सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला.
सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
मनिम्याऊ,
मनिम्याऊ,
धन्यवाद! २-४ दिवसांत परत जाऊन पहाते.
हिरवी अबोली रानफुलात येते.
हिरवी अबोली रानफुलात येते. आमच्या वाडीत कंपाउंडला उगवायची.
सुप्रभात.
सुप्रभात.

१) २) ३) ४)
१)

२)

३)

४)

जागू, तुझा हा गुलाब मला
जागू, तुझा हा गुलाब मला लहानपणात घेऊन गेला.

शाळेत अशी गावठी तुलाबाची रोपं होती. त्याला फुल फुललं , की सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे असायचं . शनीवारी सकाळची शाळा. मग पहिले २/३ तास झाल्यावर , मोठ्या वर्गातल्या मुलांना वर्ग सारवावे लागतं. ते झाले की सगळे घरी जात. मी मात्र वडीलांबरोबर घरी जाण्यासाठी थांबलेली असे. मग कधीतरी "दादांना" विचरून फुल काढायला मिळे. काय सुगंध असायचा. वा!
शोभा मस्त आठवणी. १) २) ३)
शोभा मस्त आठवणी.
१)

२)

३)

मस्त फोटो जागू...
मस्त फोटो जागू...
छान आठवण शोभा.
सर्वच फोटो फार सुरेख.
सर्वच फोटो फार सुरेख.
इथे कोणी दिनेशदा यांच्या
इथे कोणी दिनेशदा यांच्या संपर्कात आहे का? त्यांना एक निरोप द्यायचा होता - डॉ. मृदुला दाढे-जोशी यांच्या 'रहें ना रहें हम' या आगामी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी रोहन प्रकाशनाच्या संकेतस्थळावर (http://www.rohanprakashan.com/) सुरू झाली आहे. त्यांनी मला याविषयी विचारले होते. त्यांना हा निरोप देता आला तर मी आभारी राहीन!
तुझा निरोप पोहचवला मी
तुझा निरोप पोहचवला मी जिज्ञासा ..
टीना, अगं किती पटकन काम केलेस
टीना, अगं किती पटकन काम केलेस तू! मनापासून आभार
अगं आभार काय त्यात
अगं आभार काय त्यात
जीवामृत आणि शेणखत घालून
जीवामृत आणि शेणखत घालून केलेली मशागत.

वांगी
भेंडी

१)
२)

गवार

१)
२)

मिरची

१)
२)

कसली तरारलीए रोपं
कसली तरारलीए रोपं
सगळ्या गप्पा फोटो मस्तच
सगळ्या गप्पा फोटो मस्तच
या सिझन चे शेवटचे फुल..
या सिझन चे शेवटचे फुल..
वॉव सायु,मस्त फोटो!
वॉव सायु,मस्त फोटो!
माझ्याकडल्या मोगर्यालापन
माझ्याकडल्या मोगर्यालापन चिक्कार कळ्या लागल्या आहेत..
सायु तुझी भरतकामाची कला आणि
सायु तुझी भरतकामाची कला आणि रोज फुले सजवण्याची कला दोन्ही सुंदर.
साधनाकडून आणलेलं अडेनियम

फुल टू जेलस जागू, मला अशा
फुल टू जेलस जागू, मला अशा स्वतःच्या हाताने भाज्या करायला आवडतात.
सर्वांचे सर्वच फोटो फार गोड.
जोरदार पावसामुळे मी लावलेल
जोरदार पावसामुळे मी लावलेल हदग्याच झाड पडल.
गवारीची रोपे जमीनीवर पडली होती. काल त्या सगळ्यांना काठीचा आधार देऊन बांधल.
ओहह अरेरे, असं नको व्हायला.
ओहह अरेरे, असं नको व्हायला.
नमस्कार निगकर!
नमस्कार निगकर!

सुस्नात गुलाब झकास आहे.गुलाब
सुस्नात गुलाब झकास आहे.गुलाब धरणारा हातही किती मृदू आहे!
रविवारी इथे भरपूर पाऊस पडला.अशावेळी पक्षांची दया येते.कबुतरांच्या त्रासाला कंटाळून ग्रीलला जाळी बसवून घेतल्यामुळे येणार्या साळुंक्या आणि कावळयांची पंचाईत झाली.दुपारी मी वाचत असताना साळुंक्या ग्रीलवर डुलक्या काढायच्या.ते मी फार मिस करतेय.नेहमीच्या सवयीने कावळा पाण्यासाठी आला तर त्यालाही बंदी! चुकार बुलबुल येऊन जायचे तेही आता बंद.खरेतर आमच्याच घराचा पिंजरा या कबुतरांपायी झालाय.
काल वार्यामुळे अशोकाची झाडे बेफाम हलत होती.एका अशोकाला तर छोट्या जांभळाच्या आकाराच्या फळांचे घोस लटकलेले आहेत.अजून हिरवे आहेत.ती फळे पक्षी खातात का?
अरे वा! काय सुंदर धागा आहे!
अरे वा! काय सुंदर धागा आहे! प्रसन्न वाटले एकदम. मी माझे काही फोटो टाकू शकतो का येथे?
Shalee,ka nahee? Taka photo.
Shalee,ka nahee? Taka photo.
शोभा किती गोड गुलाब.
शोभा किती गोड गुलाब.
आमच्या सोसायटीच्या बागेत
आमच्या सोसायटीच्या बागेत यावेळी बहावा (गोल्डन शॉवर) नावाप्रमाणेच खुप बहरला आहे. नेहमी दुरुन फोटो काढतो पण यावेळी काही फोटो अगदी जवळून काढले.


प्रचि. १
प्रचि.२
मस्त फोटो शाली!
मस्त फोटो शाली!
शोभाताई, गुलाब एकदम झकास..
शोभाताई, गुलाब एकदम झकास.. खुप खुप छान.
Pages