Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पाहिजे ती ऑफर द्यायला
मला पाहिजे ती ऑफर द्यायला पाहिजे' असं काही तरी घाण हसत म्हटला. ते कुणाला आठवतं का? त्याचा खरा अर्थ दुसराच असावा असे कुणाला वाटले का?
एकूण हा किश्या एक नंबरचा गचाळ, गल्लीगुंड, ठरकी इसम आएह असे मत झाले आहे. त्यापेक्षा भूषण हजार पटीने बरा. आऊला अचानक सहानुभुतीची मते मिळायला लागली आहेत. ती वाचणार.
<<
आठवत नाही , पहायला हवे हे , अत्यंत छपरी माणुस !
भयंकर दारु चढलेल्या आवाजात बोलतोय एक तर .
श.रा बाकी खरच चांगली अॅडीशन आहे मेघा सई टिम मधे.
डेलिया आणि ओनमएका वयस्कर
डेलिया आणि ओनम
एका वयस्कर बाईचा असा विनाकारण अपमान पाहुन मजा कशी काय वाटू शकते, अतिशय विकृत मनोवृत्ती आहे.
मलातर त्या काळ्तोड्यांचे वागणे अतिशय आक्षेपार्ह आणि मुद्दामून ठरवून आउला, मेघा टीम ला टार्गेट केल्यासारखे वाटतेय. आउ त्याच्या वाट्याला गेलेली नव्हती. आउ समोर उभी रहायची सुद्धा त्याची लायकी नाही खरेतर
पहिली गोष्ट म्हणजे विनाकारण अपमान नव्हता. ती वयस्कर बाई सुद्धा काही कमी नाही. शिव्या देण्यात एक नंबर आहे. मला त्यांचे भांडण आणि शब्दाला शब्द कसे देतात त्याने मजा नाही पण या त्यांच्या उषा नावाचा आणि उशा शिवण्याचा जो संबंध जोडला त्याने गंमत वाटली. ही केवळ ते लोक त्यांची चेष्टा करत होते पण उषाताईंना तेवढी समज नसल्याने (किंवा समजत असून पण फुटेजसाठी) त्या भडकत होत्या आणि किशोर्,भूषण वगैरे त्यामुळे आणखी चेकाळत होते. त्यामुळे हे भांडण लोकांनी मजा घ्यावे यासाठीच केले होते असे मला वाटते.
बाकी माझी मनोवृत्ती विकृत आहे हे मी मान्य करतो. पण नंदकिशोरला काळतोंड्या म्हणण्यामागे तुमची मनोवृत्ती काय आहे हे मात्र लगेच उठून दिसले. धन्यवाद.
नंदकिशोरला ज्या कामासाठी
नंदकिशोरला ज्या कामासाठी पाठवलंय आत, तो ते चोख बजावतोय. त्याला पब्लिक वोट्स मिळायची शक्यता कमी असली तरी, चॅनल ला जे हवं आहे, ते त्या माणसाच्या उपस्थितीने व्यवस्थित मिळेल असं दिसतंय. उनाला या आधी १-२ वेळा ममां ने तलवार कधी काढणार हे विचारणे , त्यानंतर नंदकिशोर चे घरात येणे, कालचे त्याचे उनाला मुद्दाम डिवचणे, आजच्या भागाच्या जाहिरातीत दाखवलं की तो पु-स-मे तिघांना थेट भिडला... हे सगळं होण्यात योगायोग अजिब्बात नाही असं ठाम मत झालंय !
कालच्या भागात परत एकदा मे-स दोघी, टिम रेशम पुढे फिक्या पडल्या. रेशम मेघाशी लहान मुलं भांडतात, त्या पद्धतीने भांडत होती एकदम.
उश्या शिवण्याचा पहिला टप्पा
उश्या शिवण्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर किश्याचे जास्त कौतुक झाले ते पाहूण भूषण त्याला म्हटला की आता, तुला सई खुप मोठी ऑफर देऊन त्यांच्याकडे वळवायला बघेल. त्यावर तो ज्याप्रमाणे हसत 'मला पाहिजे ती ऑफर द्यायला पाहिजे' असं काही तरी घाण हसत म्हटला. ते कुणाला आठवतं का? त्याचा खरा अर्थ दुसराच असावा असे कुणाला वाटले का?
एकूण हा किश्या एक नंबरचा गचाळ, गल्लीगुंड, ठरकी इसम आएह असे मत झाले आहे. त्यापेक्षा भूषण हजार पटीने बरा.
>>> खरं आहे. तो बोलला होता असं. अति गलिच्छ माणूस आहे. आणि वागायची पद्धत नाहीये. दमदाटीची आणि अरेरावीचीच भाषा करतो.
काही id खरंच अति करतायत.
काही id खरंच अति करतायत..इतक्या पर्सनल कंमेंट..रेडा, डुक्कर, मवाली..etc..
कोणीतरी इथे मागे म्हणल्याप्रमाणे..Only guys can understand something..त्याप्रमाणेच तो जो काय आऊ न चौगुले यांच्यातला teasing प्रकार होता..चौगुले काय वाईट बोलले नव्हते..आऊ त्यांना म्हणाली तू 50 दिवसांनी येऊन मला शिकव..
त्या पुष्कर ला बाहेर पण मित्र कमीच असणार आहेत..कारण याला सगळे बुली करत असणार..अन तो बुली करण्यासारखाच वागतो..
एका id च्या सारखा सारखा सांगण्यामुळे रेशम व भुषण ला सगळे वोट केले..☺☺
पहिल्यांदा जे करतो तेच व्होट
पहिल्यांदा जे करतो तेच व्होट रजिस्टर होते व्हूटवर..
रूतुजा नंतर आता माझी फेव्हरीट
रूतुजा नंतर आता माझी फेव्हरीट शरा
करेक्ट morpankhis☺️
करेक्ट morpankhis☺️
>>काल सईकडे सुई न्हवती म्हणुन
>>काल सईकडे सुई न्हवती म्हणुन काय झाल दोरा तर होता ना थोडं डोकं वापरुन ..

त्यांचं घोडं बहुदा तिथेच अडलं होतं..
असो. काल थोडसं बघितलं तेव्हा भूषण, त्यागी, चौघुले यांच्या गप्पा मस्तच रंगल्या होत्या.. त्यातही काही शाब्दिक कोट्या अगदी खास.. विशेषतः "हे ऊशा झाल्यावरच कळेल."
सर्वच जण (एक सदस्य सोडून) त्याचा आनंद घेत होते. ऊशा/ऊषा लिहीण्यात फरक असला तरी बोलण्यात फारसा नसल्याने धम्माल सुरू होती. क्रेडीट अर्थातच मराठी भाषेची संपन्नता! [मला वाटले आस्ताद त्यांना पोट फोड्या ष चा ऊच्चार वेगळा करा वगैरे अशा टेक्निकालिटी मध्ये घुसून पुन्हा एकदा फेयर गेम वगैरे खेळायला लावतो की काय.. पण त्याने ती ऊर्मी आवरली]
पहिल्या काही भागात हागणे, पादणे, थोबडावणे, लोकांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल ताशेरे ओढणे अशी सोयीस्कर मस्करी करणारी हीच ती
आ ऊ का? हे सर्व स्क्रिप्टेड आहे हे नक्की... नंदू व आ ऊ ने एकदाचे बेअरींग पकडले आहे. तेव्हा आता 'राडा' चा जमल्यास आनंद घ्यावा लागेल.
>>मला वाटले आस्ताद त्यांना
>>मला वाटले आस्ताद त्यांना पोट फोड्या ष चा ऊच्चार वेगळा करा वगैरे अशा टेक्निकालिटी मध्ये घुसून पुन्हा एकदा फेयर गेम वगैरे खेळायला लावतो की काय.. पण त्याने ती ऊर्मी आवरली

बाकी पुष्कर बद्दल वाईट वाटते.
बाकी पुष्कर बद्दल वाईट वाटते. मेघाकडून खेळला की दुसर्या टीम चे त्याला झोडपतात (आता तर त्यागी पण टपली मारून जातो).. मेघा विरूध्द बोलला की ममा झोडपतात [गेल्या विकांताला त्याला बेक्कार फैलावर घेतला- मेघाचा बॅड इंफ्ल्युएंस आहे असे सईला सांगत होता म्हणून...].
याचा परिणाम असा होतो की मग तो ऊगाच कधी सुशांत शी पंग घे, कधी आस्ताद शी असे करून साठलेले सगळे फ्रस्ट्रेशन बाहेर काढतो.
या पुष्कर ला कुणि तरी पुश करा रे!
परवा त्यागी ने बि बॉ कॅमेरा समोर अगदीच वाईट्ट पर्दा फाश केलाय सगळ्यांचा: मेघा टीम खरे तर अगदीच बेक्कार व निगेटीव खेळतात, ऊलट रेशम व टीम आपल्याला दाखवतात तसे नसून खरेच चांगली माणसे आहेत वगैरे.
बिझनेस टास्क साठी बि बॉ ने सई ला लीडर बनवणे इथूनच सगळे गंडले होते..
पुढचे सर्व अपेक्षेप्रमाणेच घडले.
असो.
मी वाचल्या नाहीत अजून पोस्टस
मी वाचल्या नाहीत अजून पोस्टस पण यावेळी मेघा, आऊ आणि आस्तादला मत दिलं. आस्तादला यासाठी की परवा कॅप्टनशीप मध्ये तो प्रामाणिक होता म्हणून. याआधी मी फक्त पुष्करला दोनदा मत दिलंय.
काल थोडसं बघितलं तेव्हा भूषण,
काल थोडसं बघितलं तेव्हा भूषण, त्यागी, चौघुले यांच्या गप्पा मस्तच रंगल्या होत्या.. त्यातही काही शाब्दिक कोट्या अगदी खास.. विशेषतः "हे ऊशा झाल्यावरच कळेल."
सर्वच जण (एक सदस्य सोडून) त्याचा आनंद घेत होते. ऊशा/ऊषा लिहीण्यात फरक असला तरी बोलण्यात फारसा नसल्याने धम्माल सुरू होती >>
आत्ता हा भाग बघितला. अतिशय खालच्या लेवलची गलिच्छ टोमणेगिरी वाटली.
योग तुमचे आणि माझे मत बर्
योग तुमचे आणि माझे मत बर्यापैकी जुळते. कदाचित आपली नावे सारखी असावित म्हणून...
चौगुले अति करतोय. मस्करी लेवल
चौगुले अति करतोय. मस्करी लेवल नाही ही. बाहेरचं वाचून आलाय तरी करतोय त्यामुळे तो ह खा सारखा पाहुणा असेल आणि bb ने काही सांगून पाठवलं आहे का अशीही शंका येतेय.
तरीही त्याने असं बोलणे मला तरी मवाली टाईप वाटलं. आज पण असंच असेल आणि आस्ताद कॅप्टन म्हणून नाही थांबवू शकला तर मला आस्तादला वोट दिल्याचा पश्चाताप होईल. खरं म्हणजे कालच रेशम आणि आस्तादने थांबवायला हवं होतं. भूषण पण आगीत तेल ओतत होता.
स्मिता काल उगाच सई मेघाला बडबडत होती, स्वतः ला पैसे नकोत का सांभाळून ठेवायला.
बाकी चोरीबाबत मेघाने आधी
बाकी चोरीबाबत मेघाने आधी सुरुवात केली, कोणीतरी लिहिलंय ती हिंदी बिग बॉस च्या शिल्पा शिंदे सारखी आधीच रेशम तिजोरीच्या चाव्या घ्यायला गेली पण भूषणचं लक्ष होतं. तो बडबडला. सुया चोरल्या. त्यामुळे रेशम ने पुढे काहीही चोरलं तरी तिला माफ.
आस्ताद कॅप्टन म्हणून नाही
आस्ताद कॅप्टन म्हणून नाही थांबवू शकला तर मला आस्तादला वोट दिल्याचा पश्चाताप होईल. >>> आस्ताद कधी कॅप्टन झाला??
>>योग तुमचे आणि माझे मत बर्
>>योग तुमचे आणि माझे मत बर्यापैकी जुळते. कदाचित आपली नावे सारखी असावित म्हणून...
असो. पसंद अपनी अपनी!
हे जस्टीफिकेशन पटण्या सारखे आहे
आस्ताद कधी कॅप्टन झाला?? >>>
आस्ताद कधी कॅप्टन झाला?? >>> सुशांतला आजारपणामुळे बाहेर पाठवलं आहे म्हणून ही जबाबदारी आस्तादला दिलीय.
आस्ताद ला माहितच नाहीये रेशम
आस्ताद ला माहितच नाहीये रेशम ने सुद्धा पैसे चोरलेत ते. त्यामुळे तो मेघाने चोरले अशी शंका अली तरी सात्विक संताप आला त्याला. स्मिता पैसे चोरण्यावरून बोलत होती ते रेशम ला पण इन्डायरेक्टली लागू होत असल्याने तिने तो विषय वाढवला नसावा. मला वाटले आता कबूल होऊन पैसे परत करतात की काय सई आणि मेघा! बरे झाले नाही केले ते. सई चा लॅक ऑफ एक्ष्सपिरियन्स अगदी हायलाइट होत आहे या टास्क मधे.
सईला लक्षात आले की किल्ली दोन्ही लॉक्स ना लागतेय, तिला हेही दिसले की रेशम ने पैसे काढून ठेवलेत तरीही तिला हे लक्षात आले नाही की आपले पैसे चोरीला गेले असू शकतात. मेघाला लगेच लक्षात आले की ते लोक पण आपली तिजोरी उघडू शकतील आणि पैसे लपवायला हवेत ते. फक्त इट वॉज टू लेट. रेशम खरोखरच खिलाडी आहे! तिने उचकवले तर मेघाने का उचकावे? कशाला तोंडी लागली तिच्या? तेही लेम भांडण होते एकदम. उनाचे भांडण एडिट केले का? त्या क्लिप मधे दाखवलेय ते नाही दिसले काल. नंदकिशोर आणि त्याखा ला 'खुजली' आहे मला उचकवाअयची पण मी बोलले तर आयुष्यात विसरणार नाहीत असे काय काय म्हणाली होती उना. उशा आणि उषा चे मलाही आधी हसू आले, पण नंतर ते फार खेचले गेले. तिला जास्तच टार्गेट केल्यासारखे झाले. किशोर ने चॅनल च्या सांगण्यावरून उना ला उचकवले असे मलाही वाटते आहे.
पण एकूण हे नक्की अहे की
पण एकूण हे नक्की अहे की सुशांत, राजेश, किशोर, कोणीही सडकछाप शिवीगाळ, दादागिरी केली की पुष्की, सई , मेघा वगैरे लोक त्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यांच्या (बहुधा ) प्रोटेक्टेड आयुष्यात आणि लिमिटेड अनुभव कक्षेत त्यांना तसला अनुभवच नसावा. ते बिच्चारे दिसतात मगअशा वेळी! ... पण मग त्यामु़ळे पब्लिक ची वोट्स पण घेऊन जातात
व्हिलन मंडळींना अर्ग्युमेन्ट जिंकल्याच्या आनंदात ते लक्षात येत नसावे. नंतर मग चर्चा करत बसतात सई आणि मेघा ला कशी बुवा वोट्स मिळतात ? 
भूषण च्या सतत सोयीप्रमाणे कोलांट्या उड्या सुरूच आहेत. एकदम स्लायमी वाटतो मला तो. आता फेबु वर व्हिडिओ आहे एक, त्यात आस्ताद, भूषण आणि पुष्की किशोरबद्दल बोलत आहेत. किशोर आल्यावर एकदम भूषण चा सूर बदलला. तसेच काल रेशम ने पैसे चोरताना त्याने साम दाम वगैरे बडबड केली पण नंतर उगीच तिच्या मागे हे फेअर नाही वगैरे म्हणाला, आणि तिला सांग तसं असे म्हटल्यावर आत जाऊन मात्र तसे काहीच न म्हणता तू डेंजर आहेस हं वगैरे गुळूमुळला. उनाची चेष्टा करताना पण आधी किशोरला फॉलो करत होता पण नंतर येऊन उगीच तिला तू गैरसमज करून घेतेयस वगैरे बडबड.
Kuchh tum kaho kuchh ham kahe
Kuchh tum kaho kuchh ham kahe nawaacha juna movie aaj baghitla suttiwar asalyamule.. tyaat fardin khan aani richa pallod etc lok aahet.. tyaat fardin chya lahaan bahinich kam keleli same sai sarkhi watat hoti.. mhanun search kel tar saich aahe.. chhan watali tyaat
थत्ते महाशयांनी ज्या धडाडीने
थत्ते महाशयांनी ज्या धडाडीने वे धाडसाने थेट सर्वांसमक्ष आ ऊ ला वटवाघूळ वगैरे म्हटले होते त्यापूढे या पोरांची थट्टा मस्करी फारच शाळकरी ठरावी. असो. पण यावेळी मात्र आ ऊ खाजवून खरूज काढते आहे. एकूण सगळाच प्रकार हा 'चील चील चिल्लाके कजरी सुनाये.. झूम झूम कौआ भी ढोलक बजाये.. आरे वाह वाह वा! ..'

आऊ सारख्या व्यक्तींसाठी मराठीत एक छान म्हण आहे:
कितीही मोरपंख पांघरले तरीही कावळा काव काव च करणार.
असो. कदाचित, या सर्वामूळे सहानुभूती वोट्स मिळून आ ऊ सेफ होईल असा मास्टर प्लान दिसतोय बि बॉ चा.
रेशम दिवसें दिवस अधिक आवडू लागली आहे.. राजा बाबूं चे म्हणणे फारच मनावर घेतलेले दिसते. good for her game!
नंदूपेक्षा सुशांत बरा वाटायला
नंदूपेक्षा सुशांत बरा वाटायला लागलाय! सुशांत निदान इमेज जपण्याखातर नंतर माफी तरी मागत होता. हा माणूस बेमुर्वतखोर आणि उद्धट वाटायच्या लेव्हलचा आहे. नक्की माहित नाही... अभिनय आहे का खरंच ते.
आऊ बोअर आहे. बडा घर पोकळ वासा सारखी नुसतीच बडबड आहे हिची, धमक काहीच नाही. मनोरंजनमूल्यही नाही. तिला इतके पैसे द्यावेत इतकं काहीच नाही तिच्याकडे.
डॉली बिंद्रा वगैरे
डॉली बिंद्रा वगैरे कॅटॅगरीमधला वाटतोय. जरा चटपटीत मसाला टाकण्यासाठी आणलाय, जाईल एखाद्या आठ॑वड्यात..
इथले काही लोक मेघा सै चे
इथले काही लोक मेघा सै चे आंधळे भक्त बनल्यागत वाटतंय, किंवा मग मेघाच्या नात्यात तरी असतील.. अतिशय घाण मेंटेलिटी आहे मेघाची, स्मिता सर्वाधिक आवडते, राहिला प्रश्न व्हिलन वाटण्याचा, तर सुरुवातीला जे tasks होते तेच मुळात शक्तिप्रदर्शन महस्पर्धा होते, त्यामुळे संपूर्ण जोर लावून खेळणारी रेशम आणि कं व्हिलन वाटले. सध्या जे चाललंय तसे टास्क असते तर ह्या घाणेरड्या बुद्धीच्या सैमेघा आत्ता वागत आहेत तश्याच कायम वागल्या असत्या. आज सुद्धा सै उगाच झटे घेत होती. मला कळत नाही लोक इतक्या आंधळेपणाने कसे वागत आहेत. थोडा सारासार विचार केलात तर रेशम आणि कं सुरुवातीपासून नीट च खेळत आहेत, उगाच नाही त्याखा आणि नंदू त्यांना जॉईन झालेले. माझ्या लाडक्या स्मिताला पण त्यांच्यात एकदाच खेळून negativity आलेली, पण इथल्या स्वघोषित विश्लेषकांनी तिच्या बोलण्याचा विपर्यास करून, रेशम आणि कं च negative ठरवली. धन्य आहात!
पण जुई किरकिरी होती हे
पण जुई किरकिरी होती हे हजारवेळा मान्य. आणि हो, जुई च्या कॅटेगरीचा एक id इथे आहे, फक्त तो मेघा टीम सपोर्टर आहे, रेशम आणि कं मधला प्रत्येक सदस्य कसा वाईट आहे हे पोटतिडकीने असं सांगतात, जसं जुई सै बद्दल बोलायची!
किशोर ने चॅनल च्या
किशोर ने चॅनल च्या सांगण्यावरून उना ला उचकवले असे मलाही वाटते आहे. >>> काय उपयोग? आज पुष्कीला शान्त करणार आहे ह्याच्या आणि किशोरच्या भान्डणात. ती स्वतः किशोरशी भिडली नाही.
पण एकूण हे नक्की अहे की सुशांत, राजेश, किशोर, कोणीही सडकछाप शिवीगाळ, दादागिरी केली की पुष्की, सई , मेघा वगैरे लोक त्यासमोर उभे राहू शकत नाहीत. >>> नाही. आज मेघा भिडणार आहे किशोरशी. तीच सर्वान्ना पुरुन उरते.
मंडळी, मेघा आणि आऊला भरघोस
मंडळी, मेघा आणि आऊला भरघोस मतं द्यायला विसरू नका बरं. वोटिंग सुरू आहे हं.
दिलं ग मामी, लगे हात आस्तादला
दिलं ग मामी, लगे हात आस्तादला पण देऊन टाकलं
.
Pages