बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूषण येतो की. यावेळी आहे.

चोरी ज्याने कोणी पहिल्यांदा केली ते चूक, तेव्हा bb झाडत नाहीत आणि गेम खालच्या थराला गेला की जागे होणार.

मेघा आणि सई टास्क सुरू होण्याआधीच चोरी, सुया लपवणे अशा गोष्टीवर भर देत होत्या. एकदम नीच मनोव्रुत्ती वाटली. रेशम आज खूप छान खेळली. हा खरं म्हणजे tycoon गेम सारखा टास्क होता आणि खूप छान खेळता आला असता. मॅनेजमेंट लेसन्स वगैरे.

रेशम विषयी चांगले वाटत होते पण पुढच्या प्रमोमध्ये तिला पैसे चोरताना पाहीले. त्यामुळे चांगल्या चाललेल्या टास्कचा ती बोर्‍या वाजवणार हे दिसले.

आऊ आल्या आहेत नॉमिनेशन्स मधे तर यावेळी त्यांना एलिमिनेट करावं, इथे काही बोलायची कोणाला थोबडवायची हिंमतच नाही तशीही त्यांची !
त्यापेक्षा एलिमिनेट होऊन बाहेर जाऊन मस्तं फटाके फोडतील त्या सगळ्यांच्याच नावानी , she’ll be much more entertaining with her explosive interviews outside !

ह्यावेळी आऊचं जातील, त्यांना वचवच करायला आणलेलं पण त्या सेफ गेम खेळतायेत. सुचवलं पण म मां नी त्यांना. मुलाने पण वचनमुक्त केलं पण उपयोग नाही काही, आता bb पैसे खर्च करायचे नाहीत बहुतेक त्यांच्यावर Wink .

हिंदी बिग बॉस मी कमी बघितलं आहे पण कोणीतरी लिहिलंय bb पेजवर की हिंदीत ह्या task वेळी चोरी आणि चिटींग अलाउड होतं म्हणे.

हिंदी बिग बॉस मी कमी बघितलं आहे पण कोणीतरी लिहिलंय bb पेजवर की हिंदीत ह्या task वेळी चोरी आणि चिटींग अलाउड होतं म्हणे.>> इट्स अ पार्ट ऑफ गेम .. रुल कुठे लिहिलाय बिग बॉसने..

रूल च्या वेळी मी ऐकायला हजर नव्हते ग टीना.

अर्थात ते सुया चोरणे चालत असेल तर पैसे चोरणे पण चालेल. चोरी कुठलीही चालेल.

उद्या काय होतं बघुया. कामगारांशी डील करणे, योग्य मोबदला देणे आणि परत वर बक्षिसी देऊन कामगार आपल्याकडे टिकवून ठेवणे जे कुशल काम करतात, त्या आघाडीवर पहिल्या दिवशी तरी रेशम सरस ठरली सई पेक्षा. सई भावनिक मुद्दा जास्त मांडत होती त्यात जे आहेत तिच्याबरोबर तेच राहणार, पलीकडचे येणार नाहीत. जसं त्यागराज, चौगुले नाही आले.

मेघा आणि सई टास्क सुरू होण्याआधीच चोरी, सुया लपवणे अशा गोष्टीवर भर देत होत्या. >> सुया चोरी केल्या होत्या का त्यांच्याकडे असलेल्या सुया वापरल्या ? मला असे वाटले की त्यांना सुया न मिळाल्याने त्यांच्याकडे ज्या त्यांच्या सुया होत्या त्याच त्यांनी वापरल्या.

सई आज अगदीच डंब ठरली कामगारांशी आणि रेशमशी डिल करताना, कुशल कामगार सगळे रेशम कडेच.
बिग बॉसने टिम शफल करायच्या आयडियाज दिल्या, इतके वाइल्ड कार्ड मेंबर्स आले, बुली गँग मधले २ लोक सुशान्त जुई वजा झाले तरी आज टास्क आलं कि पुन्हा आपलं तेच, सईच्या टिममधे नेहेमीचे मोजके यशस्वी !
बाकी सगळे रेशमकडेच.
नंदकुमारचा भाव अचानक वधारला सुबक उश्या शिवल्याने, डायरेक्ट दहा हज्जार मागु लागला Biggrin
पण नन्दकुमार - भुषण खरच उश्या शिवणारे गादीउश्या कामगारच दिसत होते .
सईला भाव् करता नाही आला, तसेही तिचे कामगार फ्री मधे काम करणारे, कशाला वाचवत होती पैसे ? घ्यायचे कि डबल पैसे देऊन बाजुच्या टिमचे कामगार , त्याशिवाय रेशमला पहिल्या ऑर्डरमधे शिवलेल्या उश्या कशाला विकल्या? अगदीच पुअर बिजनेस डिल बाय सई !
रेशम आणि तिच्या टिममधले कामगार थोडे एंटरटेन करत होते तरी फार काही इंटरेस्टींग नव्हता हा टास्क, बोअर झालं .
उद्या जरा चोरी चकारीमधे मजा आली तर बघु !

एक्सपर्ट ब्लॉग्झ वर अधुन मधुन येतो हा प्रॉब्लेम मग १-२ दिवस मिस होतात एपिसोड्स!! आपला भरोसा आता मामीच्या अपडेटवर

कालचा टास्क पाहता, कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे की काय अशी शंका आली.
पहिले ५० दिवस जो ग्रुप अनफेअर खेळणारा, गुंडगिरी करणारा म्हणून सोशल मिडीयावर कुप्रसिद्ध झाला होता तो एकदम फेअर गेम खेळू लागला आणि दुसरा सोशल मिडीयावर मोठा फॅन फॉलोविंग असलेला फेअर ग्रुप स्वयंपाकघरातली कात्री लपवून आणणे, सुया लपवणे वगैरे चिटिंग करताना दिसला ! माबुदो असू शकेल.
रेशम काल छान खेळत होती आणि सई छान दिसत होती Happy
या खेळात मनुष्यबळाइतकंच , कच्च्या मालाचा पुरेसा साठा असणं हे ही तितकंच महत्वाचं होतं. दोन्हीपैकी काही कमी असलं तर बार्गेनिंग करायला जमणं आवश्यक होतं. त्यामुळे डोकं लावून खेळणंच गरजेचं होतं. जे रेशमने बरंच चांगलं निभावलं.

अ‍ॅक्चुअली लपवा छपवी/चोरी अलाउड आहे म्हणे, ऐकलं कि सेम टास्क हिन्दीत झालं होतं, यापेक्षा कितीतरी झपाझप चोर्या/ टुल्स लपवणे झालं होतं म्हणे !
आज रिव्ह्यु करणारे युट्युबर्स हसत होते कि मराठी लोकांनी उश्या बनवायचे रेट्स किती स्वस्तं ठरवले, सई तर् ५० रु पासून सुरवात केली, हिंदीत दाहा हजार अँड अप मागत होते म्हणे Proud
सर्वात फनी ‘ऑनेस्ट्ली इन्सेन’ नावाचे युट्युबर्स आहेत , ते म्हणे यापेक्षा लपाछपी , विषामृत नाहीतर डॉक्टर डॉक्टर अ‍ॅडल्ट गेम खेळा म्हणे Rofl

अरेरे !! अता आस्ताद रडायला लागलाय सई सारखा . त्याला वाटतेय की प्रेक्षक वर्ग हीन अभिरुचिचा अस्ल्याने त्याची (उच्च अभिरुचि असलेली ) गाणी, जोक्स , गप्पा लोकांना आवडत नाहीयेत. आणि म्हणुन त्याला कमी वोट्स मिळतायेत सई , मेघा च्या तुलनेत.

मित +१.
पण हे कात्री आणणं,सुया लपवणं अलाऊड नाही नव्हतं,नाही असंही bb ने काही म्हंटलं नाही.बझर वाजल्यानंतर काही आणलेलं चालणार नाही हे स्पष्ट केलं होतं का bb ने?
मी थोडं ऊशीरा पहायला सुरुवात केली.
मेघा नेहमीच फेअर गेम खेळते खरं.काल तिला चिटिंग करताना बघुन आश्चर्य वाटलं.
आणि रेशम ऊलट शांतपणे खेळत होती.लपवलेल्या सुया मिळाल्यानंतर ही तिने अपेक्षेपेक्षा कमी आरडाओरडा केला.
पण भुषणला कसं कळलं सुया कुशनमधे लपवल्याचं?

आज तर पैशाची चोरी होणारे.

लोकहो, मेघा बरोबरच आउलाही मतं द्या. सध्या मेघाच्या टीममधले कमी नको व्हायला. चौघुले आणि त्याखा रेशमच्या टीममध्ये गेले आहेत. त्याखा मेघाच्या टीममधे येऊन मुंडी हलवून जातो पण खेळतो रेशम बरोबर. त्यामुळे सध्या भूषणवर फोकस करा.

वोटिंग लाईन्स सुरू आहेत. मेघा आणि आउला भरघोस मतं द्या.

लोकहो,
यु.एस मधे व्हुट ब्लॉक्ड आहे, लिंक देताना प्लिज थोडक्यात सांगत जाल का त्या व्हिडीओ क्लिप बद्दल ?
काय झालय सुशान्तला ?

त्याला उलट्या होत होत्या. बर्‍याच उलट्या एकापाठोपाठ झाल्यामुळे सईसाठी उलट्या काळजाची असणारी रे गँग सुशांतसाठी चिंताग्रस्त झाली. आस्ताद्चे अ‍ॅनालिसिस हे सुशांतच्या अतीतिखट खाण्यामुळे झाले. आता सुशांतला तिखट खायला द्यायचे नाही यावर जुनी मैत्रीण मेघा व रे गँग यांचे एक्मत झाले.

Pages