सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
रचना मी तुझ्याकडे मागणार होते
रचना मी तुझ्याकडे मागणार होते नंतर वाचल दार्जिलिंगमध्ये आहे. खुप सुंदर आहे.
रचना, काय सॉलिड रंग आहे.
रचना, काय सॉलिड रंग आहे. फ्रेश कलर एकदम.
जाम फळांची फुले
जाम फळांची फुले

त्यावर माशा न्याहरी करताना दिसतात सकाळी

मस्त फोटो सार्यांचे
मस्त फोटो सार्यांचे
प्रदर्शनातून लीलीचा कंद आणला
प्रदर्शनातून लीलीचा कंद आणला होता. त्याला फुले आली.

हे मागील वर्षी प्रदर्शनातून आणलेल. बरच बहरत हे अडेनियम

मी वर टाकलेले फोटो दिसतायत का
मी वर टाकलेले फोटो दिसतायत का?
मी वर टाकलेले फोटो दिसतायत का
मी वर टाकलेले फोटो दिसतायत का ? +++ हो. लीली अडेनियम, जाम फुल, भुईचाफा गुलबाक्षी खुप सुरेख जागु.:)
भुई चाफ्याचा कंद माझ्या साठी ठेवशील ग..
रचना, कसला गोड रंग आहे ब्रम्ह कमळाचा.
हो सायु नक्की ठेवेन.
हो सायु नक्की ठेवेन.
भूईचाफा सायुसाठी

शेवंती अजून फुलतेय
\
ह्या गुलाबांचा खुप बहर आला होता.


वाहवा सर्वांनी टाकलेले फोटो
वाहवा सर्वांनी टाकलेले फोटो सुंदर.
जागू लकी यु.
लिली, अडेनियम, भुईचाफा,
लिली, अडेनियम, भुईचाफा, शेवंती, गुलाब ☺ सर्वच एकाहून एक आहे जागुतै..
मस्तच फोटो जागु..
मस्तच फोटो जागु..
बहवा बहारायला लागलाय
बहवा बहारायला लागलाय
वा वा!!
वा वा!!
सर्वच फोटो मस्त!!
डोळ्याना सुखविणारे!
रन्गीत ब्रम्ह कमळ
रन्गीत ब्रम्ह कमळ पहिल्यान्दाच पाहिले.
आज सगळं वाचून काढलं. खूप छान
आज सगळं वाचून काढलं. खूप छान वाटलं
बहावा आहाहा.
बहावा आहाहा.
जागु कीत्ती सुरेख फुले..
जागु कीत्ती सुरेख फुले..
बहावा आहाहा.+१००
खिड्कीतल्या चिऊताई
खिड्कीतल्या चिऊताई

रचनाताई त्यांच्या साठी पाणी
रचनाताई त्यांच्या साठी पाणी पण ठेवा
हो पाणी तर ठेवलच आहे कऊ
हो पाणी तर ठेवलच आहे कऊ
ताई नको हो फक्त रचना म्हटल तर जास्त आवडेल
रचना किती सुंदर चिऊताई दाणे
रचना किती सुंदर चिऊताई दाणे खात आहेत हे दृश्य.
पिवळी अबोली आणि पिवळा गुलाब

ह्याच नाव विसरले. टिनाला माहीत असेल.

गुलाबी गुलाब

हा फोटो माझ्या पाच वर्षाच्या मुलीने काढला तिला हे आवडल म्हणुन. आंब्याच्या पानांना हा रंग आला आहे.

http://wildedibles.teriin.org
http://wildedibles.teriin.org/
ही साईट बघा. पश्चिम घाटातील (गुजरातमधील तापीच्या खोर्यापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेला) खाण्याजोग्या वनस्पतींचे ऑनलाईन संग्रहालय आहे. मराठी, इंग्रजी व हिंदीतून त्या त्या वनस्पतीला काय म्हटले जाते, वनस्पतीचा कुठला भाग खाण्यायोग्य आहे वगैरे भरपूर माहिती आहे.
मस्त फोटो रचना..
मस्त फोटो रचना..
ह्याच नाव विसरले. टिनाला माहीत असेल.>> रेड कॅलेंकोई उर्फ डिसेंबर फ्लॉवर..
सुरेख प्रचि जागुताई. पिवळी
सुरेख प्रचि जागुताई. पिवळी अबोली काय मस्त आहे.. मला पण हवी.
रचना ही अबोली मला साधनाने
रचना ही अबोली मला साधनाने दिली होती. बहुतेक ह्याची फांदी जगत असावी. बाजूला रोपे उगवतात. पण माझ्याकडे अजून उगवलेले नाही.
ह्याला बी धरत नाही.
सर्वच फोटो मस्त.
सर्वच फोटो मस्त.
माझ्या पाच वर्षाच्या मुलीने
माझ्या पाच वर्षाच्या मुलीने काढला तिला हे आवडल म्हणुन.>>>>> बडे मियां सो बडे मियां छोटे मियां सुभानल्ला!
Ok जागुताई. बघते कुठे नर्सरी
Ok जागुताई. बघते कुठे नर्सरी मध्ये मिळाली तर.
(No subject)
आईच्या बागेत हे फूलझाड आपणहून आले.बहुदा तण असावे.पाने भोपळ्याच्या पानांसारखी आहेत.नाव माहित आहे का?
(No subject)
Pages