Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चोघुले ज्या तर्ही डिवचत होते
चोघुले ज्या तर्ही डिवचत होते ते मला पर्सनली नाही आवडलं.. आणि मुख्य म्हणजे हा तोच माणुस आहे जो मागच्या विकेंडच्या वार मधे सुशांतला मवाली आणि गुंड म्हणत होता... हाहाहा..
शो स्क्रिप्टेड जरी असला तरी निदान लोकांना ते माहिती नाही आणि आपली प्रतिमा काय बनेल बाहेर याची भिती नसेल का वाटत या लोकांना? आणि ते ही चौघुलेसारख्या व्यक्तीला ज्याला लोक फक्त एक गाणं अन जरासे कॉमेडी शो मधुन ओळखतात.. निदान पंगा घेताना कुणाशी घ्यावा तेपन न कळे..
आणि आस्ताद सगळीकडे उच्च अभिरुची, संस्कृती अन काय्काय टिमक्या वाजवतो त्याने पन आवर घालु नये सर्वामधे ?
आहेच बर मेघा, सई, पुष्कर, आऊ, शर्मिष्ठा पण म्हणुन अश्या तर्हेने का बोलावं? पैश्याची फार निकड असावी याला असं म्हणावं का आता या विचारात पडली मी.. हाहाहा.. लोकं फार बोंबा मारताय याच्या नावाने..
मला वाटत याला स्पेशल खाद्य देण्याकरता बोलावला असेल पण मानलं बा लोकांच्या इतक्या शिव्या खाऊन घ्यायच्या कामासाठी म्हणजे..
ममांना पॉईंट्स सापडले परत आता शिव्या घालायला..
अॅसिडीटी हे कारण लोकांना
अॅसिडीटी हे कारण लोकांना सांगायला असेल असं वाटतय !
असो , त्याचं सामान आणि नावाची पाटी काढायला सांगितली म्हणे त्याच्या मित्रांना.
याचा अर्थ पुन्हा एकदा नो नॉमिनेशन वीक का ?
बाकी नन्दकिशोर नक्कीच सिक्रेट मिशन वर आलाय, आल्या अल्या एकदम लगेच व्हिलन गिरी कसं करेल कोणी ?
हा म्हणतोय डिव्हाइड अँड रुल पण मला वाटतय याच्या दादागिरीमुळे उलट सई -मेघा -पुष्कर -आउ -शरा एकजुट होईल उलट , नाहीतर इतक्यात यांच्याआधीच छोट्या अस्स्लेल्या गृपमधे वादावादी चालु होती, याच्याशी वाद घालायच्या निमित्ताने उलट एकत्रं आलेत !
पुष्करची म.मां नी त्याला मेघा आउ बद्दल बोललेले पकडले त्यामुळे बिघडलेली इमेज अता आउंसाठी स्टँड घेतल्याने नक्कीच बॅक टु नॉर्मल होणार !
दादागिरी विरुद्ध स्टँड घेणारी टिम जनतेला नक्कीच आवडते, झाला तर फायदाच होणार मायनॉरिटी टिमचा.
मे, सै ,शरा,नं चौ भांडत
मे, सै ,शरा,नं चौ भांडत असताना,आस्ताद समाधी लागल्यासारखा,मख्खा सारखा तिथे का ऊभा होता??!थांबवायचा प्रयत्नही केला नाही त्याने नं चौ ला.
अस्तादच्या सुसंस्कारित
अस्तादच्या सुसंस्कारित मेंदूनं त्याला न बोलण्याचा आदेश दिला असणार.
मला हेराफेरी आठवला परत -
मला हेराफेरी आठवला परत - "बाबूभैया आप बीच मे पत पडिये, इनको आपस मे मार पीट करके सुलझाने दीजिये!"
आस्ताद ने तसाच अप्रोच घेतला असेल
अस्तादच नाही तर स्मिता, रेशम,
अस्तादच नाही तर स्मिता, रेशम, कपटी भूषण सगळेच गप्प होते. आतातरी त्या आऊला लक्षात येतंय का की कोण तिची बाजू घेतात आणि कोण संधीसाधू आहेत ते.
बरोबर मामी., हा सुसंस्कृत,
बरोबर मामी., हा सुसंस्कृत, ऊच्च अभिरुचीवाला.प्रेक्षक येडे..
आस्तादच काय. रे टिम मधलं कोणीही पुढे आलं नाही मधे पडायला..सगळे नं चौला घाबरुन एका जागी बसले.
स्मिता काय बोलली ते मला कळलं नाही.
मी मेघाला वोट केलं.
आज रेशम तिच्या टीमबरोबर पैसे
आज रेशम तिच्या टीमबरोबर पैसे वाटपाबद्दल चर्चा करत होती ज्यात त्यांनी एकालाच जास्त मेहनताना देऊन त्याला कॅप्टन बनवायचं असं ठरलं तेव्हा ती म्हणाली मला काय, कोणीही चालेल तुमच्यापैकी कॅप्टन झालेलं ... अगदी त्यागराजदेखिल चालेल.
त्यागराज त्या गृपमधल्या उतरंडीत सगळ्यात खालच्या पायरीवर उभा आहे, हे त्याला कळलंय की नाही देव जाणे. अर्थात मेघाच्या टीममध्ये आला तरीही त्याची जागा बदलणार नाहीच म्हणा.
गंदकिशोरची जी काही स्ट्रॅटेजी आहे की आउला उकसवून त्या निमित्तानं चमकेशगिरी करायची, ती अत्यंत किळसवाणी आहे. पण त्याचा फायदा मेघाटीमला होणार आहे.
मला वाट्तय खात्या आणि नन्दु
मला वाट्तय खात्या आणि नन्दु अचानक बाहेर पडणार आणि ऋतुजा सुशान्त अचानक एंट्री मारणार !
नन्दकिशोर घाण आहे मला अजिबात
नन्दकिशोर घाण आहे मला अजिबात नाही आवडला
आता या आठवड्यात खा त्या नाही
आता या आठवड्यात खा त्या नाही ना एलिमिनेट होणार, सुशांत गेल्यामुळे.
आता या आठवड्यात खा त्या नाही
आता या आठवड्यात खा त्या नाही ना एलिमिनेट होणार, सुशांत गेल्यामुळे.>>> म्हणजे परत वोटिंग लाईन्स बंद केल्या का? नसतील केल्या तर नक्कीच कोणालातरी काढतील बाहेर. खात्या अथवा कडूपैकी कोणीतरी जायला हवं.
एनिवे, कुशनचा टास्क सईची टीम
एनिवे, कुशनचा टास्क सईची टीम जिंकली.
सईकडचे पाच हजार रुपये चोरीला गेलेत हे मेघाच्या लक्षात आलं. त्या आधीच ही शक्यता तिच्या लक्षात आली होती. पण ते कोणी आणि कधी चोरले हे अजून त्यांना कळलं नाहीये बहुतेक.
अर्थात, इतकं करूनही रेशमकडे केवळ ९६ हजार उरले तर सईकडे लाखाच्यावर होते. याला कारण सईकडच्या लोकांनी बिनपैशाचं काम केलं तर रेशमकडे त्याखा आणि गंदकिशोर यांनी चिक्कार पैसे मागितले.
शेवटच्या २१ उशांच्या ऑर्डरच्या वेळी निव्वळ नशिब थोर म्हणून सईकडे बरोब्बर २१ कव्हरं, सुई, दोरा आणि पुरेसा कापूस होता. त्याउलट रेशमकडे केवळ १० कव्हरं निघाली. स्मिता तर तक्रार देखिल करत होती की ती आत घुसायला असती तर बरोबर वस्तू घेऊन आली असती.
रच्याकने, सई आणि रेशमला प्रत्येकी केवळ एकच अॅसिस्टंट घेऊन खोलीत शिरायची परवानगी होती. पण दोन ऑर्डर्सच्या वेळी रेशम, अस्ताद आणि भूषण आत घुसत होते.
रात्री गंद्किशोर रेशमला सांगत होता की क्वालिटी कंट्रोलमध्ये उशा पास करायलाच नको होत्यास. काहीतरी खुसपटं काढायची. पण रेशम त्या गोष्टीला मानायला तयार नव्हती. तिच्यामते उशांमध्ये कापूस व्यवस्थित होता आणि त्या शिवल्याही व्यवस्थित होत्या त्यामुळे असे काहे ओढून ताणून मुद्दे काढण्यात तिला इंटरेस्ट नव्हता.
वूट व आपली मराठी शिवाय कुठं
वूट व आपली मराठी शिवाय कुठं पहायला मिळेल बिबॉ? आ म वर गेले २ दिवस अर्धवट भाग अपलोड करत आहेत. कालचा भाग तर आऊ टीमला सेफ्टी पिन देतात तेवढाच बघायला मिळाला. की तेवढाच होता?
https://www.voot.com/bigg
https://www.voot.com/bigg-boss/bigg-boss-marathi-season-1/bigg-boss-mara...
वोटिंगचे नियम ईथे दिलेत.
एका आयडीचं एकच व पहिलच वोट काऊंट होतय.
अजब,मागच्या पानावर अन्जुताईने
अजब,मागच्या पानावर अन्जुताईने gilitv ची लिंक दिलीय तिथे बघा दिसतय का.
नवीन Submitted by Chaitrali>>
नवीन Submitted by Chaitrali>>> धन्स चैत्राली! बघतो.
म्हणजे कॅप्टनशिप चे उमेदवार
म्हणजे कॅप्टनशिप चे उमेदवार सई वि. किशोर की काय? !!
ते काही कळलं नाही.
रेशम टीमकडून त्याखा असेल उमेदवार, इथे कदाचित सईच असेल उमेदवार. कॅप्टन्सीसाठी फुल्ली गोळा खेळायचाय त्यांना उद्या.
सुशांत परत नाही यायचा. गेम
सुशांत परत नाही यायचा. गेम सोडला त्याने असं सांगितलं bb नी. बाहेर पडल्यावर बायकोसकट सर्वांनी कानउघाडणी केली असेल, पक्षाने वगैरे पण. आरामाची पण गरज असेल आणि हेही कारण.
आज अभिनंदन सईचं मस्त जिंकली. पैसे पण टीमने न घेतल्याने, ते पण जास्त होते. रेशम पण फेअर राहिली. उगाच खुसपट न काढता उशा ज्या अगदीच कमी कापूसवाल्या होत्या त्या रिजेक्ट केला.
चौगुले जाम डोक्यात जातोय, फार निगेटिव्ह वागतोय. रेशमला कित्ती बडबडत होता, उशा रिजेक्ट का नाही केल्या. हे आणि ते. तिने बरोबर केलं, पहिला गेम सई ने उशा दिल्या सहा म्हणून ती जिंकली होती.
रेशम टीमवाल्यांनी काही जणांनी
रेशम टीमवाल्यांनी काही जणांनी पगार घेतले नसते तर रेशम जिंकली असती का.
सुशांत आता येत नाही
सुशांत आता येत नाही म्हटल्यावर भूषण आणि अस्तादनं टिपं गाळली.
नंतर अस्ताद आणि इतर बोलत होते, की सुशांत अति तिखट खातो आणि कोणी नको खाऊ बोललेलं ऐकतही नाही. शिवाय त्याला बद्धकोष्ठता पण आहे. रोज ७-८ प्रकारच्या गोळ्या घेतो.
आउ आणि नंतर सगळ्या मेघाटीम
आउ आणि नंतर सगळ्या मेघाटीम सद्स्यांशी भांडण करून झाल्यावर गंदकिशोर म्हणत होता की त्या पाच जणांची खूपच एकी आहे पण आता मी त्यांना फोडणार. फोडा आणि झोडा नीती अवलंबणार.
हे रच्याकने म्हणजे काय आहे ?
हे "रच्याकने" म्हणजे काय आहे ?
म्हणजे कॅप्टनशिप चे उमेदवार
म्हणजे कॅप्टनशिप चे उमेदवार सई वि. किशोर की काय? !!
<<
कॅप्टन्सी साठी शा.रा ला पुढे करायला हवं, चांगली खेळली आणि तिला इम्युनिटीची जास्तं गरज आहे नवीन असल्यामुळे.
नवीन येऊन सुध्द्दा फार मस्तं ब्लेंड झाली आहे मायनॉरिटी गृपशी.
आजच्या एपिसोडचे फोटो पाहिले, पुष्करचा पिंक शर्ट, मेघाचा पिंक ड्रेस, सईचा फ्लोरल ड्रेस त्यावरचे झुमके किती मस्तं आहेत, हे तिघं एकत्रं अस्स्लेला एक फोटो आहे, एकदम फ्रेश मस्तं दिसतायेत तिघे , गार्डन मधे उमललेली ३ फ्रेश फ्लॉवर्स दिसतायेत एकदम
सई बरेचदा सिंपल कॅज्युअल, वेअरेबल ड्रेसेस घालते पण अॅक्ससराइझ कसले मस्तं करते, खूप मस्तं दिसतं तिला.
की त्या पाच जणांची खूपच एकी
की त्या पाच जणांची खूपच एकी आहे पण आता मी त्यांना फोडणार.>>> बाहेरुन आत्ताच आलाय ना तो किश्या? तरी त्याला माहीत नाही की हा प्लॅन आस्त्याने अर्धा दिवस मागून ऑलरेडी करुन झालाय. गेल्याच रविवारी दस्तुरखुद्द ममांनी देखील काडी टाकून पाहिली. पण त्यांच्यातल्या सगळ्यांना माहितीये की ग्रूपमुळेच त्यांचा टिकाव आहे..त्यामुळे इतक्यात तरी नाही तुटत हा ग्रूप. शेवटच्या ५-६ जणांत जर हेच लोक्स उरले तर मात्र शक्यता आहे.
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने चा शॉर्टफॉर्म.
आता तुम्ही विचाराल की 'रस्त्याच्या कडेने' काय आहे? तर ते बाय द वे चं मराठीकरण आहे.
ऋतुजा यायला हवी आता मात्र.
ऋतुजा यायला हवी आता मात्र. बिग बॉस नाहीतर अजून एखादा कोणीतरी शोधून आणेल, ह्यावेळेचा तर जाम डोक्यात गेलाय चौगुले.
कॅप्टन्सी साठी शा.रा ला पुढे
कॅप्टन्सी साठी शा.रा ला पुढे करायला हवं, चांगली खेळली आणि तिला इम्युनिटीची जास्तं गरज आहे नवीन असल्यामुळे.
नवीन येऊन सुध्द्दा फार मस्तं ब्लेंड झाली आहे मायनॉरिटी गृपशी.
>> नाही डिजे, ज्यांच्याकडे जास्त पैसे ते उमेदवार बनणार असं काहीसं आठवतंय.
त्यामुळे कामगारांच्यातला त्याखा आणि व्यापार्यांच्यातली सई असे असतील. मला नक्की नियम आठवत नाहीयेत.
रेशम टीमवाल्यांनी काही जणांनी
रेशम टीमवाल्यांनी काही जणांनी पगार घेतले नसते तर रेशम जिंकली असती का.>>> हो बहुधा.. चौगुले आणि त्याखाला घबाडच दिलं रेशमने..
रेशमचे 96 हजार आणि सईचे 1 लाख होते
Pages