सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
पुण्यामध्ये रक्तरोहनचे झाड
पुण्यामध्ये रक्तरोहनचे झाड कुठे आहे कोणी सांगू शकेल का? त्याची फुले/फळे अगदी लाकडी असल्यासारखी दिसतात. मला dry flower arrangement करिता हवी आहेत.
लहानपणी नागपूरला असताना अंबाझरी तलावाच्या काठी याची खूप झाडे होती. उन्हाळ्यात सकाळी आम्ही मैत्रिणी ती फुले गोळा करायला जायचो. आता तिथे एकही झाड नाही.
शोभा खुप सुंदर फोटो गुलाबाचा.
शोभा खुप सुंदर फोटो गुलाबाचा.
सध्या अनंत छान बहरत आहे.

कांचनलाही चांगला बहर आहे.

काल तिन ब्रम्हकमळ म्हणून चुकीचे नाव पसरलेले कॅकटस फुलून गेले. आम्ही बघायलाच विसरलो काल. आज पण फुलतील.
जागुताई मस्तच..
जागुताई मस्तच..
अनंत खुप खुप छान !
आजच्या झी मराठी दिशा
आजच्या झी मराठी दिशा साप्ताहिकात प्रकाशीत झालेला माझा लेख. सविस्तर नंतर माबोवर टाकेनच.

जागूताई दोन्ही फोटो भारीचे!
जागूताई दोन्ही फोटो भारीचे! कांचनचा फोटो पोर्ट्रेट ऐवजी लँडस्केपमध्ये काढला असता तर अजून छान दिसला असता.
अरे वा काय मस्त धावतोय धागा..
अरे वा काय मस्त धावतोय धागा...;)
शोभा गुलाब टवटवीत..
शाली, बहावा मस्तच टिपलायत!
मनीम्याऊ, कमळाचे फोटो कमाल.... तुम्ही नागपूरच्या का? रक्तरोहन, नागपूरला महाराज बागेत आहे.
जागु सगळेच फोटोज भारी.
रक्तरोहनचा पत्ता दिल्या बद्दल
रक्तरोहनचा पत्ता दिल्या बद्दल धन्यवाद सायुताई. मी पक्की नागपुरीच.
येत्या नागपूर भेटीत महाराज बागेला भेट द्यायलाच हवी.
हे रक्तरोहन काय आहे? प्लिज
हे रक्तरोहन काय आहे? प्लिज फोटो द्या ना.
रक्त रोहन : Indian redwood
रक्त रोहन : Indian redwood tree, Soymida febrifuga.
2. dried फुले (फळे?)

१००० चं अभिनंदन!
१००० चं अभिनंदन!

येत्या नागपूर भेटीत महाराज
येत्या नागपूर भेटीत महाराज बागेला भेट द्यायलाच हवी.+ नागपूरला आलीस की कळव.. सोबतच जाउया माहाराज बागेत.:)
माझ्याकडे एक जुईच भारतातुन
माझ्याकडे एक जुईच भारतातुन आणलेला वेल आहे. तो आता ५ एक फुट लांब झाला आहे. पण त्याला एकही फुल नाही. विकत आणल तेंव्हा खुप फुल होती. काय करता येईल? सिंगापुरात मोगरा साधारण बारामहिने फुल देतो. जुई बरोबर जाई पण आणली आहे. त्याला ५/६ फुल येउन गेली. पण मग काही नाही. दोन्ही झाड १ वर्ष जुनी आहेत. प्लीज सांगा.
जागू अभिनंदन.
जागू अभिनंदन.
सर्व फोटो मस्तच. मोगरा फुलला आहाहा.
आमची गॅलरी!
आमची गॅलरी!

मस्त शोभा.
मस्त शोभा.
शोभा मोगर्याच्या शुभेच्छा
शोभा मोगर्याच्या शुभेच्छा आणि तुझी गॅलरी दोन्ही मस्त.
Curiosity म्हणून..
Curiosity म्हणून..
हे फूल नक्की कसलं आहे?
मला कोणी सांगेल का?
माझ्याकडे एक जुईच भारतातुन आणलेला वेल आहे. तो आता ५ एक फुट लांब झाला आहे. पण त्याला एकही फुल नाही. विकत आणल तेंव्हा खुप फुल होती. काय करता येईल? सिंगापुरात मोगरा साधारण बारामहिने फुल देतो. जुई बरोबर जाई पण आणली आहे. त्याला ५/६ फुल येउन गेली. पण मग काही नाही. दोन्ही झाड १ वर्ष जुनी आहेत. प्लीज सांगा. >>> मला कोणी सांगेल का?
आभा,
आभा,
तुमची जुई कुंडीत असेल तर कुंडी मोठी आहे याची खात्री करा.खत घालत असालच.जुईबरोबर काही वेळ काढा/तिच्याबरोबर मायेने बोलत जा.अंगावरुन हात फिरवा.अगदीच वेळ नसेल तर दिवसभरात चहा वगैरे जुईशेजारी बसून प्या.
हा maazaa आणि एका परिचिताचा अनुभव आहे.
माझ्या जुईला अगदीच कमी फुले येत असत .तिची जागा बदलली.नवरा रोज काहीवेळ जुईशेजारी उभा राही.आधीपेक्षा बरीच फुले यायची.parichitaanchyaa जुईचे तर गजरे होत असत.त्यांनी ती एका छोट्या पिम्पात लावली होती.
जागूताई, नविन धागा काढा २०१८
जागूताई, नविन धागा काढा २०१८ साठी.
देवकी, अगदी योग्य सल्ला.
देवकी, अगदी योग्य सल्ला. माझाही अनुभव काहीसा असाच. टेरेसमधल्या बागेची जबाबदारी माझी असते. कामानिमित्त पंधरा दिवस बाहेर होतो तेंव्हा बायकोने व्यवस्थित काळजी घेऊनही मोगरा पुर्ण कोमेजला होता. हा प्रकार दोन तिन वेळा झाला तेंव्हा लक्षात आले. आता बायकोही कुठे पिवळे पान काढ, पाणी स्प्रे करून पाने साफ कर वगैरे करते. हे खरच महत्वाचे आहे.
कऊ ते जेरेनियम आहे.
कऊ ते जेरेनियम आहे.
आभा, खत घालून पहा जुइला . कॅल्शियम दिल्याने पण फरक पडेल असे वाटते - अंड्याची सालं , ऑयस्टर शेल्स, बोन मील, यातलं काही
जमणार नसेल तर दोन -चार ट्म्स टॅबलेट्स कुटून घाला.
धन्यवाद मेधाजी
धन्यवाद मेधाजी
इथे मी अधूनमधून पोस्टी
इथे मी अधूनमधून पोस्टी वाचायला येते. आज प्रथमच एक प्रश्न/शंका विचारते आहे :
मैत्रिणीकडून जांभळ्या आणि पांढर्या गोकर्णीच्या बिया आणून कुंडीत लावल्या होत्या. एकाच कुंडीत थोड्या थोड्या अंतरावर पांढर्याच्या ३ आणि जांभळ्याची १.
पांढर्या गोकर्णीचे २ छान कोंब फुटले. त्यातला एक वेल जोमाने वाढला. त्याला आधी काठीचा आणि नंतर दोरीचा आणि बाल्कनीच्या ग्रिलचा आधार दिला. बघता बघता वेल पाच-एक फूट वाढला आणि नंतर मात्र पार सुकून गेला. जेमतेम दीड-दोन महिन्यात हे सगळं झालं.
जांभळ्या गोकर्णाला कोंब फुटला, तो बोटभर वाढला आणि तसाच सुकून गेला.
आता आणखी एका पांढर्याचा कोंब आला आहे, पण तो देखील वाढेलसं वाटत नाही. आणखी एक पांढर्याची बी आता मातीखाली आहे.
हे कशामुळे झालं असेल?
बाल्कनीत सकाळच्या वेळात ऊन असतं. इतरही ३-४ कुंड्या आहेतच.
नर्सरीतून खत आणलंय. त्याच्या पॅकवर दिलेल्या सूचनांनुसार ते घालते. कुंडी मोठी आहे. उन्हाळ्यात रोज पाणी घालत होते.
वरती म्हटलंय तसं रोज सकाळची कॉफी झाडांशेजारी बसून पिते. रविवारचा नाश्ताही तिथेच असतो माझा. अधूनमधून पाणी स्प्रे करून सगळी पानं स्वच्छ करते. एकेका पानांना अलगद बोटांनी उचलून निरखायला, त्यांची रचना पाहायलाही मला खूप आवडतं. नवीन कोंब फुटले की प्रचंड आनंद होतो. तरी वेल सुकल्यामुळे खूप वाईट वाटतंय.
नेटवर जरा शोधाशोध केली तर गोकर्णीला न्युट्रल माती लागते असं कळलं. मग वाटलं, माती अॅसिडिक झाल्याने असं झालं असेल का?
कशामुळे अॅसिडिक होऊ शकते काही कल्पना नाही.
स्वयंपाकघरात भाज्या, पालेभाज्या धुतल्या की ते पाणी ओतून देण्याऐवजी मी अनेकदा कुंड्यांमध्ये घालते. त्यामुळे तर असं झालं नसेल?
ललिता-प्रीति
ललिता-प्रीति
वेल पूर्न वाळून गेलाय का? नसेल तर कट करून पहा.कोंब येऊ शकतात का?
देवकी, वेल पूर्ण वाळून गेलाय.
देवकी, वेल पूर्ण वाळून गेलाय.
नवा आलेला कोंबही मेला.
नवा आलेला कोंबही मेला.>>>
नवा आलेला कोंबही मेला.>>> अरेरे.असो त्या वेलाचे आयुष्य तेवढेच असावे बहुदा.
माझाही मोगरा रुसून आहे.पण त्याची कुंडी खूप वर असल्याने मी तिथे पोहोचू शकत नाही.दुसरा मोगरा आणि मदनबाण फक्त तरारले आहेत.गोमूत्र डायल्युट करून घातले.या मोसमात एकही फूल नाही.
सोनचाफ्याला वर्ष झाले. नुसताच वाढतो आहे.माळ्याने कलम आणून दिले होते.सोनचाफ्याला किती वर्षांनी फुले येतात?
कढीलिंबाच्या कुंडीत छोटे छोटे शंख झाले आहेत.आज पाहिले तर दुसर्या कुंडीतही आहेत.ते तसेच राहू द्यायचे की त्यावर काही उपाय आहे? शंख पानांवर नाहीत.कुंडीमधल्या मातीत आहेत.
स्वयंपाकघरात भाज्या,
स्वयंपाकघरात भाज्या, पालेभाज्या धुतल्या की ते पाणी ओतून देण्याऐवजी मी अनेकदा कुंड्यांमध्ये घालते. त्यामुळे तर असं झालं नसेल?
मी मासे धुतलेले पाणी घालते. पण अशा भाज्यांचे पाणी घालून नाही होणार अस. कारण मी तर साफ केलेल्या पालेभाज्याही कुंडीत टाकते.
माती बदलून बघ.
ओहह ललिता-प्रीती . असं नको
ओहह ललिता-प्रीती
. असं नको व्हायला.
गोकर्ण उलट मला गुणी रोप वाटतं, फार नखरे नसणारे आणि सहज कसंही, कुठेही वाढून फुलं देणारे. फार लाड नाही करावे लागत, असा स्वानुभव
अंजू, हे तुझ्यासाठी. :)
अंजू, हे तुझ्यासाठी. :)
Pages