ वेळा एकच गोष्ट माझा मुद्दा वेगळा आहे असं सांगायचा प्रयत्न करत सुशांत ची जागा भरुन काढायचा प्रयत्न करत होते.
आज काय सगळं एकदमच बॅक टु
आज काय सगळं एकदमच बॅक टु नॉर्मल विथ मेघा-पुष्कर-सई ??
मांजरेकर रुसतील ना आता मेघाने नवीन मित्रं नाही मिळवले म्हणुन
कालच्या मांजरेकरांच्या डावानंतर वाटलं मेघा सुध्दा आता सईबरोबरच्या डबल बेडवरून बस्तान हलवणार पण आज दोघी परत एकमेकींना कुरवाळतच उठल्या, बहुदा पॅचप कसा झालेला नाही दाखवणच पसंत केलं चॅनलने !
शेवटी होतय काय कि आता सगळ्यांना सगळ्यांची स्ट्रेंथ , वीकनेसेस आणि कुठे मेजर एकमत होतय त्यानुसार दर वेळी भांडून पुन्हा त्याच टिम्स एकत्रं येतात कारण शेवटी एकमेकांना हे लोक आवडो न आवडो नॉमिनेशन्स ला सपोर्टर्सची गरज असतेच आणि सई म्ह्स्णते तसे शेवटी डिस्ट्रक्टिव वृत्ति नसलेल्या लोकांचा आणि असलेल्या लोकांचा वेगवेगळा गृप बनतोच भांडाभांडी रुसण्या फुगण्यानंतर.
बाकी आजच्या दिवसाचा बेस्ट पार्ट म्हणजे टास्कमधे कधी नव्हे ते हा गांधीवादी अहिंसा गृप पटकन बसला सेफ झोन मधे आणि मेघा नॉमिनेशनला न घाबरता बिंधास्त बाहेर पडली, फायनली तिला कॉन्फिडन्स/ अंदाज आला तर बाहेरच्या फॅन फॉलॉइंगचा !
मैत्रीला पुन्हा एकदा जागली आणि तिच्या गृपमधले इतर नॉमिनेट झाले नसल्याने व्होट्स डिव्हाइड होणार नाहीत, मेघा व्होट्स नक्की घेणार भरभरून.
आज अस्ताद चांगला वाटला आणि पुन्हा एकदा आऊ सगळ्यात सर्वात अनॉयिंग बाई, अतिशय विचित्रं , विकृत भाव असतात त्यांच्या चेहर्यावर !
सुशान्तच्या लॅब टेस्ट साठी बाहेर पडणे प्रकारात काहीतरी गडबड नक्कीच आहे, जर तो जास्तं काळासाठी गेला असेल तर पुन्हा नो नॉमिनेशन वीक असणार !
जिजिविषा असणारे वीर जोपर्यंत
जिजिविषा असणारे वीर जोपर्यंत स्ट्राँग प्रतिस्पर्धी जिवम्त आहेत तोपर्यंत आपापसांत लढणार नाहीत. प्रतिस्पर्धी कँप थोडा मोकळा होऊ द्या मग बघा दोघी कशा एकमेकींवर तलवार उपसतात ते.
या दोघी फक्त अशा आहेत ज्या मित्र बनवणे, मज्जा करणे, चकाट्या पिटणे या कारणांसाठी बिबॉमध्ये आल्या नाहीयेत, जिंकण्यासाठी आल्यायत. पुष्कर पण आहे पण तो बावचळतो लवकर.
जुई सारख सारख मी कमी बोलते मी
जुई सारख सारख मी कमी बोलते मी कमि बोलते अस म्हणत होती तेव्हा मी खुर्चितुन पडायची बाकी होते " मुव्ह ऑन ताई! " अव! सन्पला की शो अजुन कितीवेळ रडणार?
काल मेघा मस्त म्हणाली त्या
काल मेघा मस्त म्हणाली त्या खुर्चीतून उठताना की मी उठतेय पण तुमच्या तिघांपैकी कुणीजरी उठुन बाहेर आलात तर लाटण्याने मारेन!...... याला म्हणतात लीडरशीप!
खरतर तिने दम भरल्यामुळेच ते तिघे घट्ट बसून राहीले तिथे नाहीतर एकतर आउंसमोर पाघळले असते किंवा रेशमसमोर गळपटले असते
मेघा ओळखून आहे सगळ्यांना आणि ती एक स्टेप पुढचा विचार करते!
शरा या ग्रूपसाठी बाइंडींग एजंटचे काम करतीय
बाकी आस्ताद फेअर खेळला, रेशम शक्य तितका वेळ नेटाने लढली, भूषणने हुश्यारी करायचा प्रयत्न केला पण पंचायत टास्क मध्ये खाल्लेली माती मेघा टीम साठी एक धडा होती त्यामुळे त्यांनी भूषणचा बेत यावेळी हाणून पाडला!
आता उर्वरित सगळी गॅंग आउंना मोहरा बनवून खेळतीय!
मेघा नॉमिनेशनला न घाबरता
मेघा नॉमिनेशनला न घाबरता बिंधास्त बाहेर पडली, फायनली तिला कॉन्फिडन्स/ अंदाज आला तर बाहेरच्या फॅन फॉलॉइंगचा !>>> डीजे, मला यात शर्मिष्ठाचा मोठा हात दिसतो.. तीने मेघाला आश्वस्त केलय कि मी सांगते ना तुझं फॅन फॉलोविंग किती स्ट्राँग आहे आणि तू नक्की सेफ होणार असं.. चला बर झालं मेघा आता गेम खेळायला मोकळी..
बाकी आतल्या मेघा कंपुतल्या तिघांनी काय खतरनाक किल्ले लढवलेय आत्तापर्यंत.. आणि आस्ताद बिबॉच्या मिठाला जागला हेपन कारण आहेच जोडीला.. त्याला पॉप्युलॅरिटी आणि बिबॉमधे लोकांचे वोट्स यातला फरक चांगलाच कळलाय असं वाटतय अन आता तोपन जरा डोक्याने आणि फेअर गेम खेळुदे म्हणजे मिळवल..
काल मेघा मस्त म्हणाली त्या
काल मेघा मस्त म्हणाली त्या खुर्चीतून उठताना की मी उठतेय पण तुमच्या तिघांपैकी कुणीजरी उठुन बाहेर आलात तर लाटण्याने मारेन!...... याला म्हणतात लीडरशीप!>> मलापन जाम मस्त वाटली ती..खतरनाक भाव होते तिचे..
आता या तिघांनी आऊचं मन जपायला जाऊ नये आणि त्यांना नॉमिनेट करुन टाकावं...
>>त्याला पॉप्युलॅरिटी आणि
>>त्याला पॉप्युलॅरिटी आणि बिबॉमधे लोकांचे वोट्स यातला फरक चांगलाच कळलाय असं वाटतय
फायनली!
जितक्या लवकर स्टारडमच्या बुडबुड्यातून बाहेर येतील तितके ते चांगले असेल त्यांच्यासाठी
रेशमलापण जाणवलय बहुतेक ते!
अग्गं बाई.. जूई म्हणते कि
अग्गं बाई.. जूई म्हणते कि पुष्कीला स्वतःची मत नाही तर बोलं.. मेघाचा आवाज इरिटेट करतो तर 'जस्ट शटअप' असे म्हण..
हिचे न ती जी हखा आल्यावर तिच्याकडे रेराचं बिचिंग करत होती ते..
रड्या तसाही नाहीये सध्या आणि
रड्या तसाही नाहीये सध्या आणि कॅप्टन होता/असल्यानं सेफ आहे. त्यामुळे आता आउ येऊंद्यात नॉमिनेशन मध्ये आणि तिला किंवा उसण कडूला बाहेर काढा आधी. दोघांचाही कंटाळा आला. जुईनंतरचा नेक्स्ट कळकट इसम उसणच आहे.
त्याखा जाईल आता बहुतेक बाहेर.
त्याखा जाईल आता बहुतेक बाहेर.... त्याचा म्हणून असा फारसा फॅन बेस नसावा आणि शोमध्ये पण अजुन त्याने स्वताची जागा निर्माण केलेली नाहीये!
आणि तो एकच बॅग घेउन आलाय बहुतेक
काल भूषण जेव्हा मेघाला बोलला
काल भूषण जेव्हा मेघाला बोलला की प्रेशराईज हा शब्द वापरू नको तेव्हा तो माझ्या प्रचंड डोक्यात गेला.
) कारण मेघा बरोबर बोलत होती हे त्याला पण माहित आहे, आणि पंचायत समितिच्या खेळात बहुमत मान्य केले ते जबरदस्तीने हे मेघा त्याला सांगत होती तर तो त्याच्याकडे काणाडोळा करत होता. पण आस्ताद ला कळून चुकलं की आपण ते करू शकत नाही. त्यामुळे तो शहाणपणाने वागला.
मुद्देवंचित वाटला (फारेन्डच्या धाग्याला धन्यवाद
उगिच नै आवडत तो मला :बदामच बदामः
Pages