पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच सिलिकॉन चॉकलेट मोल्ड खरेदी केलाय पण चॉकलेट कसे बनवावे ते माहित नाही प्लीज़ याबद्दल माहितीचा धागा कोणी देऊ शकेल का

कुठल्याही चांगल्या किराणा मालाच्या दुकानात मिळायला हवा.
साधा खडा हिंग रु. २०/- ला १०ग्रॅम तर हिरा हिंग ४०/५०रु. ला १० ग्रॅम असा भावात फरक आहे. याचे खडेच मिळतील, पावडर हिरा हिंग सहसा कुणी ठेवत नाही.
हिरा हिंगाचा तूरडाळीच्या दाण्याहून अर्धा तुकडा खाऊन पाहा; जिभेला चांगलंच जाणवतं; सुया टोचल्याप्रमाणे तिखट लागतं; हिंगाचा स्वाद, झणका आणि सुवास जाणवतो.

धन्यवाद योकु पण हिरा हिंग म्हणल्यावर दुकानदार खडा हिंगचं दाखवतात. मी मागे मार्केट यार्डातून आणायचे पण आता तिकडे जाणं होत नाही. मंडई जवळ बघावा लागेल.

O.K

माझी बाई एकीकडे काम करीत असे,त्यांच्याकडे म्हणे हिंगाचे तुकडे पिळून,फोडणीत टाकत.तो हिंग ते इंदूरवरुन आणत.हिरा हिंग,अशाप्रकारे वापरतात का?

ओली हळद + आंबे हळद ( ओली) दोन्ही मिळुन पाव किलो आहे. याचं लोणचं कस करतात? किंवा बाकी कशासाठी वापरता येइल?

ओल्या हळदीचं लोणचं कधी तरी खाल्लं होतं, फारच आवडलं होतं. पण आंबे हळद सुद्धा खातात का? बाकी लोणच्यासारखं हळदीचं लोणचं रोज खाल्लं तर चालतं कि उष्णता / पिंप्ल्स असं काही होइल?

आंबे हळद, ओली हळद आणि आले साधारण समप्रमाणात घेऊन त्याच्या पातळ काचर्‍या किंवा जुलिएन्स ( मॅच स्टिक ) करायचे. नीट मिसळून चबीपुरते मीठ आणि सर्व चकत्या बुडतील एवडा लिंबाचा रस घालायचा. मी फ्रीजमधे ठेवते. ७-८ दिवस तरी नीट रहाते. ह़ळद आणि आंबेहळद नीट कोरडेच फ्रीज मधे ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकतात. त्यामुळे एका वेळेस थोडे थोडेच लोणचे करुन ठेवू शकता.

थंडीच्या दिवसात मुंंबैत आणि इथे पण बरेचदा असतं घरात. मला तरी उष्णता किंवा पिम्पलस चा त्रास जाणवला नाही. ( थंडीच्या दिवसातच दोन्ही प्रकार मिळतात म्हणून थंडीच्या दिवसात. बाकी काही कारण नाही )

मेधा, मीही सेम असेच करते. खूप सुंदर लागते हे लोणचे चवीला. विशेषतः ओली हळद खूप मस्त लागते. ऐशु ओली हळद वेचून खाते व बाकीचा मसाला माझ्यासाठी ठेवते Happy

मॅगी, मेधा - थँक्स ! दोघींच्या रेसिपीमधले घटकपदार्थ घरात आहेतच, त्यामुळे उत्साह असताना आजच करुन पाहीन.

मेधा, आता हवेत थोडी उष्णता जाणवायला लागली आहे, तरीही रोज लोणचं खाल्लं तर पिंप्ल्स येतील अशी भीती आहे. पण जीभेवर कंट्रोल ठेवुन प्रमाणात खाईन.

रश्मी थँक्स!
शोध हे सदरच काढुन टाकल्याने लय गोंधळ झालाय राव. > खरच.

शोध हे सदरच काढुन टाकल्याने लय गोंधळ झालाय राव. >>> असं णायीये. टेक्स्ट विंडो (म्हणजे याच ठिकाणी), जे सर्च करायचंय ते टाईपा आणि मग चोप्य पस्ते त्या वरच्या सर्च बॉक्सात करा,...

असं णायीये.

<<

असंच आहे.

पूर्वीची कष्टपूर्वक तयार केलेली व अत्यंत वर्सेटाईल व उत्तम शोध सुविधा चक्क कटवलेली आहे. मला त्या फीचरचे नेहेमीच कौतुक वाटत असे. कारण दुसर्‍या कुठल्याच साईटवर अशी (इतकी पॉवरफुल व अ‍ॅक्युरेट) सुविधा नव्हती. यासोबतच धाग्याखालचे कीवर्ड्स उडवून टाकलेत तरी चालतील, असे मला तरी वाटते. कारण स्वतःची शोधसुविधा नसल्याने बहुतेक त्याचा रिलेव्हन्स उरलेला नसावा आता.

सध्या जो आहे तो गूगलचा अगदीच जनेरिक कस्टम सर्च आहे. मी आत्ताच "मिनिमलिस्ट चिकन मायबोली" नॉर्मल गूगल सर्चवरून करून धागा शोधला.

... आधीची शोधसुविधा येईल का परतून?

Pages